✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता
  • नवीन लेखन
  • पाककृती
  • भटकंती
  • विशेषांक

हमारा स्टेशन हमारी शान

व
वेल्लाभट यांनी
Wed, 10/05/2016 - 18:26  ·  लेख
लेख
'बोरीवली स्टेशनचा कायापालट' अशा शीर्षकाची बातमी वाचली तेंव्हाच ठरवलं होतं की आपण अशा कामात भाग घ्यायचा. त्यानुसार लगेच माहिती काढली आणि एम ए डी (मॅड) म्हणजेच मेक अ डिफरन्स फाउंडेशनबद्दल कळलं. मग काही दिवसानंतर डोंबिवली स्टेशनच्या रंगरंगोटीचे फोटो बघितले. आतुरता अजूनच वाढली. हे सगळं होऊन गेल्यावरच का कळतंय, आगोदर का नाही असं वाटायला लागलं. दरम्यान द अगली इंडियन, हरितस्पर्श, हरियाली इत्यादी अनेक संस्थांशी संपर्क करून काही उपक्रम आहेत का याची माहिती घेत राहिलो. मग मेक अ डिफरन्स आणि मुंबई फर्स्ट या दोन संस्था संयुक्तपणे मुंबईच्या अनेक स्टेशनांचं सुशोभिकरण करणार असल्याची बातमी वाचली आणि मुंबई फर्स्ट च्या साईटवर जाऊन मी माझा स्वयंसेवा करण्याचा मानस नोंदवला. आता संधी मिळेल हे जवळजवळ नक्की होतं. मेल आली, पुढे कस्कायच्या ग्रूपमधे अ‍ॅड झालो आणि 'टीम' चा भाग झालो. हमारा स्टेशन हमारी शान. या उपक्रमाबाबत बर्‍याच जणांनी वाचलं असेल एव्हाना. पेपर, रेडियो, सोशल मिडियाच्या माध्यमातून भरपूर प्रचार होतो आहे आणि भरपूर स्वयंसेवकांचा प्रतिसादही मिळतो आहे. अनेक कलाकार, अनेक संस्था आपापल्या परीने याला हातभार लावत आहेत. २ ऑक्टोबर ते ८ ऑक्टोबर चालणार्‍या या उपक्रमात फूल न फुलाची पाकळी म्हणून थोडं काम करायची संधी मला काल मिळाली. माझ्यासोबत दोन आणखी जणांना घेऊन मी दादर स्टेशनच्या सुशोभिकरणाच्या कामात खारीचा वाटा उचलला. अनुभवकथन करायला बराच वेळ लागेल, परंतु अनुभव अतिशय आनंद देणारा, समाधान देणारा होता. कित्येक लोक, मोठेमोठे कलाकार आपापली कामं, जबाबदार्‍या सांभाळून यात भाग घेतायत, अनेक जण सहपरिवार इथे येऊन स्वयंसेवा करतायत. आपलं शहर सुंदर दिसावं हा उद्देश फक्त महत्वाचा आहे आणि त्यासाठीच हा प्रयत्न आहे. रात्रीच्या एक वाजता जेंव्हा आमचा २०-२५ जणांचा एक गट आपापलं सामान आवरून आज झालेलं सगळ्यांचं काम बघतो, तेंव्हा काहीतरी चांगलं केल्याचा, एकत्र आल्याचा आनंद मिळतो आणि तो काल मी अनुभवला. यात मी काहीच्च खरं तर केलेलं नाही पण हा धागा इथे टाकण्याचं कारण इतकंच की अजून तीन दिवस आहेत आणि स्वयंसेवकांची गरज आहेच. तेंव्हा मुंबई-ठाण्यात राहणार्‍या मिपाकरांना यात सहभागी व्हायचं असेल तर जरूर व्हा असं सुचवेन. चित्रकला चांगली असणं, इत्यादी अटी नाहीत फक्त इच्छा आणि उत्साह हवा आहे. तेंव्हा इच्छुकांनी http://mumbaifirst.org/participate-in-hamara-station-hamari-shaan-initiative/ या लिंकवर आपला सहभागी होण्याचा मानस नोंदवा, म्हणजे पुढील उपक्रमांच्या आधी ते तुमच्याशी संपर्क साधतील. काही छायाचित्रः 1 2 3 अस्मादिक 4 आम्ही ज्यावर काम केलं तो फलक (काम अपूर्ण आहे)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
राहती जागा
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
सद्भावना
बातमी
अनुभव
शिफारस

प्रतिक्रिया द्या
7953 वाचन

💬 प्रतिसाद (22)

प्रतिक्रिया

फार स्पृहणीय काम. फारच छान!

एस
Wed, 10/05/2016 - 22:39 नवीन
फार स्पृहणीय काम. फारच छान! वाचून आनंद आणि अभिमान वाटला.
  • Log in or register to post comments

+१००

अजया
गुरुवार, 10/06/2016 - 08:45 नवीन
असेच म्हणते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मस्त उपक्रम!

रातराणी
Wed, 10/05/2016 - 23:18 नवीन
मस्त उपक्रम!
  • Log in or register to post comments

+१

पद्मावति
Wed, 10/05/2016 - 23:38 नवीन
+१
  • Log in or register to post comments

एक नंबरचे काम आहे हे !

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 10/05/2016 - 23:41 नवीन
एक नंबरचे काम आहे हे ! अभिनंदन !!
  • Log in or register to post comments

चांगले काम आहे. लगे रहो......

रेवती
Wed, 10/05/2016 - 23:50 नवीन
चांगले काम आहे. लगे रहो.......
  • Log in or register to post comments

खूप छान काम...मी उपलब्ध

खटपट्या
गुरुवार, 10/06/2016 - 00:16 नवीन
खूप छान काम...मी उपलब्ध असल्यास आपणास कळवेन
  • Log in or register to post comments

खतरनाक !! नुसतंच सरकारच्या

स्रुजा
गुरुवार, 10/06/2016 - 01:43 नवीन
खतरनाक !! नुसतंच सरकारच्या नावाने खडे न फोडता, स्वतः पुढाकार घेऊन काही तरी बदल आणण्याची कृती खुप आवडली. परवाच पार्ले स्टेशन चे फोटो पाहिले. ते ही काम जबरदस्त झालंय ! तुम्हाला खुप शुभेच्छा आणि कौतुक..
  • Log in or register to post comments

+११

पिलीयन रायडर
गुरुवार, 10/06/2016 - 04:19 नवीन
+११ असंच म्हणते! पुढाकार घेऊन काम केलंत हे फार आवडलं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्रुजा

उपक्रम एकदम आवडला आणि तुम्ही

सही रे सई
गुरुवार, 10/06/2016 - 02:50 नवीन
उपक्रम एकदम आवडला आणि तुम्ही त्यात स्वतः प्रयत्न करून सहभागी झालेला आहात त्या बद्दल तुमचं अभिनंदन.
  • Log in or register to post comments

खाइके पान बनारसवालाछाप गाणी

कंजूस
गुरुवार, 10/06/2016 - 04:41 नवीन
खाइके पान बनारसवालाछाप गाणी ब्यान करा.सगळ्या स्काइवॅाकची परिस्थिती काय आहे? किती धुणार?
  • Log in or register to post comments

+१

वरुण मोहिते
गुरुवार, 10/06/2016 - 10:22 नवीन
मस्त उपक्रम
  • Log in or register to post comments

मस्त आप्ला

नाखु
गुरुवार, 10/06/2016 - 15:17 नवीन
खारीचा वाटा सुद्धा उचलला तरी मस्तच आहे.
  • Log in or register to post comments

मस्त उपक्रम

कविता१९७८
गुरुवार, 10/06/2016 - 15:20 नवीन
मस्त उपक्रम
  • Log in or register to post comments

सगळ्यांचे अनेक आभार.

वेल्लाभट
गुरुवार, 10/06/2016 - 23:44 नवीन
सगळ्यांचे अनेक आभार. उपक्रमाबद्दल जरूर वाचा असं सुचवेन. नुसतं बसून शिव्या देतोच आपण इतर वेळी. इथे अनेक जण एकत्र तर येतायत हे काय कमी आहे? आणि विधायक कार्य होतंय. त्यामुळे यातच पहिलं यश आहे. पुढे बघू काय होतं. काय कंजूसभाऊ! स्कायवॉक जिथे खराब झालेत तिथून जाताना कुणी कचरा टाकताना दिसलं, थुकताना दिसलं तर अडवता, समजवता येतं का बघा पुढच्या वेळी. ओघाने आलं म्हणून सांगतो मी हे सतत करतो जिथेजिथे म्हणून शक्य होईल तिथे तिथे थांबून, थांबवून सांगतो. काही ऐकतात, काही उलट बोलतात; चालायचंच. आपण करावं, आपलं समाधान.
  • Log in or register to post comments

छान! लेख आणि हा प्रतिसादही

रुपी
Fri, 10/07/2016 - 06:35 नवीन
छान! लेख आणि हा प्रतिसादही फार आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

टाळ्या...

अत्रुप्त आत्मा
Fri, 10/07/2016 - 06:05 नवीन
टाळ्या...
  • Log in or register to post comments

ऐहिक उपक्रम

चौकटराजा
Fri, 10/07/2016 - 07:57 नवीन
आपल्याकडे ऐहिक उपक्रमापेक्षा भावनिक उपक्रमांकडे लोकांचा ओढा अधिक आहे विशेशतः स्त्री वर्गाचा. सद्या एक रंगाच्या साड्या नेसून तात्पुरते ग्रूपला एक नाव द्यायचे व फोटो छापून आणायचा यापेक्षाही आपल्या या तथाकथित ग्रूपने वर्षात काय भरीव कार्य केले याचे उत्तर बहुधा शून्य असे असते. सोसायटीत घाण पडलेली असते पण स्त्री वर्गाने एक्त्र येऊन सफाई केल्याचे मी तरी पाहिलेले नाही पण भोंडला मात्र न चुकता करायचा असा प्रकार असतो. वरील उपक्रम पाहून सर्वच सरकारने करायचे असते या खास " भारतीय " कल्पनेला छेद जात आहे याचे मनापासून कवतिक.
  • Log in or register to post comments

आपल्याकडे ऐहिक उपक्रमापेक्षा

वेल्लाभट
Fri, 10/07/2016 - 07:59 नवीन
आपल्याकडे ऐहिक उपक्रमापेक्षा भावनिक उपक्रमांकडे लोकांचा ओढा अधिक आहे
स्पॉट ऑन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

माझा देखील खारीचा वाटा होता.

ज्योति अळवणी
Sat, 10/08/2016 - 16:24 नवीन
माझा देखील खारीचा वाटा होता. खरच स्पृहणीय उपक्रम आहे हा. शक्य असेल त्याने शक्य असेल तसे काही ना काही करावं अस मला वाटत.
  • Log in or register to post comments

आज ठाणे स्थानकात पण सुशोभिकरण पाहिलं.....

माम्लेदारचा पन्खा
Sat, 10/08/2016 - 18:55 नवीन
काम उत्तम आहे..... परंतु जितका जीव लावून स्वयंसेवक काम करीत होते तितक्याच किंबहुना दुप्पट वेगाने आपलं "बंबईया पब्लिक" त्याची वाट लावेल हा विचार करुन मन खिन्न झालं....
  • Log in or register to post comments

मस्त उपक्रम!

प्रसाद_१९८२
Sun, 10/09/2016 - 11:05 नवीन
मस्त उपक्रम!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा