सर्किटची मेख (अर्थात लघुकथास्पर्धा)

आंबोळी's picture
आंबोळी in जे न देखे रवी...
27 Sep 2008 - 10:54 am

हे विडंबन नाही. आम्ही फक्त प्राजुच्या संयमाची रेघ या सुंदर कवितेवरुन प्रेरणा घेतली आहे.

आदितीचा 'पाय' होता 'ब्रह्मकुमारी' विप्रंची
आंबोळ्याची 'नाडी' होती मनिषची 'लक्ष्मी'

कर्णाची 'थंडी' होती होती जरी अजब ती
धनंजयाचा 'कंस' तो करी किती 'हाराकिरी'!

आत्महत्या करुन गेला ऋषिकेशाचा शेतकरी
आयुष्यातून उठून गेला पेठकरांचा टॉमीही

मासेमारीचे गूज सांगे टारु हा माउंटब्युकी
मारतो माणसे आता चतुरंगाचा बिबटाही!

बाजी मारली पार्टनरनी पुरस्कारही घेतला
मिपाकरांची परिक्षा घेत आहे सर्किटही!

-------------------------------------------
कंदीलसुमार २७-०९-२००८

कविताविडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

27 Sep 2008 - 10:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अरे सही!
आणि सुरुवातच माझ्या नावानी (थोडं चुकलं आहे, आ नाही अदिती आहे मी) मग कविता मस्तच असणार! ;-)

अदिती

अभिज्ञ's picture

27 Sep 2008 - 10:20 pm | अभिज्ञ

लघुकथास्पर्धेची थीम वापरून
केलेले विडंबन/काव्य आवडले.
:)
(प्रतिसाद_मात्र) अभिज्ञ.

प्राजु's picture

28 Sep 2008 - 5:03 am | प्राजु

आंबोळ्या.. लय भारी रे..!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चतुरंग's picture

28 Sep 2008 - 6:31 am | चतुरंग

कविता मस्तच आंबवली आहेस! ;)

चतुरंग

धनंजय's picture

28 Sep 2008 - 7:33 am | धनंजय

कोई जीता कोई हारा (किरी)

(कंसातला) (धनंजय)