माझ्या मनातला एक ना-पाक प्रश्न
खरडफळ्यावर आदूदादूंनी पाकिस्तानी अभिनेत्यांनी काम केलेल्या हिंदी चित्रपटाविषयी एक प्रश्न विचारला आहे. त्यावरून हे विचार मनात आले.
पाकिस्तानी अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित न होऊ देणं वगैरे ठीक आहे. पण १.जे आधीच प्रदर्शित झालेले चित्रपट आहेत त्यांच्या टीव्ही प्रसारणाचं काय? बंदी तर त्यावरही आणायला हवी. आतिफ अस्लमने गायलेली गाणी चालतात पण पाकिस्तानी अभिनेते चालत नाहीत, हा दुटप्पीपणा आहे. २.बंदीच घालायची तर सगळ्या पाकिस्तानी कलाकारांवर घालायला हवी. उदाहरणार्थ कुठल्याही music shop मध्ये गुलाम अली, मेहदी हसन, आबिदा परवीन, फरिदा खानम,राहत फतेह अली खान, नुसरत फतेह अली खान यांचे आल्बम ठेवता कामा नयेत. कुठल्याही संगीत स्पर्धेत ' हंगामा है क्यूं बरपा ' आणि ' रंजिशी सही ' गाणाऱ्या कलाकारांना कितीही चांगले गायले तरी स्पर्धेबाहेर फेकून द्यायला हवं. इथे मिपावर ' छाप तिलक सब छीनी रे ' वर आलेला लेख काढून टाकायला हवा.
३. जो न्याय पाकिस्तानी अभिनेत्यांना,तोच इतर कलाकारांनाही. सैयोनी ऐकणं हा देशद्रोह जाहीर करायला हवा. फवाद खान आणि अली फझल यांना एक न्याय आणि राहत फतेह अली खान आणि गुलाम अली यांना दुसरा - हे कितपत बरोबर आहे? Either everybody counts, or nobody counts!व
४. रच्याकने नदीम श्रवण जेव्हा जोरात होते तेव्हा ते सर्रास पाकिस्तानी संगीतरचना उचलायचे. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांचं काय? जे जे पाकिस्तानी आहे, ते बॅन व्हायला हवं. पण पूर्वलक्ष्यी प्रभाव किंवा retrospective effect ने!
तुम्हाला काय वाटतं?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हँहँहँ... नवाज शरिफ यांच्या
अरे काय, आजच्या दिवसात शंभर
हो ना!
तुमच्याइतकी, हा शब्द अॅड करा
हो, ते राहिलंच. ;)
बरोबर आहे म्हणा, स्तुती
तेही आहेच.
कळतो की दादा, आणि तुम्ही निखळ
असो(च)!
मी माझ्यापासून सुरवात करतोय.
खटपट्या साहेब तुमच्यापासुन प्रेरणा
बोका-ए-आझम,
दांभिकपणाचं म्हणाल तर
दांभिक = ?
वाचा आणखी मिसळपाव.
नक्की कोणी बॅन केले आहे?