✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

संघः कलियुगातील एक चमत्कार

न
नर्मदेतला गोटा यांनी
Mon, 09/12/2016 - 13:26  ·  लेख
लेख
संघ आणि त्याचे टिकाकार साधारणपणे ज्या काळामधे हिंदू संघटित नव्हता विस्कळीत होता आणि तसे असणे हेच त्याच्या दुरवस्थेचे कारण आहे असे लक्षात आल्याने हिंदू समाजातला हा दोष दूर करण्यासाठी संघ संस्थापकांनी संघाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात जनतेने लगेच प्रतिसाद दिला नाही तरी हळू हळू हा विचार रुजत गेला. आज नव्वद वर्षानंतर असे लक्षात येते की हा वटवृक्ष वाढत आहे. दिवसेंदिवस संघाची वाढच होते आहे. जनमानसामधे संघाने आणि स्वयंसेवकांनी स्थान मिळवले आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे चारीत्र्य. एक पैच्यासुद्धा गैरव्यवहारामधे स्वयंसेवक सापडणार नाही हा लोकांच्या मनात विश्वास आहे. आज अनेक सेवाकार्ये चालतात. नागालँड, मेघालय अशा नॉर्थ ईस्टच्या राज्यामधे सेवाकार्ये चालतात. आदिवासी भागामधेही त्या लोकांचे दु:ख दैन्य दारिद्र्य दूर करण्यासाठी हे लोक झटत आहेत. त्यांच्यावर विश्वास असल्यानेच समाज या कार्यकर्त्यांना पाठबळ देतो. आर्थिक पाठबळही देतो आहे. समाजासाठी देशासाठी एवढ्या समर्पण भावनेने स्वतःला विसरून काम करत असतानाही विरोधकांना हे पाहवत नाही आणि कुणाच्या हत्येचे पातक संघविचारांच्या माथी मारले जाते. हा विरोधकांचा संधीसाधूपणाच म्हटला पाहीजे. इतरही अनेक क्षेत्रामधे संघ पोचला आहे. बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे आहे. उद्योजकतेमधे आहे. अगदी शेतीमधेही तो आहे आणि ग्राहक क्षेत्रामधेही आहे. खूपदा स्वातंत्र्य आंदोलनाच्यावेळी संघ कुठे होता असे विचारले जाते. पण गोवा जेव्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता त्यावेळी तेव्हाच्या केंद्र सरकारची गोवामुक्तीसाठी कोणतीच हालचाल दिसेना अशा वेळी संघ स्वयंसेवकांनीच लढा उभारून गोवा मुक्त केला. त्यासाठी लाठ्या काठ्या खाल्या. जेलमधेही गेले. पण याचे कोणीच कौतुक करत नाही. तिथली जनता मात्र हे जाणून आहे. गोव्यातल्या जनतेने संघ कार्यकर्त्यांना मंत्री, मुख्यमंत्रीपदावरही बसवलेले आहे. आज संघ विचारांचे कार्यकर्ते राजकीय क्षेत्रात आहेत. त्यांच्या हातात सत्ता आहे. पण त्या राजकीय कार्यकर्त्यांनी संघविचार बाजूला ठेवलेला नाही. इतकेच काय तर जनमानसावर इतका प्रभाव असूनही संघाने स्वतःला नेहमीच अराजकीय ठेवलेले आहे. कधी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला स्वतःला बाधून घेतलेले नाही. माळीणची भूस्खलनाची दुर्घटना असो कलकत्त्याचा पूल कोसळणे असो किंवा केदारनाथची दुर्घटना असो. संघ कार्यकर्ते तिथे मदतीला उभे राहतातच. असा समाजाचा अनुभव आहे. प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी समाजाला संघाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कोणतेच क्षेत्र स्वयंसेवकांना वर्ज्य नाही. ज्यावेळी काही राजकीय नेत्यांच्या बँका ग्राहकांचा विश्वासघात करण्यात मग्न आहेत अशा वेळी स्वयंसेवकांनी मात्र अनेक पतसंस्था बँका उभारून बँकींग क्षेत्रात जनतेचा विश्वास कमावलेला आहे आणि जनतेची त्या माध्यमातून सेवा चालवली आहे. शिक्षण क्षेत्रही स्वयंसेवकांनी काबीज केलेले आहे. इतर राजकीय नेते ज्यावेळी या क्षेत्रात येऊन शिक्षण सम्राट बनले आहेत अशा वेळी संघ स्वयंसेवक मात्र एक व्रत म्हणून शिक्षण संस्था चालवत आहेत. मोठ मोठ्या बॅका, शिक्षण क्षेत्रे ताब्यात असताना एक पैच्याही गैरव्यवहाराचा कलंक या संस्थांना लागलेला नाही. हा कलियुगातला एक चमत्कारच मानला पाहीजे. हा चमत्कार आणि स्वयंसेवकांचे विशुद्ध चारीत्र्य हीच त्यांची शक्ती आहे. विरोधकांना हेच सलते आहे. त्यातूनच संघ वारंवार टिकेचा धनी होताना दिसतो. तरीही सर्व आरोपांना तोंड देत संघाचे सर्व उपक्रम वाढतच आहेत आणि शाखाही दिवसेंदिवस जोमाने वाढत आहेत. जनतेचा प्रचंड प्रतिसाद संघाला मिळतो आहे. म्हणून काम करणार्‍याने निस्वार्थपणे काम करीत रहावे. टिकाकार टिका करत राहतीलच. त्यांची पर्वा कशाला
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
लेखनप्रकार (Writing Type)
मत

प्रतिक्रिया द्या
83205 वाचन

💬 प्रतिसाद (480)

प्रतिक्रिया

नै ते शिंगे बिंगे उगारणे

अभ्या..
Wed, 09/14/2016 - 20:52 नवीन
नै ते शिंगे बिंगे उगारणे सुध्दा बसायचे एखाद्या हिंसेच्या कलमात.
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

राजेश सर,

विशुमित
गुरुवार, 09/15/2016 - 11:01 नवीन
राजेश सर, अति उत्कृष्ट प्रतिसाद...!! श्रीगुरुजी यांनी सांगितलेल्या ज्या काही 6-7 संस्था आणि त्यांचे कार्य, एक वेळ मान्य करू पण या कार्य मधून drastically (कृपया मराठी शब्द सुचवा) समाजजीवनामध्ये काहीच बदल दिसत नाही. दिसतात ते फक्त एवढेच मुद्दे- 1) राम मंदिर 2) गो रक्षा 3) लव्ह झिहाद 4) विदेशी द्वेष 5) स्वदेशीचा घोष 7) अन्य धर्मीयांशी तुलना 8) प्रसंगानुरूप बदलणारे आदर्श व्यक्ती 9) पुरातन वैदिक पद्धतीचा गाजावाजा 10) आयुर्वेद आणि हर्बल-जैविक तेच उत्तम 11) आपत्ती निवारण 12) हिंदुत्ववाद दिलेली सूची प्रतिकात्मिक आहेत, पण एवढेच मुद्दे का प्रकर्षाने पुढे येतात. संघ इथे थोडा कमी पडतो असं नाही वाटत का ?
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

1) राम मंदिर

श्रीगुरुजी
गुरुवार, 09/15/2016 - 14:53 नवीन
1) राम मंदिर
श्रीराम मंदीर निव्वळ संघाचा नव्हे तर इतर अनेकांचा खूप जिव्हाळ्याचा मुद्दा आहे.
2) गो रक्षा
गोरक्षा किंवा गोवंशहत्याबंदीचा कायदा काही राज्यातून खूप पूर्वीपासून आहे. काही राज्यातून काँग्रेस सत्तेवर असतानाचा हा कायदा आलेला आहे.
3) लव्ह झिहाद
लव्ह जिहादच्या हा संघाचा एकमेव किंवा फक्त संघाचा मुद्दा नाही. अनेकांनी त्यावर लिहिले आहे. लव्ह जिहादच्या माध्यमातून होणारे धर्मांतर व धर्मांतरातून नंतर पुढे येणारी वेगळेपणाची भावना व नंतर कालांतराने तिथे जन्माला येणारा फुटिरतावाद हे निव्वळ भारतासाठी धोकादायक नसून जगात जिथे जिथे मुस्लिमांची संख्या वाढली तिथे तिथे हा धोका निर्माण होत आहे.
4) विदेशी द्वेष
विदेशी द्वेष म्हणजे नक्की काय?
5) स्वदेशीचा घोष
स्वदेशीचा घोष म्हणजे नक्की काय?
7) अन्य धर्मीयांशी तुलना
उदाहरणार्थ?
8) प्रसंगानुरूप बदलणारे आदर्श व्यक्ती
बदलणारे म्हणजे काल जे आदरणीय होते ते आज तिरस्करणीय आहेत व काल जे तिरस्करणीय होते ते आज आदरणीय आहेत असा अर्थ होतो का? दोन्ही प्रकारची काही उदाहरणे देता येतील का?
9) पुरातन वैदिक पद्धतीचा गाजावाजा
उदाहरणार्थ?
10) आयुर्वेद आणि हर्बल-जैविक तेच उत्तम
असे संघ कधी म्हणाला?
11) आपत्ती निवारण
हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतातील अनेक नैसर्गिक आपत्तींमध्ये संघ कार्यकर्त्यांनी स्वतःहून मदतकार्यात सह्भाग घेतला आहे. संघाची ओळख जर आपती निवारण कार्यात सहभागी होणारी संस्थ असा होत असेल तर ती अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे.
12) हिंदुत्ववाद
संघ मुळातच हिंदूंसाठी स्थापन झालेला आहे. जसं कॉग्रेसची ओळख फक्त भ्रष्टाचार, गुन्हेगारी, जातीयवाद, देशद्रोहीपणा, अतिरेक्यांचे समर्थन इ. वरून होते तसेच संघाची ओळख हिंदुत्ववादावरून होत असेल तर ती अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.
↩ प्रतिसाद: विशुमित

चमत्कार?

राजेश घासकडवी
Tue, 09/13/2016 - 20:37 नवीन
चमत्कार हा शब्द फारच उदारपणे वापरला आहे असं म्हणता येईल. संघाने जे काही चांगलं काम केलेलं आहे तसं काम करणाऱ्या संस्था, संघटना जगभर गेल्या हजारो वर्षांत कित्येक झाल्या. हिंदू धर्मात जी वर्णव्यवस्था आहे त्याप्रमाणे जर कलियुगात झालेल्या चमत्कारांचं वर्गीकरण करायचं झालं तर संघ हा त्यामनाने क्षुद्र चमत्कार आहे. वरच्या जातीतले चमत्कार काही नोंदवतो. १. आधुनिक वैद्यक किंवा मॉ़डर्न मेडिसिन - पेनिसिलिनने कोट्यवधी जीव वाचवले. पोलियो, देवी, वगैरेंवरच्या लशींमुळे अब्जावधी आयुष्यं सुखी झाली. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान जितके लोक युद्धाने मारले तितकेच फ्लूच्या साथीने मेले. आता हे सगळं इतिहासात गेलं आहे. हा खरा उच्च जातीचा चमत्कार. २. लोकशाही - जगभर लोकशाहीचं वारं फिरतं आहे. शंभरेक वर्षांपूर्वी जवळपास आख्खं जग कुठल्या ना कुठल्या राजवटीखाली होतं. आता लोकं काय म्हणतात हे गंभीरपणे घेणाऱ्या राज्यव्यवस्थांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. अमर्त्य सेन यांनी म्हटलेलं होतं त्याप्रमाणे दुष्काळ आणि त्यातून होणारे मृत्यू हे लोकशाही व्यवस्थेत होत नाहीत - आणि त्याची प्रचिती दिसून येते आहे. हाही उच्च प्रतीचा चमत्कार आहे. त्याआधी गेल्या हजारो वर्षांत दुष्काळात लोकं मरणं हे जवळपास नैसर्गिक होतं. ३. शिक्षणाचा प्रसार - हजारो वर्षं अज्ञानाच्या अंधःकारात खितपत पडलेली सामान्य जनता आता ज्ञान घेऊ शकते आहे. शिक्षण हा मूलभूत अधिकार बनलेला आहे. जगातल्या साक्षरांचं प्रमाण दोनपाच टक्क्यांवरून नव्वद टक्क्यांच्या आसपास येतं आहे. याला म्हणतात चमत्कार. कारण तो अब्जावधी जीवनांवर सकारात्मक परिणाम करून जातो. ४. इंटरनेट/मोबाइल क्रांती - प्रत्यक्ष ज्ञान अगदी चुटकीसरशी हाताशी आलेलं आहे. त्याचबरोबर घडलेल्या मोबाईल क्रांतीमुळे जगाशी असलेला जोडलेपणा वाढलेला आहे. हा खरा चमत्कार आहे. ५. भारतीय घटना - नुसतं हिंदूंबाबतच बोलायचं तर हिंदू समाजातल्या ८० टक्के समाजाला दलित, महार, सोनार, चांभार वगैरे जातींच्या बंधनांतून बाहेर काढण्याचं काम भारतीय घटनेवर काम करून जे आंबेडकरांनी लेखणीच्या काही फटकाऱ्यांनी केलं, ते कितीही दंड फिरवून संघाला करता आलं नाही. त्या चमत्काराच्या मानाने संघाचा 'चमत्कार' हा क्षुद्रच आहे. तेव्हा चमत्कार नक्की कशाला म्हणायचं हे जरा तुलनेेनेच ठरवावं असं माझं मत आहे.

चला

ट्रेड मार्क
Wed, 09/14/2016 - 00:07 नवीन
संघाने काहीतरी चांगली कामं केली हे तरी मान्य करताय. फक्त त्या तसं काम करणाऱ्या कित्येक संस्थांपैकी काही विदा दिल्यात तर आमच्या ज्ञानात भर पडेल. बाकी जी तुलना केलीये ते सफरचंद आणि मोसंबी यांची तुलना करण्यासारखे आहे.
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

अहो संघाने चांगली कामं केली

राजेश घासकडवी
Wed, 09/14/2016 - 04:08 नवीन
अहो संघाने चांगली कामं केली आहेतच. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत 'राष्ट्रवाद, देशाभिमान' वगैरे गुण चांगलेच असतात. अन्नात मीठ असावं तसं. त्याबद्दल काहीच म्हणणं नाही. मी चमत्कार कशाला म्हणावं याबद्दल बोलत होतो. मी दिलेली उदाहरणं (शेवटचं भारतीय घटनेचं सोडलं तर) जगातल्या अब्जावधी व्यक्तींचं आयुष्य सुधरून गेलेलं आहे. भारतीय घटनेचाही चांगला परिणाम अब्ज लोकांवर झालेला आहे. आधुनिक वैद्यक ठाउक नाही अशी व्यक्ती जगात विरळा. संघ ठाउक आहे अशा जगात किती व्यक्ती आहेत?
बाकी जी तुलना केलीये ते सफरचंद आणि मोसंबी यांची तुलना करण्यासारखे आहे.
सफरचंद आणि मोसंबी नाही, मी कलिंगड आणि चणियामणिया बोरं अशी तुलना करून दाखवत होतो. दोन्ही फळंच आहेत, पण वजनांमध्ये केवढा प्रचंड फरक आहे बघा ना! जर कोणी त्या क्षुद्र बोरांना 'महाप्रचंड फळ' म्हणायला लागलं तर हसायला येणारच. या लेखात जो चमत्कार शब्द वापरला आहे त्याबद्दलच तक्रार आहे. 'बघा बघा चमत्कार, करा इथे नमस्कार' या म्हणण्यापलिकडे लेखात काहीही नाही. जर संघाने केलेल्या मर्यादित का होईना, पण कामांचा व्यवस्थित आढावा घेतला असता तर निदान काहीतरी नवीन काहीतरी शिकायला मिळालं असतं. 'शिक्षणक्षेत्रही संघाने काबीज केलेलं आहे' यासारखी उथळ विधानं दिसतात. अहो, भारतातली ८०-९० टक्के पोरं सरकारी शाळांमधून शिकतात. उरलेल्या १०-२० टक्क्यातला कुठचातरी अर्धापाव टक्का मिळवल्यावर त्याला 'काबीज करणं' म्हणायचं?
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

हे चमत्कार वगैरे पध्धतीचे

A.N.Bapat
Wed, 09/14/2016 - 06:13 नवीन
हे चमत्कार वगैरे पध्धतीचे लेख हि एका प्रकारे 'सेल्फआरती ' किंवा आरशासमोर उभे राहून आरती असते. माझे वैयक्तिक मत .
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

सहमत आहे

llपुण्याचे पेशवेll
Wed, 09/14/2016 - 14:38 नवीन
५. भारतीय घटना - नुसतं हिंदूंबाबतच बोलायचं तर हिंदू समाजातल्या ८० टक्के समाजाला दलित, महार, सोनार, चांभार वगैरे जातींच्या बंधनांतून बाहेर काढण्याचं काम भारतीय घटनेवर काम करून जे आंबेडकरांनी लेखणीच्या काही फटकाऱ्यांनी केलं, ते कितीही दंड फिरवून संघाला करता आलं नाही. त्या चमत्काराच्या मानाने संघाचा 'चमत्कार' हा क्षुद्रच आहे. हे विधान अशा प्रचारकी थाटाचा उत्तम नमुना आहे.
↩ प्रतिसाद: A.N.Bapat

...

चंपाबाई
Wed, 09/14/2016 - 19:48 नवीन
पेशव्याना बाबा गटाचा प्रचार कसा आवडेल ? १८१८ चा स्तंभ आठवत असेल.
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

लोचट प्रतिसाद!

श्रीगुरुजी
Wed, 09/14/2016 - 20:27 नवीन
लोचट प्रतिसाद!
↩ प्रतिसाद: चंपाबाई

आम्बेडकरान्चे कार्य

दिगोचि
Wed, 09/14/2016 - 16:06 नवीन
आम्बेडकरानी लेखणिच्या एक फटकार्यात ८० टक्के हिन्दु समाजाला जातीच्या बन्धनातुन बहेर काढलेले मला तरी कोठेहि दिसलेले नाही. म्हणजे त्यान्च्या लेखणीचा फटका फक्त घटनेच्या पानावरच अद्याप आहे. अजून मराठा समाज आरक्शण मागत आहे आणि इतर समाजहि हेच करत आहेत याचा अर्थ असा की देशातला जातिद्वेश दुर्दैवाने अजुन कायम आहे व त्यावर अनेक क्रुश्णकारस्थानी नेते जीवन जगत आहेत.
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

डॉ. आंबेडकरांच्या तथाकथित

सुबोध खरे
Wed, 09/14/2016 - 20:41 नवीन
डॉ. आंबेडकरांच्या तथाकथित अनुयायांनी त्यांचे पुतळे उभे केले आणि त्यांना घटनेच्या पुस्तकात बंदिस्त करून ठेवले आहे. कारण त्यांचे विचार इथल्या सारखे सगळीकडे पिंक टाकण्यासाठीच वापरले. ते विचार अमलात आणले तर यांची दुकाने बंद होतील ना. डॉ आंबेडकर आता फक्त "जप आणि पूजा करण्यापुरते" उरले आहेत.
↩ प्रतिसाद: दिगोचि

...

चंपाबाई
Wed, 09/14/2016 - 22:33 नवीन
हो ना ! म्हणुनच तर रा. स्व. संघ बाबासाहेब ( तसेच गांधीजी ) यांचे फोटो पूजतो , पण आचरण मात्र शून्य
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आणि तुम्ही औरंगजेब, अब्दाली

सुबोध खरे
गुरुवार, 09/15/2016 - 10:46 नवीन
आणि तुम्ही औरंगजेब, अब्दाली,मुल्ला ओमर, ओसामा बिन लादेन यांची पूजा करता आणि आचरण शून्य
↩ प्रतिसाद: चंपाबाई

चमत्कारच झाला की

ट्रेड मार्क
Wed, 09/14/2016 - 22:22 नवीन
तुम्ही सांगितलेले मुद्दे चमत्कार आहेत होय. आम्हाला आपलं वाटायचं विज्ञान म्हणतात ते हेच. आधुनिक वैद्यकशास्त्र, मोबाईल क्रांती चमत्कार म्हणायचे तर. शिक्षणाच्या प्रसारासाठी असंख्य लोकांनी घेतलेले कष्ट कुचकामी असून फक्त चमत्काराने हे साध्य झाले. बाबासाहेबांना दैवी साक्षात्कार होऊन त्यांनी भारतीय घटना लिहिली म्हणायचं की. सगळं चमत्कारिकच आहे म्हणायचं!
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

अहो, तुम्ही कशाला मध्ये पडता?

राजेश घासकडवी
गुरुवार, 09/15/2016 - 04:59 नवीन
अहो, तुम्ही कशाला मध्ये पडता? मी लेखकाने ज्या अर्थाने 'चमत्कार' हा शब्द वापरला होता त्याच अर्थाने बोलत होतो. संघाची स्थापना दैवी साक्षात्काराने झाली असं लेखकाचंही म्हणणं नाही. काहीतरी प्रभावी, परिणामकारक या अर्थाने त्यांनी तो शब्द वापरला आहे. तुम्ही माझ्या प्रतिसादाला एक निकष आणि त्यांच्या लेखाला वेगळा निकष असं करून स्वतःचं अज्ञान का उघड करता? सोडून द्या. मी लेखकाला भाषेबद्दल फीडबॅक दिला. त्यांनी तो मान्य करायचा की नाही याबद्दल काहीतरी ठरवलं असणारच. तिथेच विषय संपला. तुम्ही मला बोलण्याऐवजी लेखकालाच का विचारत नाही माझा मुद्दा पटला की नाही ते? मला काही या चर्चेत फार रस नाही. मी पुढच्या कामाकडे वळलेलो आहे. तुम्हीपण काहीतरी सकारात्मक करा. काय म्हणता?
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

चिमटा जोरात बसलेला दिसतोय

ट्रेड मार्क
गुरुवार, 09/15/2016 - 20:14 नवीन
लेखक सोडून दुसऱ्या कोणी मध्ये बोलू नये असा नियम आहे का? एकमेकांशी बोलायचं असेल तर व्यनी करून बोला. मी कुठे वेगळा निकष वापरतोय. माझ्या मते लेखकाने चमत्कार हा शब्द या अर्थी वापरलाय की लाखो लोक गेली ९० वर्षे स्वयंस्फूर्तीने स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत. त्यांना कोणी पगार देत नाही किंवा अजून कसले "फायदे" नाहीत. तरी इतके लोक संघाबरोबर आहेत आणि अजूनही त्यात वाढ होते आहे. याचा आधुनिक वैद्यकीशी काय संबंध? किंवा तुम्ही उल्लेखलेल्या इतर गोष्टींशी काय संबंध? जर तुम्ही एखाद्या दुसऱ्या अश्या संस्थेबरोबर तुलना केली तर ते योग्य ठरले असते. मी कशाला लेखकाला विचारू तुमचा मुद्दा पटला का नाही ते, पण लेखकाने उत्तर सुद्धा दिलं नाही म्हणजे.... समजायला तुम्ही सुज्ञ आहातच. बाकी सकारात्मक करण्याच्या सल्ल्याबाबत धन्यवाद. पण असे सल्ले आणि अश्या लेखांवर मतप्रदर्शन करून उगाच वेळ वाया घालवू नका. का तुम्हाला हेच करणं सकारात्मक वाटतंय?
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

करेक्ट

नर्मदेतला गोटा
गुरुवार, 09/15/2016 - 22:21 नवीन
करेक्ट
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

@ट्रेड मार्क,

शाम भागवत
गुरुवार, 09/15/2016 - 10:23 नवीन
@ट्रेड मार्क, काय बारीक चिमटा काढलाय. :))
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

राजेश जी,

विशुमित
गुरुवार, 09/15/2016 - 11:55 नवीन
राजेश जी, तुमच्या प्रतिक्रियेची प्रतिउत्तर चुकून तुमच्या प्रतिसादाच्या वरती गेले आहे. कृपया नोंद घ्यावी.
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

संघावरचा राग

ट्रेड मार्क
Wed, 09/14/2016 - 01:13 नवीन
बाकी काही लोकांचा संघावर इतका राग का आहे तेच कळत नाही. MIM, झकीर नाईकांच्या वा तत्सम संस्थांसारखे ते लोक प्रचार/ भाषणे करत नाहीत. ते ख्रिस्ती मिशनऱ्यांसारखे चमत्कार दाखवून आजार बरे करत नाहीत. ते कोणाला आग्रह करून, भुलवून, अमिष दाखवून, बळाच्या जोरावर संघात सामील करून घेत नाहीत. ते कोणाकडून पैसे मागत नाहीत. बरं ते शाखेत करतात काय तर त्यांचे कार्यक्रम म्हणजे प्रार्थना, खेळ, बैठका ई असतात. त्यांचे विचार ऐकावे आणि आचरणात आणावे असाही त्यांचा आग्रह नसतो. हे स्वयंसेवक संघटितपणाच्या जोरावर गुंडगिरी करत नाहीत, मुलींची छेड काढत नाहीत. एवढी चेष्टा होते तरी कोणी हाणामारी केल्याची, दंगल केल्याची उदाहरणे नाहीत. याउपर, देशांतर्गत नैसर्गिक संकटकाळात हे स्वयंसेवक मदतीला धावून जातात. संकटातील लोकांना त्यांची जात, धर्म न विचारता मदत करतात. त्यांना त्याचे कोणी पैसे देत नाहीत... पगार जाऊद्या पण जायचा, यायचा आणि तिथला खर्च पण कोणी देत नाही. बाकी वर कोणीतरी म्हणल्याप्रमाणे ते आसपास असतात पण आहेत असं कळत नाही. तरी एखादा खाकी चड्डीवाला दिसला की चेष्टा होतेच. हातात दंड (काठी) बघितली तरी चेष्टा होते. बरं नुसतीच चेष्टा नाही तर लोक रागराग पण करतात. काय कारण आहे याचे?

कारण उघड आहे....

गामा पैलवान
Wed, 09/14/2016 - 01:47 नवीन
ट्रेड मार्क, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर अत्यंत सोपं आहे. जोवर संघाचे लोकं समोरच्याच्या कानफडात भडकावत नाहीत तोपर्यंत त्यांची टिंगल, टवाळी, रागराग, द्वेष, मत्सर सगळं छानपैकी होणारंच. काळ्या दगडावरची रेघ आहे ही. आ.न., -गा.पै.
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

कानफटात वगैरे मारण्याची फक्त

साहना
Wed, 09/14/2016 - 02:18 नवीन
कानफटात वगैरे मारण्याची फक्त भाषा ह्यांना जमते. वेळ येते तेंव्हा ह्यांची खाकी चड्डी पिवळी होते. "तो मी नव्हेच हो" किंवा "मी सरकारी नोकरी वाला माणूस" अश्या प्रकारचे सोंग पांघरून संघवाले पोबारा करतात. ह्यांची मर्दमुखी फक्त बौद्धिक वर्गांत लहान मुलांच्या पुढे. बौद्धिकांत "आम्ही बाबरी मशीद पाडली" पण सार्वजनिक रित्या "कुणी पडली ठाऊक नाही आमचा उद्धेश फक्त अहिंसात्मक प्रदर्शन करण्याचा होता. पण ती पडली हि दुःखद घटना आहे." असली भाषा. चार भिंतींच्या मागे "२००२ गुजरात मध्ये मुसलमानांना आम्ही धडा शिकवला" पब्लिक मध्ये "दंग्यांत आमचा काहीही सहभाग नव्हता आम्ही आपले अल्लाह घराची गाय". मैदानात "भारत माता कि जय ... " नंतर फोन वर "अमेरिकन सिटीझनशिप मिळाली हो आमच्या सिद्धेशला... " बौद्धिकांत "मुसलमान लोक एक नंबरचे नालायक असतात" पब्लिक मध्ये "मुसलमान ख्रिस्ती सगळे लोक हिंदूच आहेत." बौद्धिकांत "इस्लाम हा भयानक धर्म आहे" पब्लिक मध्ये "इस्लाम शांततेची शिकवण देतो" थोड्क्यात काय तर वैचारिक दिवाळखोरी आणि स्वतः बद्दल असलेली grandiose delusions आणि त्याचा भंग झाला कि लोकांचा कानफटात मारण्याची "फक्त भाषा".
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

थोडक्यात

ट्रेड मार्क
Wed, 09/14/2016 - 02:35 नवीन
तुम्हाला असं म्हणायचंय की इतर शांती आणि सलोखा पसरवणाऱ्या "अल्पसंख्यांका"प्रमाणे संघिंनी पण काठ्या टाकून शस्त्र हातात घेतली पाहिजेत. जरा कोणी खाकी चड्डीपासून ते हिंदू, हिंदुत्व, भारत याविरुद्ध बोलला की कापून टाकायला पाहिजे. हिंदूंची देवळे सोडून बाकी सगळी प्रार्थनास्थळे नेस्तनाबूत केली पाहिजेत ई ई ना? पण जर का ते नुसतंच बोलतात तर तुम्हाला एवढा राग का त्यांचा? त्यांच्या असण्यानसण्याने जर काही फरक पडत नाही तर मग करू दे त्यांना काय करायचं ते. तुम्ही द्या सोडून.
↩ प्रतिसाद: साहना

अच्छा म्हणजे ते पोपटपंची,

फेदरवेट साहेब
Wed, 09/14/2016 - 06:47 नवीन
अच्छा म्हणजे ते पोपटपंची, मखलाशी वगैरे करतात हे आपल्याला मान्य आहे अन त्यातच संघाचं दिव्यत्व वगैरे आहे असं आपण मानता का?
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

भूभू जी

ट्रेड मार्क
Wed, 09/14/2016 - 19:05 नवीन
अच्छा म्हणजे ते पोपटपंची, मखलाशी वगैरे करतात हे आपल्याला मान्य आहे अन त्यातच संघाचं दिव्यत्व वगैरे आहे असं आपण मानता का?
ऑ.. मी कुठे असं म्हणलंय? ते जे बोलतात ते तुम्हाला पोपटपंची, मखलाशी वाटत असेल तर मी करणार? प्रत्येकाची विचार करण्याची/ समजण्याची कुवत वेगवेगळी असते. काहींना रागा, दिग्गु, झाना, ओवेसी यांचे बोलणे प्रचंड आवडते. मुद्दा हा आहे की जर संघी फक्त बोलतात, मग ते तुम्हाला वाटते तसे पोपटपंची, मखलाशी असो, त्याने तुम्हाला काय फरक पडतो?
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब

मैदानात "भारत माता कि जय ...

फेदरवेट साहेब
Wed, 09/14/2016 - 06:45 नवीन
मैदानात "भारत माता कि जय ... " नंतर फोन वर "अमेरिकन सिटीझनशिप मिळाली हो आमच्या सिद्धेशला... "
आयशपथ काय निरीक्षण आहे हे, एक नंबर, खल्लास _/\_
↩ प्रतिसाद: साहना

संघाचे चांगले काम एकतर तुम्ही

आनन्दा
Wed, 09/14/2016 - 11:49 नवीन
संघाचे चांगले काम एकतर तुम्ही पाहिलेच नाही किंवा तुम्हाला त्याकडे दुर्लक्ष करायचे आहे असे दिसतेय. मी संघ अगदी जवळून पाहिलेय. मला स्वतःला संघ तेव्हढा पटत नसला तरी आज भारतात असलेल्या समस्यांपैकी काही समस्यांवर संघ काम करत आहे यात वाद नाही. त्यामुळे तुम्हाला संघ लहान वाटत असेल तर तुम्ही एकातर फारच मोठे आहात किंवा फारच छोटे आहात.
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब

सन्घाविरूद्ध किती जळजळ

सुखीमाणूस
Wed, 09/14/2016 - 20:06 नवीन
सन्घाविरूद्ध किती जळजळ काही वाइट नाही परदेशी जाणे• उच्चवर्णियानी जरूर जावे सुखात रहावे हिन्दू धर्म वाढवावा इथे पैसा पाठवावा
↩ प्रतिसाद: फेदरवेट साहेब

कानफटात वगैरे मारण्याची फक्त

श्रीगुरुजी
Wed, 09/14/2016 - 13:30 नवीन
कानफटात वगैरे मारण्याची फक्त भाषा ह्यांना जमते. वेळ येते तेंव्हा ह्यांची खाकी चड्डी पिवळी होते. ...
संघ विरोधकांना कधीही संघाशी वैचारिक पातळीवर मुकाबला करता आला नाही. संघाची विचारसरणी व तत्वज्ञान त्यांना कधीही वैचारिक युक्तीवाद करून खोडता आले नाही. संघाचे विचार चुकीचे आहेत हे कधीही त्यांना व योग्य विचार कोणता हे त्यांना कधीही वैचारिक पातळीवर करता आलेले नाही. यांना फक्त संघाचा द्वेष करता आला. त्यामुळेच संघावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करणे एवढेच त्यांना जमते.
↩ प्रतिसाद: साहना

संघाची टीका वैचारिक पातळीवर

साहना
Wed, 09/14/2016 - 19:39 नवीन
संघाची टीका वैचारिक पातळीवर कशी करणार ? माकडाशी का कधी संस्कृत मध्ये वाद घातला जाऊ शकतो ? संघाचे वैचारिक पातळीवर अस्तित्वच नाही मुळी. ९० वर्षे, लाखो स्वयंसेवक पण "हिंदुत्व" म्हणजे काय हो म्हटले कि "ख्रिस्ती मुसलमान सगळेच हिंदू आहेत" असली वैचारिक दिवाळखोरी.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

याच कारणासाठी तुमच्याशी कोणी

श्रीगुरुजी
Wed, 09/14/2016 - 20:25 नवीन
याच कारणासाठी तुमच्याशी कोणी संस्कृतमध्ये वाद घालत नाही.
९० वर्षे, लाखो स्वयंसेवक पण "हिंदुत्व" म्हणजे काय हो म्हटले कि "ख्रिस्ती मुसलमान सगळेच हिंदू आहेत" असली वैचारिक दिवाळखोरी.
बादवे, आधीच्या एका प्रतिसादात संघाची हिंदुत्ववादाची व्याख्या दिलेली आहे. ती वाचली नसेलच. न वाचतात तारे तोडणे हे तुमचे व्यवच्छेदक लक्षण गोवा सरकारच्या परिपत्रकावरून लक्षात आले आहे.
↩ प्रतिसाद: साहना

"भारत माता कि जय ... " नंतर

नर्मदेतला गोटा
Wed, 09/14/2016 - 15:16 नवीन
"भारत माता कि जय ... " नंतर फोन वर "अमेरिकन सिटीझनशिप मिळाली हो आमच्या सिद्धेशला...
भारताच्या जयजयकार करणार्‍यांना अमेरीका का देते सिटीझनशिप. हा विचार करा की.
↩ प्रतिसाद: साहना

अनेक नामवंत गांधीवादी,

श्रीगुरुजी
Wed, 09/14/2016 - 15:18 नवीन
अनेक नामवंत गांधीवादी, समाजवादी, निधर्मी, पुरोगामी नेत्यांची पुढील पिढी देखील परदेशात स्थायिक झाली आहे.
↩ प्रतिसाद: नर्मदेतला गोटा

आणि अस्वले आपली विष्ठा

साहना
Wed, 09/14/2016 - 19:43 नवीन
आणि अस्वले आपली विष्ठा जंगलांत टाकतात. पुरोगामी, निधर्मी लोक काय करत घेऊन आम्ही काय करणार ? इथला वाद आणि त्यांचा संबंध का ?
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मग तुम्ही इथे कशाला येताय?

श्रीगुरुजी
Wed, 09/14/2016 - 20:23 नवीन
मग तुम्ही इथे कशाला येताय? तुमची जागा जंगलात.
↩ प्रतिसाद: साहना

..

चंपाबाई
Wed, 09/14/2016 - 18:26 नवीन
टांझानिया की जय म्हटले तरी अम्रिका सिटिजनशिप देते
↩ प्रतिसाद: नर्मदेतला गोटा

हो

सुबोध खरे
Wed, 09/14/2016 - 20:49 नवीन
हो अमेरिकेत बरीच प्राणिसंग्रहालये आहेत. तिथे कायमचा वास्तव्याचा परवाना मिळतो.
↩ प्रतिसाद: चंपाबाई

अतिशय खोल विचार केला आणि

साहना
Wed, 09/14/2016 - 19:49 नवीन
अतिशय खोल विचार केला आणि साक्षात्कार झाला. भारतीय लोक म्हणजे जगातील सर्वांत थोर संस्कृतीतील लोक. संघाने भारतीय लोकांचे चारित्र्य घडवले आहे. संस्कृत सर्व भाषांची जननी असल्याने भारतीयांना इंग्रजी स्पॅनिश वगैरेवर जन्मापासून प्रभुत्व मिळविता आले आहे. भारतीय शिक्षण पद्धतिचा पाया व्यासानी घातला अश्या पद्धतीतून अतिशय उच्च कोटीचे विद्यार्थी निर्माण होतात. गणिताचे तर बोलू नका, वेदिक गणितामुळे भारतीय तर चालते फिरते सुपर काम्पुटर बनले आहेत. म्हणून तर भारत माता कि जय बोलणाऱ्या लोकांना अमेरिका पायघड्या घालून बोलावते. बाकी नासा मधील ९९% लोक भारतीय आहेत, अमेरिकेतील ६५% डॉक्टर भारतीय आहेत वाला फॉरवर्ड तर तुम्ही वाचलाच असेल. म्हणून तर अमेरिकेच्या नागरिकत्व प्रतिज्ञेत भारत मातेचा उल्लेख नाही I hereby declare, on oath, that I absolutely and entirely renounce and abjure all allegiance and fidelity to any foreign prince, potentate, state, or sovereignty, of whom or which I have heretofore been a subject or citizen;
↩ प्रतिसाद: नर्मदेतला गोटा

बरोबर आहे. तिकडे जाऊनही

फेदरवेट साहेब
गुरुवार, 09/15/2016 - 07:37 नवीन
बरोबर आहे. तिकडे जाऊनही भारताचा जयजयकार करा अन इकडे छठपूजा करतात म्हणून बिहारी धरून ठोका........ वरतुन जेवण झाले की मांडीला पाने पुसत हिंदू तेतुका मेळवावाच्या गफ्फा मिपावर हाणा.
↩ प्रतिसाद: नर्मदेतला गोटा

कधिही संघाचा अनुभव न

पुष्कर जोशी
Wed, 09/14/2016 - 17:05 नवीन
कधिही संघाचा अनुभव न घेतल्याचा पुरावा .. पुस्तकी ज्ञान ..
↩ प्रतिसाद: साहना

अहो असे खूप लोक असतात, कि

तेजस आठवले
Wed, 09/14/2016 - 22:48 नवीन
अहो असे खूप लोक असतात, कि ज्यांच्या बोलण्यात आणि कृतीत अंतर असते. तुम्हाला संघी लोकांचा एवढा राग असेल तर ते काहीही बोलले तरी तुम्हाला काय फरक पडतो? बरं काही कारणाने त्यांची चड्डी पिवळी होत असे तर तुम्हाला काय फरक पडतोय, त्यांची ते धुवून घेतील किंवा तसेच राहतील. जोपर्यंत संघातले लोक सार्वजनिक ठिकाणी जाहीरपणे अधिकृत मतप्रदर्शन करत नाहीत तो पर्यंत ते त्यांच्या सभेत (बौद्धिक) काहीही बोलले(तुमच्या म्हणण्या प्रमाणे) तरी काय फरक पडतो?
थोड्क्यात काय तर वैचारिक दिवाळखोरी आणि स्वतः बद्दल असलेली grandiose delusions आणि त्याचा भंग झाला कि लोकांचा कानफटात मारण्याची "फक्त भाषा".
हे तुमच्या बाबतीत पण म्हणता येऊ शकतेच की! आपल्या जन्मभूमीबद्दल आदर बाळगणे आणि दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेणे ह्याचा काय संबंध ते सांगू शकाल का ? अमेरिकेचे नागरिक जर भारताबद्दल प्रेम व्यक्त करत असतील(जोपर्यंत त्या देशाच्या सार्वभौमत्वाचा अनादर होत नाही आणि कुठल्याही प्रकारे ते अमेरिकाविरोधी वर्तन करत नसतील), तर तो काही द्रोह होऊ शकत नाही. कोणीही कायदेशीररित्या दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेतले असेल तर त्यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे? अमेरिका आणि भारत काही एकमेकांचे शत्रू नाहीत आणि औपचारिकरीत्या शत्रू म्हणावे असे दोघात काही झालेलेही नाही.(जर आपण पाकिस्तानचे उदाहरण घेतले तर जरी आपण औपचारिकरीत्या पाकिस्तान ला शत्रू जाहीर केले नसले तरी त्याच्या वर्तणूकीमुळे तो आपला शत्रूच आहे. विषयांतराबद्दल क्षमस्व.) बाकी तुम्हाला संघ आणि त्याच्या आडून काही विशिष्ट गोष्टींवर टीका करायची असेल तर त्यासाठी वेगळ्या साईट्स आहेत.तिथे सुद्धा खुशाल तुमची मते मांडा. बाकी वैयक्तिक काही नाही. आपण लोकशाही देशाचे नागरिक आहोत आणि आपल्याला सर्वाना आपले मत मांडण्याचा हक्क आहे. तुमच्या दृष्टीने संघ काही देशविरोधी करत असेल तर तसे पुराव्यासहित स्पष्ट करा(न्यायालयात सिद्ध झालेले- नुसते आरोप नव्हे.) बाकी, सकाळचा वर्ग संपल्यावर काही संघी लोक तुमच्या कडे येऊन चहा पोहे मागत नव्हते ना? काही लोकांना ह्याचा राग येतो हो!
↩ प्रतिसाद: साहना

माझ्या (हिंदू) धर्माचा ठेका

साहना
Wed, 09/14/2016 - 23:43 नवीन
माझ्या (हिंदू) धर्माचा ठेका घेतला आहे अश्या प्रकारे संघ वागतो आणि हिंदू धर्माला अनेक प्रकारे नुकसान पोचवतो हे सोडल्यास मला संघीय लोक काय करतात ह्याचा फरक पडला नाही. आपले संघ पूर्ण मिपा वर नाही टाकले असते तर मी लिहायला गेले नसते.
↩ प्रतिसाद: तेजस आठवले

आणि हिंदू धर्माला अनेक

श्रीगुरुजी
गुरुवार, 09/15/2016 - 15:01 नवीन
आणि हिंदू धर्माला अनेक प्रकारे नुकसान पोचवतो
नुकसान? ते कसे काय? काही उदाहरणे देता का?
↩ प्रतिसाद: साहना

पुन्हा तेच

झेन
गुरुवार, 09/15/2016 - 18:09 नवीन
"खाकी चड्डी पिवळी होते" राग संघावर का चड्डीवर
↩ प्रतिसाद: साहना

पोटेन्शिअल आहेच धाग्यात

अनन्त अवधुत
Wed, 09/14/2016 - 03:40 नवीन
हा 200 वा प्रतिसाद. बाकी चालू द्या...

पुराणांतर्गत इतिहास

श्रीनिवास टिळक
Wed, 09/14/2016 - 05:37 नवीन
२०१५ मध्ये भारतीय इतिहास संकलन समितीने (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न संस्था) १८ खंडांमध्ये १८ पुराणांवर आधारित भारताचा इतिहास प्रसिद्ध करण्याचा संकल्प सोडला आहे. २०२५ मध्ये संघाची शताब्दी आहे त्या सोहळ्यात हे खंड प्रकाशित होणार आहेत.

:-))

सतीश कुडतरकर
Wed, 09/14/2016 - 11:12 नवीन
:-))
↩ प्रतिसाद: श्रीनिवास टिळक

पुराणांवर आधारलेला इतिहास?

पुंबा
Wed, 09/14/2016 - 14:07 नवीन
पुराणांवर आधारलेला इतिहास? बाप रे!पुरातत्वशास्त्र, न्युमिस्मॅटीक्स, कार्बन डेटींग वगैरे काही नाही?
↩ प्रतिसाद: श्रीनिवास टिळक

एक मिनीट, ते जे काय खंड म्हणत

मोदक
Wed, 09/14/2016 - 14:12 नवीन
एक मिनीट, ते जे काय खंड म्हणत आहेत ते प्रकाशीत होवूदेत मग टीका टिप्पणी सुरू करूया. संकल्पावस्थेतल्या गोष्टीबद्दल आत्ता मत व्यक्त करणे योग्य नाही. युवराज मतीमंद आहेत म्हणजे त्यांचे सुपुत्र त्यांच्या पुढची पातळी गाठतील असे काही नसते हो.
↩ प्रतिसाद: पुंबा
  • «
  • ‹
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा