✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

स्टार्ट अप्स - व्यवसाय कल्पना मंथन

न
निनाद यांनी
Wed, 09/07/2016 - 15:22  ·  लेख
लेख
सायकल सायकल या समुहावर चर्चा करताना मोबाईल चार्जींग साठी सायकला जोडून काही उपकरण बनवता येईल का अशी चाचपणी चालली होती.विषय हा प्रकल्प कसा करता येईल यावर फिरू लागल्यावर असे वाटले की यामध्ये तर व्यावसायिक शक्यता आहेत. हा सुचलेला प्रकल्प विचार असा आहे: सुमारे २ किंवा ३ सेमी आकाराचे छोटे पंखे हँडप्रेस मशिनवर बनवायचे. त्याला एक चुंबक असलेली मोटार जोडायची. हवे ने पंखा फिरला की विज तयार होईल. करंट आपल्या मोबाईलच्या गरजे नुसार रेग्युलेट करायचा. आणि त्याला एक यु एस बी सॉकेट जोडायचे. हे सगळे एका सिल्ड खोक्यात बसवायचे (पाणी जाऊ नये म्हणून). आता वार्‍याने उर्जा देणारा मोबाईल चार्जर तयार. हा चार्जर एका क्लिप ने सायकलला जोडायचा. जे लोक सायकलवर लाँग ट्रिप्स करतात त्यांना या चार्जरची महती लगेच लक्षात येईल! कारण स्ट्रावा किंवा कोणताही अ‍ॅप जिपिएस वापरून बॅटरी खातो. त्याला अशी चार्जरची जोड दिली तर अधिक काळ मोबाईल चालू राहील. याला एक सोलार पॅनल जोडता येईल अशीही एक कल्पना सुचवली गेली आहे. सगळी चर्चा झाली आणि मग असे प्रॉडक्ट आधीच तयारही केले गेले आहे असे कळले. अर्थातच ही कल्पना कुणालातरी आधी सुचलीच असणार. आणि ते ही ठिक आहे. परंतु आपले स्वतः चे डिझाईन असेल तर अजुनही हे तयार करता येईल मार्केट मध्ये आणता येईल. काहीच नाही झाले तर अलिबाबा या साईट वरून - चिन मधून सुटे भाग मागवायचे आणि येथे जोडून ते विकायचे हे तर अगदीच सहज शक्य आहे. या कल्पनेत कुटिरोद्योग म्हणून काहीसा दम आहे! भांडवल फार लागणार नाही. सायकल शिवाय्ही अनेक ठिकाणी याचा उपयोग होऊ शकेल. हे टोपीवर बसवता येईल. मग चालताना चार्जिंग होईल. किंवा खिडकीवर घरी बसवता येईल. विकण्यासाठी इबे किंवा नॅपडिल चा वापर करताच येईल. कल्पना सुचली तरी हा प्रकल्प मला करायचा नाहीये किंवा करायला जमणार नाहीये. पण कुणाला तरी जमेल. अशा तुमच्याकडेही कल्पना असतील. प्रत्येक कल्पना आपण प्रत्यक्षात आणूच असे ही नाही. म्हणून अशी व्यवसाय कल्पना तुमच्याकडे असेल तर ती येथे मांडावी ही विनंती. यामुळे एक नवीन स्टार्ट अप्सचा डेटाबेस तयार होईल. त्याचा कुणाला तरी उपयोग होईल ही आशा...
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
तंत्र
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
18111 वाचन

💬 प्रतिसाद (53)

प्रतिक्रिया

तशा प्रकारच्या डायनामोने

पिंगू
Mon, 09/19/2016 - 22:27 नवीन
तशा प्रकारच्या डायनामोने मोबाईलची बॅटरी चार्जिंग करणे अवघडच आहे. सायकलसाठी हब डायनामो मिळतो आणि तो वापरल्यास एकाच वेळेस मोबाईल बॅटरी आणि सायकलचा लाईट दोन्ही चार्ज करणे शक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टर्मीनेटर

मोबाईल चार्जर...

श्रीकांत बोरवणकर
Mon, 09/19/2016 - 18:15 नवीन
पूर्वी सायकलच्या फिरणार्‍या टायरला स्पर्श करेल व घर्षणाने फिरेल असा डायनामो लावीत...अजून ही लावत असावेत. त्या डायनामोतून तयार झालेल्या वीजेवर सायकलचा दिवा लागत असे ( तोच तो.... जो नसल्यास पोलीस दंड करीत व अवतीभवती इतका उजेड आहे तर दिवा कशाला हवा ? असे विचारल्यास अवतीभवती इतकी हवा आहे मग तुझ्या सायकलीच्या चाकात कशाला हवी हवा ? असे बोलून मामा चाकातली हवा सोडून देत असे या प्राचीन पी जे मधे ज्याचा उल्लेख येतो तो ) काही हौशी लोक यावर आणखी किरट्या आवाजात वाजणाराबजाज स्कूटर चा हॉर्न ही लावीत. त्या डायनामो वर ही मोबाईल चार्ज करता यावा अशी योजना करता येइल. तर अशा प्रकारचे डायनामोला जोडता येइल असे सर्किट (ज्यावर सध्याचे मोबाईल चार्जर डायरेक्ट लावता येइल ) हे पण एक प्रॉडक्ट होउ शकेल. किंवा डायनामो + दिवा + हॉर्न + चार्जर असे पूर्ण पॅकेज प्रॉडक्ट ही तयार होऊ शकेल . हे कुणी आधीच तयार केलेय का ते मात्र मी पाहील नाहीये.
  • Log in or register to post comments

हब डायनामो वापरुन हे शक्य आहे

पिंगू
Mon, 09/19/2016 - 22:28 नवीन
हब डायनामो वापरुन हे शक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकांत बोरवणकर
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा