मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाप्पाचा नैवेद्यः मावा चॉकलेट रोल

अनन्न्या · · लेखमाला
1 साहित्यः दोन वाट्या खवा, एक वाटी पिठी साखर, एक टेबल स्पून कोको पावडर, दोन तीन थेंब व्हॅनिला इसेन्स. कृती: एक वाटी खवा आणि अर्धी वाटी पिठी साखर कढईत एकत्र करावे. व्हॅनिला इसेन्स घालून मंद गॅसवर ढवळत रहावे. बटर पेपरला तूप लावून घ्यावे. खव्याचा गोळा झाला की बटर पेपरवर थापावे. 1 . आता कढईत परत एक वाटी खवा, अर्धी वाटी पिठीसाखर, एक चमचा कोको पावडर घ्यावी. एकत्र करून मंद गॅसवर ढवळत रहावे. त्याचा गोळा झाल्यावर पहिल्या थापलेल्या खव्यावर थापावे. 1 . दहा मिनीटे गार होऊ द्यावे. आता बटर पेपरसह रोल करण्यास घ्यावा. गुंडाळी करून बटर पेपर सोडवत जावे. 1 . रोल तयार झाल्यावर हाताने अलगद फिरवून घट्ट वळावा. गार झाल्यावर कापावा. माझा पहिला थर थोडा पातळ थापला गेला. पण चवीला एकदम मस्त! आणि बाहेरच्या मिठाईपेक्षा तर बाप्पाला नक्कीच आवडेल. याचा रोल नसेल जमत तर फक्त दोन थर देऊन बर्फी करा. 1

वाचने 16958 वाचनखूण प्रतिक्रिया 31

स्वाती दिनेश 14/09/2016 - 11:19
रोल्स मस्तच आहेत. मस्तच! स्वाती

पूर्वाविवेक 14/09/2016 - 11:43
फारच सुरेख. सणासुदीला बाहेरच्या मिठाईत होणारे भेसळीचे प्रमाण फार वाढले आहे. घरच्या घरी केलेली शुद्ध मिठाईचं बाप्पा आणि आपल्यासाठी योग्य आहे.

प्रभाकर पेठकर 14/09/2016 - 14:47
पाककृती आवडली. पण एक नाही कळलं. चॉकलेट रोल साठी व्हॅनिला एसेन्स का? चॉकलेट एसेन्स जास्त योग्य वाटतं. चॉकलेटची चव जास्त उभारून येईल. असो.

In reply to by प्रभाकर पेठकर

त्याऐवजी वेलची पावडरही चालेल पण दुसरा थर चॉकलेट आहे म्हणून मी व्हॅनिला घेतलय. चॉकलेटमध्ये नाही.

रुपी 14/09/2016 - 22:02
वा! मस्त आणि सोपी वाटत आहे रेसिपी. लहानपणी आमचा एक मित्र "राजमलाई" नावाची टॉफी आणायचा - एकदम भारी लागायची. ती अशीच असावी बहुतेक!

सही रे सई 14/09/2016 - 22:22
मस्त पाकृ.. आणि सादरीकरण पण उत्तम.शेवटच्या फोटोवरून बाकरवडीची आठवण झाली. पाकृ आहे का कोणाकडे बाकरवडीची.

दिपक.कुवेत 16/09/2016 - 12:39
खव्याचा हा असा उपयोग पहिल्यांदा पाहिला. खाल्लाक्षणी रोल्स तोंडात विरघळतील ह्यात शंकाच नाहि.

मनिमौ 17/09/2016 - 16:28
कसले सही आहेत रोल. करायला पण खुप सोपे आहे घरात एखाद्या कार्यक्रमाला पटकन करता येईल