लेखकअनन्न्यायांनी बुधवार, 14/09/2016 08:39 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः
दोन वाट्या खवा,
एक वाटी पिठी साखर,
एक टेबल स्पून कोको पावडर,
दोन तीन थेंब व्हॅनिला इसेन्स.
कृती:
एक वाटी खवा आणि अर्धी वाटी पिठी साखर कढईत एकत्र करावे. व्हॅनिला इसेन्स घालून मंद गॅसवर ढवळत रहावे. बटर पेपरला तूप लावून घ्यावे. खव्याचा गोळा झाला की बटर पेपरवर थापावे.
.
आता कढईत परत एक वाटी खवा, अर्धी वाटी पिठीसाखर, एक चमचा कोको पावडर घ्यावी. एकत्र करून मंद गॅसवर ढवळत रहावे. त्याचा गोळा झाल्यावर पहिल्या थापलेल्या खव्यावर थापावे.
.
दहा मिनीटे गार होऊ द्यावे. आता बटर पेपरसह रोल करण्यास घ्यावा. गुंडाळी करून बटर पेपर सोडवत जावे.
.
रोल तयार झाल्यावर हाताने अलगद फिरवून घट्ट वळावा.
गार झाल्यावर कापावा. माझा पहिला थर थोडा पातळ थापला गेला. पण चवीला एकदम मस्त!
आणि बाहेरच्या मिठाईपेक्षा तर बाप्पाला नक्कीच आवडेल. याचा रोल नसेल जमत तर फक्त दोन थर देऊन बर्फी करा.
प्रतिक्रिया
सुंदर सोपी पाकृ.
भारी दिसताहेत रोल. पाकृ पण
वा मस्त लहान मुलाना प्रचन्ड
वा! मस्त!
छान दिसतोय. साहित्यही फार
फारच सुरेख!
अरे वा..
फारच सुरेख. सणासुदीला
हो गं आणि स्वस्त सुध्दा!
खुप मस्त!
मस्त आणि करुन बघण्यासाठी मस्ट
आवडलं.
व्हॅनिला इसेन्स नुसत्या खव्याच्या थरात वापरलय
In reply to आवडलं. by प्रभाकर पेठकर
सुंदर!!
छान सोपी पाकृ. दिसायला
सोपी आणि मस्त कृती. लहान
धन्य आहेस तू.मस्त दिसतायत रोल
स्लर्प रेसिपी!!
कसलं काय काय सुचतं! ही पाकृ
रोल्स आवडले. खव्याचा थर जास्त
वा! मस्त आणि सोपी वाटत आहे
आवल्लं.. मी एकदोन खाल्ल्यापन
मस्त पाकृ.. आणि सादरीकरण पण
बहुतेक आहे, उद्या देईन असली
In reply to मस्त पाकृ.. आणि सादरीकरण पण by सही रे सई
मिपावर आधी येऊन गेली आहे -
In reply to मस्त पाकृ.. आणि सादरीकरण पण by सही रे सई
चविष्ट पाकृ. रोल्स देखणे दिसत
छान पाकृ.!
वाह सुंदर
खुप मस्त दिसत आहेत. :) आवडली
रोल्स उचलून तोंडात टाकावेसे
ताई