(प्रेरणा: आदूबाळ यांची समर ऑफ ६९ ची अनुवादित रचना पाहिली, आणि मीही एका इंग्रजी मालिकेच्या
प्रारंभगीताचा मराठीत केलेला हा प्रयत्न .... )
जरी न दिली तुज कोणी कल्पना याची,...
आंधळी खडतर वाट मित्रा, ही जीवनाची...
पोटासाठी पाळावी लागे, लाचारी टुकार नोकरीची...
फाटक्या खिशाल्या लाजेखातरही, न साथ कोण्या दमडीची...
पेरणीविना करपून गेली, कोवळी प्रेमशिवारं तुज्या मनीची...
आठदिन माहवर्षे उलटली कैक, कोरड्या रहाटगाडग्याची..
परी तुझ्यासवे तिथे असेन मी, हे जाणून घे तू ...
संकटांच्या वर्षावात जरी पोळलास तू,
तरी तुझ्यासवे तिथे असेन मी, हे उमजून घे तू ...
याजन्मीचा सहोदरच जणु माझा तू ...
तुझ्यासवे तिथे असेन मी,
कारण माझ्यासाठीही असशीलचना दोस्ता तिथे तू ....
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2618
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोणती शिरेल? मूळ गाणंपण द्या
फ्रेंड्स
In reply to कोणती शिरेल? मूळ गाणंपण द्या by एस
THE REMBRANDTS LYRICS
In reply to कोणती शिरेल? मूळ गाणंपण द्या by एस
या गाण्याचे गुगल ने असे भाषांतर केले..
In reply to THE REMBRANDTS LYRICS by पगला गजोधर
फ्रेण्द्सचे त टायटल साँग का?
टका
In reply to फ्रेण्द्सचे त टायटल साँग का? by टवाळ कार्टा
*बरोबर
In reply to टका by पगला गजोधर
छानच जमलंय. आवडलं.
थॅंक्स
In reply to छानच जमलंय. आवडलं. by पद्मावति
जम्या साहेब... आवडेश हो आवडेश
थॅंक्स
In reply to जम्या साहेब... आवडेश हो आवडेश by महासंग्राम