१५ ऑगस्टची लगबग. लेकीच्या हट्टासाठी ती शाळेत यायला तयार झालेली.
लेकीचं देशभक्तीपर गाणं तिनं चांगलंच पाठ करून घेतलेले.
पांढरा गणवेश, मामाने आणलेले पांढरे शूज घालून लेक डोईच्या शेंड्या उडवत फिरत होती.
**********************
शाळेतील ध्वजवंदनाचा कार्यक्रम शिस्तबद्धरीत्या पार पडत होता. पाहुण्यांनी तिरंगा फडकविला. हिने उजव्या हाताची सलामी दिली.
तालात वाजणारा बँड.
समूहाच्या धीरगंभीर आवाजातल्या ‘जन गण मन’ बरोबर तिने सूर मिसळले.
मान आणि नजर वर रुबाबदारपणे फडकणाऱ्या तिरंग्यावर. पुढच्याच क्षणी तिचे डोळे डबडबले, पुढचं धूसर झाले. घशातून आवाज निघेना. अंग थरथरू लागले.
.
.
.
तोच तिरंगा! याच्यातच लपेटून तिच्या पतीला आणले होते. तिच्या जीवनाचा साथीदार याच तिरंग्याच्या रक्षणासाठी तिला एकटं सोडून गेला होता.
वाचने
3799
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
शतशब्दकथा
ओह.....
:(
:(
In reply to :( by पद्मावति
_/\_
_/\_ :'(
:(
:(
_/\_
वीरमाता, वीरपत्नींना खरोखरंच
+१
In reply to वीरमाता, वीरपत्नींना खरोखरंच by एस
जव्हेर भाऊ
In reply to +१ by जव्हेरगंज
+१
सर्वांचे आभार..
छान कथा
छान!
आवडली
:(
1+