Skip to main content

एकटी - शतशब्दकथा

लेखक निओ यांनी शुक्रवार, 19/08/2016 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
१५ ऑगस्टची लगबग. लेकीच्या हट्टासाठी ती शाळेत यायला तयार झालेली. लेकीचं देशभक्तीपर गाणं तिनं चांगलंच पाठ करून घेतलेले. पांढरा गणवेश, मामाने आणलेले पांढरे शूज घालून लेक डोईच्या शेंड्या उडवत फिरत होती. ********************** शाळेतील ध्वजवंदनाचा कार्यक्रम शिस्तबद्धरीत्या पार पडत होता. पाहुण्यांनी तिरंगा फडकविला. हिने उजव्या हाताची सलामी दिली. तालात वाजणारा बँड. समूहाच्या धीरगंभीर आवाजातल्या ‘जन गण मन’ बरोबर तिने सूर मिसळले. मान आणि नजर वर रुबाबदारपणे फडकणाऱ्या तिरंग्यावर. पुढच्याच क्षणी तिचे डोळे डबडबले, पुढचं धूसर झाले. घशातून आवाज निघेना. अंग थरथरू लागले. . . . तोच तिरंगा! याच्यातच लपेटून तिच्या पतीला आणले होते. तिच्या जीवनाचा साथीदार याच तिरंग्याच्या रक्षणासाठी तिला एकटं सोडून गेला होता.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3800
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

संपादकांना विनंती. शीर्षकामधे 'शतशब्दकथा' जोडावे.

ओह.....

:(

In reply to by पद्मावति

:(

_/\_

_/\_ :'(

:(

:(

_/\_

In reply to by जव्हेरगंज

एस सर आणि जव्हेर भाऊ ..धन्यवाद.

+१

छान कथा

:(

आवडली. पण मनाला चटका लाऊन गेली.