✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मिपाकरांचा सल्ला हवाय! :)

व
विसोबा खेचर यांनी
Tue, 09/23/2008 - 12:18  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14966 वाचन

💬 प्रतिसाद (40)

प्रतिक्रिया

म
मनिष Tue, 09/23/2008 - 12:38 नवीन

खुशाल असे लिहावे -

"शिन्च्या, मिपावर तुझा लेख प्रसिद्ध होतो आहे म्हणून उलट तूच मला पैशे दे लेका!"
प्रेमाने लिहायचे असेल तर लिहा, नाहीतर त्याला म्हणा ब्लॉग काढून लिही हवे ते! :) - मनिष
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 09/23/2008 - 19:54 नवीन

हेच म्हणते..

प्रेमाने लिहायचे असेल तर लिहा, नाहीतर त्याला म्हणा ब्लॉग काढून लिही हवे ते! मनिषशी सहमत आहे.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिष
व
विनायक प्रभू Tue, 09/23/2008 - 12:39 नवीन

पैसे

http://vipravani.wordpress.com/ एम्.एफ मध्ये जा असे सागावे. त्याला तिथे मिळाले किंवा नाही मिळाले तो त्याचा प्रश्न. समाज सेवा करणार्या लोकांना पैसे मिळतात. लिहुन स्व माज सेवा करण्यासाठी नाही. वि.प्र.
  • Log in or register to post comments
प
प्रकाश घाटपांडे Tue, 09/23/2008 - 12:41 नवीन

अस व्हय?

मला वाटल तात्या संपादकाला सांगुन त्याचे लेख उडिवतोय. तव्हा तो इचारतोय "आपण मिपाचे मालक आहात हे समजले. मला मिपावर एक चांगला लेख द्यायचा आहे. त्याचे तुम्ही किती पैसे घेणार?" प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/23/2008 - 12:41 नवीन

"आपण

"आपण मिपाचे मालक आहात हे समजले. मला मिपावर एक चांगला लेख द्यायचा आहे. त्याचे मला तुम्ही किती पैसे देणार?" चांगला का वाईट ते आमचं संपादक मंडळ आणि त्यांचे मदतनीस ठरवतात, आणि यांत मिपाचे सगळेच सभासद येतात. तेव्हा आधी त्यांना लेख वाचूदेत मग निर्णय पाच लोकांच्या कमिटीवर सोपवण्यात येईल. त्या कमिटीत कोणाला घ्यायचं यासाठी मिपावर एक कौल घेण्यात येईल. आणि मग कमिटी जो निर्णय घेईल तो मान्य आहे का नाही हे पुन्हा कौलावर चढवण्यात येईल .... (हुश्श दमले. या वयात यापुढे टायपिंग नाही होत माझ्याच्यानी!)
  • Log in or register to post comments
स
सखाराम_गटणे™ Tue, 09/23/2008 - 12:41 नवीन

मला वाटते

मला वाटते की तात्या तुम्ही त्याला सत्यपरीस्थीती सांगावी. त्याला येथील अनुभाव नसावा. आपण त्याला समजावावे. ----- नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 09/23/2008 - 12:45 नवीन

अवांतर.. :)

नाडीला घाबरु नका, ज्योतिषाला पैसे देउन पटवा. हसता हसता खुर्चीतून धापकन खाली पडलो! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™
द
दिपोटी Tue, 09/23/2008 - 12:44 नवीन

अबक : खंयचो रे तू ?

तात्यांनु, त्यांका सांगा की हंयसर मिपावर फुक्काट करमणूक, गाणी-बजावणी, इनोद-विनोद, मनोरंजन होतांसा त्यां क्काय तुकां कमी आसां म्हून तू त्यांचे पैसे मांगतसयस ? - दिपोटी
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 09/23/2008 - 12:50 नवीन

तात्या

प्रतिसाद देण्याचे किती पैसे मिळतील? (म्हणजे प्रति प्रतिसाद अमूक अमूक पैसे अबकने मिसळपाव कल्ला समितीत जमा करावेत.) मनस्वी *डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*
  • Log in or register to post comments
ट
टारझन Tue, 09/23/2008 - 14:51 नवीन

+१०१

तात्या असं असेल तर आमाना बी पैसं पाहेन ,.... काय ग मने ... माजे धा प्रतिसाद ... लगिच .... बाकी लेखक धंदेवाइक (सुद मराठीत प्रोफेशनल हो) असावा. पण त्यांना सांगावे की इथे "फ्रि सोर्स कोड" चा फंडा चालतो , आणि लेखक वाचक चालक मालक पालक ... सगळेच हा एक स्वखुषीसाठी प्रकल्प राबवत आहेत -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
श
शैलेन्द्र Tue, 09/23/2008 - 12:54 नवीन

तात्या, त्य

तात्या, त्याला म्हणाव, मि पा साठि तिकीट सुरु केल कि असे पैसे मिळ्तील..
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/23/2008 - 12:59 नवीन

किंवा

तात्या, त्यांना पिडाकाकांची कविता "मिपावर लिहिणं धोक्याचं" पाठवा आधी!
  • Log in or register to post comments
ज
जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 09/23/2008 - 13:01 नवीन

तात्या

तात्या त्याला नाडी केंन्द्रामध्ये पाठवा आधी ;) आपल्या लेखनाचे भविष्य व येणार शुन्य प्रतिसाद तर पाहून घेईल.... मग तुम्हालाच पैसे देईल की लेखन प्रसिध्द करा ह्यासाठी :) जैनाचं कार्ट शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Tue, 09/23/2008 - 13:06 नवीन

आपुनबी

आपुनबी येईच बोलता है... बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जैनाचं कार्ट
य
यशोधरा Tue, 09/23/2008 - 14:23 नवीन

तात्या,

तात्या, त्यांना म्हणावे, या प्रश्नाने तुम्ही मला बुचकळ्यात टाकून उगाच माझा वेळ खाल्ला, मग पुन्हा मिपाकरांचा सल्ला घेण्यासाठी मी हा लेख लिहिला, मग मिपाकरांनी हे वाचले आणि वेळात वेळ काढून इथे प्रतिसाद टायपले... तुमच्या एका अश्या पत्राने आम्हां सर्व मिपाकरांचा इतका वेळ घेतला, त्याबद्दल तुम्हीच ( म्हणजे अबक) आम्हां सर्वा मिपाकरांना किती पैसे देणार??? याचे उत्तर तुम्हांला अबक देतील असे काही वाटत नाही!! :D
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Tue, 09/23/2008 - 14:32 नवीन

अबक..

तात्या, त्याला म्हणावे 'मिसळपावाचा' आस्वाद घेतल्यावर पैसे (आस्वादघेणार्‍याला) मालकांना द्यावे लागतात. हॉटेलात येणार्‍या गिर्‍हाईकाला त्याच्या येण्याचे पैसे 'मालक' देत नसतो.
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 09/23/2008 - 14:36 नवीन

तात्या (मालक+चालक्+संचालक)

सरकारी शिरस्त्यानुसार... १.आपले "मॉल्यवान" लेखन आंतर जालावर कोठे प्रकाशित झाले ते विचारा.. २.हे साहित्य तुमचेच आहे याचा पुरावा काय? चॉरि नाहि.. याला पुरावा काय? ३.आपल्या आधिच्या लेखनास अस्सल प्रतीसाद किती व कुणाचे आले आहेत? मला वाटते ही माहीती पुरेशि आहे "सोलायला" नाद खुळा (सरपंच आणि पारावरचि मंडळी कशी "सोलतात " याचि ऊत्सुकता असलेला.) मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 09/23/2008 - 15:06 नवीन

सोप्पे आहे तात्या ...

त्याला म्हणावं की बाबारे तुझे " बहुमोल साहित्य मिपावर " जरुर प्रकाशित केले जाईल व त्याला योग्य ती किंमतही दिली जाईल. त्याबाबत बिणधास्त रहा पण ... त्याला यासाठी खालील कागदपत्रे " सरकारी णियमानुसार व मराठी साहित्य परिषदेच्या मार्गदर्शक तत्वांनुसार " खालील कागदपत्रे वरीजनल व त्याच्या ५ ऍटेस्टेस प्रतींसह मिपाच्या कार्यालयात व कार्यालयीन वेळात सादर करावी लागतील ... १, साहित्य स्वतःचेच असल्याबद्दलचे हाय कोडतामधुन प्रतिज्ञापत्रक ... २, ते कुठे पुर्वप्रसिद्ध असल्यास त्या साईट वर कॉपीराईट हक्काच्या उल्लंघनाबद्दल खटला भरल्याचा पुरावा म्हनुन संबंधित कागदपत्रे ... ३, पुर्वप्रकाशित नसल्यास त्याचा "चौर्याचा " प्रतिबंधक उपाय म्हणुन " माहिती तंत्रज्ञान गुन्हे अन्वेषण विभागाला " सादर केलेले २ संरक्षण प्रतिज्ञापत्र" ... ( याला त्या विभागाच्या विभागीय आयुक्तांचे ओळखपत्रची छांयांकित प्रत जोडली असावी.) ४, ते साहित्य मराठीतुन व सुद्धलेखनाच्या पातळीवर उतरले असल्यास त्यासंबंधीचे " अबक साईटच्या प्रशासकाच्या सहीचे " प्रतिज्ञापत्र ... ५, जर त्यात गैरमराठी शब्दांचा वापर झाला असल्यास त्याच्या परवानगीचे " राज ठाकरे वा आबा पाटलांच्या" सहीचे पत्र ... ६, ते ज्या संगणकवर टायपले गेले त्याची खरेदीची बिले ... ७, त्यावर असणार्‍या " सॉफ्तवेअर्स्च्या खरेपणाबद्दल" ऍन्टी- पायरसी सेल" चे पत्र ... ८, लिहण्यासाठी वापरलेल्या खोलीच्या जागेचा ७-१२ चा उतारा, प्रॉपर्टी टॅक्स भरल्याची नोंद व ती बिनाशेती व कुठलेही कर्जरहीत अस्सल्याचा पुरावा ... ९, लिहताना वापरलेल्या विजेचे भरलेले बील व त्यामगची पुर्ण थकबाकी रहीत बिले ... १०, त्यावर येणार्‍या प्रतिसादाबद्दलचे ना-हरकत प्रमाणपत्र ... ११, प्रतिसाद वाचुन झीट येणार नाही हे सिद्ध करणारे वैद्यकीय प्रमाणपत्र ... १२, मानसीक संतुलन ठीक असल्याचा पुरावा .... १३, ज्या खात्यात पैसे पाठवायचे आहेत त्याचे डिटेल्स ... १४, मागच्या ५ वर्षाचे टॅक्स रिटर्न्स ... १५, ह्या पैशातला १० % भाग सामाजीक कार्याला आगाऊ दिल्यासंबंधीच्या घोषणेचे प्रतिज्ञापत्र ... १६, ते स्वतः कोण आहेत ह्यासंबंधीची सर्व सरकारी कागदपत्रे ... ( ह्यात त्यांच्या मागच्या ३ पिढ्यांसबंधी पण कागदपत्रे द्यावी लागतील ...) १७, त्यांचा उत्तम चरित्राची व सद्ध्वर्तवणुकीची साक्ष देणारे गॄहमंत्रालयाचे प्रतिज्ञापत्र ... १८, ते कुठल्याही " राजकीय पक्षाशी , धार्मीक संघटनांशी २ संबंधीत नसल्याचा पुरावा म्हनुन त्या त्या पार्टीकडुन पत्रे ... १९, "५ प्रसिद्ध लोकांचे " ओळखीसाठी साक्षीपत्र ... २०, वरील सर्व कागदपत्रे खरी असल्याचे सांगणारे त्यांचे " सिप्रीम कोर्टातले" प्रतिज्ञापत्र ... हुश्श !!!! एवढे करुन मगच त्यांना पैसे द्या ... अवांतर : पैसे दिल्यावर त्यांचा " दुरध्वनी क्रमांक " आम्हाला द्यायला विसरु नका ... आम्ही इकडुन " खंडणीसाठी" फोन करतो ... च्यायला लोकं लाख - लाख रुपये कमवतात, मग आम्हाला " प्रोटेक्सन मनी " द्यायला नको का ??? सरकारी बाबु - छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 09/23/2008 - 15:09 नवीन

भले शाब्बास!

भले शाब्बास डान्या! खंडणीवसुली पथकाचा 'डान' शोभतोस खरा! मनस्वी *डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात.*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/23/2008 - 15:15 नवीन

अवांतर

तात्यांनी सुरुवातच "सभ्य स्त्रीपुरूषहो" अशी केली आहे. तेव्हा कोणाला शंका येऊ शकेल इथे डॉन लोकं काय करत आहेत. डॉन या शब्दाचा एक अर्थ सभ्य पुरूष, ज्याला मराठीत झंटलमन म्हणतात. स्पॅनिशमधे तर श्रीयुतच्या ऐवजी डॉनच म्हणतात!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी
छ
छोटा डॉन Tue, 09/23/2008 - 16:08 नवीन

अरेरे ....

तात्यांनी सुरुवातच "सभ्य स्त्रीपुरूषहो" अशी केली आहे. तेव्हा कोणाला शंका येऊ शकेल इथे डॉन लोकं काय करत आहेत.
अरेरे ... गलतीसे मिश्टेक हो गयी, माफी असावी "डॉण आदिती ( रेफ : सरकार - ३ ) ... पण हे " सभ्य उर्फ झंटलमन " कसे व्हायचे ? काही छोटासा क्रॅश कोर्स आहे का ? छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
३
३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 09/23/2008 - 16:22 नवीन

पण हे " सभ्य

पण हे " सभ्य उर्फ झंटलमन " कसे व्हायचे ? आपण व्याख्येनेच " सभ्य उर्फ झंटलमन " आहात ... झंटलमन बाय डेफिनीशन! काळजी नका करू! गलतीसे मिश्टेक हो गयी, माफी असावी "डॉण आदिती ( रेफ : सरकार - ३ ) ... सरकार - ३ मी पहाणार नाही कारण त्यावर "बहिष्कार" आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
छ
छोटा डॉन Tue, 09/23/2008 - 16:11 नवीन

चुकुन डबल झाला ...

म्हणुन काढुन टाकला आहे ... तसदीबद्दल क्षमस्व ! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
प
प्रकाश घाटपांडे Tue, 09/23/2008 - 15:17 नवीन

डॉन्या

\ =)) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
व
विसोबा खेचर Tue, 09/23/2008 - 15:21 नवीन

डॉन्या, तुझ

डॉन्या, तुझी नियमावली सह्हीच आहे रे! :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
श
शितल Tue, 09/23/2008 - 19:27 नवीन

मस्त रे !

डॉन्या, जबरा प्रतिसाद रे ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ल
लिखाळ Tue, 09/23/2008 - 19:57 नवीन

हा हा हा

१०, त्यावर येणार्‍या प्रतिसादाबद्दलचे ना-हरकत प्रमाणपत्र ... ११, प्रतिसाद वाचुन झीट येणार नाही हे सिद्ध करणारे वैद्यकीय प्रमाणपत्र ... भारी आहे बुवा.. :) --लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
भ
भास्कर केन्डे Tue, 09/23/2008 - 20:25 नवीन

डॉन = कारकून

डॉन बाबा, खासच नियमावली!!! वाचून वेगवेगळ्या हापिसात कारकूनांकडून झालेल्या अत्याचाराची आठवण झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
द
देवदत्त Tue, 09/23/2008 - 21:56 नवीन

ह्या

=)) ह्या पैशातला १० % भाग सामाजीक कार्याला आगाऊ दिल्यासंबंधीच्या घोषणेचे प्रतिज्ञापत्र ... हे आहे म्हणून. नाही तर मिळालेल्या रुपयांवरील कर सरकारला भरल्याची पावती ही नंतर सादर करणे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
स
स्वप्निल.. Wed, 09/24/2008 - 05:23 नवीन

एकदम मस्त..!!

डॉन, वाचता वाचता खाली पडलो..एकदम झक्कास प्रतिक्रिया... स्वप्निल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
न
नोहिद सागलीकर Tue, 09/23/2008 - 18:13 नवीन

प्रिय अ ब क महाशय

"आपण मिपाचे मालक आहात हे समजले. मला मिपावर एक चांगला लेख द्यायचा आहे. त्याचे मला तुम्ही किती पैसे देणार?" -- अबक. बाबारे इथ ''बोला चिच कडी आणी बोला चाच भात '' इथ आनंद्,प्रेम ,ज्ञान,वीरंगूळा , तुला भरभरुन मिळेल , पन बाळा तुला हे काय ?साहित्य परिषद वाटली का काय पैसे मागतोय वेड्या .........................................................
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Tue, 09/23/2008 - 18:43 नवीन

डॉन तु

डॉन तु सरकारी हापिसात ७-८ वर्ष कामाला होतास की काय?? :) तुझ्या अटी भारीच आहेत. तात्या शेठ. त्या अबक ला सांगा तशी गरजच न्हायी. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Tue, 09/23/2008 - 19:13 नवीन

पैसे नाही

पैसे नाही देणार पण तुमच्या खरडवहीत ;">"तुमचा लेख खुप छान आहे. तुम्ही कित्ती कित्ती हुश्शार!" अशी मोठ्ठ्या अक्षरातली खरड नक्कीच टाकण्यात येईल असे अश्वासन द्यावे.
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन Tue, 09/23/2008 - 19:34 नवीन

+१

भारीच रे ... झक्कास !!! छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनामिक
ब
ब्रिटिश Tue, 09/23/2008 - 19:31 नवीन

जेआयला

जेआयला तेला पैस हावं ? पैस हावं ? पोकल बांबूच फटक देत बोल मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला सगला काय नावानच हाय)
  • Log in or register to post comments
स
संदीप चित्रे Tue, 09/23/2008 - 19:48 नवीन

च्यायला हे म्हणजे

एखाद्या खेळाडूने ऑलिंपिकच्या चाचणी परीक्षेआधीच विचारायचे -- भाग घेण्यासाठी किती पैसे देणार ? तात्या, 'अबक'ना कळव 'हौसेला मोल नसतं साहेब.' -------- (अवांतरः च्यायला, उद्या लोक विचारतील मल मिपा वाचायचंय, किती पैसे देणार ? !!) ;)
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश टिंग्या Tue, 09/23/2008 - 19:52 नवीन

मिपाकरांचा सल्ला हवाय का?

सल्ला द्यायचे पैशे लागतील! मला तुम्ही किती पैशे देणार? ;) (झानटामाटिक) टिंग्या ;)
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 09/23/2008 - 20:23 नवीन

मा. अबक महोदय,

अहो मिपाकर एवढे पोचलेले आहेत की तुम्हालाच दिवसाला २० प्रमाणे लेख पाडून देतील तुमच्या ब्लॉगवर टाका पाहिजे तितके आणि प्रत्येकी ५०रु. प्रमाणे १०००रु. रोकडा तुम्हीच आम्हाला द्यावेत. (विडंबने हवी असल्यास रु.१०० प्रत्येकी , कच्चा माल शोधून देण्याची जबाबदारी तुमची नाहीतर त्याचे वेगळे रु.५० प्रत्येकी ;) ) तेवढाच मिपा कट्ट्यासाठी निधी! B) काय कशी वाटते आयडियाची कल्पना? चतुरंग
  • Log in or register to post comments
व
वेताळ Wed, 09/24/2008 - 10:20 नवीन

प्रिय तात्या

मला वाटते अबक हा परिस्थीतीशी झगडणारा विद्रोही नवलेखक असावा . प्रत्येक संपादकाच्या दारावर थपडा खाउन तो मिपावर खुप आशेने आला असावा.तुमच्या कडुन बिचारयाला खुप अपेक्षा असाव्यात.त्याला काही वंगाळ न बोलता त्याचे लेखन प्रसिध्द करावे व पैश्याचा मोबदला म्हणुन ४ ऑक्टोबर च्या मिपाच्या बैठकीत असात्विक गटात त्याला सामिल करुन घ्यावे.तेवढीच त्याची साहित्यीक त्रुष्णा शांत होइल. वेताळ
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 09/24/2008 - 12:10 नवीन

प्रिय अबक

प्रिअ अबक, आपले एटीएम कार्ड आणि पिन नंबर पाठवून द्यावा. लेख प्रकाशित झाल्यावर मानधन ब्यांकेत जमा करण्यात येईल. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा