✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

ग — गंगाधर मुटे, Sat, 07/09/2016 - 12:48
मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्‍याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतकर्‍याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्‍याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्‍याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्‍याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्‍याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!

                     - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रतिक्रिया द्या
175552 वाचन

💬 प्रतिसाद (484)

मी बी कृषि मंत्री होईन म्हणतो

मोदक
Sat, 07/09/2016 - 12:58 नवीन
मी बी कृषि मंत्री होईन म्हणतो अशी एक किरकोळ दुरूस्ती केलीत तर कविता सत्याच्या अधिक जवळ जाईल असे वाटते.
  • Log in or register to post comments

मंत्री म्हटल्यावर त्यात

गंगाधर मुटे
Sun, 07/10/2016 - 14:03 नवीन
मंत्री म्हटल्यावर त्यात कृषिमंत्रीही आपोआपच येतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

म्हणजे

नाखु
Sat, 07/09/2016 - 14:04 नवीन
एकूण असा प्रकार आहे तर !!!
  • Log in or register to post comments

:)

गंगाधर मुटे
Sun, 07/10/2016 - 14:03 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

मा. सदाभाऊ खोत यांची

अभ्या..
Sat, 07/09/2016 - 14:45 नवीन
मा. सदाभाऊ खोत यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
  • Log in or register to post comments

हार्दीक अभिनंदन!

गंगाधर मुटे
Sun, 07/10/2016 - 14:04 नवीन
हार्दीक अभिनंदन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

राजनीती मंत्री कुणाच्याही

विवेकपटाईत
Sat, 07/09/2016 - 17:04 नवीन
राजनीती मंत्री कुणाच्याही नावाने का होईना, मंत्री, प्रधानमंत्री होण्यासाठीच असते. त्यात गैर काय..मला कुणी मंत्री बनविले मी पण नकार देणार नाही (या जन्मात तरी शक्यता दिसत नाही, पण आपला पुनर्जन्मावर विश्वास आहे).
  • Log in or register to post comments

दुर्दैव हे आहे की शेतकर्‍याचे

गंगाधर मुटे
Sun, 07/10/2016 - 14:06 नवीन
दुर्दैव हे आहे की शेतकर्‍याचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोचणारे शेतकर्‍याच घात करत असते. शल्य आहे ते एवढेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

दुर्दैव हे आहे की शेतकर्‍याचे

मोदक
Sun, 07/10/2016 - 17:12 नवीन
दुर्दैव हे आहे की शेतकर्‍याचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोचणारे शेतकर्‍याच घात करत असते हा घात करणे प्रकार मे २०१४ पासून सुरू झाला आहे की गेले कांही वर्षांपासून (समजा १०-१५ वर्षे) सुरूच आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

अव्याहत सुरू आहे.

गंगाधर मुटे
Sun, 07/10/2016 - 19:59 नवीन
अव्याहत सुरू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

१६ ऑगस्ट १९४८ पासून का?

मोदक
Mon, 07/18/2016 - 15:46 नवीन
१६ ऑगस्ट १९४८ पासून का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

माफी असावी १६ ऑगस्ट १९४७ असे

मोदक
Mon, 07/18/2016 - 15:48 नवीन
माफी असावी १६ ऑगस्ट १९४७ असे वाचावे. किंवा संपादकांनी प्रतिसाद संपादित केला तरी चालेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

मुटे साहेब मंत्री बनण्याणे

विवेकपटाईत
Sun, 07/10/2016 - 18:56 नवीन
मुटे साहेब मंत्री बनण्याणे शेतकर्यांचा घात कसा काय होतो, हे मला तरी समजत नाही. किंवा या सरकारला तुम्ही शेतकरी विरोधी समजता आहात का? तर हा पूर्वग्रह आहे. त्यांना कार्य करू द्या. कमीत कमी या सरकारने जल शिवारांचे कार्य चांगले केले आहे. युरियाची चोरबाजारी काही अर्थी थांबविली आहे. DFCचे कार्य पूर्ण झाल्यावर भाज्यांच्या गाड्या हि सुरु होण्याची शक्यता आहे. हरियाना पासून थेट भाजी २४ तासांत मुंबईला पोहचेल. शेतकरी ग्राहक दोघांना फायदा होईल. रस्त्यांच्या रुंदीकरण्याचा कामाला वेग आला आहे. त्याचा फायदा हि शेतकर्याला होईल. एवढी काही वाईट सरकार नाही आहे. बाकी शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे, या संबंधित शेतकरी संघटना किती जोमाने आपली बाजू मांडतात? या बाबतीत लोकाना जागृत करण्याचे किती कार्य झाले? 'कांदे आणि भाजी महाग का' या वर मिसळपाव मध्ये मी लेख लिहिले आहे, किमान मुटे साहेबांनी 'डाळीला ग्राहकांनी काय भाव द्यावा आणि का' असा लेख मिसळपाव वर लिहायला पाहिजे. पण सबसिडी आणि लोन माफीच्या पुढे नेते काहीच बोलत नाही. कारण यातच सर्व मलाई आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

विकास झालाच नाही असे थोडेच

गंगाधर मुटे
Sun, 07/10/2016 - 20:02 नवीन
विकास झालाच नाही असे थोडेच आहे? गेल्या ५० वर्षात विकास खूप झालाय पण त्याचा फायदा शेतकर्‍याला होत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

तुमचा प्रतिसाद अगदी मान्य

ज्योति अळवणी
Sat, 07/23/2016 - 20:16 नवीन
तुमचा प्रतिसाद अगदी मान्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

मुटे जी तुम्हाला मन्त्रीपद

कविता१९७८
Sat, 07/09/2016 - 17:09 नवीन
मुटे जी तुम्हाला मन्त्रीपद मिळाल तर तुम्ही स्वीकारणार नाही का??
  • Log in or register to post comments

अवश्य स्विकारेन. पण शेतीचे

गंगाधर मुटे
Sun, 07/10/2016 - 14:08 नवीन
अवश्य स्विकारेन. पण शेतीचे प्रश्न त्यातून सुटत नाही हेही प्रांजळपणे कबूल करण्याचे धैर्य दाखवेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

पण शेतीचे प्रश्न त्यातून सुटत

टवाळ कार्टा
Sun, 07/10/2016 - 14:42 नवीन
पण शेतीचे प्रश्न त्यातून सुटत नाही
असे असेल तर जे आत्ता खुर्चीत आहेत त्यांच्यावर टिका कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

हेच विचारणार होते

कविता१९७८
Sun, 07/10/2016 - 14:48 नवीन
हेच विचारणार होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

सत्तेच्या खुर्चीतून शेतकर्

गंगाधर मुटे
Sun, 07/10/2016 - 20:04 नवीन
सत्तेच्या खुर्चीतून शेतकर्‍यांच्या समस्या निर्माण होत आहे म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

म्हणजे सत्तेची हाव तुम्हालाही

कविता१९७८
Sun, 07/10/2016 - 14:51 नवीन
म्हणजे सत्तेची हाव तुम्हालाही आहे पण उगाच ज्याच्या हाती सत्ता आहे त्यावर टीका करावी ही तुमची सवय आहे असे दिसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

तुमचे मत तुम्हाला लखलाभ.

गंगाधर मुटे
Sun, 07/10/2016 - 20:05 नवीन
तुमचे मत तुम्हाला लखलाभ. तुमच्या मताचा आदर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कविता१९७८

मुटेजी अशा कविता

अनुप ढेरे
Sun, 07/10/2016 - 14:37 नवीन
मुटेजी अशा कविता पाडण्यापेक्षा आत्ता बाजारसमितीबाबत झालेल्या बदलांबद्दल तुमचं मत लिव्हा की! त्यात काय चांगलं काय वाईट ते.
  • Log in or register to post comments

कविता पाडण्यापेक्षा .....

गंगाधर मुटे
Sun, 07/10/2016 - 20:05 नवीन
कविता पाडण्यापेक्षा .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनुप ढेरे

अरारा.....,

जावई
Sun, 07/10/2016 - 17:08 नवीन
मुलूख मैदानी तोफ फुसकी निघाली...उगाचच आम्ही मोटारसायकलीला ऊस बांधून यांच्यासाठी बेंबीच्या देठापासून बोंब मारत होतो..पोलीसांचा मार पण खाल्ला पोटभरुन...
  • Log in or register to post comments

आपल्या आस्वादासाठी माझा एक

गंगाधर मुटे
Fri, 07/22/2016 - 04:53 नवीन
आपल्या आस्वादासाठी माझा एक शेर; दावा मला कुणीही कुठलाय एक मंत्री निर्मोह-त्याग-करुणा ज्याच्या कथेत आहे (मिसळपाववर पूर्वप्रकाशित)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जावई

हा धागा महाप्रलयाच्या दिशेने

गंगाधर मुटे
Sun, 07/10/2016 - 20:09 नवीन
हा धागा महाप्रलयाच्या दिशेने वाटचाल करू नये म्हणून प्रतिसादांना या धाग्यावर मी उपप्रतिसाद देण्याचे यानंतर टाळणार आहे. कवितेवर वाचक आपापल्या आकलनानुसार मत नोंदवू शकतात. तो त्यांचा अधिकार आहे हे मी मान्य करतो.
  • Log in or register to post comments

१६ ऑगस्ट १९४७

गंगाधर मुटे
Mon, 07/18/2016 - 19:32 नवीन
१६ ऑगस्ट १९४७ पासून का?
१६ ऑगस्ट १९४७ च्या आधीपासून. लढाया कशासाठी होत होत होत्या? इंग्रज भारतात कशासाठी आले होते? लुटायसाठीच ना? की सातव्या वेतना अयोगाची खैरात करायला, पुढार्‍यांना मंत्रीपदे वाटायला आले होते? भारतात खनीजद्रव्ये, जंगली संपत्ती आणि शेतीमाल सोडून लुटण्यासारखं दुसरं होतंच काय?
  • Log in or register to post comments

इंग्रज शेतकर्‍याचे नांव घेवून

मोदक
Mon, 07/18/2016 - 19:35 नवीन
इंग्रज शेतकर्‍याचे नांव घेवून भारत लुटायला आले होते का? तुमचा नक्की काय मुद्दा आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

भारत लुटायला म्हणजे काय?

गंगाधर मुटे
Mon, 07/18/2016 - 19:54 नवीन
भारत लुटायला म्हणजे काय? हे समजाऊन सांगा जरा.
  • Log in or register to post comments

वरचा प्रतिसाद तुम्हीच लिहिला

मोदक
Mon, 07/18/2016 - 20:15 नवीन
वरचा प्रतिसाद तुम्हीच लिहिला आहे की मला भास होत आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

इंग्रज शेतकर्‍याचे नांव घेवून

गंगाधर मुटे
Mon, 07/18/2016 - 22:57 नवीन
इंग्रज शेतकर्‍याचे नांव घेवून भारत लुटायला आले होते का? हे मी लिहिलं आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

इंग्रज शेतकर्‍याचे नांव घेवून

मोदक
Tue, 07/19/2016 - 00:19 नवीन
इंग्रज शेतकर्‍याचे नांव घेवून भारत लुटायला आले होते का? हे मी लिहिलं आहे? हो. हे वाचा. *************************** गंगाधर मुटे - दुर्दैव हे आहे की शेतकर्‍याचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोचणारे शेतकर्‍याच घात करत असते मोदक - हा घात करणे प्रकार मे २०१४ पासून सुरू झाला आहे की गेले कांही वर्षांपासून (समजा १०-१५ वर्षे) सुरूच आहे? गंगाधर मुटे - अव्याहत सुरू आहे. मोदक - १६ ऑगस्ट १९४७ पासून का? गंगाधर मुटे - १६ ऑगस्ट १९४७ च्या आधीपासून. लढाया कशासाठी होत होत होत्या? इंग्रज भारतात कशासाठी आले होते? लुटायसाठीच ना? (या वाक्यापुढेही प्रतिसाद आहे) मोदक - इंग्रज शेतकर्‍याचे नांव घेवून भारत लुटायला आले होते का? गंगाधर मुटे - भारत लुटायला म्हणजे काय? हे समजाऊन सांगा जरा. मोदक - वरचा प्रतिसाद तुम्हीच लिहिला आहे की मला भास होत आहेत? ***************************
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

अरे व्वा! हे तुम्हाला नीट

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 12:31 नवीन
अरे व्वा! हे तुम्हाला नीट वाचून लिहिता आलं. अजिबात भास झालेला नाही. मग माझा मुद्दा इतका स्पष्ट असताना तुमचा नक्की काय मुद्दा आहे? हा प्रश्न कशाला विचारला आहे? उगीच गुर्‍हाळ लांबवायच. बोटायलाही त्रास आणि कीबोर्डलाही त्रास.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

तुमचा नक्की काय मुद्दा आहे?

मोदक
Tue, 07/19/2016 - 15:29 नवीन
तुमचा नक्की काय मुद्दा आहे? सगळ्या सरकारांनी शेतकर्‍याचा घात केला तो कसा केला ते बोला. तुमचा मुद्दा (तुम्हाला) स्पष्ट असेल तर त्याचे पुरावे द्या. माहिती द्या. कोणती सरकारची पॉलिसी कशी चुकली आणि ती कशी सुधारावी याचा अभ्यास केला असला तर त्याची माहिती द्या. मिपावर अनेक तज्ञ लोक आहेत ते सांगतील सरकारशी कसा लढा द्यायचा. त्यांची मदत घ्या आणि तुमचे जे काही असेल ते उद्दिष्ट पूर्ण करा. ..आणि तुम्हाला उगाच गोल गोल गफ्फा हाणायच्या असल्या तर तसे सांगा. तुम्ही शेती करता म्हणजे जगावेगळे काम करत नाही आहात. लाखो करोडो शेतकरी आहेत भारतात. परिस्थीतीमुळे आत्महत्या करतात ही दुर्दैवी बाब आहे पण त्या आत्महत्यांना ठेवी बनवून रडगाणे गायचे असेल तर खुशाल गा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

कवितेत लिहिलेच आहे

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 16:17 नवीन
जे काही लिहायचे ते कवितेत लिहिलेच आहे. ते पुरेसे आहे. ते समजले तरच पुढे बोलण्यात अर्थ. आणि ही कविता आहे. ती काही तुम्हाला उद्देशून लिहिलेली नाही आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

दुर्दैव हे आहे की शेतकर्‍याचे

मोदक
Tue, 07/19/2016 - 16:30 नवीन
दुर्दैव हे आहे की शेतकर्‍याचे नाव घेऊन सत्तेपर्यंत पोचणारे शेतकर्‍याच घात करत असते. शल्य आहे ते एवढेच! हे तुम्हीच लिहिले आहे ना? मग "हे कसे?" असे विचारल्यावर कशाला गोल गोल फिरताय? तुम्ही लिहिले ते वाचले. सगळ्याच सरकारांनी कसा घात केला ते समजले नाही म्हणून तुम्हाला विचारत आहे. एखादी कविता मला उद्देशून लिहिली तरी हरकत नाही. पण तुम्ही केलेले दावे सिद्ध करण्याची जबाबदारी तुमचीच असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

छान कविता

सिरुसेरि
Tue, 07/19/2016 - 08:19 नवीन
मी बी मंत्री होईन म्हणतो नागपुरची संत्री खाईन म्हणतो .
  • Log in or register to post comments

धन्यवाद

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 12:50 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

संघटनेची सीडी करून

सुबोध खरे
Tue, 07/19/2016 - 09:32 नवीन
संघटनेची सीडी करून सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो हांगाश्शी आता कसा बरोबर बोललात. नाही तरी त्या शेतकरी संघटनेत आहेच काय?
  • Log in or register to post comments

वास्तव

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 12:49 नवीन
मी खरे किंवा खोटे लिहित नाही. नेहमी वस्तुस्थिती जशी असेल तशी मांडतो. त्यात बेईमानी करत नाही. कुणाला काय वाटेल याचाही विचार करत नाही. माझ्यासाठी गैरसोईचं ठरणारं असेल तरीही चिंता करत नाही. वाचताना तुमच्यासारख्यांना तुमच्या सोईचं असेल ठीक वाटतं, गैरसोईच असेल तर माझी चामडी सोलून काढावी, असे वाटते. यावर माझ्याजवळच काय निसर्गाजवळही इलाज नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

काहीही ह

सामान्य वाचक
Tue, 07/19/2016 - 15:57 नवीन
जर मोदक राव ना उत्तर द्या बरे आधी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

तुय्म्ही प्राथमिक शाळेत

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 16:20 नवीन
तुय्म्ही प्राथमिक शाळेत शिक्षत होते काय? तुमच्या प्रतिसादावरून तसे वाटले म्हणून विचारले बुवा. उगीच काहीच्याबाही गैरसमज नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक

तुय्म्ही प्राथमिक शाळेत

गंगाधर मुटे
Tue, 07/19/2016 - 16:20 नवीन
तुय्म्ही प्राथमिक शाळेत शिक्षत होते काय? तुमच्या प्रतिसादावरून तसे वाटले म्हणून विचारले बुवा. उगीच काहीच्याबाही गैरसमज नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सामान्य वाचक

हो तुम्हालाही काहीच्याबाही

सूड
Tue, 07/19/2016 - 16:48 नवीन
हो तुम्हालाही काहीच्याबाही वाटत असतं हे तुमच्या कविता आणि प्रतिसादांवरनं कळतंच!! कोणी बोललं की पुन्हा मुस्कटदाबी वैगरे बोलायला मोकळे तुम्ही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

नाही

सामान्य वाचक
Tue, 07/19/2016 - 17:16 नवीन
मी स्वयंघोषित शिक्षक आहे काही लोक स्वयंघोषित तारणहार असतात, तसेच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

आणि तुमचा काय

सामान्य वाचक
Tue, 07/19/2016 - 17:18 नवीन
'काहीच्याबाही' गैरसमज झाला ते सुद्धा लिहा उगीच कोडी घालत बसू नका
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गंगाधर मुटे

मुटे साहेब, तुमच्या कविता आणि

अस्वस्थामा
Tue, 07/19/2016 - 17:01 नवीन
मुटे साहेब, तुमच्या कविता आणि नागपुरी तडके उत्तमच आहेत लिखाण म्हणून. पण, हा पण महत्त्वाचा आहे आणि तुमच्या वाटचालीबद्दल कल्पना आहे म्हणून मांडतोय (अन्यथा प्रयत्न केला नसता), पण आपण इतर शेतीविषयक जे कळकळीचे लिखाण (उदा. नाखूंचे धागे, मुविंचा शेतीचा प्रयत्न इ. इ.) जे की जेन्युइन आहे यावर भाष्य का करत नाही ? शेतकरी संघटनेच्या पलिकडेही आहे आणि फक्त विद्रोही अथवा आम्हीच कसे "शोषित" या आविर्भावामुळे इथे तुम्हाला थोड्या अनपेक्षित प्रतिसादास सामोरे जावे लागतेय हे तुमच्या लक्षात येतेय का ? भारताततरी शेतकरी आणि इतर अशी इतकी सहज विभागणी सोपी नाहीय. इथल्या बर्‍याच जणांचे कोणी ना कोणी शेतीशी निगडीत आहेत. बरेचजण कोरडवाहू अथवा पडीक शेतीमुळे शहराकडे वळालेले आहेत. त्यांना मातीची, शेताची ओढ आहे. त्या सर्वांना एकाच तराजूत तोलून कुठेतरी तुम्ही लोकांना दुखावण्यापलिकडे काही साध्य करता का मग ? माणसं जोडणं, मुविसारख्या नव्याने शेतीकडे वळू पाहणार्‍यांना मदत, प्रोत्साहन देणं हे जास्त महत्वाचं आहे ना. मग तुमच्यासारख्या जाणकार आणि संघटनेच्या व्यक्तीकडून ती अपेक्षा केली तर काय गैर ? तुम्ही एकदातरी तुमचा अप्रोच बदलण्याचा प्रयत्न करून तर पहा ना. इथे सगळे सामान्यच लोक आहेत, जर तुम्ही त्यांच्याशी ही नेहमीच फटकून वागणार असाल तर ते कसे योग्य राहील? तुम्हीच विचार करुन पहा. लोकांचे तुमच्याशी वागणं हे बर्‍याचदा तुमच्या त्यांच्याशी वागण्याचे प्रतिबिंब असतं (खासकरुन जेव्हा त्या लोकांशी तुम्हाला कसलेच घेणं-देणं (obligations) नसतेय) आणि किमान त्याच्यावर विचार तरी व्हावा असं वाटतं. असो.
  • Log in or register to post comments

जबर आणि विचार करायला लावणारा

महासंग्राम
Tue, 07/19/2016 - 17:23 नवीन
जबर आणि विचार करायला लावणारा प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अस्वस्थामा

+११ झणझणीत प्रतिसाद आहे.

मोदक
Tue, 07/19/2016 - 17:25 नवीन
+११ झणझणीत प्रतिसाद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: महासंग्राम
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा