मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
9 Jul 2016 - 12:48 pm

मी बी मंत्री होईन म्हणतो : नागपुरी तडका

लाल दिव्याची चमक पाहीन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतमालाला रास्त भाव
भेटला काय, न भेटला काय
शेतकर्‍याला दारिद्रीत जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपलं जमवून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतकर्‍याला कर्जमुक्ती
भेटली काय, न भेटली काय
शेतकर्‍याला कर्जात जगायची
उपजत सवयच हाय
मी तरी आपला खिसा भरून
घेईन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीचे प्रश्न
सुटलेत काय, न सुटलेत काय
या बैताडबेलण्या शेतकर्‍याले
उपजत अक्कलच नाय
संघटनेची सीडी करून
सत्तेच्या बोहल्यावर चढेन म्हणतो
मी बी मंत्री होईन म्हणतो...!!

शेतीशी प्रतारणा करून
सत्तेत येता येते
शेतकर्‍याशी इमान राखणारा
खड्ड्यामधी जाते
शेतकर्‍याचे नाव फक्त
कामापुरते घ्यावे
सीडी चढून झाली की
खुशाल सोडून द्यावे
सत्ताकारण करावे
तरच मिळते अभय....!!
एकमुखाने बोला भाऊ!
सत्तासुंदरी की जय....!!!

                     - गंगाधर मुटे "अभय"
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

नागपुरी तडकाकविता

प्रतिक्रिया

गंगाधर मुटे's picture

23 Jul 2016 - 11:23 pm | गंगाधर मुटे

मितभाषी साहेब,

लोखंडी तलवारीशी सोन्याची ढाल घेऊन लढता येत नाही.
स्वतःचा जीव गमावायचा नसेल तर ढालही लोखंडाची किंवा त्यापेक्षाही टणक धातूची असावीच लागले.

पर्याय नसतो. इलाज नसतो.

मितभाषी's picture

23 Jul 2016 - 11:36 pm | मितभाषी

मुटेकाका तो प्रतिसाद आनन्दीताला होता.

रुस्तम's picture

23 Jul 2016 - 11:56 pm | रुस्तम

चोराच्या मनात चांदणे
Disclaimer: वैयक्तित टीका नाही. म्हण वापरली आहे.

गंगाधर मुटे's picture

23 Jul 2016 - 11:15 pm | गंगाधर मुटे

मी कधी कुणाची अक्कल, दानत काढतच नाही.

ते मी दिलेलं प्रत्यूत्तर होतं.

जसा प्रश्न असतो तसे उत्तर असते.
जसे उत्तर असते तसे प्रत्यूत्तर असते.

आपण माझे २७/०७/२०१४ ते २७/०७/२०१४ अशा सलग चार वर्षाचे माझे जुने धागे वाचावेत.
आणि मी कुणाला अपमानास्पद बोललोय का, ते शोधावे.

दोन वर्षात मी काही आयड्यांशी (सर्व नव्हे) असे का वागतो, याचाही शोध तुम्हीच घ्यावा.

माझा एक शेर ऐकवतो तुम्हाला

आसुड उगारणारा, माझा स्वभाव नाही
पण; वेळ आणली या, मग्रूर लांडग्याने

हा जुना शेर आहे. मी फक्त शेर ऐकवला, नाही तर तुम्ही म्हणाल की मी लोकांना लांडगा म्हटले.

आनन्दिता's picture

24 Jul 2016 - 12:54 am | आनन्दिता

मी कधी कुणाची अक्कल, दानत काढतच नाही.ते मी दिलेलं प्रत्यूत्तर होतं.

इतक्या सगळ्या उर्मट उत्तरांनंतर तुम्ही हे असं म्हणणं हास्यास्पद आहे. तुम्ही कितीही आव आणलात तरी बर्याच प्रतिसादांमधुन तुमचं साळसुदपणाचं पितांबर घसरलं आहे.

दोन वर्षात मी काही आयड्यांशी (सर्व नव्हे) असे का वागतो, याचाही शोध तुम्हीच घ्यावा.

बरेच आयडी तुमच्याशीच असे का वागतात ? काही प्रश्ण तुम्हालाच का विचारले जातात याचा शोध तुम्ही घ्याल का?

हा जुना शेर आहे. मी फक्त शेर ऐकवला, नाही तर तुम्ही म्हणाल की मी लोकांना लांडगा म्हटले.

कविता , गझला, चारोळ्या यासगळ्यांविषयी तुम्हाला एकट्यालाच जाण आहे असं जरी ग्राह्य धरलं तरी विनाकारण येईलजाईल त्याच्यावर असे शेर, कविता भिरकावुन तुम्हाला काय साध्य करायचंय हे समजलं नाही. यातुन मलातरी ना तुमची प्रतिभा सिद्ध झाल्यासारखी वाटतेय ना तुमचं म्हणणं सिद्ध झाल्यासारखं वाटंतय!

असो!!

गंगाधर मुटे's picture

24 Jul 2016 - 8:11 am | गंगाधर मुटे

इतक्या सगळ्या उर्मट उत्तरांनंतर तुम्ही हे असं म्हणणं हास्यास्पद आहे. तुम्ही कितीही आव आणलात तरी बर्याच प्रतिसादांमधुन तुमचं साळसुदपणाचं पितांबर घसरलं आहे.

माझा प्रतिसाद नीट वाचलात का? वाचला असेल तर समजला का? का निष्कारण धाग्याची लांबी वाढवता?

मी कधी कुणाची अक्कल, दानत काढतच नाही.

ते मी दिलेलं प्रत्यूत्तर होतं.

जसा प्रश्न असतो तसे उत्तर असते.
जसे उत्तर असते तसे प्रत्यूत्तर असते.

असे लिहिले होते मी...!

बरेच आयडी तुमच्याशीच असे का वागतात ? काही प्रश्ण तुम्हालाच का विचारले जातात याचा शोध तुम्ही घ्याल का?

कधीचाच घेतला आहे. रोग कळला आहे म्हणून उपचार नेमकेपणाने सुरू आहेत. औषध कडू असल्याने रोग्याला व त्याच्या नातेवाईकाला आवडत नसेल तर त्याला इलाजकर्त्याचा नाईलाज आहे.

कविता , गझला, चारोळ्या यासगळ्यांविषयी तुम्हाला एकट्यालाच जाण आहे असं जरी ग्राह्य धरलं तरी विनाकारण येईलजाईल त्याच्यावर असे शेर, कविता भिरकावुन तुम्हाला काय साध्य करायचंय हे समजलं नाही. यातुन मलातरी ना तुमची प्रतिभा सिद्ध झाल्यासारखी वाटतेय ना तुमचं म्हणणं सिद्ध झाल्यासारखं वाटंतय!

हे तुमचं स्वतःच मत आहे. वाटेल तसं मत बाळगण्याचं स्वातंत्र्य तुमचं तुम्हाला आहे. मी यात दखल द्यावी असं काहीही नाही.

आनन्दिता's picture

24 Jul 2016 - 8:54 am | आनन्दिता

तुमचे प्रतिसाद म्हणजे काय स्टिफन हॉकिंग्ज च्या थिअरीज आहेत का न कळायला?
बाकी धाग्याची लांबी वाढवण्यापेक्षा ही मला तुमच्यावर शब्द , वेळ वाया घालवायचा कंटाळा आलाय.
राम राम __/\__

गंगाधर मुटे's picture

24 Jul 2016 - 1:32 pm | गंगाधर मुटे

__/|\__

राम राम
खुदा ऑफिस
दिल्या घरी सुखी रहा.

मितभाषी's picture

26 Jul 2016 - 11:12 pm | मितभाषी

आमची म्हतारी म्हणते " बाई शिताळ रहा"

सामान्य वाचक's picture

24 Jul 2016 - 2:47 pm | सामान्य वाचक

इग्नोरास्त्र हाच एकमेव उपाय आहे
दुसरे सगळे मार्ग कुचकामी आहेत इथे

चला आता बंद करा हा धागा

गंगाधर मुटे's picture

24 Jul 2016 - 4:56 pm | गंगाधर मुटे

रामराम
नमस्कार
जयश्रीराम
वालेकुमसलाम
जयभीम
टाटा
बायबाय
गूडमॉर्निंग/नून/इव्हिनिंग
खुदा हाफ़िज

काळजी घ्या.
जपा स्वत:ला.
रस्त्याने चालतांना स्वत:ला सांभाळा. शक्यतो डावी बाजू सोडू नका.
क्यूं की बचेंगे तो और लढेंगे...!
हर राहपर, हरमोड पर..
मिलते रहेंगे...!
लढते रहेंगे...!!
झगडते रहेंगे...!!!

हे अपरिहार्य आहे कारण....
जित्त्याची खोड मेल्याशिवाय जात नाही...
हे विधीलिखीत आहे... आणि ते खोटे नाही!!!!

b r n

गंगाधर मुटे's picture

23 Jul 2016 - 11:25 pm | गंगाधर मुटे

आपण माझे २७/०७/२०१० ते २७/०७/२०१४ असे वाचावे.

राँर्बट's picture

23 Jul 2016 - 10:27 pm | राँर्बट

रामचंद्र कह गए सिया से ऐसा कलयुग आएगा
हँस चूगेगा दाना दुनका कौआ मोती खाएगा

मितभाषी's picture

23 Jul 2016 - 11:11 pm | मितभाषी

४४० व्होल्ट है , छुना है मना.

सामान्य वाचक's picture

24 Jul 2016 - 8:11 am | सामान्य वाचक

तसेच आत्महत्येला प्रवृत्त करणे हा पण गुन्हा आहे आणि त्याला पण शिक्षा होते कायद्याने

चंपाबाई's picture

24 Jul 2016 - 8:14 am | चंपाबाई

कंपूबाजांच्या झुंडीने त्रास दिला तरी मुटेसाहेबानी जो आत्मविश्वास दाखवला आहे, तो कौतुकास्पद आहे.

सामान्य वाचक's picture

24 Jul 2016 - 8:18 am | सामान्य वाचक

चांगलं चाललंय

चंपाबाई's picture

24 Jul 2016 - 2:47 pm | चंपाबाई

कंपूवाले तरी दुसरं काय करतात ? अहो विडंबनम अहो प्रतिसादम !

उडन खटोला's picture

24 Jul 2016 - 11:16 pm | उडन खटोला

मुटे सरकार अब झुकने का नहीं और रुकने का भी नहीं
अब पाचसौ के पहले थकने का नहीं

गंगाधर मुटे's picture

26 Jul 2016 - 10:34 pm | गंगाधर मुटे

: समारोप :

आंतरजालाच्या सुसंस्कारीत, सुशिक्षित, सुजान, आणि अभ्यासू जगतात २००९ मध्ये माझा चंचूप्रवेश झाला. २००९ मधील माझ्या पहिल्या लेखावर (http://www.maayboli.com/node/12292) अर्थाचे अनर्थ करून प्रतिसादात जो गोंधळ घातला गेला तीच स्थिती आज ७ वर्षानंतरही कायमच आहे. ती १७ वर्षानंतरही अशीच कायम राहण्याची शक्यता आहे कारण .........

सांप्रत हिंदुस्थानातल्या मनुष्यजातीच्या एका झुंडीला लढायची व संघर्ष चेतवता ठेवण्याची प्रचंड आवड आहे. त्यातूनच एकटेपणाने लढण्याऐवजी झुंडीने लढण्याची प्रवृती वाढत गेली असावी. यातूनच निर्माण झाला असावा वर्गसंघर्ष.

वर्गसंघर्षाची काही लक्षणे आणि वैशिष्टे :
१) एका वर्गाने दुसर्‍या वर्गाला हीन/न्यून लेखने.
२) एका वर्गाने दुसर्‍या वर्गाचे शोषण करून त्या वर्गाला आपल्या पायदळी ठेवण्याचा प्रयत्न करणे.
३) एका वर्गाला दुसर्‍या वर्गाची बरोबरी करता येत नसले तर थेट दुसर्‍या वर्गाचे अहीत चिंतने.
४) आपल्या प्रत्येक अपयशाला एका वर्गाने दुसर्‍या वर्गाला जबाबदार ठरवणे.
५) एका वर्गाने दुसर्‍या वर्गाच्या समस्या समजून घेण्याऐवजी त्याच्या समस्या आणखी गुंतागुंतीच्या कशा होतील, याचेच प्रयत्न करणे.
६) वगैरे वगैरे.

वर्गसंघर्षाची काही उदाहरणे :
१) दलित विरुद्ध सवर्ण
२) हिंदू विरुद्ध मुस्लिम
३) मराठा विरुद्ध ब्राह्मण
४) बहुसंख्यांक विरुद्ध अल्पसंख्यांक
५) अल्पजन विरुद्ध बहुजन
६) वगैरे वगैरे

खरं तर वर्गसंघर्षाची ठीणगी पाडायला आणि ज्योत पेटती ठेवायला कोणत्याही वर्गातल्या सर्वच व्यक्ती अजिबात कारणीभूत नसतातच. कारणीभूत असतात फ़क्त त्या-त्या वर्गातल्या झुंडी. झुंडीच हे कार्य इमाने इतबारे करित असतात आणि त्याचे फ़टके तो संपूर्ण वर्ग, तो संपूर्ण समाज, ती संपूर्ण जात भोगत असते.

ही बाब सर्वमान्य नसली तरी माझ्या ७ वर्षाच्या आंतरजालीय अनुभवावरून या निष्कर्षाप्रत आलो आहे की, शेतकरी विरुद्ध सुशिक्षित बिगरशेतकरी असा छुपा संघर्ष अस्तित्वात आहे. हा वर्गसंघर्ष नसला तरी वर्गसंघर्षाची बहुतांशी लक्षणे आणि वैशिष्टे जशीच्या तशी लागू होत आहेत.

यातून या देशाची सुटका कधी होणार आहे हे भगवंताशिवाय कोणीच सांगू शकत नाही, अशी स्थिती मात्र नक्कीच आहे.

भयंकर चुकीचे अतिसुलभीकरण आणि सामान्यीकरण. अत्यंत असहमत. बाकी चालू द्या.

सुबोध खरे's picture

27 Jul 2016 - 10:34 am | सुबोध खरे

२००९ मधील माझ्या पहिल्या लेखावर (http://www.maayboli.com/node/12292) अर्थाचे अनर्थ करून प्रतिसादात जो गोंधळ घातला गेला तीच स्थिती आज ७ वर्षानंतरही कायमच आहे. ती १७ वर्षानंतरही अशीच कायम राहण्याची शक्यता आहे.
सगळं जगंच तिरपे आहे त्याला कोण काय करणार आणि ते कसं सुधारणार? तरी बरं ते स्थळ दुसरंच आहे.

शलभ's picture

27 Jul 2016 - 11:21 am | शलभ

-१
तुम्ही ७ वर्षापासून तुमचा चष्मा तोच आहे असा अर्थही निघतोय त्यातून. आणि पुढचे १७ काय ७० वर्षेही तेच दिसणार तुम्हाला जर चष्मा नाही बदलला तर..

रच्याकने, तुमच्या लिखाणात मला ही लक्षणे जाणवली.
१) एका वर्गाने दुसर्‍या वर्गाला हीन/न्यून लेखने.
४) आपल्या प्रत्येक अपयशाला एका वर्गाने दुसर्‍या वर्गाला जबाबदार ठरवणे.
६) वगैरे वगैरे.

अहो.. असे बोलायचे नसते. आता तुम्हीपण झुंडीत सामील आहात असा भाळ माथी येईल.

पिलीयन रायडर's picture

27 Jul 2016 - 7:32 am | पिलीयन रायडर

माझं वरातीमागुन घोडं आहे पण मला आज कळालं की बोकाभाऊ उडाले. इथे काय दंगा झालाय ते माहीत नाही. पण मोसाद सिरिज अडकल्याने भयानक म्हणजे भयानक वाईट वाटलं. बोकाभाऊ इथे परत यायला हवेत. त्यांना कधी मर्यादा सोडून लिहीताना पाहिलेले नाही. आणि इतक्या झटपट आयडी बॅन झाला तेव्हा वॉर्निंगसुद्धा न देता अशी कारवाई झाली की काय अशी शंका आली. आणि इतकं असं बोकाभाऊ काय बोलले असतील असा प्रश्न पडला.

बोकाभाऊ लवकर परत येवोत. मिपावरच्या उत्तम लेखकांपैकी एक ते आहेत.

सामान्य वाचक's picture

27 Jul 2016 - 9:54 am | सामान्य वाचक

समारोप केल्यावर परत लिहिलेस??
काही संवेदना वेगैरे आहेत कि नाही तुला?
झुंडबाज कुठली

उडन खटोला's picture

27 Jul 2016 - 11:22 am | उडन खटोला

राजकीय चर्चा वाचत नाही का ओ तुम्ही?

बोकाभाऊ नी अनेकांना अनेक वेळा शिव्या दिलेल्या होत्या. अर्थात त्या मर्यादित स्वरूपात असू शकतील. ;)
संपादक दुत्त दुत्त असतात नेहमीच. :)

राही's picture

27 Jul 2016 - 11:53 am | राही

ह्या धाग्यावरचे श्री.बोका यांचे दोन प्रतिसाद आक्षेपार्ह होते.ते बहुतेक आता दिसत नाहीयत. (पूर्ण धागा पुन्हा स्क्रोल क्रून बघण्याइतका पेशन्स नाहीय.) इतरत्रही राजकीय धाग्यांवर आणि उजव्या मतांच्या बाबतीत ते अतिशय आक्रमक असतात. मी आक्रमक हा सौम्य शब्द वापरला आहे.
बाकी त्यांचे इतर ललित लिखाण अत्यंत वाचनीय असते हे निर्विवाद. त्यामुळे त्यांचे माझ्यासकट अनेक चाहते इथे आहेत.
तसेच श्री मुटे यांच्या शेतीविषयक इतर धाग्यांवर काही ठराविक आठदहा लोक; (सर्व मिपा नव्हे; आणि हे मुटे यांनी वेळोवेळी स्पष्ट केले आहे.)ज्याला ते झुंड म्हणतात त्यांनी अतिआक्रमक, टवाळखोर विरोधी प्रतिसाद दिलेले आहेत.
मला वाटते की या धाग्यावर अनेक प्रतिसाद उडवण्यात आलेले असावेत. धाडकन एखादा आय्डी उडवला असे बहुधा होत नसावे. संपादकांच्या न्यायबुद्धीवर माझा विश्वास आहे. उलट उजव्या आणि हिंदुत्ववादी विचारसरणीच्या प्रतिसादांबाबत थोडी लीनियन्सीच (उदारपणाच) दाखवली जाते असे म्हणता येईल. त्यामुळे इथे तक्रार करण्याजोगे असे काही वाटले नाही. शिवाय हा निर्बंध तात्पुरता असतो. त्यामुळे श्री बोका यांच्या ललित लिखाणाला आपण सर्व मुकणार नाही याची खात्री आहे.

आपल्या निरीक्षणाशी संपूर्णपणे सहमत.

अभ्या..'s picture

27 Jul 2016 - 12:09 pm | अभ्या..

संतुलित, अनुभवी प्रतिसाद.
राहीताईना 100 टक्के सहमत.
हेच मत खरडफळयावर आधी नोंदवले होते.

संदीप डांगे's picture

27 Jul 2016 - 12:58 pm | संदीप डांगे

+१

गणेश उमाजी पाजवे's picture

27 Jul 2016 - 6:50 pm | गणेश उमाजी पाजवे

खरेच बोका भाऊ लवकर परत येवोत हीच इच्छा आहे :/ माझ्या मते कारवाई दोन्ही बाजूनी व्हायला हवी होती करायचीच होती तर. बोका भाऊंनी त्यांना मनोरुग्ण वगैरे म्हटले आहे पण मुटेकाकांनी पण सगळ्यांची अक्कल, दानत काढली आहे.आणि वरून कविता, गझल समजण्यासाठी कशा भावना, संवेदन वगैरे लागतात आणि त्या कशा आमच्यापाशी नाहीयेत हे पण म्हटले आहे त्यामुळे कारवाई झालीच तर ती दोन्ही बाजूने व्हावी नाहीतर बोक्या भाऊंवरचा बॅन उठावा अशी माझी संपादक मंडळाला विनंती आहे.

कविता१९७८'s picture

27 Jul 2016 - 8:53 pm | कविता१९७८

सहमत पण आता मिपाने जरी बन्दी उठवली तरी इतका अन्याय झाल्यावर बोकाभाउ तरी तयार होतील का पुन्हा यायला?

सुबोध खरे's picture

11 Nov 2021 - 12:11 pm | सुबोध खरे

मुवि यांनी धाग्याचा दुवा दिल्या वर परत वाचून काढला

बऱ्याच दिवसांनी परत एकदा हसू आलं