प्रो कबड्डी - सिझन ४
प्रो कबड्डीचा ४ था मोसम आज २५ जुन २०१६ रोजी सुरु झाला. अती क्रिकेटचा कंटाळा आल्या नंतर मी दुसर्या खेळांचा दर्शक होण्याचा प्रयत्न करत होतो. फुटबॉल कडे मन आकर्षित होत होते आणि अचानक प्रो कबड्डीची सुरुवात झाली. साधारण दुसर्या सिझनपासून खेळातला रस वाढत गेला. मुंबईकर असल्यामुळे घरची टीम म्हणून 'यु मुंबा' चा नैसर्गीक समर्थक आणि नंतर चाहता बनलो. 'यु मुंबा' ने दुसर्या सिझनचे विजेतेपद पटकावल्यानंतर त्यांचा वाट्याला आलेले प्रेम वेगवेगळ्या ठिकाणी दिसून आले. ३ र्या सिझनच्या अंतिम फेरीतील निसटता पराभव मनाला काही काळापुरता टोचत राहिला.
या सगळ्या पार्शभुमीवर ४ था सिझन फार लवकर घोषीत झाला तेव्हा कबड्डीचे ही क्रिकेट होणार काय ही शंका मनाला चाटून गेली. काय होते ते पुढे कळेलच मात्र प्रो. कबड्डीमुळे कबड्डीला वलय लाभतेय व मातीतल्या रांगड्या खेळाडूंना चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत हे पाहून मनास आनंद देखील होत आहेत.
अनुप कुमार, राकेश कुमार, रिशांक देवाडिगा, मनजित चिल्लर, नरवाल आडनावबंधु, निलेश शिंदे, फजल अत्रांचली (इराण), जां कुं ली (कोरिया) (नाव लिहिण्यात चुकले असल्यास दुरुस्ती सुचवावी) आणि इतर खेळाडुंनी प्रेक्षकांना भरभरुन आनंद दिलाय.
या सिझनमधे यु मुंबाचे बरेच तगडे खेळाडू इतर संघांनी खरेदी केले आहेत. जवळपास ५०% संघ नवीन आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरु नये. या खेळात मिनिटामिनिटाला रंग बदलत असल्यामुळे शेवटपर्यंत रंगतदार लढती होत आहेत. त्यामुळे यावेळचे विजेते कोण असतील याचा अंदाज लावणे सद्यातरी अवघड आहे. यंदा पहिल्यांदाच महिला संघ देखील खेळत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे केवळ दोनच संघ असून एकच सामना होईल. अधिक माहितीसाठी प्रो कबड्डीची अधिकृत वेबसाईट बघता येईल.
प्रो कबड्डी सिझन्सचे आत्तापर्यंतचे विजेते याप्रमाणे.
सिझन १ : जयपुर पिंक पँथर्स
सिझन २ : यु मुंबा
सिझन ३ : पटना पायरेटस
===================================================
प्रो कबड्डी सिझन ४ चे संघ खालीलप्रमाणे (कंसात माझ्या आवडत्या खेळाडूंची नावे)
१. बंगाल वॉरीयर्स (निलेश शिंदे /जां कुं ली / सुरजित नरवाल / विशाल माने / महेंद राजपूत)
२. बंगळूरु बुल्स ( मोहित चिल्लर / सुरिंदर नाडा)
३. दबंग दिल्ली ( काशिलींग आडके)
४. जयपुर पिंक पँथर्स ( शब्बीर बाप्पू / राजेश नरवाल / रण सिंग)
५. पटना पायरेटस ( फजल अत्रांचली / बाजीराव होडगे / प्रदिप नरवाल)
६. पुणेरी पलटण ( मनजित चिल्लर / अजय ठाकूर / दिपक निवास हुड्डा)
७. तेलुगु टायटन्स (संदिप नरवाल / राहुल Chaudhari)
७. यु मुंबा (अनुप कुमार / राकेश कुमार / रिशांक देवाडीगा / जीवा कुमार)
यंदा एकूण संघांमधला मराठी टक्का देखील लक्षणीय रित्या वाढलेला आहे.
सात संघ आणि जवळ जवळ ३५ दिवस हे सामने रंगणार आहेत.
तर चला, आपल्या मातीत जन्मलेल्या या खेळाचा आनंद घेऊ या आणि चर्चा करत राहूया.
==================================================
वर्गीकरण
प्रतिक्रिया
दिवस १४ वा
खुप धन्यवाद हा धागा चालू
प्रतिसादाबद्दल धन्यावाद !
नाही hotstar.com वर सुद्धा
जुनचं दुखणं
नक्कि महिति नाही
युट्यूबवर शोधून पाहीलं होतं
एखादी प्रॉक्झी एक्स्टेंशन क्रोम वर टाकून सामना बघता येईल.
झक्कास्स्स्स....काम फत्ते.
दिवस १५ वा
सोबत
दिवस १६ वा
दिवस १७ वा
काल झालेली पुणे वि .
दिवस १८ वा
लै माज दिसत होता जयपूरला.
लै माज दिसत होता जयपूरला.
दिवस १९ वा
वाचतोय.
+१
+१
सहमत
+१
दिवस २० वा
मस्तच...मॅच पाहता आल्या नाही
प्रतिसादकांचे आभार !
:(
दिवस २१ वा
दिवस २२ वा
दिवस २३ वा
+ १
दिवस २३ वा
दिवस २४ वा
दिवस २५ वा
अनुप
वूमन्स कबड्डी लीग अगदीच रटाळ
सहमत,
मस्त
अपराजित यू मुंबा
दिवस २६ वा
तिसर्या
प्रो-कबड्डीचे नवे तंत्रज्ञान
बोनस पॉइंट बद्दल
सचिन शिंगाडेने सामना घालवला
आमची मुंबा
दिवस २७ वा
दिवस २८ वा
मस्त सामना!
शेवटच्या राइडला परतला अस्ता तर...
सहमत.