✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

थक्क करणारी एक घोडदौड

व
वेल्लाभट यांनी
Wed, 06/15/2016 - 13:01  ·  लेख
लेख
पेला अर्धा भरला आहे.. पेला अर्धा सरला आहे... पाडगावकरांच्या या कवितेतले भाव इतके कालातीत आहेत की बास! आणि क्षणोक्षण त्याचा प्रत्यय येत राहतो. शंभर व्यक्ती भेटतात, शंभर गोष्टी कानावर पडतात. नाव, गाव, चेहरा, व्यवसाय या पलिकडची माणसाची एक ओळख असते ती म्हणजे त्याचा विचार. त्याला दृष्टिकोन म्हणा, स्वभाव म्हणा, किंवा अ‍ॅटिट्यूड म्हणा इंग्लिशमधे. हा अ‍ॅटिट्यूड माणसाची खरी ओळख करून देतो, तोच माणसाला घडवतो किंवा बिघडवतो. बाकी सगळं दुय्यम असतं. संकटं, अडचणी सगळ्यांनाच येतात. काही त्यात खचतात, काही त्यातही रचतात, काही विरतात, काही उरतात, काही पडतात, काही घडतात. अ‍ॅटिट्यूड. परवा याच अ‍ॅटिट्यूडचं एक लाजवाब उदाहरण बघायला मिळालं. बघायलाच नव्हे, त्याच्याशी बोलायला मिळालं. मुलाला टांग्यात बसवायला घेऊन गेलो असता, सवयीनुसार टांगेवाल्याची विचारपूस केली आणि मातीत सहज हात घातल्यावर एखादं रत्न हाती लागावं तसं झालं. नंदकुमार असं त्या घोडेवाल्यांचं नाव. माणूस तसा वयस्कर आहे. दिवसाला पाच ते सहा फेर्‍या मिळतात, आणि सहाशे सातशे रुपये घरी नेता येतात. 'इतक्यात भागतो घोड्याचा खर्च बिर्च?' असं विचारल्यावर ते म्हणाले, 'इच्छा असेल ना, तर सगळं शक्य होतं.' नंदकुमारांकडे एक नाही, दोन घोडे आहेत. एक हा चॉकलेटी आणि एक पांढरा आहे. तो लग्नामुंजीला जातो. ते गेली पस्तीस वर्षं टांगा चालवत आहेत. 'पूर्वी चार आण्यात स्टेशन ते टेंभी नाका आणायचो, आता तुम्हाला चार आणे माहितही नसतील.', असं म्हणत ते आठवणीत रमले. 'मी रेल्वेत कामाला होतो. परिस्थिती अतिशय बेताची. पण रेल्वेची डुटी संपली की उरल्या वेळात टांगा चालवायला लागलो. आता रिटायर्ड आहे. पेन्शन येतंय. पण टांगा चालवतो अजूनही. सवय झालीय, सुटत नाही आणि त्रासही होत नाही. मुलं म्हणतात, कशाला आता हे करताय? आराम करा... पण तरीही करतो. मन रमत नाही याशिवाय.' मी यातच प्रेरित झालो होतो पण पुढे अजून भारी माहिती कळायची होती. 'मुलं काय करतात?' मी विचारलं. 'एक लंडन ला असतो; आणि दुसरा दुबईला.' हे उत्तर ऐकलं आणि मला पुढे काय विचारावं हेच कळेना. फक्त हँडशेक केला त्यांना. त्यांची ही थक्क करणारी घोडदौड ऐकून मी अवाक झालेलो होतो. त्यांचंच वाक्य घोकत होतो, 'इच्छा असेल ना, तर सगळं शक्य होतं.' हेच सिद्ध करणारा एक रिक्षावाला मागे भेटला होता. ठाण्याहून अंधेरीला कुठल्याशा मिलमधे कामाला जाणार्‍या त्याने कर्ज काढून रिक्षा घेतली. दूरदृष्टी वाखाणण्याजोगी होती त्याची. रिक्षामुळे त्याची जायची यायची सोय झाली. ठाण्यावरून सकाळी भाडं घेऊन तो जातो, दिवसभर दुसर्‍या एकाला रिक्षा भाड्याने चालवायला देतो, आणि येताना पुन्हा भाडं घेऊन ठाण्याला येतो. आहे त्या परिस्थितीत त्याने दुसरा भक्कम उत्पन्नस्त्रोत तयार केला; हो तयार केला, याला शोधणं म्हणता येत नाही. टांगेवाल्यासारखंच हे उदाहरण. आमच्या कंपनीतला कँटीनबॉय संध्याकाळी कपड्यांचा स्टॉल लावतो. त्याचाही तोच फंडा. हातपाय हलवत रहायचे. क्रिएटिंग ऑपॉर्च्युनिटीज. अनेक उदाहरणं ठाऊक आहेत आणि या मंडळींशी बोलून फार उत्साह येतो, उमेद येते. या उलट अशी अनेक जणं माहितीत आहेत, ज्यांनी गरिबी, कंपनी बंद पडणं, जवळची व्यक्ती जाणं, योग्य संधी न मिळणं, लग्न न होणं, इत्यादी अनेक कारणांमुळे आपल्या आकांक्षा, इच्छांचा कप्पाच बंद करून टाकला. जिद्द बिद्द फंडेच झुगारून दिले आणि उरलेलं आयुष्य निव्वळ वैफल्यग्रस्त राहण्यात आणि इतरांना करण्यात घालवलं; घालवतायत. त्यांचं वाईटही वाटतं, पण चूकही वाटतं. They seal their own fate. असो. पहिल्या कॅटेगरीतली माणसं नियमित भेटत राहूदेत अशीच मी नेहमी इच्छा करतो. It keeps you pushing towards your goals. ता.क. ठाण्याला तलावपाळीला मागे 'नंदकुमार' लिहिलेला टांगा दिसल्यास एक फेरी जरूर मारा असं सुचवेन.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
अनुभव

प्रतिक्रिया द्या
12167 वाचन

💬 प्रतिसाद (66)

प्रतिक्रिया

इच्छा तिथे मार्ग आणि पेला

दीपा माने
गुरुवार, 06/16/2016 - 17:55 नवीन
इच्छा तिथे मार्ग आणि पेला अर्धा भरलेला पाहण्यातच यशसिध्दी होत असते हाच जीवनमंत्र मी मानते.
  • Log in or register to post comments

जॅाय राइड

नमकिन
गुरुवार, 06/16/2016 - 18:15 नवीन
गेटवेला बंदीचे निर्देश घातलेले आहेत मुक्या प्राण्यांच्या हक्कासाठी कोर्टाने.
  • Log in or register to post comments

मस्त धागा. एकसे एक लोकं आहेत

सखी
गुरुवार, 06/16/2016 - 21:55 नवीन
मस्त धागा. एकसे एक लोकं आहेत ही सगळी. खटपट्या यांनी सांगितलेल्या आजी आणि समिरसूर यांनी वर्णन केलेले जोशी आजोबा यांच्याकडुन शिकण्यासारखं आहे.
  • Log in or register to post comments

क्रिएटिंग ऑपॉर्च्युनिटीज

विकास
Fri, 06/17/2016 - 03:19 नवीन
चांगले अनुभव कथन! "क्रिएटिंग ऑपॉर्च्युनिटीज" वरून आठवले.. इंजिनिअरींगच्या पहील्या वर्षात असताना एक कार्यक्रम केला होता त्यात सिनिअर्सपैकी एकेका विद्यार्थ्याने त्याने निवडलेली अभियांत्रिकी शाखा का निवडली ते सांगायचे होते. आमच्याकडे (सरदार पटेल) त्यावेळेस फक्त सिव्हिल, मेकॅनिकल आणि इलेक्ट्रीकल इतक्याच शाखा होत्या. इलेक्ट्रीकल वाल्याने ती शाखा कशी जोरात आहे हे वर्णन करून सांगत आधीपासून ठरवून त्यात अ‍ॅडमिशन मिळवली वगैरे सांगितले. मेकॅनिकलवाला म्हणाला की त्याला सिव्हीलला मिळाली होती. मग एक वर्ष भरपूर अभ्यास केला आणि ट्रान्सफर मिळवली कारण मेकॅनिकल कशी चांगली असते. सिव्हील वाला बिचारा ओशाळलेला होता. गिल्ट काँप्लेक्स दाखवत त्याने सिव्हील इंजिनिअरींग पण कसे चांगले असते वगैरे वगैरे लेक्चर दिले. मग या सगळ्यांचे (म्हणजे अनुभवी विद्यार्थ्यांचे) आवडते "मित्रासारखे" असलेले पांचोली सर उभे राहीले. "उपदेशोही मुर्खाणां.." असे सुभाषित ते म्हणाले (मुर्ख वगैरे म्हणले तरी विद्यार्थ्यांना त्यात प्रेमाचे शब्दच दिसत होते. कुणालाही राग / व्यक्तीगत वाटले नव्हते). मग इंग्रजीत म्हणाले की "You are all fools! Engineers are supposed to create jobs and not supposed to demand! ते जेंव्हा तुम्हाला कळेल तेंव्हा समजेल की नक्की कुठे जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत ते!"
  • Log in or register to post comments

मस्त धागा अन् प्रतिसाद पण

भाग्यश्री कुलकर्णी
Fri, 06/17/2016 - 11:05 नवीन
मस्त धागा अन् प्रतिसाद पण एकसे एक. जगायला बळ देतात अशी माणसं
  • Log in or register to post comments

फार सुंदर लेख आणि प्रतिसाद.

आदूबाळ
Fri, 06/17/2016 - 11:23 नवीन
फार सुंदर लेख आणि प्रतिसाद.
  • Log in or register to post comments

मस्त !

नीलमोहर
Fri, 06/17/2016 - 11:25 नवीन
प्रेरणादायी लेख आणि प्रतिसादही.
  • Log in or register to post comments

सर्वांना अनेक धन्यवाद :) इथे

वेल्लाभट
Fri, 06/17/2016 - 12:50 नवीन
सर्वांना अनेक धन्यवाद :) इथे अशीच अजून अजून व्यक्तींची माहिती येत राहिली तर फारच उतम होईल.
  • Log in or register to post comments

छान लेख

सिरुसेरि
Fri, 06/17/2016 - 13:36 नवीन
छान लेख . या लेखामुळे नया दौर मधला दिलिपकुमारचा टांगेवाला आणी त्याने जोशात म्हणलेला "थुंक देना उसके मुंहपर जो अपनी बातसे पलट जाय ." हा डायलॉग सहजच आठवला . हल्ली सगळीकडे शहरीकरणामुळे टांग्यांचे प्रमाण कमी झाले आहे . "टांगा पलटी घोडा फरार" अशीच स्थिती आहे .
  • Log in or register to post comments

"थुंक देना उसके मुंहपर जो

अभ्या..
Fri, 06/17/2016 - 13:41 नवीन
"थुंक देना उसके मुंहपर जो अपनी बातसे पलट जाय ."
भारीच डॉयलॉग कि, आवडला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सिरुसेरि

लेखन आवडले.

स्नेहल महेश
Fri, 06/17/2016 - 13:58 नवीन
अतिशय सकारात्मक धागा.
  • Log in or register to post comments

सुन्दर लेख आणि प्रतिसाद.

धनंजय माने
Fri, 06/17/2016 - 16:27 नवीन
सुन्दर लेख आणि प्रतिसाद.
  • Log in or register to post comments

आवडले

पैसा
Fri, 06/17/2016 - 18:47 नवीन
लेख आणि प्रतिसाद आवडले.
  • Log in or register to post comments

+१

राघवेंद्र
Fri, 06/17/2016 - 21:08 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अतिशय सुंदर

फारएन्ड
Fri, 06/17/2016 - 21:33 नवीन
एकदम छान वाटले वाचून. समीरसूर व इतर अनेकांच्या प्रतिक्रियाही मस्त. हा एक एकदम सकारात्मक उद्योग केलाय, वेल्लाभट! धन्यवाद :)
  • Log in or register to post comments

सगळ्यांचेच आभार ! :)

वेल्लाभट
Mon, 06/20/2016 - 14:21 नवीन
सगळ्यांचेच आभार ! :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा