Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by चांदणे संदीप on Mon, 05/02/2016 - 16:50
लहानपणी शाळेत असताना एखाद्या बोरिंग तासाला, वह्यांच्या मागच्या पानांवर पानभर ही असली डिजाईन्स काढत बसायचो. आईला कळायच नाही की मला माझ्या बहिणींच्या तुलनेत पेनाची रिफील सारखी का लागते. त्या वेळेला रीफिलला आमच्याकडे "कांडी" म्हणत. एकदा आईला कळाल आणि जाम खरडपट्टी निघाली. शाळेतही कधी कुठल्या शिक्षकांनी पाहिलं की ते रागवत. पण मला ते कांडी संपवण आवडे. तासनतास त्यात कसा वेळ जाई कळायचेच नाही. अजूनही असलं काही काढत बसलो की जी तल्लीनता पदरी पडते ती आणि त्यामुळे मनाला जी वेगळीच उभारी मिळते त्याला तोड नाही. माझ कांडी संपवण कस वाटतय ते नक्की सांगा. ह्याला चित्रप्रकाराला नक्की कुठला प्रकार म्हणायचे किंवा ह्याचे काय करता येईल असे काहीच माहीत नसल्यामुळे मिपावरील जाणकारांनी मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती! सर्व काही पेनानेच रेखाटले आहे फक्त चांगले दिसावे म्हणून फोटोशॉपमधून मागे चित्र, कलरिंग वगैरे नट्टापट्टा इ. प्रकार केले आहेत. डिजाईन १) D1 डिजाईन २) D2 धन्यवाद, Sandy
  • Log in or register to post comments
  • 6610 views

प्रतिक्रिया

Submitted by सस्नेह on Tue, 05/03/2016 - 16:43

Permalink

अरे वा !

हीपण कला आहे का तुमच्याकडे !
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Wed, 05/04/2016 - 05:30

Permalink

मस्त! दुसरे डिझाईन अधिक आवडले

मस्त! दुसरे डिझाईन अधिक आवडले.
  • Log in or register to post comments

Submitted by शाम भागवत on Wed, 05/04/2016 - 06:51

Permalink

टेक्सटाईल डिझायर

साधारणतः १ ते ४ स्क्वेअर इंचात निरनिरा ळे डिझाईन काढून त्याचा अल्बम करा. टेक्स्टाईल डिझायनर ओळखीचा असेल तर त्याला दाखवा. साड्या व ड्रेस मटेरिअल वरील डिझाईन कसे असते ते अभ्यासले तर फायदा होऊ शकेल. या डिझाईनची बॉर्डर केली तर कसे दिसेल इकडे ही लक्ष असू द्या. हात चांगला वळतोय. कला आहे ही. सिमेट्रीची नजर पण आहे. हे काम फार किचकट व वेळकाठू असते. पण ही तुम्हाला आनंदाची गोष्ट वाटतीये हेच कौतुक आहे. तुम्हाला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by चांदणे संदीप on Wed, 05/04/2016 - 10:30

In reply to टेक्सटाईल डिझायर by शाम भागवत

Permalink

धन्यवाद भागवत सर!

हे ही करून पाहतो! Sandy
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com