✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

कोहीनूर हिरा, .. आणि इतिहासाच्या मागील पानावरुन पुढे जाताना .. ..

म
माहितगार यांनी
Tue, 04/19/2016 - 12:54  ·  लेख
लेख
सोने असो वा जड जवाहीर यांच्यावर निव्वळ अय्याशीखातर आयातीसाठी परकीय चलन वाया घालवावे एवढे नक्कीच महत्वाचे नाहीत. पण काही गोष्टींना सांस्कृतीक वारशाचे महत्व असते, अशा वारशा सोबत अस्मिता जोडल्या गेल्या असतात. एखादी गोष्ट तुम्ही बाजारात सहज विकायला ऑक्शनमध्ये ठेवता आणि कुणि विकत घेऊन जाते तर तुमचा अभिमान आणि तुमचे मन दुखावले जात नाही. पण कुणि तुमच्या पराभवाचा लाभ घेऊन वस्तु आणि तेही अस्मिता जोडलेली सांस्कृतीक वारसा असलेली असेल तर समाजमनाचा हळवा कोपरा दुखावला जातोच. अस्मिता हिरावलं जाण्याचं हे खुपणं वस्तु हिरावून घेऊन जाणार्‍यांना लक्षात येतच असं नाही. असं म्हणतात की कोहीनूर बहुधा आताच्या आंध्र प्रदेशातील कोल्लूर खाणीत मिळाला असावा आणि दक्षीण भारतातील काकातीया राजवटीच्या संपत्तीत असावा, इस्वी १३१० मध्ये खिलजीच्या सैन्याने यशस्वीपणे वरंगल लूटल्या नंतर तो बहुधा दिल्ली दरबारी रुजू झाला असावा हा बहुधा निश्चीतपणे न सांगता येणारा सर्वसाधारण तर्क. पण दिल्लीच्या सुलतानांकडे खिलजीच्या काळापासून ते औरंगजेबा पर्यंत व्यवस्थीत नोंद करुन राहीला असावा, त्या नंतर इराणच्या शहाची लूट > अफगाणी फूट> त्यांची आपापसातली दगाबाजी होत आश्रयाला आलेल्या अफगाणी शुजाशहा दुर्राणी कडून हा शीख राजे रणजितसिंगाकडे पोहोचला, रणजितसिंगां स्वर्गवासानंतर त्यांच्या मागे त्यांच्या कुटूंबातील, शीखांमधील आणि पंजाबातील दुफळीच्या परिणामातून शिखांचा इंग्रजांशी युद्धात पराभव झाल्यानंतर इंग्रजांनी रणजित सिंगाच्या सातवर्षीय वंशजाशी जो करार केला त्यात हा लिखीत स्वरुपात इंग्लंडच्या राणीसाठी भेट मिळवला. आणि इंग्लंडच्या राणीच्या मुकुटात जडवला जाऊन तेथील संग्रहालयात प्रदर्शनार्थ ठेवला गेला आहे. कोहीनूरचा हिरा तसा जगातला सर्वात मोठा वगैरे नाही पण मोठ्या आकाराच्या हिर्‍यांपैकी एक, त्याच ऐतिहासिक मुल्य बाजूला ठेवल तर एक ते दहा अब्जात त्याची किंमत होण्यास हरकत नसावी (हे माझ व्यक्तिगत मत) आंतरराष्ट्रीय संबंधांचा विचार केला तर आजच्या काळासाठी दहा अब्ज ही मोठी किंमत नाही आणि कार्बनचा दगड तो शेवटी कार्बनचा दगड त्यासाठी म्हणून किती हट्टाला पेटायच ? हा कोहीनूर हिरा वापस मिळवण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत म्हणून भारतीय सर्वोच्च न्यायालयात कुणि गेले, काहीही झाले तरी हिरा लगेच भारतास मिळेल असे नाही त्यामुळे याचिका सुनावणीस घेण्याची सर्वोच्च न्यायालयाला घाई करण्याची गरज नसावी आणि समजा सुनावणीस घेतली तर -कोहीनूर वापस घेण्याची घाई नसेल किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाची वस्तुस्थिती म्हणून अजून बराच काळ शांत बसावे लागेल किंवा कदाचित मानवी जिवनास निरुपयोगी कोळश्याच्या दगडाचे आकर्षण भाजपा सरकारला नसेल-तर एकुण आताच्या देशप्रेमी भाजपा सरकारने सर्वोच्च न्यायालयासमोर सादर केलेले - कोहीनूर ही इंग्लडच्या राणीला देण्यात आलेली भेट होती असे- प्रतिज्ञापत्र देशप्रेमाचा आदर्श ठरते का असा साशंकतेचा मुद्दा आहे. भारताची आजची राजकीय एकात्मता अंशतः ब्रिटीश राजकर्त्यांच्या करामतींचा त्यांनी केलेल्या भल्या बुर्‍या करारांचा भाग आहे त्यामुळे ब्रिटीशांनी भारतात केलेले सर्व ऐतिहासिक करार मदार नाकारुन चालत नाहीत हे खरे असले तरी त्यांनी केलेल्या वसाहतवादी लूटीचे समर्थन करण्याचे कारणही नसावे आणि नेमकी इथेच बहुधा भाजपा सरकारची गल्लत होत असावी; प्रश्न केवळ काही वस्तु ब्रिटनकडे राहील्या याचा नाही अप्रत्यक्षपणे त्यांचा वसाहतवाद भारत सरकार स्विकारते असा त्याचा अप्रत्यक्ष अर्थ होतो किंवा कसे. भारत आज तसेही सार्वभौम राष्ट्र आहे, एखाद्या प्रतिज्ञापत्राचा अर्थ काय होतो याने फार फरक पडत नाही फरक यातील कायदे विषयक आणि देशप्रेम विषयक बारकावे भाजपा सरकारास ल़क्षात न येत असण्याचा आहे. आणि त्यामुळे सरकारने दिलेल्या प्रतिज्ञापत्राला सर्वोच्च न्यायालयाने स्वतःची मती स्थिर ठेऊन अधिक चर्चा करुन पुन्हा सादर करण्यास सांगितले अशी बातमी आहे. मंत्रिमंडळात सुषमा स्वराज आणि अरुण जेटली सारखे दोन-दोन अनुभवी सर्वोच्च न्यायालय स्तराचा वकीली अनुभव असलेली मंडळी असताना काय लिहून दिले जात आहे हे आणि तेही भाजपा सरकारने पाहू नये हे आचंबित करणारे आहे. संदर्भ *कोहीनूर विषयक ताज्या बातम्या * Koh-i-Noor इंग्रजी विकिपीडिया लेख * First Anglo-Sikh War * Text of the 1846 Treaty of Lahore * ज्याच्या कारकर्दीत कोहीनूरचे हस्तांतरण झाले तो रणजित सिंगाचा मुलगा दुलीप सिंग * जगातील मोठ्या हिर्‍यांची यादी * एनी वे मी गेल्या २४ तासाच्या आत परस्पर विरोधी राजकीय पक्षांवर म्हणजे दुसर्‍या धाग्यातून काँग्रेस कम्युनीस्टांच्यावरही टिका केली आहे तेव्हा तरीही ज्यांना मी विषीष्ट चष्मे लावतो वाटते त्यांनी तसे वाटून घ्यायचे की निष्पक्ष दृष्टीकोणांचा आदर करावयाचा हे पहावे. प्रतिसादांसाठी आभार.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
इतिहास
देशांतर
राजकारण

प्रतिक्रिया द्या
24490 वाचन

💬 प्रतिसाद (74)

प्रतिक्रिया

दुसरा मार्ग

ट्रेड मार्क
Tue, 04/19/2016 - 22:41 नवीन
मध्यंतरी ऐकले होते की राणीची सांपत्तिक परिस्थिती ठीक नाहीये. विकायला तयार असेल तर बघायला पहिजे. :)
  • Log in or register to post comments

आणलाच समजा परत

पैसा
Tue, 04/19/2016 - 23:17 नवीन
आणलाच समजा परत तर तो सरकारी मालकीचा होईल की रणजितसिंगाच्या वंशजांचा?
  • Log in or register to post comments

देशाच्या...

तर्राट जोकर
Tue, 04/19/2016 - 23:21 नवीन
देशाच्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

चांगला प्रश्न

माहितगार
Tue, 04/19/2016 - 23:33 नवीन
आणलाच समजा परत तर तो सरकारी मालकीचा होईल की रणजितसिंगाच्या वंशजांचा?
चांगला प्रश्न विचारलात मी अरुण जेटली आणि सुषमा स्वराजांकडे बोट दाखवतो आहे ते यामुळेच, कोहीनूर मोगल (दिल्ली) दरबारच्या अधिकृत खजीन्याचा भाग होता तो निव्वळ लुटीतून नेला गेला. लुटीतून नेलेली गोष्ट कायदेशीरपणे जिथून आणली तिथे वापस गेली पाहीजे म्हणजे -आता भारत सरकारकडे जमा झाली पाहीजे- लुटीतून प्राप्त झालेल्या वस्तुवरचे सर्व करार मदार बेकायदेशीर ठरतात. आणि हा मुद्दा कोणी मांडावयास हवा कायदे पंडीतांनी, तुमच्या मंत्रीमडळात दोन-दोन सर्वोच्च न्यायालयीन कायदेपंडीत आहेत आणि अजूनपण आहेत तुमच्या आवडीचे तुम्ही सॉलीसीटर जनरल नेमले आहेत कायदेशीर बाबींची फोड सामान्य जनतेस करता येत नसेल स्मृती इराणी, राजनाथ, नरेंद्र मोदींना करता येत नसेल पण अरुण जेटली आणि सुषमा स्वराजांबद्दल तसे म्हणता येईल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

..

mugdhagode
Tue, 04/19/2016 - 23:48 नवीन
सुरतेच्या लोकानी नुस्कान भरपाई मागितली तर कोण देणार ? महाराष्ट्र शासन की महाराजांचे वारस ?
  • Log in or register to post comments

;) चांगला प्रश्न आहे,

माहितगार
Wed, 04/20/2016 - 00:09 नवीन
;) चांगला प्रश्न आहे, तांत्रिकदृष्ट्या आणि नैतीकदृष्ट्या महाराष्ट्र या बाबतीत गुजराथेस परतफेड करणे लागावा, आणि तरीही गुजराथी लोक त्या बद्दल इन्सीस्ट करताना दिसत नाहीत कारण नंतरच्या काळात त्यांच्या सुरक्षिततेचे दायित्व मराठा सेनानींनी सांभाळले असावे आणि तुमच्या शब्दात कदाचित मराठा सरदारांनी किमान गुजराथेत कर्तव्ये चोखपणे बजावली असावीत किंवा कसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode

आपल्या सर्व स्वार्‍यांच्या

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 04/20/2016 - 17:07 नवीन
आपल्या सर्व स्वार्‍यांच्या बदल्यात मराठ्यांनी गुजरातला एक अख्खा गायकवाड नावाचा लोकाभिमुख राजवंश दिला, ज्याने गुजरातला भारतीय स्वातंत्र्यदिनापर्यंत न्याय्य, सुखकारक व भरभराटीची राजवट दिली !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माहितगार

कं लिवलयं

टवाळ कार्टा
Wed, 04/20/2016 - 17:20 नवीन
कं लिवलयं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

कैच्या कै लॉजिक

mugdhagode
Wed, 04/20/2016 - 17:39 नवीन
..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

हे लॉजिक नाही वस्तुस्थिती आहे

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 04/20/2016 - 20:54 नवीन
हे लॉजिक नाही वस्तुस्थिती आहे ! पण, सगळीकडे तिरक्या नजरेने पहाणार्‍याला वस्तुस्थितीकडे सरळ पाहणे जमत नाही, ना सोईचे असते... ही पण एक वस्तुस्थितीच आहे, नाही का ? =)) असो. चालूद्या. लोकांचे मनोरंजन करण्याच्या स्पर्धेत उतरण्याची इच्छा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode

हाहाहा, भरपाई कोण देणार!

गामा पैलवान
गुरुवार, 04/21/2016 - 11:53 नवीन
मुगोबाई, अहो काहीच कसं कळंत नाही तुम्हाला? म्हणे सुरतेची भरपाई कोण देणार. हा काय प्रश्न झाला का? सुरतेची भरपाई मोगलांनी द्यायला पाहिजे. सुरतेचा किल्लेदार इनायतखान पराकोटीचा भ्रष्ट होता. त्याने दहाहजार शिबंदीचे पैसे तरतूद न करता ढापले. महाराजांनी त्याला निरोप पाठवला तेव्हा एक कोटी रुपयांची मागणी केली. वर त्याला हेही सांगितलं की हे इतके पैसे केवळ तुझ्याकडेही सापडतील. इतरांना हात लावायची मला गरज नाही. पैसे दे, मी जातो. तरीपण भेकड इनायत सुरतेच्या गढीत लपून बसला. त्याच्याकडून भरपाई घ्यायला पाहिजे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode

...

mugdhagode
गुरुवार, 04/21/2016 - 13:21 नवीन
अग्गोबै ! , सुरतेतुन कोटभर रुपये गोळा करुन मराठ्यानी लुटुन घेतले तर सुरतेच्या किल्लेदाराने / मोघलानी गुजरात्यांवर केलेला अन्याय कसा दूर होतो म्हणे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

मुगोबाई, मला माहीत नाही. आ.न., -गा.पै.

गामा पैलवान
गुरुवार, 04/21/2016 - 18:47 नवीन
‍
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode

ज्यांना या बाबतीत अजून काही

मनो
Wed, 04/20/2016 - 01:53 नवीन
ज्यांना या बाबतीत अजून काही जाणण्याची उत्सुकता आहे त्यांनी वि स वाळिंबे यांचे 'युवराज' हे पुस्तक वाचावे. याचा नायक आहे दुलीपसिंघ - रणजीतसिंहाचा वारस, लाहोरचा अंतिम शीख शासक. त्याचे राज्य इंग्रजांनी घेतले. महाराणी विक्टोरिया हिच्या मानसपुत्राचा दर्जा त्याने गाठला. आणि त्यानंतरची शोकांतिका मुळातून वाचण्यासारखी आहे. कोहिनूर हिरा त्याने लहानपणी महाराणीला भेट म्हणून दिला आणि उत्तर आयुष्यात ती संपत्ती परत मिळावी म्हणून त्याच राणी बरोबर तो झगडला.
  • Log in or register to post comments

..

mugdhagode
Wed, 04/20/2016 - 07:14 नवीन
भेट दिलेली वस्तू परत कशी मिळेल ? महाभारत द्युतात , वनवास भोगला की राज्य परत मिळणार होते. तशी स्कीम होती का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनो

कोहिनूर भेट दिलेला नाही मोगाजी.

बबन ताम्बे
Wed, 04/20/2016 - 10:46 नवीन
तहातील खालील कलम वाचा. लबाड कोल्ह्यांनी घातलेल्या जाचक अटी आहेत त्या. III. The gem called the Koh-i-Noor, which was taken from Shah Sooja-ool-moolk by Maharajah Runjeet Singh, shall be surrendered by the Maharajah of Lahore to the Queen of England.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode

...

mugdhagode
Wed, 04/20/2016 - 11:46 नवीन
यात लबाडपणा काय आहे ? जिंकणारा राजा हवे ते घेणारच ना ? आणि त्या शाह सू मलिककडुन शीखांकडे कोहिनुर कसा आला म्हणे ? उडत उडत ? की तोही युद्धात जिंकला होता ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

तुम्ही म्हणालात भेट दिलेली वस्तु परत कशी घेणार...

बबन ताम्बे
Wed, 04/20/2016 - 11:54 नवीन
ती इंग्लंडच्या राणीला भेट दिलेली नव्ह्ती. तो हीरा शाह कडून रणजीतसिंहांकडे कसा आला हे मी वाचले नाही. राहीला लबाडपणा. इंग्रजांनी बहुतेक राज्ये लबाडपणेच खालसा केली आणि भारताला लुटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mugdhagode

..

mugdhagode
Wed, 04/20/2016 - 22:17 नवीन
इंग्रजानी युद्ध करुन देश जिंकला असता तर तुमचे आमचे खापरपणजोबा - आम लोकच युद्धात मेले असते. त्यापेक्षा संस्थानिकाना कायद्यात बांधुन इंग्रज जिंकले हे बरेच झाले की !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

मा. गा. साहेब मागे एकदा

प्रमोद देर्देकर
Wed, 04/20/2016 - 11:29 नवीन
मा. गा. साहेब मागे एकदा लोकसत्तेमध्ये कुतुहल या सदरात त्याची माहिती आली होती. मिळाली की डकवतो.
  • Log in or register to post comments

५६ इंच छाती ने मारलेली अजून

अभिजित - १
Wed, 04/20/2016 - 22:27 नवीन
५६ इंच छाती ने मारलेली अजून एक पलटी. बस .. हाच निर्णय खान्ग्रेस ने घेतला असता तर जोरदार अस्मितेची बोंब ठोकली असती.
  • Log in or register to post comments

फार काहि करायची गरज नाहि.

अर्धवटराव
गुरुवार, 04/21/2016 - 01:02 नवीन
कोहिनूरच्या किमतीपेक्षा जास्त मुल्य देणारी चीज भारताकडुन वसुल करायची असेल तर साहेब आरामात कोहीनूर भारताच्या हवाली करेल. वरुन आपण किती उमद्या मनाचे आहोत याची दवंडी पिटुन घेईल. साहेबच तो...
  • Log in or register to post comments

पटले. बचके रहना रे बाबा.

तर्राट जोकर
गुरुवार, 04/21/2016 - 11:05 नवीन
पटले. बचके रहना रे बाबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

कोहिनूर जगन्नाथाचा

श्रीनिवास टिळक
गुरुवार, 04/21/2016 - 19:23 नवीन
महाराजा रणजीत सिंग यांनी आपल्या मृत्युपत्रात कोहिनूर हिरा पुरीच्या जगन्नाथ मंदिराला अर्पण करावा असं लिहिल्याचं जालावर वाचलं आहे (अवांतर: गुरु नानक पुरीला १५०६ मध्ये गेले होते. तेव्हा त्यांनी एक आरती लिहिली. रवींद्र नाथ टागोरनी तिचे वर्णन An anthem to the world असं केलं आहे (See The Jagannath Temple and the Sikh Arti by Anil Dhir http://odisha.gov.in/e-magazine/Orissareview/2012/Feb-March/engpdf/1-6.pdf).
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा