✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कर्मयोग : दि ऑप्शन नॉट टू वर्क !

व
विवेक ठाकूर यांनी
Sat, 04/16/2016 - 14:53  ·  लेख
लेख
पैसा , वेळ आणि काम ही दैनंदिन टेंशनची तीन प्रमुख कारणं आहेत . काहीही आणि कितीही साधना केली तरी हे तीन प्रश्न सोडवल्याशिवाय जीवनात स्वास्थ येणं असंभव . आपल्या प्रत्येक दिवसाचा सगळा प्राईम टाईम याच तीन गोष्टींवर व्यतीत होत असतो . तस्मात , या तीन आयामात मजा आली तर जगण्यात आपसूक मजा येते . या तीन डायमेंन्शसपैकी काम सेंट्रल आहे कारण वेळ आणि पैसा त्याच्याशी निगडित आहेत . थोडक्यात काम नसेल ( उदा . रविवार ) तर वेळ आणि पैसा दुय्यम ठरतात . आणि त्याही पुढे जाऊन काम आनंदाचं झालं तर वेळ आणि पैसा बहुतांशी परिणाम शून्य होतात . कामाच्या बाबतीत एक सार्वत्रिक गैरसमज असाये की मनाजोगतं काम नाही त्यामुळे मजा येत नाही . या गैरसमजामुळे फार मोठा अनर्थ ओढवला आहे. कारण हे म्हणजे, पत्नी मनासारखी नाही त्यामुळे वैवाहिक जीवनात सुख नाही म्हणण्यासारखं आहे . त्यात पत्नी निदान व्यक्ती तरी आहे त्यामुळे तिच्याबाबतीत काही प्रमाणात कलह संभव आणि स्वाभाविक आहे . पण काम तर सर्वस्वी न्यूट्रल आहे. ते पूर्णपणे व्यक्ती निरपेक्ष आहे. त्यामुळे कामाच्याबाबतीत, ते करणार्‍याचा दृष्टीकोनच कायम निर्णायक आहे . थोडक्यात , एकदा का मनानं ठरवलंकी आपण करत असलेल्या कामात काही मजा नाही की जीवनाचा बाजा वाजलाच म्हणून समजा . मग त्या कामात व्यतीत केलेला वेळ आणि त्यातून मिळणारा पैसा, फारसा आनंद देऊ शकत नाहीत . तर सांगायची गोष्ट अशी की मनाजोगतं काम ही आयुष्यात मनासारखी पत्नी मिळण्यासारखी दुर्लभ घटना आहे . बर्‍याच सायकॅट्रीस्टसनी यावर `गेटींग अॅडजेस्टेड टू द सिच्युएशन '( किंवा वेल अॅडजस्टेड पर्सनॅलिटी ) हा एकमेव नामी पर्याय शोधला आहे . थोडक्यात , ` आहे त्याच्याशी विनातक्रार जुळवून घ्या , सुखी व्हाल', असा मनाला गप्प करण्याचा उपाय सुचवला आहे. आणि जगातल्या बहुतेक सर्व सो कॉल्ड हॅपी दिसणार्‍यांनी तोच आचरणात आणलेला दिसतो . असे लोक मग ` रिटायरमंट नंतर मजा करू ' अशी मनाची समजूत काढून, स्वतःला नेटानं कामाला जुंपून घेतात . सुट्टीच्या दिवशी जमेल आणि झेपेल तेवढी मजा करतात . सोमवारची नकोनकोशी आठवण मनाला पुढची काही तरी स्वप्न दाखवत सुसह्य करतात. ही झाली कर्मयोगाची सायकिक ट्रिटमेंट . आध्यात्मिक ट्रिटमेंट तर त्याहून भारी आहे आणि अर्थात असायलाच हवी ! आध्यात्मात `निष्काम कर्मयोग' किंवा ` फलापेक्षारहित कर्मयोग ' सांगितला जातो . थोडक्यात , पैशाकडे न बघता निव्वळ कामाचा आनंद घ्या हा तो राजमार्ग ! पण हा प्रकार जितका जोरात राबवाल तितका मानसिक दुफळी निर्माण करतो . कारण एकतर काम आवडत नसलं तरी पगाराच्या आशेनं, वेतन आयोगाकडे नजर लावून , प्रमोशनची स्वप्न पाहात ; पब्लिक सकाळी उठल्यापासून कामाचा गाडा ओढत असतं. त्यात आता ` कोणतीही अपेक्षा न करता' ही सगळी झकमारी करायची म्हणजे अवघड होऊन बसतं . या कर्मयोगी विचारसरणीमुळे कामाला गौरव प्राप्त होणं तर दूरच, पैशाला अवाजवी महत्व मिळालंय. म्हणजे सरकारी कामात बेतहाशा भ्रष्टाचार आणि प्रायवेट सेक्टरमधे जीवघेणी स्पर्धा . सरकारी कार्यालयातला माणूस निब्बर झालायं आणि खाजगी क्षेत्रातला निव्वळ यंत्रवत काम करतोयं. कामाची मजा म्हणावी तर इकडेही नाही आणि तिकडेही नाही . तर काय असेल कामाच्या आनंदाचं रहस्य ? पहिली गोष्ट, काम न करण्याचा विकल्प उपलब्ध असतांना सुरु केलेलं काम कायम सृजनात्मक असतं. हा विकल्प म्हणजे मनाची समजूत असेल तर उपयोग नाही. वास्तविकात तुम्हाला केंव्हाही काम बंद करता यायला हवं . दुसरी गोष्ट, या `ऑप्शन नॉट टू वर्क' मधे कामाची कंटीन्यूटी आणि सृजनात्मकता दोन्हीही अंतर्निहित आहेत . असा विकल्प असेल तर काम किती आनंदाचं होईल याची तुम्ही कल्पना करू शकता. आणि तिसरी गोष्ट, अशा कामात मग वेळ आणि पैसा दोन्ही दुय्यम होतात . कामाची ऐच्छिकताच, कामाचा इतका आनंद देऊन जाते की फलप्राप्ती बोनस ठरते. आणि जिथे आनंद आहे तिथे तणाव अशक्य आहे. काय आधार आहे या विचारामागे ? तर मुळात कार्य हा अस्तित्वाचा छंद आहे , कंपलशन नाही. ज्या वेळी काम कंपलशन म्हणून केलं जातं त्यावेळी आपण अस्तित्वापासून वेगळे झाल्यासारखे वाटतो. आपली समग्रता हरवते. आपली सृजनात्मकता लयाला जाते. केवळ फलप्राप्तीच्या आशेनं आपण कामाचं ओझं वाहातो आणि त्यातून कालनिर्मिती होते. हा काल दुहेरी असतो, एकीकडे तो कालावधी संपण्याची इच्छा निर्माण करतो आणि दुसरीकडे काम वेळेत संपवण्याचं टेंशन तयार करतो . या विकल्पाचा दुसरा पैलू तर त्याहूनही थोर आहे . अशा चित्तदशेत काम करणार्‍या व्यक्तीला एका क्षणी अचानक उलगडा होतो की काम केवळ शारिरिक आणि मानसिक पातळीवर चालू आहे, आपल्याला त्याची फक्त जाणीव होतेयं. आपण सदैव अकर्ता आहोत. कामाच्या यशापयशाचा आपल्याशी काही संबंध नाही. आपण परिणामापासून मुक्त आहोत ..... आणि हा `ऑप्शन नॉट टू वर्क' आपल्याला कायमच उपलब्ध होता! तुमचं कामच तुमचा छंद होतं, मग ते कुठलही काम असो. कामाच्या आनंदामुळे फलाशा दुय्यम होते आणि वेळेचं मनानं निर्माण केलेलं ओझं दूर होतं.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
24694 वाचन

💬 प्रतिसाद (180)

प्रतिक्रिया

हाहाहा

शाम भागवत
गुरुवार, 04/21/2016 - 18:20 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

केला की नाही मूळ लेख सोपा.

शाम भागवत
गुरुवार, 04/21/2016 - 18:21 नवीन
केला की नाही मूळ लेख सोपा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

येस्स! हलके घेतल्याबद्दल

रेवती
गुरुवार, 04/21/2016 - 18:50 नवीन
येस्स! हलके घेतल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

छान लिहिताय

पैसा
गुरुवार, 04/21/2016 - 18:20 नवीन
तुम्ही नेहमी का लिहीत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

बरं पण म्हणजे जे आहे त्यात

पिलीयन रायडर
गुरुवार, 04/21/2016 - 18:23 नवीन
बरं पण म्हणजे जे आहे त्यात आनंद माना किंवा रादर काहीच मानु नकात.. आनंद ना दु:ख.. मग कामच काय एकंदरित आयुष्यात तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही. पण हे ओव्हर सिम्प्लिफिकेशन नाही वाटत का? समजा एखादा कामगार आत्ता उन्हात रस्त्यावर मजुरी करत आहे. तुम्ही म्हणा की "तो" म्हणजे त्याचे शरीर नाही वगैरे वगैरे.. पण त्याला कामाचा जो त्रास व्हायचाय तो होणारच आहे. उन लागणारच.. अंग दुखणारच आणि त्याचे दु:ख होणारच की.. शिवाय... हे फक्त भावनांना बंद करणे झाले.. कामाला नाही.. काम तर करावेच लागते की हो.. "आपण" करत नसुन आपले "शरीर" करत असले किंवा अजुन काहीही फंडे लावले तरी ह्या देहाला उठुन काम करावे लागतेच. तेव्हा तुम्ही म्हणतात तसला काही लेखात मुद्दा असेल तर "ऑप्शन नॉट टु वर्क" हे फसवे शीर्षक आहे. "ठेविले अनंते तैसेची रहावे.. चित्ती असु द्यावे समाधान" ह्या पेक्षा काही वेगळं सांगितलय का ह्या लेखात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

बरोबर बोलताय.

शाम भागवत
गुरुवार, 04/21/2016 - 20:02 नवीन
पण त्याला कामाचा जो त्रास व्हायचाय तो होणारच आहे. उन लागणारच.. अंग दुखणारच आणि त्याचे दु:ख होणारच की..
अगदी खरेय. हे सगळे होणारच होते हो. पण आपण आपली नावड त्यात जास्तीची म्हणून घालतो त्यामुळे तो त्रास आणखीन वाढवून ठेवतो. यालाच भोग भोगताना तो वाढवून ठेवणे असे म्हणतात. उदाहरण देऊन हवे तर स्पष्ट करतो. कोणीतरी वरती म्हटलेय की, "सकाळी उठून की स्वयंपाक करायलाच लागतो. डबे तयार करायलाच लागतात." वगैरे वगैरे. ते श्रम आहेत याबद्दल वादच नाही. ते काम नसते तर आणखीन एक डुलकी काढता आली असती हेही मान्य. पण उठावे लागतेच. आता काही जणी रेडिओ लावतात तर काही जणी गाणी गुणगुणतात व त्या नादात काम कधी संपते ते कळतच नाही. थोडक्यात मुद्दा असा आहे की काम करण्यासाठी जेवढे श्रम व्हायला पाहिजेत तेवढेच झाले पाहिजेत त्यापेक्षा थोडेसे सुध्दा जास्त श्रम झाले नाही पाहिजेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

प्रतिसाद आवडला

मूकवाचक
गुरुवार, 04/21/2016 - 18:41 नवीन
ज्ञानेश्वरी नित्यपाठातला हा भाग आठवला: दीपाचेनी प्रकाशे | गृहींचे व्यापार जैसे | देही कर्मजाता तैसे | योगयुक्ता || तो कर्में करी सकळें | परी कर्मबंधा नाकळे | जैसें न सिंपे जळीं जळें | पद्मपत्र || तयाही देह एकु कीर आथी | लौकिकीं सुखदुःखी तयातें म्हणती | परी आम्हांतें ऐसी प्रतीती | परब्रह्मचि हा || देह तरी वरिचिलीकडे | आपुलिया परी हिंडे | परी बैसका न मोडे | मानसींची || अर्जुना समत्व चित्ताचें | तेंचि सार जाणैं योगाचें | जेथ मन आणि बुद्धीचें | ऐक्य आथी || देखैं अखंडित प्रसन्नता| आथी जेथ चित्ता| तेथ रिगणें नाहीं समस्तां| संसारदुःखां ||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

+१

राघव
गुरुवार, 04/21/2016 - 18:58 नवीन
@शाम भागवत यांचा प्रतिसाद आवडला. @मुवा: उद्धृत भाग खूपच छान आहे. धन्यवाद! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मूकवाचक

म्हणजे काय करा ??

अर्धवटराव
Fri, 04/22/2016 - 23:14 नवीन
जर प्राप्त परिस्थितीत एखादे काम करायलाच लागणार असेल तर ते त्यात गोडी घालून करा.
गोडी घालुन करा म्हणजे नेमकं काय करायचं म्ह्णताय ? एखादं काम गोड वाटतं म्हणजे काय असतं? माणासाचा मेंदु एखाद्या प्रचंड गुंतागुंतीच्या इलेक्ट्रॉनीक सर्कीट सारखा असतो. एखादं काम करताना या सर्कीटमधील एक विशिष्ट प्रणाली कार्यान्वीत होते. त्याकरता आवष्यक तेव्हढी ऊर्जा आणि प्राणवायु उपलब्ध असला तर ते मेंदुला शीण वाटत नाहि व ते काम गोड वाटतं. मेंदुला शीण न जाणावता काम करणं म्हणजेच त्यात गोडी असणं. उदा., संध्याकाळी अभ्यासाचा कंटाळा येत असेल कारण मेंदु शिणला असतो. व्यवस्थीत झोप, व्यायाम, नाश्ता करुन अभ्यासाला बसा, त्याच कामात गोडी वाटते. हे फार सिंपल उदाहरण झालं. पण सर्वप्रकारच्या कामात हिच प्रोसेस असते. मग ते पाठांतर असो, प्रोग्रामींग असो, टॅक्स फाइल करणं असो कि कार चालवणं. काम करताना ते नकोसं वाटणं, जांभया येणं, लक्ष्यात न येणं हे सर्व मेंदुला त्याचं इंधन न मिळाल्याची लक्षणं असतात. प्रत्येक मनुष्याच्या शरीरघडणीनुसार मेंदुचे काहि सर्कीट आपसुक स्ट्रीमलाइन असतात. त्यालाच आपण माणसाची आवड/ स्वभाव म्हणतो किंवा त्याचा कल अमुक गोष्टीत आहे असं म्हणतो. मेंदुचे इतर सर्कीट अभ्यासाने सेट केले तर त्यातही गती येते व कालांतराने त्यात परिश्रम जाणवत नाहि. या सर्वांमागे सरळ सरळ शरीरशास्त्र आहे बाकी काहि नाहि. निराकार वगैरे कल्पनांविषयी नंतर कधितरी :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

हे सगळे प्रतिसादकचे विचार आहेत

विवेक ठाकूर
Fri, 04/22/2016 - 23:32 नवीन
त्यांचा लेखात मांडलेल्या `दि ऑप्शन नॉट टू वर्क'या बेसिक विचाराशी काहीएक संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

शक्य आहे.

अर्धवटराव
Fri, 04/22/2016 - 23:51 नवीन
पण हे सर्व शरीरशास्त्राशीच संबंधीत आहे एव्हढं नक्की. बाकी `दि ऑप्शन नॉट टू वर्क'या बेसिक विचारांवर विचारलेल्या प्रश्नाला इग्नोर करण्यात आलं आहे. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

ऑप्शन नॉट टू वर्क स्टेप बाय स्टेप

शाम भागवत
Sun, 04/24/2016 - 20:28 नवीन
खरे म्हणजे मी ऑप्शन नॉट टू वर्क याबाबत बोलणार नव्हतो. पण माझे निरीक्षण व अनुभव यानुसार, १) एखादे काम करत असताना, अंगीकृत कामाशी काहीही संबंध नसलेले विचार मनात येत आहेत हेच मुळी आपल्या लक्षात येत नाही. कारण आपण विचारांबरोबर वाहत जात असतो. २) यासाठी विचारांवर जागृत राहून लक्ष ठेवण्याची कला साधायला लागते. ही कला थोडीफार साधायला लागल्यावर मग हळूहळू आपल्या मनात आत्ता या क्षणी कोणते विचार येत आहेत हे जाणवणे जमायला लागते. ३) यानंतरच नकारात्मक विचार जे कामाचा ताण तणाव वाढवतात किंवा कामाबद्दल नावड निर्माण करतात असे विचार मनात आल्या आल्या ते धरणे मग ते थांबवणे / थोपवणे शक्य होऊ शकते किंवा त्यादृष्टीने प्रयत्न करणे जमू लागते. ४) हाच विचारांचा प्रवाह सकारात्मक मार्गाने वळवता येणे ही त्यानंतरची पुढची पायरी होय. ही पायरी फार महत्त्वाची असते. कारण विचार थोपवले तरी परत कधीतरी अनुकूलता प्राप्त होताच उसळी मारून हजर होतात. पण ते वळविण्याची कला साधायला लागल्यावर मात्र ही भिती कमी कमी होत जाते. ५) मग मात्र आपण व काम येवढेच शिल्लक राहते. कामातील समरसता हळूहळू वाढत जाते आणि कधीतरी आपण काम करत नसून आपणाकडून काम होतेय याचा अनुभव येतो. कामापासून आपण पूर्णपणे भिन्न झालेलो असतो. हेच ऑप्शन नॉट टू वर्क कामाचे मुख्यत्वे करून दोन प्रकार संभवतात. पहिला म्हणजे ज्यात डोक्याचा वापर फारसा नसतो. कामात टोचतोच पणा असतो. दुसऱ्या प्रकारात मात्र डोक्याचा वापर जास्त व अंगमेहनत कमी असते. क्रमांक ५ मध्ये दिलेला अनुभव हा पहिल्या प्रकारच्या कामात प्रथम येतो. दुसऱ्या प्रकारच्या कामात हा अनुभव येणे ही खूपच पुढची पायरी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

खरे म्हणजे मी ऑप्शन नॉट टू वर्क याबाबत बोलणार नव्हतो !

विवेक ठाकूर
Sun, 04/24/2016 - 22:49 नवीन
बरोब्बर! तुम्हाला ऑप्शन नॉट टू वर्कची काहीही कल्पना नाही. भरकटलेले विचार कामाकडे कसे वळवावेत वगैरे तुम्ही लिहीलेल्या तपशीलाचा आणि लेखाचा काहीएक संबंध नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

:-))

शाम भागवत
Mon, 04/25/2016 - 00:05 नवीन
:-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

"जर प्राप्त परिस्थितीत एखादे

शाम भागवत
Sat, 04/23/2016 - 15:50 नवीन
"जर प्राप्त परिस्थितीत एखादे काम करायलाच लागणार असेल तर" ह्या गृहितकावर मी विचार मांडले होते. मात्र प्राप्त परिस्थिती बदलून कामात गोडी कशी आणता येते याबद्दल तुम्ही लिहीत आहात असे वाटतेय कारण; तुमच्या सिंपल उदाहरणात "व्यवस्थीत झोप, व्यायाम, नाश्ता करुन अभ्यासाला बसा" असे सागत आहात म्हणजे चक्क परिस्थितीच बदला असे सांगताय असेच माझे मत बनले आहे. आपल्या दोघाच्या दृष्टिकोनातच फरक असल्याने मला या विषयावर बोलण्यास फारसा वावच राहिलेला नाही. तरीपण परिस्थिती न बदलता, (म्हणजे झोप घेणे व्यायाम करणे व नाश्ता करणे हे पर्याय उपलब्ध नसताना) अभ्यासात गोडी कशी आणायचे याची शरीरशास्त्रात एखादी प्रोसेस असेल तर ती वाचायला मला आवडेल. असो.
मेंदुचे इतर सर्कीट अभ्यासाने सेट केले तर त्यातही गती येते व कालांतराने त्यात परिश्रम जाणवत नाहि.
एकदम मान्य. पण सकारात्मक विचार करून म्हणजेच कामात गोडी आणण्याचा प्रयत्न करून ही मेंदूतील सर्कीट का बरे सेट करता येत नसावीत ते काही कळले नाही. याबाबत माहिती मिळाल्यास आभारी होईन. जर प्राप्त परिस्थितीत आपली नावड अथवा कामाबद्दलची तक्रार यावरच विचार करत करत काम केल्यास आपल्यालाच त्रास होतो किंवा काम बिघडते. तसेच आपली होणारी चिडचीड ही आपल्या हातून चुका होण्याची शक्यता वाढ्वते असा जर पूर्वानुभव असेल तर आपणच आपल्या मनाचे समुपदेशन करणे योग्य ठरणार नाही का? कामात गोडी घालणे ही फार पुढची गोष्ट झाली हो. त्या अगोदर कामाबद्दलचा कडवटपणा काढणे ही पहिली पायरी पण बरेच जण ओलांडू शकत नाहीत असे माझे निरिक्षण आहे व या निरिक्षणावर आधारित मी माझ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. थोडक्यात मुद्दा असा आहे की काम करण्यासाठी जेवढे श्रम व्हायला पाहिजेत तेवढेच झाले पाहिजेत त्यापेक्षा थोडेसे सुध्दा जास्त श्रम झाले नाही पाहिजेत. मग हे शरीरशास्त्राने साधो अथवा ऑप्शन नॉट टू वर्क ने साधो. साधणे महत्वाचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

परिस्थितीत बदल...

अर्धवटराव
Sat, 04/23/2016 - 21:25 नवीन
तुमच्या सिंपल उदाहरणात "व्यवस्थीत झोप, व्यायाम, नाश्ता करुन अभ्यासाला बसा" असे सागत आहात म्हणजे चक्क परिस्थितीच बदला असे सांगताय असेच माझे मत बनले आहे.
अहो, एखादं काम करण्याची गरज/इच्छा/भावना निर्माण होणं हेच मुळी परिस्थिती बदलण्याचं निर्देशक आहे. ज्याला आपण काम करणं म्हणतो, कर्म म्हणतो, ते परिस्थिती बदलण्याव्यतिरीक्त आहे तरी काय?
तरीपण परिस्थिती न बदलता, (म्हणजे झोप घेणे व्यायाम करणे व नाश्ता करणे हे पर्याय उपलब्ध नसताना) अभ्यासात गोडी कशी आणायचे याची शरीरशास्त्रात एखादी प्रोसेस असेल तर ती वाचायला मला आवडेल. असो.
याबद्दल पुर्वी टंकलं आहे. प्राप्त परिस्थितीत काय करायला हवं याचं उत्तर देणारं इंजीन माणसाच्या मनात/मेंदुत नेहेमी उपलब्ध असतं. त्याचा कौल घेणे हा सर्वोत्तम मार्ग. जर आत्ता अभ्यासाची निकड असेल आणि मेंदु शिणला असेल तर ते इंजीन तुम्हाला अर्धा तास पॉवर नॅप घेऊन अभ्यासाला बसायचा कौल देईल (याचा काहि एक सेट फॉर्मुला नाहि. प्रत्येकाची तर्‍हा वेगळी असणार). इन फॅक्ट, ताजंतवानं होऊन अभ्यासाला बसणं हे त्या अभ्यासकर्मातच इन्क्लुडेड असेल. इट्स ऑल अबौट कॉर्डीनेशन बिट्वीन मन अ‍ॅण्ड शरीर.
पण सकारात्मक विचार करून म्हणजेच कामात गोडी आणण्याचा प्रयत्न करून ही मेंदूतील सर्कीट का बरे सेट करता येत नसावीत ते काही कळले नाही. याबाबत माहिती मिळाल्यास आभारी होईन.
हि सकारात्मकता जर प्रामाणीकपणे मनाला पटली, त्यात सत्य/तथ्य वाटलं तर डेफिनेटली मेंदु त्यानुसार काम करेल. किंबहुना, कामाची निकड खरच निर्माण झाली असेल तर त्यात सकारात्मकतेचं तेल ओतण्याची गरजच राहात नाहि. आणि मनाला तशी गरज नसेल वाटत तर लाख सकारात्मक विचार करा, मनाला त्यातला फोलपणा जाणवत राहिल.
जर प्राप्त परिस्थितीत आपली नावड अथवा कामाबद्दलची तक्रार यावरच विचार करत करत काम केल्यास आपल्यालाच त्रास होतो किंवा काम बिघडते.
नक्कीच ते काम बिघडेल. पण जर तक्रार करण्याजोगं काम आपल्या वाट्याला असेल तर ते डेफिनेटली कुठल्यातरी गरजेतुन निर्माण झालं असेल. त्या गरजेला ते काम ड्राइव्ह करु देणं सगळ्यात बेष्ट. काम आवडीचं असो वा गरजेतुन निर्माण झालेलं, त्याच्या परिणामात मन गुंतलं कि कार्यनाश होण्याचे चान्सेस असतातच. त्यापेक्षा "काय करायला हवं" या इंजीनचा सतत कौल घेत राहिल्यास बेस्ट पॉसिबल कर्म देखील साध्य होतं आणि त्याचा त्राचा त्रास देखील होत नाहि.
तसेच आपली होणारी चिडचीड ही आपल्या हातून चुका होण्याची शक्यता वाढ्वते असा जर पूर्वानुभव असेल तर आपणच आपल्या मनाचे समुपदेशन करणे योग्य ठरणार नाही का?
"आपल्या" हातुन चुका होणं, "मनाचं" समुपदेशन करणं... हि मनाची विभागणी मूळातच चुकीची आहे. चिडचीड मनाचीच होते, समुपदेशन सुद्धा मन मनाचच करतं. चिडचिड होण्यामागे शारीरीक कारण म्हणजे वर म्हटल्याप्रमाणे मेंदुचं सर्कीट सेट नसणं. मानसीक कारण म्हणजे मन परिणामात गुंतलं असणं. त्या परिणामात गुंतण्याऐवजी मनाने जर आपल्या "प्राप्त परिस्थितीत काय करायला हवं" या कर्मात गुंतलं तर शरीर-मनाचं नेमकं कॉर्डीनेशन करुन कार्य साध्य करण्याचा प्रॉग्राम मनासमोर आपसुक येतो. देन जस्ट डु इट. त्याचा जो काहि परिणाम होईल त्यावर रिएक्शन म्हणुन परत नवीन प्रोग्राम मनासमोर येतोच. दॅट्स लाइफ.
कामात गोडी घालणे ही फार पुढची गोष्ट झाली हो. त्या अगोदर कामाबद्दलचा कडवटपणा काढणे ही पहिली पायरी पण बरेच जण ओलांडू शकत नाहीत असे माझे निरिक्षण आहे व या निरिक्षणावर आधारित मी माझ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
त्यात काहि वाद नाहि. मी पण माझे निरीक्षणच नोंदोवतो आहे :)
थोडक्यात मुद्दा असा आहे की काम करण्यासाठी जेवढे श्रम व्हायला पाहिजेत तेवढेच झाले पाहिजेत त्यापेक्षा थोडेसे सुध्दा जास्त श्रम झाले नाही पाहिजेत. मग हे शरीरशास्त्राने साधो अथवा ऑप्शन नॉट टू वर्क ने साधो. साधणे महत्वाचे.
मला ते ऑप्शन नॉट टु वर्क म्हणजे नेमकं काय हेच कळलं नाहि. काम करताना त्यात गोडी निर्माण करायला ऑप्शन नॉट टु वर्क नशीबाने उपलब्ध असतं, कि ते निर्माण करावं लागतं हे ही कळलं नाहि. निर्माण करणं म्हणजे अजुन एक कर्म अ‍ॅड झालं. त्यात काहि अध्यात्मीक वगैरे आहे हेही मला पटलं नाहि. हा सगळा शरीर आणि मानसशास्त्राचा प्रांत आहे असं माझं प्रामाणीक मत आहे. धागाकर्त्याला विचारलं तर त्यांनी सरळ प्रश्न इग्नोर केला. असो. आपापली मर्जी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

दोन्ही सदस्य लेखातल्या अत्यंत फंडामेंटल गोष्टीशी

विवेक ठाकूर
Sat, 04/23/2016 - 22:38 नवीन
फारकत घेऊन चर्चा निष्कारण मनाच्या गुंत्यात नेतायेत. या प्रकारे काम स्वच्छंद होणं असंभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

कल्पना करा

विवेक ठाकूर
Sat, 04/23/2016 - 22:58 नवीन
काम न करण्याचा किंवा ते थांबवण्याचा विकल्प कायम उपलब्ध आहे ...अशी तुमची निश्चल चित्तदशा आहे. आणि या चितदशेतून तुम्ही काम सुरू केलंय. आता काम हा तुमचा स्वच्छंद असल्यानं त्यात रस आपसूक निर्माण होईल, मनाची एकाग्रता विनासायास साधेल, काम स्वभावतःच सम्यक होईल (म्हणजे कामाचं शरीर किंवा मनाला ओझं वाटणार नाही), तुमची सृजनात्मकता साथ देईल , ते शक्यतो वेळेतच पूर्ण होईल आणि मुख्य म्हणजे ..... त्या कामातून कमालीचा आनंद मिळेल ! लेखाचा मूळ अर्थ असा आहे .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

माझा प्रश्न तोच आहे

अर्धवटराव
Sat, 04/23/2016 - 23:38 नवीन
ज्या क्षणी काम करण्याची प्रेरणा मनात उत्पन्न झाली त्याच क्षणी ते न करण्याचं ऑप्शन बाद झालं. आत ते न करण्याचं किंवा थांबवण्याचं ऑप्शन त्याच कामांतर्गत आलं तरच शक्य आहे. काम करत असताना ते न करण्याच्या ऑप्शनकडे बघणं म्हणजे एकतर द्विधा मन:स्थिती झाली किंवा कामाच्या परिणामांपासुन फारकत घेण्याची इन्शोरन्स पॉलिसी झाली. म्हणजे कसं, कि मी काम तर करतोय, त्याचे परिणाम कसेही असले, अ‍ॅज गुड अ‍ॅस ते काम केलच नाहि तरि, त्या परिणामांचा माझ्यावर काहिही परिणाम होणार नाहि याची सोय उपलब्ध असणे म्हणजे नॉट टु वर्क ऑप्शन. आता अशी परिणामरहितता नशीबाने तरी मिळाली असेल किंवा ति कमवली तरी असेल (डॉ. खरे, गॅरी ट्रुमन वगैरे मंडळींनी कमवली तशी)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

चर्चा निष्कारण मनाच्या गुंत्यात नेतायेत.

अर्धवटराव
Sat, 04/23/2016 - 23:41 नवीन
आम्हि मुद्दाम चर्चा भलतीकडे नेत आहोत असं वाटत असल्यास चर्चेत काहि पॉइंट नाहि. आणि कामाचा स्वच्छंद यथेच्च उपभोगत असल्यामुळेच त्याबद्दलचे विचार टंकतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक ठाकूर

श्री गणेश लेखमाला आणि हे

अप्पा जोगळेकर
गुरुवार, 04/21/2016 - 16:51 नवीन
श्री गणेश लेखमाला आणि हे 'ऑप्शन नॉट टू वर्क' एकदमच प्रकाशित झाले असते तर मजा आली असती.
  • Log in or register to post comments

जगी कर्मयोगाचे हे सार

भीमाईचा पिपळ्या.
गुरुवार, 04/21/2016 - 17:42 नवीन
जगी कर्मयोगाचे हे सार घ्यावे जाणून सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देई ×× सर. जाणकारांनी भर घालावी.
  • Log in or register to post comments

लेख वाचला, आवडला. काही टक्के

रेवती
गुरुवार, 04/21/2016 - 17:58 नवीन
लेख वाचला, आवडला. काही टक्के पटला नाही, कारण प्रत्येकजण वाचताना आपापल्या परिस्थितीचा मापदंड लावत असतो. अंतर्निहित हा शब्द फार अवघड आहे. चित्तदशा वगैरे वाचले की हापिसच्या कामापासून लांब गेल्यासारखे वाटते. काही प्रतिसाद वाचले, त्यातील काही पटले नाहीत. सरळ साध्या लेखाचे प्रतिसादांमुळे उगीच अवघड प्रकरण करून ठेवण्यात अर्थ नाही. लेख १०० टक्के नाही तरी काही टक्के नक्कीच आचरणात आणता येण्यासारखा आहे. बरेचजण आचरणात आणतही असतील. नोकरी करताना प्रत्येक दिवस एकसारखा आनंदी, उत्साही असेल या आशेवर राहणे वेडेपणा आहे, तसेच रोजचा दिवस तुम्ही कसाबस ओढता हेही खोटे असेल, जरा लक्ष ठेवा व बघा की मनुष्य काही ना काही आनंद शोधूनच काढतो, चुकीच्या ठिकाणी का असेना! अनेक उदाहरणे हापिसच्या बाहेर फुंकत उभी असलेली दिसतील. ;) मला घराच्या कर्जाचा हप्ता द्यायचाय, अमक्याचे बिल भरायचेय असेही काही प्रतिसादांमध्ये आहे. अगदी बरोबर आहे. तुम्ही एकटेच आहात सगळी बिले भरणारे! बॉस त्रास देतो आहे, तर हो, तुमचा एकट्याचाच बॉस त्रास देतोय बाकी कुण्णाचा देत नाही. फक्त तुम्ही एकटेच या जगात प्रॉब्लेममध्ये फसलेले आहात असल्या प्रतिसादांनी लेखाचे भजे करून ठेवण्याने उपयोग नाही. सगळाच्या सगळा लेख हा तुमच्या प्रश्नाचे उत्तर असेल असे नाही. विठामाऊली, लेखाबद्दल धन्यवाद. त्यातून, प्रतिसादामधून एक या लेखाशी संबंधित नसलेला विचार मनात आला व माझा लहानसा प्रश्न (मीच निर्माण करून ठेवलेला) सुटला असे म्हणता येणार नाही पण सुटू शकेल अशी आशा निर्माण झाली.
  • Log in or register to post comments

हेहेहेहेहे रेवाक्का रॉक्स

अभ्या..
गुरुवार, 04/21/2016 - 18:04 नवीन
हेहेहेहेहे रेवाक्का रॉक्स अगेन. अ‍ॅज ऑलवेज. कसं जमतं असं परफेक्ट लिहायला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

रेवतीजी, तुम्हाला लेखाचे मर्म

सस्नेह
Fri, 04/22/2016 - 17:12 नवीन
रेवतीजी, तुम्हाला लेखाचे मर्म बरोबर समजले आहे. (जे बऱ्याच मूढ मिपाकरांना कळलेले नाही. त्यात मीपण आहे ) तुम्ही आचरणात आणण्याचा प्रयत्न करालच. कदाचित तुम्हाला त्यात यशही मिळेल. पण नाहीच मिळाले तरी काम न करण्याचा पर्याय कधीही विसरू नका. कधी ना कधी तुम्ही नक्की काम करायचे सोडाल, अशी खात्री आहे. धन्यवाद ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

काय स्णेहातै, आज मी सापडले का

रेवती
Fri, 04/22/2016 - 18:26 नवीन
काय स्णेहातै, आज मी सापडले का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

उत्तम लेख व सुरेख प्रतिसाद.

प्रचेतस
गुरुवार, 04/21/2016 - 18:38 नवीन
उत्तम लेख व सुरेख प्रतिसाद.
  • Log in or register to post comments

ह्यॅ ह्यॅ ह्यॅ

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 04/21/2016 - 18:44 नवीन
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

An important message

होकाका
गुरुवार, 04/21/2016 - 19:57 नवीन
या धाग्याचा टिआरपी चांगला असल्यामुळे हा सगळ्यांनी बघावा असा एक मेसेज इथे टाकत आहे. (हा मला व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला आहे, त्यामुळे काही लोकांनी तो आधीच पाहिलेला असू शकतो.) याचा विषयाशी संबंध नाही याबद्द्ल चूभूमाअ.

"We need help from India to free us. Why is India silent?" — Baloch woman

What Nazis did to Jews, Pakistan is doing to our people, says a Baloch woman with tears in her eyes. Demanding help from India to free her country from Pakistan's actrocious occupation, she urges India not to remain a silent spectator when her neighbors, the Balochs, are suffering.
  • Log in or register to post comments

धन्यवाद, हो काका, इथे शेअर

चौथा कोनाडा
Fri, 04/22/2016 - 08:41 नवीन
धन्यवाद, हो काका, इथे शेअर केल्याबद्दल ! हृदय द्रावक परिस्थिती आहे. भारता कडे केवढ्या आशेने बघतायत ते ! पुढील पाच वर्षे या विषयाचीच असली तर आशचर्य वाटायला नको. बिचारयांच्या बाबतीत कर्मयोग: नो ऑप्शन टू फाईट हेच लिहिले असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होकाका
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा