कर्मयोग : दि ऑप्शन नॉट टू वर्क !
पैसा , वेळ आणि काम ही दैनंदिन टेंशनची तीन प्रमुख कारणं आहेत . काहीही आणि कितीही साधना केली तरी हे तीन प्रश्न सोडवल्याशिवाय जीवनात स्वास्थ येणं असंभव . आपल्या प्रत्येक दिवसाचा सगळा प्राईम टाईम याच तीन गोष्टींवर व्यतीत होत असतो . तस्मात , या तीन आयामात मजा आली तर जगण्यात आपसूक मजा येते .
या तीन डायमेंन्शसपैकी काम सेंट्रल आहे कारण वेळ आणि पैसा त्याच्याशी निगडित आहेत . थोडक्यात काम नसेल ( उदा . रविवार ) तर वेळ आणि पैसा दुय्यम ठरतात . आणि त्याही पुढे जाऊन काम आनंदाचं झालं तर वेळ आणि पैसा बहुतांशी परिणाम शून्य होतात .
कामाच्या बाबतीत एक सार्वत्रिक गैरसमज असाये की मनाजोगतं काम नाही त्यामुळे मजा येत नाही . या गैरसमजामुळे फार मोठा अनर्थ ओढवला आहे. कारण हे म्हणजे, पत्नी मनासारखी नाही त्यामुळे वैवाहिक जीवनात सुख नाही म्हणण्यासारखं आहे . त्यात पत्नी निदान व्यक्ती तरी आहे त्यामुळे तिच्याबाबतीत काही प्रमाणात कलह संभव आणि स्वाभाविक आहे . पण काम तर सर्वस्वी न्यूट्रल आहे. ते पूर्णपणे व्यक्ती निरपेक्ष आहे. त्यामुळे कामाच्याबाबतीत, ते करणार्याचा दृष्टीकोनच कायम निर्णायक आहे .
थोडक्यात , एकदा का मनानं ठरवलंकी आपण करत असलेल्या कामात काही मजा नाही की जीवनाचा बाजा वाजलाच म्हणून समजा . मग त्या कामात व्यतीत केलेला वेळ आणि त्यातून मिळणारा पैसा, फारसा आनंद देऊ शकत नाहीत .
तर सांगायची गोष्ट अशी की मनाजोगतं काम ही आयुष्यात मनासारखी पत्नी मिळण्यासारखी दुर्लभ घटना आहे .
बर्याच सायकॅट्रीस्टसनी यावर `गेटींग अॅडजेस्टेड टू द सिच्युएशन '( किंवा वेल अॅडजस्टेड पर्सनॅलिटी ) हा एकमेव नामी पर्याय शोधला आहे . थोडक्यात , ` आहे त्याच्याशी विनातक्रार जुळवून घ्या , सुखी व्हाल', असा मनाला गप्प करण्याचा उपाय सुचवला आहे. आणि जगातल्या बहुतेक सर्व सो कॉल्ड हॅपी दिसणार्यांनी तोच आचरणात आणलेला दिसतो .
असे लोक मग ` रिटायरमंट नंतर मजा करू ' अशी मनाची समजूत काढून, स्वतःला नेटानं कामाला जुंपून घेतात . सुट्टीच्या दिवशी जमेल आणि झेपेल तेवढी मजा करतात . सोमवारची नकोनकोशी आठवण मनाला पुढची काही तरी स्वप्न दाखवत सुसह्य करतात. ही झाली कर्मयोगाची सायकिक ट्रिटमेंट .
आध्यात्मिक ट्रिटमेंट तर त्याहून भारी आहे आणि अर्थात असायलाच हवी !
आध्यात्मात `निष्काम कर्मयोग' किंवा ` फलापेक्षारहित कर्मयोग ' सांगितला जातो . थोडक्यात , पैशाकडे न बघता निव्वळ कामाचा आनंद घ्या हा तो राजमार्ग ! पण हा प्रकार जितका जोरात राबवाल तितका मानसिक दुफळी निर्माण करतो . कारण एकतर काम आवडत नसलं तरी पगाराच्या आशेनं, वेतन आयोगाकडे नजर लावून , प्रमोशनची स्वप्न पाहात ; पब्लिक सकाळी उठल्यापासून कामाचा गाडा ओढत असतं. त्यात आता ` कोणतीही अपेक्षा न करता' ही सगळी झकमारी करायची म्हणजे अवघड होऊन बसतं .
या कर्मयोगी विचारसरणीमुळे कामाला गौरव प्राप्त होणं तर दूरच, पैशाला अवाजवी महत्व मिळालंय. म्हणजे सरकारी कामात बेतहाशा भ्रष्टाचार आणि प्रायवेट सेक्टरमधे जीवघेणी स्पर्धा . सरकारी कार्यालयातला माणूस निब्बर झालायं आणि खाजगी क्षेत्रातला निव्वळ यंत्रवत काम करतोयं. कामाची मजा म्हणावी तर इकडेही नाही आणि तिकडेही नाही .
तर काय असेल कामाच्या आनंदाचं रहस्य ?
पहिली गोष्ट, काम न करण्याचा विकल्प उपलब्ध असतांना सुरु केलेलं काम कायम सृजनात्मक असतं. हा विकल्प म्हणजे मनाची समजूत असेल तर उपयोग नाही. वास्तविकात तुम्हाला केंव्हाही काम बंद करता यायला हवं .
दुसरी गोष्ट, या `ऑप्शन नॉट टू वर्क' मधे कामाची कंटीन्यूटी आणि सृजनात्मकता दोन्हीही अंतर्निहित आहेत . असा विकल्प असेल तर काम किती आनंदाचं होईल याची तुम्ही कल्पना करू शकता.
आणि तिसरी गोष्ट, अशा कामात मग वेळ आणि पैसा दोन्ही दुय्यम होतात . कामाची ऐच्छिकताच, कामाचा इतका आनंद देऊन जाते की फलप्राप्ती बोनस ठरते. आणि जिथे आनंद आहे तिथे तणाव अशक्य आहे.
काय आधार आहे या विचारामागे ? तर मुळात कार्य हा अस्तित्वाचा छंद आहे , कंपलशन नाही.
ज्या वेळी काम कंपलशन म्हणून केलं जातं त्यावेळी आपण अस्तित्वापासून वेगळे झाल्यासारखे वाटतो. आपली समग्रता हरवते. आपली सृजनात्मकता लयाला जाते. केवळ फलप्राप्तीच्या आशेनं आपण कामाचं ओझं वाहातो आणि त्यातून कालनिर्मिती होते. हा काल दुहेरी असतो, एकीकडे तो कालावधी संपण्याची इच्छा निर्माण करतो आणि दुसरीकडे काम वेळेत संपवण्याचं टेंशन तयार करतो .
या विकल्पाचा दुसरा पैलू तर त्याहूनही थोर आहे . अशा चित्तदशेत काम करणार्या व्यक्तीला एका क्षणी अचानक उलगडा होतो की काम केवळ शारिरिक आणि मानसिक पातळीवर चालू आहे, आपल्याला त्याची फक्त जाणीव होतेयं. आपण सदैव अकर्ता आहोत. कामाच्या यशापयशाचा आपल्याशी काही संबंध नाही. आपण परिणामापासून मुक्त आहोत ..... आणि हा `ऑप्शन नॉट टू वर्क' आपल्याला कायमच उपलब्ध होता! तुमचं कामच तुमचा छंद होतं, मग ते कुठलही काम असो. कामाच्या आनंदामुळे फलाशा दुय्यम होते आणि वेळेचं मनानं निर्माण केलेलं ओझं दूर होतं.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हाहाहा
केला की नाही मूळ लेख सोपा.
येस्स! हलके घेतल्याबद्दल
छान लिहिताय
बरं पण म्हणजे जे आहे त्यात
बरोबर बोलताय.
प्रतिसाद आवडला
+१
म्हणजे काय करा ??
हे सगळे प्रतिसादकचे विचार आहेत
शक्य आहे.
ऑप्शन नॉट टू वर्क स्टेप बाय स्टेप
खरे म्हणजे मी ऑप्शन नॉट टू वर्क याबाबत बोलणार नव्हतो !
:-))
"जर प्राप्त परिस्थितीत एखादे
परिस्थितीत बदल...
दोन्ही सदस्य लेखातल्या अत्यंत फंडामेंटल गोष्टीशी
कल्पना करा
माझा प्रश्न तोच आहे
चर्चा निष्कारण मनाच्या गुंत्यात नेतायेत.
श्री गणेश लेखमाला आणि हे
जगी कर्मयोगाचे हे सार
लेख वाचला, आवडला. काही टक्के
हेहेहेहेहे रेवाक्का रॉक्स
रेवतीजी, तुम्हाला लेखाचे मर्म
काय स्णेहातै, आज मी सापडले का
उत्तम लेख व सुरेख प्रतिसाद.
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ
An important message
"We need help from India to free us. Why is India silent?" — Baloch woman
What Nazis did to Jews, Pakistan is doing to our people, says a Baloch woman with tears in her eyes. Demanding help from India to free her country from Pakistan's actrocious occupation, she urges India not to remain a silent spectator when her neighbors, the Balochs, are suffering.धन्यवाद, हो काका, इथे शेअर