✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

शनि ग्रह आणि पृथ्वीवरचे जीव

व
वैभव जाधव यांनी
Wed, 04/13/2016 - 22:17  ·  लेख
लेख
पृथ्वी आणि चंद्र यांच्या रोजच्या फुगडीतून चंद्राच्या गुरुत्वाकर्षणा मुळे आठ तासा तून एकदा भरती आणि नंतर ओहोटी होते. 4 4 मीटर लाटा उसळतात. चंद्र जवळ आहे म्हणून असं होतं म्हणे. माणसाच्या शरीरात असलेल्या पाणी सदृश घटकांवर परिणाम होतो असं मानायला जागा आहे का? अशा मुळे माणसाच्या वागण्यावर ठराविक दिवशी (अमावस्या पौर्णिमा) परिणाम होतो असं मानलं जातं. आता काथ्याकुटाचा मूळ विषय- म्हणजे शनि आणि पृथ्वी यांचं त्यांच्या त्यांच्या कक्षेत फिरताना काही आकर्षण प्रतिकर्षण होत असतं का? जर ते तसं होत असेल तर तो शनीचा माणसावर होणारा परिणाम मानावा का? शनि एका ठराविक काळात त्याच्या आणि पृथ्वीच्या गतीतील बदलामुळे तुलनात्मक एका च जागी असल्याने तो त्या राशीत आहे असं वाटून, त्यामुळे ठराविक लोकांना त्याच्या या आकर्षण बळामुळे त्रास होणं शक्य मानलं जावं का? - विश्वातील एका घटकाचा दुसऱ्या घटकावर परिणाम होत असतो असं मानणारा पहिला काथ्या कुटणारा वै जा.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
31781 वाचन

💬 प्रतिसाद (180)

प्रतिक्रिया

शनी-शिंगणापूर हे शिर्डीच्या

शाम भागवत
Tue, 04/19/2016 - 19:36 नवीन
शनी-शिंगणापूर हे शिर्डीच्या वाटेवर म्हणा किंवा शिर्डीच्या खुप जवळचे असे एक देवस्थान आहे. त्यामुळे शिर्डीला आलेले भाविक लोक "वाटेत शनी-शिंगणापूरलाही जाऊ" असा विचार करून शनी शिंगणापूरला जात असावेत. कुणी आवर्जून फक्त शनी शिंगणापूरला जात असेल असं वाटत नाही.
तुम्ही जो संशय व्यक्त केलाय तो मुद्दा मान्य. शनिवार, अमावास्या व शनि अमावास्या हे दिवस सोडून तुम्ही म्हणता तसे घडणे शक्य आहे पण तरीही..... ५२ शनिवार, १२ अमावास्या व शनि अमावास्या यादिवशी होणारी अभूतपूर्व गर्दी सुध्दा शिर्डीचीच असते पण "शिर्डीला आलोच आहोत तर शनि शिंगणापूरला जाऊन ४-५ तास रांगेत उभे राहून दर्शन घेऊ." अशा विचारातच सर्व भक्त मंडळी आलेली असतात अशी मनाची समजूत घालणे मला जरा जड जातेय. माझ्या लेखात मी नेहमी शनिवारीच सोनईला जायचो असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे आणि माझे अनुभव हे फक्त शनिवारचेच आहेत. असो.
  • Log in or register to post comments

गुलशन कुमार

शाम भागवत
Tue, 04/19/2016 - 20:35 नवीन
शनी-शिंगणापूर का प्रसिद्ध झाले याची मी ऐकलेली माहिती वेगळी आहे. कुणी कॅसेट कंपनीचे मालक म्हणे तिथे गेले होते. बहूधा टी सिरीजचे गुलशन कुमार असावेत. त्यांनी म्हणे शनीदेवावर एक व्हीडीओ फिल्म बनवली आणि तेव्हापासून हे ठीकाण प्रसिद्धीला आले. ही माहिती मी खुप पुर्वी युनिक फीचरच्या एका लेखात वाचली होती. त्यांच्या वेबसाइटवर हा लेख शोधला असता सापडला नाही.
मी गेल्या ३० वर्षांच्या कालखंडाबद्दल बोलतोय. त्यात मी १९८५, १९८७-८८, १९९३, २००४ या टप्यां वर मला आलेले अनुभव मांडले आहेत व त्या आधारे काही निष्कर्ष काढायचा प्रयत्न केला आहे. गुलशन कुमारांनी फिल्म काढली त्यामुळे शनिशिंगणापूरची प्रसिध्दी वाढली असे तुम्ही म्हणताय. तुमचे म्हणणे संयुक्तिक असल्याने तसे झाले असणे शक्य आहे. पण.. गुलशन कुमार तेथे कधी गेले होते व त्यांनी ती फिल्म कधी बनवली होती हे तुम्ही लिहिले असते तर बरे झाले असते. माझ्या माहिती प्रमाणे १९९४ सालापर्यंत तरी तशी काही फिल्म बनलेली नव्हती. म्हणजे गुलशन कुमारांनी फिल्म बनवली, त्यामुळे अनिस वाल्यांना शनिशिंगणापूरची महिती मिळाली व मग त्यांनी आंदोलन केले असे काही घडले नसून, ८७-८८ मधे आंदोलन झाले व त्या आंदोलनामुळेच शनिशिंगणापूर प्रसिध्दी पावून १९९४ नंतर गुलशन कुमार तेथे आकर्षित झाले असे घडले असण्याची शक्यता मला जास्त वाटते. मी या आंदोलनाला इतके म हत्व देतोय कारण; एखादे चोरी अथवा दरोडा पडला तरी ती बातमी होते. मग एखाद्या गावात गेल्या ५० वर्षात एखादी छोटीशी सुध्दा चोरी झाली नाही ह्या बातमीचे मूल्य किती असेल? कुठे बाहेर जायचे असले तरी ह्या गावातील लोक घराला कडी कुलपेही लावत नाहीत ह्या वाक्याने या बातमीचे मूल्य किती वाढेल? कडी कुलपांचे जाऊ दे, त्या गावातील एकाही घराला दाराच्या चौकटी असल्या तरी त्या चौकटींना दारेच नसतात तरीही तिथे चोरी होत नाही. ह्या बातमीचे मूल्य काय असेल ? आणि शेवटचे, या गावाचे रक्षण शनिमहाराज स्वतः करतात त्यामुळे तेथे चोरी होत नाही ही अंधश्रध्दा असून आम्ही त्याला आव्हान देत आहोत (म्हणजे त्या गावात जाऊन चोरी करून दाखवणार आहोत.) असे अनिस ने जाहीर केल्यामुळे या गावाची प्रसिध्दी किती वाढली असेल याचा ज्याने त्याने आपल्या कुवती प्रमाणे विचार करावा. असो. गुलशन कुमारांनी निव्वळ धंदा म्हणून ती फिल्म काढली, का त्यांनाच काही अनुभव आला म्हणून त्या अनुभवापोटी त्यांनी ती फिल्म काढली याबाबत मलाही माहिती नाही. शिवाय तुमच्या मुद्याचा प्रतिवाद करण्याच्या हेतूने ती माहिती मिळवून इथे टंकण्यात मला रसही नाही. ज्योतिष शास्त्र हे अध्यात्मिक उन्नती करण्यासाठीचे एक हत्यार (टूल) असून त्याचा उपयोग हल्ली फलज्योतिषासाठी केला जातो. व त्यामुळे मूळ ज्योतिष शास्त्र बदनाम होत आहे हा खरा माझा प्रतिपादनाचा हेतू असल्याने जास्त चर्चाक न करता इथेच थांबतो.
  • Log in or register to post comments

सुंदर प्रतिसाद भागवत साहेब...

विजय पुरोहित
Tue, 04/19/2016 - 21:00 नवीन
सुंदर प्रतिसाद भागवत साहेब...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

ज्योतिष शास्त्र हे अध्यात्मिक

सतिश गावडे
Tue, 04/19/2016 - 21:05 नवीन
ज्योतिष शास्त्र हे अध्यात्मिक उन्नती करण्यासाठीचे एक हत्यार (टूल) असून त्याचा उपयोग हल्ली फलज्योतिषासाठी केला जातो. व त्यामुळे मूळ ज्योतिष शास्त्र बदनाम होत आहे हा खरा माझा प्रतिपादनाचा हेतू असल्याने जास्त चर्चाक न करता इथेच थांबतो.
यावर जरुर लिहा. आज ज्योतिष हे "फलज्योतिष" म्हणून माहीती आहे. कित्येक हवशे नवशे आणि गवसे ज्योतिषी लोकांच्या विपत्तीचा गैरफायदा घेऊन आपले खिसे भरत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

खिसे तर प्रत्येकजणच भरत आहे.

विजय पुरोहित
Tue, 04/19/2016 - 21:16 नवीन
खिसे तर प्रत्येकजणच भरत आहे. मग ते राजकारणी, कंत्राटदार, प्रशासक, उच्चाधिकारी, डाॅक्टर, मेडिकल स्टोअर्स, एम.आर., खाजगी कंपन्या, जाहीरात करणारे, टीव्ही चॅनल, नगरसेवक हे सर्व यात येत नाहीत का? हे सर्व लोक पण कुठली तरी भीति दाखवूनच स्वतःचे खिसे भरतात ना? नाही मी काय म्हणतो? असल्या भोंदू ज्योतिषी व महाराजांची पोलखोल व्हावीच पण सोबत वरच्या वर्गांसोबत पण तशीच चर्चा व्हावी ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

होय. करायलाच हवी. मात्र आता

सतिश गावडे
Tue, 04/19/2016 - 22:58 नवीन
होय. करायलाच हवी. मात्र आता विषय ज्योतिष्याचा चालू आहे तर सुरुवातीला ज्योतिष्यांबद्दल चर्चा करूया. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

अरे भांडू नका रे मुलांनो! काय

वैभव जाधव
Tue, 04/19/2016 - 23:56 नवीन
अरे भांडू नका रे मुलांनो! काय ते असं करताय?
  • Log in or register to post comments

कोण भांडतंय त्याची साडेसाती

तर्राट जोकर
Wed, 04/20/2016 - 00:04 नवीन
कोण भांडतंय त्याची साडेसाती चालु असेल. असो. शंभर प्रतिसादानिमित्त जेपीसंचालित, अध्यक्षित अखिलमिपासत्कारसमितीतर्फे आपले घोड्याची लोखंडी नाल, जहाजाचा जुना खिळा, लोहाराची ऐरण ह्यांच्या संयुक्तवितळमाने बनवलेली शनीची अंगठी देण्यात येत आहे. (वर्गणीचे तेवढे दोनशीक्कावन जमा करुन टाका, तेवढंच पुन्न...)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव जाधव

अरे कसले धागे काढतात रे हे

रमेश भिडे
Wed, 04/20/2016 - 04:58 नवीन
अरे कसले धागे काढतात रे हे लोक! श्या....
  • Log in or register to post comments

प्रश्न घेऊन इच्छुक

कंजूस
Wed, 04/20/2016 - 07:39 नवीन
प्रश्न घेऊन इच्छुक ज्योतिषाकडे गेला की त्या प्रश्नाच्या प्रकाराने ठराविक ग्रहाकडेच बघितलं जातं.गुरू हा चांगला ग्रह असा गैरसमज पसरलेला असतो आणि बय्राचदा तुम्हाला शनि/मंगळाची पीडा आहे हे ऐकवलं जातं तसं सर्वात वाइट्ट ग्रह गुरूबद्दल कोणी बोलत नाही. मंगळ- तडकाफडकी वाट लावतो पण अडीच वर्षाच्या आत ठीक होतं. शनि - हळहळू वाट लावतो आणि हळूहळू पुर्ववत करतो. गुरू: कायमची वाट लावतो सुटका नाही.एवढा मोठा ग्रह वजनदार ग्रह बसला की सर्व चेंगरूनच जातं.
  • Log in or register to post comments

गुरु आणि वाईट? हे कसं काय?

विजय पुरोहित
Wed, 04/20/2016 - 08:01 नवीन
गुरु आणि वाईट? हे कसं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

वाईटच

चौकटराजा
Wed, 04/20/2016 - 08:23 नवीन
गुरू वाईटच . अलिकडे शाळांच्या फ्या किती झाल्यात पहा ! सगळे ज्ञान नेटवर ८०० रूपयाच्या पॅक मधे मिळते. परत बस चा खर्च नाही. ह्या ह्या !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजय पुरोहित

याला

नाखु
Wed, 04/20/2016 - 08:50 नवीन
सहमत आहे गुरुजी वाईटच ! इतक्या विनंत्यानंतरही पिंपरीकट्ट्याला येईनात ते... अति अवांतर :टक्या गुरुशीच गुरगुर हे पुस्तकाचे कुठवर आलय लिखाण.. अभ्याला मुखपृष्ठ बनवायला सांगायचं आहे छपाई बद्दल बोलणी करायची आहेत मूळ अवांतर : गावडे मास्तरांचा दीर्घ प्रतिसाद आवडला. ज्योतीषाचा तिटकारा द्वेष करण्यापेक्षा अभ्यास करून नीर-क्षीर करणे जास्त रास्त. त.जों.च्या सत्कार यादीत काळी बाहुली राहिली आहे ती सत्कार प्त्र दाखवून घेऊन जाणे. सेवा तत्पर नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

मुलांविशयी काहीही प्रश्न आला-

कंजूस
Wed, 04/20/2016 - 13:33 नवीन
मुलांविशयी काहीही प्रश्न आला- न होणे,मंदबुद्धी,वैरी,अपंग,वेडसर इत्यादी की गुरूच पाहावा लागतो.अतिहुशार लोक वृद्धापकाळी भ्रमिष्ट, अपमान वगैरे गुरू.शनिची पीडा जाते तशी याची जात नाही.भोग.त्यामुळे भोग नसलेला मनुष्य म्हणजे सुखी मनुष्य.
  • Log in or register to post comments

पुढील ६८ दिवसपर्यंत जगाला

मदनबाण
Wed, 04/20/2016 - 20:16 नवीन
पुढील ६८ दिवसपर्यंत जगाला सावधानतेचा इशारा, २० एप्रिल ते २६ जूनपर्यंत मोठ्या विनाशाची शक्यता आता काय करायच ?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- कुकुरुकुकुरुकुकुरुकु किक... ;) :- Kick 2
  • Log in or register to post comments

कसं करायचं ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 04/20/2016 - 21:18 नवीन
काही उपाय सांगा गुरुदेव. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

काय ठरलं मग ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 04/20/2016 - 21:17 नवीन
काही निर्णय झाला की खरडा करुन कळवा प्लीज. :) अशा धाग्यांनी बर्‍याचद पब्लिक गोंधळुन जाते. ग्रहांचा परिणाम होतो की नै म्हैती. पण चर्चेचा परिणाम हळव्या जिवांवर होऊ शकतो आणि असे काठावर असलेले बंधु पटापट शनिला हात जोडायल लागतात. =)) ग्रहाचं टेन्शन नका घेऊ मित्रहो . चांगलं खात पित जा. आयुष्य इंजॉय करा. बाकी चालु द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

नमस्कार बिरुटेसर,

संदीप डांगे
Wed, 04/20/2016 - 22:12 नवीन
नमस्कार बिरुटेसर, रोचक चर्चा आणि माहितीपुर्ण प्रतिसाद. शाम भागवत यांनी पुरेसे स्पष्टीकरण दिलेच आहे. तुमच्या काळजी निमित्त थोडा माझा अनुभव इथे द्यावासा वाटला. शाम भागवतांनी सांगितल्याप्रमाणेच ज्योतिष हे आध्यात्मिक उन्नतीचे साहाय्यक आहे. ह्यात कोणतीही ऐहिक, भौतिक सुख, समाधानाची अपेक्षा करु नये असा दंडक मी तरी मानतो. माझा गेल्या बर्‍याच वर्षांचा अंकशास्त्राचा अभ्यास आहे. आजकाल नाशिकमधे माझ्याकडे काही जिज्ञासू यायला लागले आहेत. पण माझे एक तत्त्व आहे जे मी शंभर टक्के पाळतो आणि त्यामुळे मला काही विशिष्ट गोष्टी कळल्यात. मी माझ्याकडे येणार्‍या कुठल्याच जातकाला कोणतेही उपाय सांगत नाही. रत्न, यंत्र, शांती इत्यादी खर्चिक उपाय तर सोडाच, अगदी मंत्र म्हणा, जप करा इतकेही नाही. जे आहे जसे आहे ते तसे त्यांच्यासमोर मांडतो. त्यांचे मागचे आयुष्य कसे गेले, पुढे कसे जाणार, काय आव्हाने असतील, काय चांगल्या गोष्टी होऊ शकतात, काय काळजी घ्यावी असे सर्व सांगतो. कठिण काळासाठी तयार राहायला सांगतो. थोडक्यात समुपदेशनाचेच काम. पण होतं काय की हे इच्छुक त्यासाठी येतच नसतात. त्यांना ताबडतोब रामबाण उपाय हवा असतो. गंडा, दोरा, खडा, यंत्र, यज्ञ काहीतरी नाही काय ज्याने आमची सुटका होईल, काम नीट होउ शकेल असे उपाय मागतात. आयुष्याकडे उघड्या डोळ्याने पाहायची तयारीच नसते. जे आहे ते कबुल करण्याची मानसिकता नसते. मी बघतो ते ९० टक्के समस्या ह्या मनोकायिक असतात. मनोबल वापरले, वाढवले तर ह्यातल्या किमान ६०-७० टक्के तरी समस्या निपटून जातात. पण सगळेच लोक मनाचे धैर्यवान नसतात. शस्त्रे असुन गळपाटतात. त्यांना कोणी दुसर्‍याने त्यांचे काम करावे असे वाटत असते. खडा, दोरा, मंत्र, यंत्र हे सगळे दुसर्‍याच्या खांद्यावर आपली जबाबदारी टाकण्याचे प्रकार आहेत. ह्यातुनच ज्योतिषी, भोंदु ऑफकोर्स, अशांना याची दशा, त्याची साडेसाती, अमका भारी तमका वक्री करुन भंडावून सोडतात. मी कधीही फसवणार्‍यांना दोष देत नाही. दोष नेहमी फसले जाणार्‍यांचाच. अहो, तुम्हीच संधी देताय ना, मग जो हुशार असेल तो कशाला सोडेल? तर मी स्पष्ट सांगतो, बाबांनो. कितीही उड्या मारा, प्रारब्धाच्या बाहेर काही नाही. कोणत्याही दैवी समजल्या जाणार्‍या उपायांचा उपयोग होत नाही. जे झालं असं वाटतं ते योगायोग फक्त. एक नातेवाईक आहेत, स्वत:चे स्टोनक्रशर, ट्रक्सने बिल्डिंग मटेरियल सप्लाय च्या धंद्यात बराच पैसा कमावला. टोलेजंग इमारत बांधली, दोन-तीन ट्र्क्स होते. नंतर अचानक उतरती कळा लागली. बराच पैसा अडकला. कोणीतरी सांगितले नारायण नागबळी करा. केला. ज्यादिवशी त्र्यंबक सोडले त्याच दिवशी एक मोठी अमाऊंट घेउन जा म्हणुन क्लायंटचा फोन आला. साहेब खुश. पण दोन वर्षांनी त्यांना बघितले तर चाळीवजा दोन कौलारु खोल्यांच्या भाड्याच्या घरात राहत होते. सगळी संपत्ती समाप्त. हे भविष्य कोणताही सामान्य ज्योतिषी सांगु शकणार नाही. असे अनेक किस्से आहेत. ग्रहांचा परिणाम होत नाही. ते फक्त सुचक आहेत. पण ते काय सुचना करत आहेत हे गिफ्टेड -मार्क माय वर्ड्स- 'गिफ्टेड' ज्योतिषालाच कळते. असे गिफ्टेड ज्योतिषी मिळणे ज्याच्या नशिबात आहे त्यालाच मिळतात. त्या विशिष्ट क्षणी त्याला पुढचा मार्ग दर्शवतात. गंडा घालणारे फक्त गंडा घालतात. अशांपासून खरंच दूर राहणे. माझ्या अभ्यासात असेही लक्षात आले आहे की काही विशिष्ट अंक असणारे लोक अजिबात ज्योतिषात विश्वास ठेवत नाहीत काहीही झाले तरी. त्यांची कुंडलीच तशी असते. अशांनी लाथ मारिन तिथे पाणी काढीन हा अ‍ॅटिट्युड जरुर ठेवावा, पण तितके भाग्यशाली नसलेल्या आपल्या इतर बांधवांची त्यांच्या वागणुकीबद्दल खिल्ली उडवू नये ही विनंती. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला अंकशास्त्र पद्धतीने माझे

सतिश गावडे
Wed, 04/20/2016 - 22:40 नवीन
मला अंकशास्त्र पद्धतीने माझे भविष्य/प्राक्तन/ज्योतिष पाहायचे आहे. तुमचा जातक व्हायला काय करावे लागेल? त्याचा मोबदला किती द्यावा लागेल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

जातक आणि ज्योतिषी यांची

नाखु
गुरुवार, 04/21/2016 - 09:45 नवीन
हरकत नसेल तर प्रकट मुलाखत मी घेईन अर्थात साथीला चिंचवडचे चिक्त्सक काकाश्री असतील्च. वाचक नाखु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

भारीच प्रतिसाद डांगे अण्णा...

विजय पुरोहित
गुरुवार, 04/21/2016 - 11:13 नवीन
भारीच प्रतिसाद डांगे अण्णा... अशांनी लाथ मारिन तिथे पाणी काढीन हा अ‍ॅटिट्युड जरुर ठेवावा, पण तितके भाग्यशाली नसलेल्या आपल्या इतर बांधवांची त्यांच्या वागणुकीबद्दल खिल्ली उडवू नये ही विनंती. +111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

excellent reply

vikramaditya
गुरुवार, 04/21/2016 - 12:14 नवीन
+1111111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

जे बात

चौकटराजा
गुरुवार, 04/21/2016 - 19:35 नवीन
तर मी स्पष्ट सांगतो, बाबांनो. कितीही उड्या मारा, प्रारब्धाच्या बाहेर काही नाही. कोणत्याही दैवी समजल्या जाणार्‍या उपायांचा उपयोग होत नाही. जे झालं असं वाटतं ते योगायोग फक्त. हे १००१ एक टक्के आहे त्यामुळे मी भयानक दु:खे वाट्याला येऊन आनंदी राहिलो काही अवचित चांगले घडले त्यालाही योगायोग॑ मानतो. एक माणसाची मजबुरी हे दुसर्‍याची संधी एक माणसाचे दुरदैव हे दुसर्‍याचे सुदैव हे सार आहे आपल्या जीवनाचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

An important message

होकाका
गुरुवार, 04/21/2016 - 19:51 नवीन
या धाग्याचा टिआरपी चांगला असल्यामुळे हा सगळ्यांनी बघावा असा एक मेसेज इथे टाकत आहे. (हा मला व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला आहे, त्यामुळे काही लोकांनी तो आधीच पाहिलेला असू शकतो.) याचा विषयाशी संबंध नाही याबद्द्ल चूभूमाअ.

"We need help from India to free us. Why is India silent?" — Baloch woman

What Nazis did to Jews, Pakistan is doing to our people, says a Baloch woman with tears in her eyes. Demanding help from India to free her country from Pakistan's actrocious occupation, she urges India not to remain a silent spectator when her neighbors, the Balochs, are suffering.
  • Log in or register to post comments

गुरुत्वाकर्षण आणि फलज्योतिष

गामा पैलवान
गुरुवार, 04/21/2016 - 21:40 नवीन
राजेश घासकडवी, तुम्ही गुरुत्वाकर्षणाच्या नियमांत फलज्योतिष बसवू पाहताहात. मात्र हा नियम (ज्याला न्यूटनचा नियम म्हणतात तो) कितपत परिपूर्ण आहे? या नियमानुसार शनीच्या कड्यांचं स्पष्टीकरण करता येत नाही. मग त्याच्या कसोटीवर फलज्योतिष घासून बघावे का? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

अरेरे, अशी चूक झाली का माझी?

राजेश घासकडवी
Fri, 04/22/2016 - 09:19 नवीन
अरेरे, अशी चूक झाली का माझी? न्यूटनचे फडतूस, सिद्ध न झालेले नियम वापरून मी ज्योतिषासारख्या महान शास्त्रावर शंका घेण्याचा प्रयत्न केला तर... कुठे फेडू मी हे पाप?!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

हाहाहा

शाम भागवत
Fri, 04/22/2016 - 10:45 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

कुठे फेडू मी हे पाप?!

सतिश गावडे
Fri, 04/22/2016 - 11:06 नवीन
कुठे फेडू मी हे पाप?!
सुधारीत सत्यनारायण घाला. पाच नास्तिकांना जेवायला बोलवा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

तीर्थ+प्रसाद असेल तर आम्हाला

तर्राट जोकर
Fri, 04/22/2016 - 11:11 नवीन
तीर्थ+प्रसाद असेल तर आम्हाला पहिले बोलवा. नाहीतर कोप होईल बगा. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

आमची द्रव्याने भरलेली नौका

सतिश गावडे
Fri, 04/22/2016 - 11:28 नवीन
आमची द्रव्याने भरलेली नौका श्रीवर्धन बंदरात आम्ही घट्ट बांधून ठेवली आहे. त्यामुळे टेन्शन इल्ले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

नौकेचे नाव कळवा, द्रव्याने

तर्राट जोकर
Fri, 04/22/2016 - 11:50 नवीन
नौकेचे नाव कळवा, द्रव्याने भरलेली आहे म्हणता ना? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

द्रव्य म्हणजे मुलद्रव्य हो. ;

सतिश गावडे
Fri, 04/22/2016 - 12:28 नवीन
द्रव्य म्हणजे मुलद्रव्य हो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

न्यटनचे नियम घासून ज्योतिषाचे

कंजूस
Fri, 04/22/2016 - 11:11 नवीन
न्यटनचे नियम घासून ज्योतिषाचे पीठ होणार नाही.
  • Log in or register to post comments

लोक न्युटनच्या नियमांचा उगाच

सतिश गावडे
Fri, 04/22/2016 - 11:26 नवीन
लोक न्युटनच्या नियमांचा उगाच बाऊ करतात. न्युटनने सफरचंद झाडावरून खाली पडताना पाहण्याआधी सफरचंदं काय वर जात होती काय आत्मा जसा देह सोडून वर जातो तसे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

आत्मा वर जातो? कोण बोललं?

वैभव जाधव
Fri, 04/22/2016 - 11:33 नवीन
आत्मा वर जातो? कोण बोललं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

चित्रगुप्ताकडे हिशोब द्यायला

सतिश गावडे
Fri, 04/22/2016 - 11:34 नवीन
चित्रगुप्ताकडे हिशोब द्यायला आत्म्याला वरच जावे लागनार ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैभव जाधव

गुरुत्वाकर्षणाचा शोध

सुनील
Fri, 04/22/2016 - 11:35 नवीन
कोकणात सफरचंदे होत नाहीत म्हणून. नैतर गुरुत्वाकर्षणाचा शोध एखाद्या कोंकण्यानेच लावला असता!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

बरोबर. नारळ डोक्यात पडून

तर्राट जोकर
Fri, 04/22/2016 - 11:45 नवीन
बरोबर. नारळ डोक्यात पडून 'आत्मेच वर जातात' हा शोध कोकणातच लागला असावा. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

नारळ माडावरून पडताना कधीही

सतिश गावडे
Fri, 04/22/2016 - 12:27 नवीन
नारळ माडावरून पडताना कधीही माणसाच्या डोक्यात पडत नाही असा एक समज आहे. खरे खोटे कोणास ठाऊक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

..

mugdhagode
Sat, 04/23/2016 - 19:34 नवीन
सजातीय धृव प्रतिकर्षण करतात. त्यामुळे वरुन पडणारा नारळ डोक्याजवळ आला की प्रतिकर्षित होउनन्नारळ दूर जाउन डोके शाबूत रहाते. हॅरी पॉटरच्या जुडव्या छड्याप्रमाणे नारळ व डोस्के जुडवा असल्याने एकमेकाना मारु शकत नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

धागा शनिची कक्षा सोडून

वैभव जाधव
Fri, 04/22/2016 - 11:50 नवीन
धागा शनिची कक्षा सोडून धूमकेतू सदृश भरकटला आहे असं धागा करत्याचं म्हणजे माझंच मत झालेलं आहे. पृथ्वीवर पक्षी माणसावर त्याच्या पक्षी धुमकेतूच्या गुरुत्वाकर्षणाचा काही परिणाम होतो का?
  • Log in or register to post comments

अरे बापरे

शाम भागवत
Fri, 04/22/2016 - 11:58 नवीन
नवग्रहांच्या मदतीला धूमकेतूला कशाला आणले हो वैभव साहेब. आता नक्की काय होणार बरे? :-)
  • Log in or register to post comments

धूमकेतूंचा पृथ्वीवरच्या काही

तर्राट जोकर
Fri, 04/22/2016 - 12:08 नवीन
धूमकेतूंचा पृथ्वीवरच्या काही माणसांवर भयंकर मानसिक परिणाम होतो. ते दिवसंरात्र दुर्बीणी आणि नोटपॅड घेऊन त्याच्याकडे टक लावून बघत नोंदी घेतात आणि एकमेकांत शेअर करत बसतात. अशा वर्तणुकीचा नक्की काय उपयोग होतो हे अजून समजलेले नाही. विज्ञानश्रद्ध समाजात मात्र अशा पिसाट लोकांना फार मान आहे. ऐकावे ते नवलच!
  • Log in or register to post comments

रात्रीच्या वेळी निरभ्र

सतिश गावडे
Fri, 04/22/2016 - 12:25 नवीन
रात्रीच्या वेळी निरभ्र आकाशाकडे पाहणे हा खुप मोठा विरंगुळा. अशा वेळी उच्च क्षमतेची दुर्बिण मिळाली तर तो दुग्ध शर्करा योग. हे करत असताना ज्यांनी आपली निरिक्षणं नोटपॅडवर लिहून काढली त्यांनीच जगाला सांगितले की पृथ्वी सपाट नसून गोल आहे. ती स्थिर नसून सूर्याभोवती फिरते. ती विश्वाचा केंद्रबिंदू नसून विश्वाच्या अफाट पसार्‍यातील एक पिटुकला गोल आहे. ग्रहणं ही राहू केतूंची करामत नसून तो अवकाशातील गोलांचे भ्रमणमार्ग एकमेकांना छेदत असताना सुर्यप्रकाश अडल्याने झालेली करामत आहे. अशांना पिसाट का बरे म्हणावे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

विज्ञानश्रध्द

शाम भागवत
Fri, 04/22/2016 - 12:16 नवीन
व्वा काय शब्द आहे. तुमची परवानगी असेल तर पुढे मागे कधितरी वापरीन म्हणतो.
  • Log in or register to post comments

गावडेसर, उपरोध आहे हो. कसं ना

तर्राट जोकर
Fri, 04/22/2016 - 12:31 नवीन
गावडेसर, उपरोध आहे हो. कसं ना कळे तुम्हास्नी? ;) भागवतसाहेब, आमचे सर्व शब्द प्रताधिकारमुक्त आहेत. कभीभी वापरो. =))
  • Log in or register to post comments

शाम भागवत

विटेकर
Fri, 04/22/2016 - 17:46 नवीन
सर , नमस्कार , तुमचे या धाग्यावरील (आणि इतरत्र ही)प्रतिसाद अतिशय सुरेख आहेत , लिहिते व्हावे
  • Log in or register to post comments

न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम ...

गामा पैलवान
Fri, 04/22/2016 - 18:27 नवीन
राजेश घासकडवी, >> न्यूटनचे फडतूस, सिद्ध न झालेले नियम वापरून मी ज्योतिषासारख्या महान शास्त्रावर शंका घेण्याचा प्रयत्न केला तर... बरोबर बोललात. तुमची चूक झाली आहे. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम सर्वत्र लागू पडंत नाही. साधी गोष्ट आहे. जर समुद्राला भाती येते, तर तळ्याला का येत नाही? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

मला वाटते

चौकटराजा
Fri, 04/22/2016 - 19:05 नवीन
तळ्यालाही भरती येत असेल. त्याच्या नगण्यते मुळे ती " प्रकाशात" आली नाही इतकेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

मोदी मोदी मोदी*

टवाळ कार्टा
Sat, 04/23/2016 - 00:41 नवीन
मोदी मोदी मोदी* *घ्या आणखी ट्यार्पी ;)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा