शब्द प्रेम!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जे न देखे रवी...
13 Apr 2016 - 5:44 pm

लेखकाच्या जीवनातले शब्दांचे महत्त्व:

शब्द हेच शस्त्र, शब्द हेच अमूचे अस्त्र
शब्द हेच युद्ध, शब्द हीच शांती
शब्द हीच नीती, शब्द हीच अमुची मिती
शब्द हेच कर्म, शब्द हेच फळ
शब्द हेच दैवत, शब्द हेच अमुचे वैभव
शब्द हीच दृष्टी, शब्द हीच सृष्टी
शब्द हेच जग अमुचे, शब्द हेच जीवन अमुचे
शब्द हेच अमुचे प्रेम - पहिले आणि शेवटचे!

कविता

प्रतिक्रिया

होबासराव's picture

13 Apr 2016 - 5:50 pm | होबासराव

पकवणे हेच शस्त्र, पकवणे हेच अमूचे अस्त्र
जास्त पकवल्याने होउ शकत युद्ध, पकवल्याने मिळते शांती
पकवणे हीच नीती, पकवणे हीच अमुची मिती
पकवणे हेच आमचे कर्म, पकवणे हेच फळ
पकवणे हेच दैवत, पकवणे हेच अमुचे वैभव
पकवणे हीच दृष्टी, पकवणे हीच सृष्टी
पकवायला समुच्च जग अमुचे, लोकांना पकवणे हेच जीवन अमुचे
लोकांना पकवणे हेच अमुचे प्रेम - पहिले आणि शेवटचे!

विजय पुरोहित's picture

13 Apr 2016 - 5:52 pm | विजय पुरोहित

णिसो सर आणि होबासराव म्हणजे जय आणि वीरुची जोडी शोलेमधली!

होबासराव's picture

13 Apr 2016 - 6:37 pm | होबासराव

जय आणि विरुची जोडि असे संबोधुन आपण मज पामराला प्रकांडपंडितस्वयंमप्रकाशितसाहित्यसुर्याच्या रांगेत बसवुन आपण जो बहुमान दिलात त्याबद्दल आपला ऋणि राहिल.
पण नाय हो आमचि ति लायकि नाय...आम्हि फक्त पकलेले म्हणजेच पिकलेले फळ दगड मारुन पाडणारे...ते पकवण्याचे मह्त्कार्य करायला प्रकांडपंडितस्वयंमप्रकाशितसाहित्यसुर्य समर्थ आहेतच.

जव्हेरगंज's picture

13 Apr 2016 - 10:14 pm | जव्हेरगंज

खरंच पकलो राव आज

अत्रुप्त आत्मा's picture

14 Apr 2016 - 12:59 am | अत्रुप्त आत्मा

@लेखकाच्या जीवनातले शब्दांचे महत्त्व: >> अच्छा! लेखक !
तुम्हाला हा भ्रम सुमारे किती वर्षांपूर्वी झाला!?