Skip to main content

शतशब्दकथा : दहशत!!

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 13/04/2016 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यरात्रीची वेळ .मित्राबरोबर दुकानाच्या पायरीवर गप्पा मारत बसलेलो. दुरूनच एक पांढरी स्कॉर्पिओ येताना दिसली."जरा जास्तच वेडीवाकडी चाललीये " मित्राला बोललो तोवर खाड ..माझ्या गाडीचा बंपर उखडून स्कॉर्पिओ पुढे गेलीसुद्धा.ताडकन उठून मित्राच्या बाईकला किक मारली आणि एकदोन चौक टाकून स्कॉर्पिओ गाठलीच. बाईक आडवी लावली आणि ड्रायव्हरला एकदोन शिव्या हासडल्या.तेव्हढ्यात मागची काच खाली झाली आतमध्ये एक दाढीवाला ,सफेद कपडे ,हातात,गळ्यात जाड चेन घालून ,तो पण फुल टाईट. "कोण रे? काय पायजे? " जरा फाटलीच . तरीपण उसने अवसान आणून गाडी ठोकल्याबद्दल नुकसान भरपाई मागितली."पैशे पायजे तुला?" त्याने मांडीवरचा टॉवेल बाजूला केला. ------------ टॉवेल खाली एक बोट रिवॉल्वरच्या ट्रिगरवर ठेवलेले.विषयच संपला.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3244
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

In reply to by होबासराव

हा धागा वाचला होता पुर्वी. पण ही कथा माझ्या ऑफिसमधल्या मित्राबाबत घडली आहे.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शंभर शब्दात बसवायची असल्याने शेवट जमतोय की नाही असे वाटत होते. बरीच काटछाट करुन बसला एकदाचा!!

मित्राला काय वाटलं देव जाणे. त्याने बाजूला पडलेला एक दगड उचलला आणि या बाबाच्या डोक्यावर मारला. भळ्कन रक्ताची धार लागली. तिरीमिरीत दरवाजा उघडून तो बाहेर आला. मित्र तयारीतच होता. काही कळायच्या आत त्याने बाबाची गन त्याच्याच पोटावर रोखून ट्रिगर दाबला. बाबा गाडीतच कोसळला. त्याच्या हातून गन खेचून घेत मित्राने दरवाजा उघडून पळू पाहणाऱ्या ड्रायव्हरला डोक्यात गोळी घातली. बाबाचा टाॅवेल गनवर दाबलेला असल्यामुळे आवाज आला नव्हता आणि तसंही इथल्या भेदरट वस्तीत फटाक्यांच्या आवाजाने पण लोक घाबरतात. गोळ्यांचा आवाज ऐकून त्यातले कितीजण कपडे खराब करतील या विचाराने मला तिथेही हसू आलं. " चला हो किरवंत. अंतिम संस्कार करु या यांचा." मित्राच्या आवाजाने मी भानावर आलो. बाबा आणि ड्रायव्हर दोघांना जागच्या जागी बसवत आम्ही गाडीवर बसलो. बाबाच्या गळ्यातली सोन्याची चेन काढून घेतली होतीच. मी गरुडपुराणातला मला आठवत असलेला श्लोक म्हटला. क्षणभर वडलांच्या आठवणीने कसंसंच झालं. मग मित्राने फ्युएल टँकवर गोळी मारली आणि आम्ही सुसाट सुटलो. निघताना ती गन आगीत फेकली होतीच. " ड्रायव्हरला का मारलंस? " मी विचारलं, " टिप तर त्यानेच दिलेली ना?" " म्हणून तर मारलं. विश्वासघाताला मृत्यू हीच शिक्षा!बरं, कुठे विकायची ही चेन?" " मध्य प्रदेशात. गेल्या वेळी कर्नाटकात विकली होती ना!" "

In reply to by बोका-ए-आझम

extension आवडलं.. वास्तव जीवनात घाबरुनच जगावं लागतं निदान कल्पनेत तरी full to धडाडी दाखवायला काय हरकत आहे ना :)

In reply to by मराठी कथालेखक

आणि अशा लोकांच्या प्रतिक्रिया एकदम वेगळ्या असतात. Corner केलेलं मांजर जसं समोरच्यावर झेप घेतं तसा. शेवटी हिंसा ही प्रत्येकात असते.

In reply to by बोका-ए-आझम

जोडकाम जमलंय एकदम. तुम्ही म्हणता ते खरं आहे. कोपर्‍यात सापडलेली मांजर पंजा उगारतेच.

In reply to by बोका-ए-आझम

मूळ कथेला दिलेला जोड आवडला पण यापुढे कथा विनोदी बनवायची असेल तर जळती गाडी कोकणातल्या पुलावर गेली पाहिजे. इकडून तिकडून कोणीतरी बाईकस्वारही आला पाहिजे. ;)

मुळ कथा व बोकोपंतांचे जोडकाम दोन्ही आवडले. शेवटी बोकोपंतांचा खुलासा पण अतिशय आवडला.