अर्निंग इट राइट
लेखनविषय (Tags)
मूल्य, शिस्त, विवेक वगैरे गोष्टींना महत्व न देणारी लोकं, महत्व देणा-या लोकांपेक्षा नेहमीच अधिक असतात. पण तरीही काही मूलभूत गोष्टी ज्या वाईट असतात हे सर्वमान्य आहे, त्या गोष्टीही लोकं अगदी समजून-उमजून करताना दिसतात तेंव्हा उद्विग्न व्हायला होतं. आणि तेवढंच करू शकतो आपण, याची जेंव्हा जाणीव होते तेंव्हा अजून जास्त उद्विग्न व्हायला होतं.
उदाहरणार्थ चोरी. चोरी म्हणजे एखादी वस्तू उचलून खिशातच टाकायला हवी असं नव्हे. चोर कृतीपेक्षा विचाराने आधी चोर होतो. कार्यालयीन जीवनात अशा चो-या अनेकदा बघायला मिळतात. कार्यालयीन चोर्यांची उदाहरणं म्हणजे, न केलेल्या मेडिकलच्या खर्चाची बिलं दाखवून त्या पैशाचा परतावा घेणे, बसने जाऊन टॅक्सीच्या बिलाचे पैसे घेणे, सेकंड क्लास ने प्रवास करून फर्स्ट क्लासचे पैसे घेणे, कंपनी मोबाईल बिलं भरते म्हणून त्या नंबरवरून बिनधास्त एसटीडी, आयएसडी कॉल करणे, इंटरनेट बेछूट वापरणे, इत्यादी.
'कंपनी देतेय!', 'पण मी एलिजिबल आहे' अशी स्पष्टीकरणं याबद्दल विचारणा केल्यास ऐकायला मिळतात. एलिजिबल आहे म्हणून टॅक्सीभाडं १०० रुपये घेऊन १० रुपयाच्या बसच्या तिकिटावर प्रवास केला म्हणजे ९० रुपयांची चोरीच आहे. पण हे करणा-या माणसाला तो त्याचा हक्क वाटतो. इंग्लिशमधे एक शब्द आहे Integrity; तिचा अभाव या लोकांमधे असतो. चोरी पकडेपर्यंत जरी चोर चोर नसला, तरी त्याच्या मनाला ठाऊक असतं की तो चोर आहे. या लोकांनाही ते ठाऊक असतं, पण जगाला ते कसं बरोबर आहे हे पटवून द्यायचा त्यांचा अट्टाहास बघितला की कीव करावीशी वाटते. बरं, हे असं करणारी मंडळी बहुतेक वेळा बक्कळ पगार घेणारी मंडळी असतात, कमी पगारावर काम करणारे बहुतांशी या बाबतीत सज्जन असतात असं दिसतं. शेवटी जास्त मिळायला लागलं कीच हाव निर्माण होते, कमीच असतं तिथे फक्त गरज असते.
मला लाकूडतोड्याची गोष्ट आठवते अशी उदाहरणं बघितली की. तो सुद्धा सोन्याच्या, चांदीच्या कुर्हाडीसाठी एलिजिबल ठरलाच होता की!, पण त्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याला तो त्याचा 'हक्क' वाटला नाही. शेवटी वृत्ती असते एकेकाची, आणि ती अशा प्रसंगातून दिसते. असं चोरासारखं वागणार्या व्यक्तीने त्याच्या प्रमोशनची पार्टी अगदी 'हक्काने', दिलदारपणाचा आव आणून दिली तरी त्याचं कौतुक वाटत नाही. पण त्या व्यक्तीच्या १०% पगार असलेल्याने मुलगा पास झाल्याचे वाटलेले पेढेही कौतुकासाठी अधिक 'एलिजिबल' ठरतात.
'Everybody has a Right to Earn; but very few Earn it Right.'
ब्लॉग दुवा
मिपाकरांच्या मतांच्या प्रतीक्षेत.
प्रतिक्रिया
कमी पगारावर काम करणारे
खरं आहे,
आणि मग अजिबात काहीच हक्क
धागाकर्त्याने
पण पण, LTA\मेडीकलची फेक बिलं
नाही नाही
होय
वेतनाचाच करमुक्त भाग
+१
माझ्या अॉफीसमधेपण तेच होतय.
शेवटचं वाक्य अगदी बरोब्बर आहे
डोकेखाऊ काम
माझ्या employment लेटर मध्ये
काय म्हणता?
आमच्या कंपनीत तुम्हाला ठराविक
अशी मॅनडेटरी लीव्ह असणार्या
बहुतांश बँकिंग कंपनीत ब्लॉक
एवढा शुद्ध हेतू?
हायला, आपली कुंपणी एकच तर
कंपणीमधे णोकरी असेल तर णक्की
उरलेले दिवस राबायची तयारी पण
वरील मुद्दयांना जर चोरी म्हणत
स्पाशी सहमत.
श्रीमंताला किती टॅक्स भरला
अगदी अगदी. तो ट्याक्स भरुन
प्रामाणिकपणे देय टॅक्स सर्व
तुमच्याशी पूर्ण सहमत.
कायदा करणारे लोक म्हणजे
सी.एस.आर चे खूळ
@साहना -कायदा करणारे लोक
हा धागा हाफिसात बसून लिहिला
You Said It ... :)
या ऑब्जर्वेशनला मनःपूर्वक दाद देतो!
एक साधा प्रश्न हे अस खोटे
एक साधा प्रश्न हे अस खोटे क्लेम टाकणे आणि ऑफिस ने ऑफिसच्या कामासाठी दिलेल आंतरजाल वैयक्तिक बाबींसाठी वापरण एकाच तराजुत तोलु शकतो का ?हो. काय हरकत आहे?सहमत !
श्रलोल
हे लिहायला फार सोपं आहे.
बारा बारा
अन्याय
इथे मिपावर काम करणाऱ्यांना
अतिभौतीकवाद
एक उदाहरण घेऊ..टोल च्या
तुम्ही एका रोचक मुद्द्याला
पण नैतिक आणि अनैतिक कोण
म्हणूनच पुढे लिहीलं की..
लोकसभा राज्यसभा ह्या ठिकाणी
इतक्या मोठ्या देशाचा कारभार
छान दुवा दिलात. जरा वाचून
बरोबर पण सगळ्यांनाच कळत नाही
वा उत्तम जिथे 200 रु किलो तूर
Pagination