✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

द्रौपदी वस्त्र हरण

स
साहना यांनी
Sun, 03/27/2016 - 11:14  ·  लेख
लेख
आपल्या सर्वांना हे माहिती आहेच की युधिष्ठीर दुर्योधनाशी द्यूतात द्रौपदी हरला. दुर्योधनाने मग दुष्यासनाला सांगितले की द्रौपदीला धरून ओढत फरपटत दरबारात घेऊन यावे. तिला तिथे आणल्यावर दुर्योधनाने दुष्यासनाला द्रौपदीला विवस्त्र करायला सांगितले. द्रौपदीने सर्वांकडे मदतीची याचना केली - आपले पती, भीष्म पितामह, राजा धृतराष्ट्र, परंतु कोणीही हा अन्याय, अनर्थ थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. त्या क्षणी त्या ठिकाणी कृष्णाने शपथ घेतली की तो तिथे उपस्थित असलेल्या त्या सर्व लोकांचे प्राण घेईल ज्यांनी द्रौपदीच्या या बेअब्रू होण्याचा देखावा पाहिला आणि तिची मदत केली नाही. कृष्णाने पांडवांचे देखील प्राण घेतला असता , परंतु द्रौपदीचे कुंकू, तिचे सौभाग्य असल्यामुळे ते वाचले. पांडवांच्या व्यतिरिक्त एक आणखी असामी होती जी त्याच्या क्रोधापासून बचावली - ते होते कृपाचार्य. कारण जेव्हा द्रौपदी सगळ्यांकडे मदत मागत होती तेव्हा त्यांनी एक बोट दर्शवून तिला इशारा केला होता की सर्वांकडे मदतीची याचना करण्यापेक्षा त्या एका शक्तीकडे मदत माग. द्रौपदीला त्यांचा इशारा क्षणात समजला आणि तिने स्वतःला कृष्ण्चरणी अर्पण केले. "आम्हाला काळजी नाही त्याची, त्याला आपली काळजी आहे आपल्या प्राणांचा रक्षक सुदर्शन चक्रधारी आहे" केवळ कथा आहे. काथ्याकुट करायची गरज नाही.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
23761 वाचन

💬 प्रतिसाद (128)

प्रतिक्रिया

+१

विटेकर
गुरुवार, 03/31/2016 - 11:20 नवीन
सहमत. अश्यांच्या तोंडाला लागू नये यातच शहाणपणा आहे ! माध्यांनीं थुंकितां सूर्यावरी| तो थुंका पडेल आपणांच वरी | दुसऱ्यास चिंतितां अंतरीं| आपणास घडे ||९-३-२७||
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ट्रेड मार्क

+11111111 विटेकर साहेब.

विजय पुरोहित
Fri, 04/01/2016 - 06:50 नवीन
+11111111 विटेकर साहेब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

जय श्रीकृष्ण

तिमा
गुरुवार, 03/31/2016 - 13:46 नवीन
गुज्जु जेंव्हा जय श्रीकृष्ण म्हणतात तेंव्हा ते जयश्री कृष्ण असे ऐकू येते. तसे त्यांना सांगितले तरी त्यातला फरक कळत नाही.
  • Log in or register to post comments

जेसी करस्न

राही
गुरुवार, 03/31/2016 - 14:42 नवीन
ते असे ऐकू येते : १) जेशी कश्ण २)जेशी करश्ण ३)जेशी क्रश्ण ४)जेसी कश्ण ५) जेसी करश्ण ६)जेसी क्रश्ण काही काही वेळा नुसतेच जेसी म्हणून मान हलवतात. म्हणजे पुढचे म्हटले आहे असे समजायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तिमा

'श'च्या जागी 'स'

राही
गुरुवार, 03/31/2016 - 14:46 नवीन
यात 'श'च्या जागी 'स' टाकले तर आणखी सहा काँबिनेशन्स होतात. शिवाय 'ण'ऐवजी 'न' म्हणणारेही काही असतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राही

लाटकर काका काडी टाकून गेले.

शलभ
गुरुवार, 03/31/2016 - 16:33 नवीन
लाटकर काका काडी टाकून गेले. And what a perfect काडी, ते सोडून बाकीचे वाद घालत बसलेत..;)
  • Log in or register to post comments

रावण = मर्यादापुरुषोत्तम ?

गामा पैलवान
गुरुवार, 03/31/2016 - 18:59 नवीन
तर्राट जोकर, रावण म्हणजे मर्यादापुरुषोत्तम? मग लंकेतल्या यच्चयावत लोकांनी सांगितल्याप्रमाणे सीतेला परत का धाडली नाही रामाकडे? आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

ते तर रावणच सांगू शकेल

तर्राट जोकर
गुरुवार, 03/31/2016 - 19:14 नवीन
ते तर रावणच सांगू शकेल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

म्हणूनच तो मपु नाही.

गामा पैलवान
गुरुवार, 03/31/2016 - 22:14 नवीन
तर्राट जोकर, म्हणजेच रावण मर्यादापुरुषोत्तम नाही. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

तुम्ही वाटेल ते समज करुन घ्या

तर्राट जोकर
गुरुवार, 03/31/2016 - 22:53 नवीन
तुम्ही वाटेल ते समज करुन घ्या. आपला काय विरोध नाहि. रावणालाही नाही. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

मीही हेच म्हणतो.

गामा पैलवान
Fri, 04/01/2016 - 02:07 नवीन
तजो, मीही हेच म्हणतो. आपला पण काहीही विरोध नाही. अगदी रावणालाही नाही. त्याची कर्मं निस्तरायला तो समर्थ आहे. :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

मग लोक का भडकतायत हो?

तर्राट जोकर
Fri, 04/01/2016 - 02:25 नवीन
मग लोक का भडकतायत हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

कारण सांगतो.

गामा पैलवान
Fri, 04/01/2016 - 13:46 नवीन
तर्राट जोकर, रामाला नावं ठेवल्यावर लोकं का भडकतात ते सांगतो. त्याचं काय आहे की रामायणाने भारत जोडलेला आहे. रामावर अनाठायी टीका केली की लोकांना तो भारतमातेचा अपमान वाटतो. म्हणून लोकं भडकतात. हे बरोबर की चुकीचं ते मला माहीत नाही. पण आहे ते असं आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

ओके म्हणजे जगात धार्मिक

तर्राट जोकर
Fri, 04/01/2016 - 22:23 नवीन
ओके म्हणजे जगात धार्मिक कारणावरुन भडकण्याचे कारण समान आहे तर. धन्यवाद ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

असहमत

गामा पैलवान
Sat, 04/02/2016 - 02:38 नवीन
तजो, माफ करा, पण तुमच्या निरीक्षणाशी मी असहमत आहे. हिंदू भडकत नाहीत. अगदी भडकायला हवेत तेव्हाही भडकत नाहीत. म्हणूनच तर सगळा लोच्या झालाय. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

हा हा हा. सेल्फ गोल होतोय हे

तर्राट जोकर
Sat, 04/02/2016 - 03:10 नवीन
हा हा हा. सेल्फ गोल होतोय हे लक्षात आल्यावर पलटी खाल्ली. मला अगदी हेच हवे होते. धन्स ;-) तो प्रश्न सापळा होता, तुम्ही अडकलात. गुडलक नेक्स्ट टाइम! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

जितं मया म्हणा पाहू एकदा

गामा पैलवान
Sat, 04/02/2016 - 12:07 नवीन
तर्राट जोकर, हा सापळा बिपळा नसून माझ्या दिलदारपणाची साक्ष आहे. तुम्हाला जितं मया म्हणायला मिळावं म्हणून मी केलेला त्याग आहे. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

दिलदारपणा????? पाकिस्तान

तर्राट जोकर
Sat, 04/02/2016 - 12:43 नवीन
दिलदारपणा????? पाकिस्तान प्रत्येक वर्ल्डकपमधे भारताला दाखवतो तोच ना? गुड. थ्यांक्स. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

जैसी आपली मर्जी!

गामा पैलवान
Sat, 04/02/2016 - 18:41 नवीन
जैसी आपली मर्जी, तजोसाहेब! आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

आग्गागागागागा

अर्धवटराव
Sat, 04/02/2016 - 04:31 नवीन
ते तर रावणच सांगू शकेल
=)) =)) 'नरम गरम' मधला शॉटगन सिन्हा आणि निळु भौ चा रामलीला सीन आठवला =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

सोपे आहे. रावण मर्यादा

साहना
Fri, 04/01/2016 - 07:04 नवीन
सोपे आहे. रावण मर्यादा पुरुषोत्तम होता आणि राम होता "स्त्रियांची पिळवणूक करणारा". सीता मातेची हि पिळवणूक रावनाच्याने बघवेना म्हणून तर तो डोळ्यांत पाणी आणून पर्णकुटीच्या बाहेर येवून सीता मातेच्या विनवण्या करत होता. रामा प्रमाणे धनुष्य वगैरे उचालानाचे misogynist खेळ त्याने नाही केले उलट सीतामातेला First Class पुष्पक विमानात बसवून बीच फ्रंट घरांत घेवून गेला. विमान हे मर्यादा पुरुषोत्तमा कडे असते misogynist लोक घोडी वगैरे वापरतात. त्याशिवाय रावण हा निसर्ग प्रेमी होता. गोल्बल वर्मीन होवू नये म्हणून तो मूर्ख ऋषी मुनीचे प्रदूषण करणारे यज्ञ वगैरे बंद पाडीत असे. थोडक्यांत काय तर रावण हा त्या काळचा चाचा नेहरू होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

☺☺☺

विजय पुरोहित
Fri, 04/01/2016 - 07:14 नवीन
☺☺☺
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

_/\_

झेन
Fri, 04/01/2016 - 17:05 नवीन
_/\_ अहो गेला बाजार शशी थरूर नाव घ्यायचं, चाचांच नाव ...आता 'तिरकी रेघ', 'उल्टा चश्मा' वाल्या मिपाकरांचं मोहोळ उठवलंत की हो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साहना

थोडक्यांत काय तर रावण हा त्या काळचा चाचा नेहरू होता.

होबासराव
Fri, 04/01/2016 - 13:47 नवीन
ROFL
  • Log in or register to post comments

मी एवढेच म्हणेल एकदा तरी

विवेकपटाईत
Fri, 04/01/2016 - 16:46 नवीन
मी एवढेच म्हणेल एकदा तरी रामायण किंवा महाभारत वाचून पहा. गीता प्रेसची वाचली तरी चालेल. मूर्खपणाच्या शंका तरी दूर होतील. बाकी मिसळपाव वर सारेच चालते. कधी तिखट जास्ती तर कधी कमी.
  • Log in or register to post comments

कृष्णाला देव मानले तर यादव

हेमंत लाटकर
Fri, 04/01/2016 - 21:38 नवीन
कृष्णाला देव मानले तर यादव वंशांचा नाश का झाला. कृष्णाचा अंत सामान्य फासेपारध्याच्या हाताने का झाला.
  • Log in or register to post comments

यादवीवर लिहिलेला हा लेख

मृत्युन्जय
Sat, 04/02/2016 - 13:28 नवीन
यादवीवर लिहिलेला हा लेख कदाचित तुम्हाला आवडेल - http://www.misalpav.com/node/26948
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

हे सर्व माहित आहे.

हेमंत लाटकर
Sun, 04/03/2016 - 07:38 नवीन
हे सर्व माहित आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा