ह्स्नेल

कोंबडी प्रेमी's picture
कोंबडी प्रेमी in काथ्याकूट
1 Mar 2016 - 8:28 am
गाभा: 

झोप उडवणारी बातमी

काय चाललंय आपल्या कडे ?? एखादी व्यक्ती अशी कशी वागू शकते ?

एक मात्र खटकते "हस्नेल हा मुंगी सुद्धा मारू शकत नव्हता" असे त्याचे मित्र म्हणतात आणि पुढच्याच वाक्यात त्याला बकऱ्यांची कुर्बानी देण्याचा शौक होता असे म्हटले आहे .... ह्यात काही विसंगती आहे अशी शंका सुद्धा येत नाही का ह्या पत्रकाराला ?

गेले ते तर गेले ...त्या बिचाऱ्या वाचलेल्या बहिणीचे मात्र आयुष्य कठीण आहे ...

प्रतिक्रिया

पैसा's picture

1 Mar 2016 - 9:28 am | पैसा

बातमीचे शीर्षक वाचून पुढचे काही वाचायचा धीर झाला नाही.

राजाभाउ's picture

1 Mar 2016 - 10:24 am | राजाभाउ

ह्यात काही विसंगती आहे अशी शंका सुद्धा येत नाही का ह्या पत्रकाराला ?

मात्र, हस्नेलला बकऱ्यांची कुर्बानी देण्याचा शौक होता त्यामुळेच त्याने सराईतपणे कुटुंबीयांचे गळे चिरल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे हस्नेलच्या मनोवृत्तीतले विरोधाभासही अधोरेखीत होत आहेत. हे लिहल आहे ना तिथे मुळ बातमीत.

बाकी हे भयानक आहे ह्यात शंकाच नाही.

मृत्युन्जय's picture

1 Mar 2016 - 10:52 am | मृत्युन्जय

नेपाळच्या राजघराण्यातील ग्यानेंद्र ने संपुर्ण राजघराण्याची हत्या केली होती असे म्हणतात ते आठवले.