मुळ्याचे मुठीया

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
12 Feb 2016 - 7:25 pm

सानिकाच्या दुधीच्या मुठीयाच्या कृतीप्रमाणे केलेली पाकृ.
साहित्य: दोन वाट्या मुळ्याचा पाला बारीक चिरून
दीड वाटी कणिक
एक वाटी रवा
एक वाटी बेसन
एक टीस्पून धने पूड
एक टीस्पून जीरे पूड
एक टेस्पून आलेलसूण पेस्ट
अर्धा टीस्पून मिरची पेस्ट ( तिखट्पणानुसार कमी जास्त)
एक टीस्पून आमचूर
पाव टी स्पून खायचा सोडा
मीठ चवीनुसार
अर्धा टीस्पून मोहरी, एक टीस्पून पांढरे तीळ, चिमुट्भर हिंग अर्धी वाटी तेल
बारीक चेरलेली कोथिंबीर, ओले खोबरे (ऐच्छीक)
कृती: एक चमचाभर तेल कढईत घेऊन मुळ्याचा बारीक चिरलेला पाला परतून घ्यावा. एक वाफ आली की गार करण्यास ठेवावा. मुळ्याचा पाला, गव्हाचे पीठ, रवा, बेसन, आले लसूण मिरची पेस्ट, धने-जीरे पूड, मीठ, आमचूर पावडर, सोडा हे सर्व जिन्नस एकत्र करावे. गरज लागल्यास थोडे पाणी घालून पीठ भिजवावे. हाताला तेल घेऊन मुठिया करून घ्या. चाळणीत केळीचे पान ठेवून किंवा चाळणीला तेलाचा हात लावून त्यात तयार मुठिया ठेवा. पाणी घातलेल्या पातेल्यात चाळण ठेवून १५ मिनीटे वाफवा.
muthiya
गार झाल्यावर गोल चकत्या करून घ्याव्या. मोहरी, तीळ, हिंगाची अर्धी वाटी तेलाची फोडणी करून त्यात मुठिया परतून घ्याव्या. ओले खोबरे, कोथिंबीर घालून सर्व्ह कराव्या.
muthiya

प्रतिक्रिया

विजय पुरोहित's picture

12 Feb 2016 - 8:00 pm | विजय पुरोहित

छानच झालेत...
कुरकुरीत तळून पण मस्त होतील...
थोडा चिंचगूळ टाकला तर जास्त भारी लागतात...

विशाखा राऊत's picture

12 Feb 2016 - 10:17 pm | विशाखा राऊत

वाह मस्तच. तुझ्या हातात जादु आहे . काय मस्त मस्त बनवत असतेस ताई

रेवती's picture

13 Feb 2016 - 12:01 am | रेवती

पाकृ व फोटो आवडले.

अन्नू's picture

13 Feb 2016 - 12:26 am | अन्नू

मिपावर पुन्हा छान-छान पाकृ यायला लागल्या वाटतं. :)

करुन पाहिलेच पाहिजेत.

तुम्ही खूप टॅलंटेड आहात या बाबतीत. रेसिपीजचं पुस्तक यावं. सिरियसली विचार करा.

अनन्न्या's picture

13 Feb 2016 - 3:52 pm | अनन्न्या

विचार चालू आहे, सध्या ब्लॉग्वर एकत्र करतेय.

पियुशा's picture

13 Feb 2016 - 11:19 am | पियुशा

वा मस्त दिसतायेत !

पूर्वाविवेक's picture

13 Feb 2016 - 11:25 am | पूर्वाविवेक

मस्त दिसतायेत, लागतीलही छानच !
यंदा तुमच्याकडे मुळ्याचे भरघोस पीक आलेलं दिसतंय. ;)

अनन्न्या's picture

13 Feb 2016 - 3:56 pm | अनन्न्या

बागेत लावलाय मुळा , सेंद्रीय शेती आहे तर चांगल्या भाज्या मुलांच्या पोटात जाव्यात हाच उद्देश! अशा भाज्या मुले फार खात नाहीत्, पण चटपटीत प्रकार आवडीने खातात.

_मनश्री_'s picture

13 Feb 2016 - 11:34 am | _मनश्री_

वा खूप छान आहे पाककृती
उद्याच करून पाहीन

अदि's picture

13 Feb 2016 - 11:44 am | अदि

छान झालेत...

पिलीयन रायडर's picture

13 Feb 2016 - 12:39 pm | पिलीयन रायडर

Mast g!!!

वेल्लाभट's picture

13 Feb 2016 - 1:06 pm | वेल्लाभट

खलास ! ! ! !
करून बघणे आलेच आता.

अनन्न्या's picture

13 Feb 2016 - 3:58 pm | अनन्न्या

करून पहा, मुळा न खाणारेही आवडीने खातील

नूतन सावंत's picture

14 Feb 2016 - 10:46 pm | नूतन सावंत

सहीच

जुइ's picture

15 Feb 2016 - 12:28 am | जुइ

इथे मुळ्याचा पाला मिळत नाही. लाल मुळ्याचा वापरला जावू शकतो का?

अनन्न्या's picture

15 Feb 2016 - 12:35 pm | अनन्न्या

रेवती सांगू शकेल त्याचा पाला जेवणात वापरतात का ते.

पैसा's picture

15 Feb 2016 - 1:44 pm | पैसा

कसे लागेल कल्पना करत आहे. पाकृ तर मस्तच शोधून काढलीस!

अनन्न्या's picture

15 Feb 2016 - 1:57 pm | अनन्न्या

मुलांनी पटापट संपवली!

स्वामी संकेतानंद's picture

15 Feb 2016 - 2:23 pm | स्वामी संकेतानंद

आमच्याकडे मुठिया डुबुकवडीला म्हणतात आणि ते कांद्याच्या पातीचे बनवतात.

मुळा आणि मुठीया एकत्र वाचून एका स्वयंभू शहराबद्दल काहीतरी लिहीलंय असं वाटलं.

स्वामी संकेतानंद's picture

15 Feb 2016 - 2:39 pm | स्वामी संकेतानंद

=)) =))

मदनबाण's picture

18 Feb 2016 - 7:02 am | मदनबाण

=)) =)) =))
मुठीया हा प्रकार खाल्ला आहे,पण मुळ्याचे पहिल्यांदाच वाचतो आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram

मम्बाजी सर्वज्ञ's picture

15 Feb 2016 - 10:23 pm | मम्बाजी सर्वज्ञ

'..... जळी स्थळी काष्ठी पाषाणी संताजी धनाजी दिसू लागले' च्या धर्तीवर 'जळी स्थळी काष्ठी पाषाणी स्वयंभू शहर दिसू लागले' असे म्हणावे कि काय?

मला माहित नाही!

स्वाती दिनेश's picture

16 Feb 2016 - 1:34 am | स्वाती दिनेश

मस्त दिसत आहेत मुठिया,
स्वाती

मस्त पाकृ आहे.पाला असल्याने नक्की करुन पाहीन.

अनिता ठाकूर's picture

20 Nov 2019 - 9:28 am | अनिता ठाकूर

आज मुळ्याची जुडी आणली आहे. त्यासाठी एखादी पाकृ शोधताना ही पाकृ वाचनात आली. अनन्या, तुम्ही तुमच्या ब्लॉगचा उल्लेख केला आहे. त्याची लिंक मिळू शकेल का ?

जॉनविक्क's picture

20 Nov 2019 - 11:38 am | जॉनविक्क

छान आहे. आवडले.