Skip to main content

मुळ्याचे मुठीया

लेखक अनन्न्या यांनी शुक्रवार, 12/02/2016 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
सानिकाच्या दुधीच्या मुठीयाच्या कृतीप्रमाणे केलेली पाकृ. साहित्य: दोन वाट्या मुळ्याचा पाला बारीक चिरून दीड वाटी कणिक एक वाटी रवा एक वाटी बेसन एक टीस्पून धने पूड एक टीस्पून जीरे पूड एक टेस्पून आलेलसूण पेस्ट अर्धा टीस्पून मिरची पेस्ट ( तिखट्पणानुसार कमी जास्त) एक टीस्पून आमचूर पाव टी स्पून खायचा सोडा मीठ चवीनुसार अर्धा टीस्पून मोहरी, एक टीस्पून पांढरे तीळ, चिमुट्भर हिंग अर्धी वाटी तेल बारीक चेरलेली कोथिंबीर, ओले खोबरे (ऐच्छीक) कृती: एक चमचाभर तेल कढईत घेऊन मुळ्याचा बारीक चिरलेला पाला परतून घ्यावा. एक वाफ आली की गार करण्यास ठेवावा. मुळ्याचा पाला, गव्हाचे पीठ, रवा, बेसन, आले लसूण मिरची पेस्ट, धने-जीरे पूड, मीठ, आमचूर पावडर, सोडा हे सर्व जिन्नस एकत्र करावे. गरज लागल्यास थोडे पाणी घालून पीठ भिजवावे. हाताला तेल घेऊन मुठिया करून घ्या. चाळणीत केळीचे पान ठेवून किंवा चाळणीला तेलाचा हात लावून त्यात तयार मुठिया ठेवा. पाणी घातलेल्या पातेल्यात चाळण ठेवून १५ मिनीटे वाफवा. muthiya गार झाल्यावर गोल चकत्या करून घ्याव्या. मोहरी, तीळ, हिंगाची अर्धी वाटी तेलाची फोडणी करून त्यात मुठिया परतून घ्याव्या. ओले खोबरे, कोथिंबीर घालून सर्व्ह कराव्या. muthiya

वाचने 15914
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

छानच झालेत... कुरकुरीत तळून पण मस्त होतील... थोडा चिंचगूळ टाकला तर जास्त भारी लागतात...

मिपावर पुन्हा छान-छान पाकृ यायला लागल्या वाटतं. :)

करुन पाहिलेच पाहिजेत. तुम्ही खूप टॅलंटेड आहात या बाबतीत. रेसिपीजचं पुस्तक यावं. सिरियसली विचार करा.

In reply to by पूर्वाविवेक

बागेत लावलाय मुळा , सेंद्रीय शेती आहे तर चांगल्या भाज्या मुलांच्या पोटात जाव्यात हाच उद्देश! अशा भाज्या मुले फार खात नाहीत्, पण चटपटीत प्रकार आवडीने खातात.

Mast g!!!

खलास ! ! ! ! करून बघणे आलेच आता.

कसे लागेल कल्पना करत आहे. पाकृ तर मस्तच शोधून काढलीस!

In reply to by स्वामी संकेतानंद

=)) =)) =)) मुठीया हा प्रकार खाल्ला आहे,पण मुळ्याचे पहिल्यांदाच वाचतो आहे.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram

In reply to by सूड

'..... जळी स्थळी काष्ठी पाषाणी संताजी धनाजी दिसू लागले' च्या धर्तीवर 'जळी स्थळी काष्ठी पाषाणी स्वयंभू शहर दिसू लागले' असे म्हणावे कि काय?

मस्त दिसत आहेत मुठिया, स्वाती

आज मुळ्याची जुडी आणली आहे. त्यासाठी एखादी पाकृ शोधताना ही पाकृ वाचनात आली. अनन्या, तुम्ही तुमच्या ब्लॉगचा उल्लेख केला आहे. त्याची लिंक मिळू शकेल का ?

छान आहे. आवडले.