सानिकाच्या दुधीच्या मुठीयाच्या कृतीप्रमाणे केलेली पाकृ.
साहित्य: दोन वाट्या मुळ्याचा पाला बारीक चिरून
दीड वाटी कणिक
एक वाटी रवा
एक वाटी बेसन
एक टीस्पून धने पूड
एक टीस्पून जीरे पूड
एक टेस्पून आलेलसूण पेस्ट
अर्धा टीस्पून मिरची पेस्ट ( तिखट्पणानुसार कमी जास्त)
एक टीस्पून आमचूर
पाव टी स्पून खायचा सोडा
मीठ चवीनुसार
अर्धा टीस्पून मोहरी, एक टीस्पून पांढरे तीळ, चिमुट्भर हिंग अर्धी वाटी तेल
बारीक चेरलेली कोथिंबीर, ओले खोबरे (ऐच्छीक)
कृती: एक चमचाभर तेल कढईत घेऊन मुळ्याचा बारीक चिरलेला पाला परतून घ्यावा. एक वाफ आली की गार करण्यास ठेवावा. मुळ्याचा पाला, गव्हाचे पीठ, रवा, बेसन, आले लसूण मिरची पेस्ट, धने-जीरे पूड, मीठ, आमचूर पावडर, सोडा हे सर्व जिन्नस एकत्र करावे. गरज लागल्यास थोडे पाणी घालून पीठ भिजवावे. हाताला तेल घेऊन मुठिया करून घ्या. चाळणीत केळीचे पान ठेवून किंवा चाळणीला तेलाचा हात लावून त्यात तयार मुठिया ठेवा. पाणी घातलेल्या पातेल्यात चाळण ठेवून १५ मिनीटे वाफवा.
गार झाल्यावर गोल चकत्या करून घ्याव्या. मोहरी, तीळ, हिंगाची अर्धी वाटी तेलाची फोडणी करून त्यात मुठिया परतून घ्याव्या. ओले खोबरे, कोथिंबीर घालून सर्व्ह कराव्या.

वाचने
15914
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
छानच झालेत...
वाह मस्तच. तुझ्या हातात जादु
पाकृ व फोटो आवडले.
अरे वा-
करुन पाहिलेच पाहिजेत.
धन्यवाद गवि
In reply to करुन पाहिलेच पाहिजेत. by गवि
वा मस्त दिसतायेत !
मस्त दिसतायेत, लागतीलही छानच
हे हे हे.. खरय
In reply to मस्त दिसतायेत, लागतीलही छानच by पूर्वाविवेक
वा खूप छान आहे पाककृती
मस्त!!
Mast g!!!
खलास ! ! ! !
धन्यवाद सर्वांचे!
सहीच
पाकृ आणि फोटो आवडले!
मला माहित नाही गं
झक्कास!
मस्त चटकमटक लागतात
आमच्याकडे मुठिया डुबुकवडीला
मुळा आणि मुठीया एकत्र वाचून
=)) =))
In reply to मुळा आणि मुठीया एकत्र वाचून by सूड
=)) =)) =))
In reply to =)) =)) by स्वामी संकेतानंद
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आय लव्ह यू... :- Maha-Sangram'..... जळी स्थळी काष्ठी
In reply to मुळा आणि मुठीया एकत्र वाचून by सूड
रत्नागिरी सोडून अन्य सर्वोत्तम शहर
In reply to मुळा आणि मुठीया एकत्र वाचून by सूड
छान..
मस्त पाकृ आहे.पाला असल्याने
आज मुळ्याची जुडी आणली आहे.
खिक्क!