✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

लग्न न टिकण्याची कारणे व त्यावरील उपाय

ह
हेमंत लाटकर यांनी
Mon, 01/11/2016 - 12:41  ·  लेख
लेख
21 व्या शतकात मुलां-मुलींचे लग्न जमणेच अवघड नाहीतर टिकणेही अवघड झाले आहे. त्याची काही कारणे.... बदलती मानसिकता: : दोघांचे विचार पटत असतील तरच एकत्र राहा. स्वभाव वेगळे आहेत, एकमेकांचे पटत नाही असे वाटले तर वेगळे व्हा, अशी संकल्पना रुजत आहे. सामाजिक बदल : आज मुली उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. आता मी सक्षम आहे तर मी का सहन करायचे, असे मुलींचे म्हणणे असते. बदलती जीवनशैली : सोशल मिडियाच्या अतिरेक वापरामुळे नातेसंबंधात दरी निर्माण होत आहे. तरुण पिढीच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत. प्रत्येकालाच स्वातंत्र्य पाहिजे, त्यामुळे स्वतःमध्ये बदल करण्याची अजिबात तयारी दाखवली जात नाही. संवाद कमी : टीव्ही, मोबाईल-व्हाॅट्सऍप, हाइक याच्या सतत वापरामुळे पती-पत्नींचे एकमेकांबरोबरचे संवादच कमी झाले आहेत. पती-पत्नीच्या मोबाईल वरील केवळ व्यावहारिक संवादामुळे संवाद नाही तर वादच वाढत जातात. पालकांचा हस्तक्षेप ः मुलीला सासरी सर्व गोष्टी तिला हव्या तशाच मिळाव्यात म्हणून मुलीच्या घरात तिच्या आई-वडिलांचा हस्तक्षेप होतो आणि लग्न झाल्यावर आपला मुलगा आपल्यापासून दूर होऊ नये म्हणून त्याच्या संसारात मुलाचे आई-वडील सतत लक्ष घालतात. अहंकार ः पती आणि पत्नी दोघेही उच्चशिक्षित, आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे कोणी कोणाचे ऐकायचे, समोरच्याने बदलावे, मी बदलणार नाही अश्या अहंकारामुळे नातेसंबंधामध्ये तणाव निर्माण होतो. इतर कारणे ः एकमेकांबाबत गैरसमज/संशय, व्यसन, दुसऱ्यास त्रासदायक असणाऱ्या सवयी, शारीरिक व मानसिक आजार आदी कारणांमुळे कौटुंबिक समस्या निर्माण होतात. उपाययोजना: कुटुंब टिकण्यासाठी : "मेड फॉर इच अदर' या केवळ कल्पनेतल्या गोष्टी असतात, ते अवघड व अशक्य असते; परंतु "मोल्ड फॉर इच अदर' करायचे ठरवले तरच कुटुंब टिकू शकतात. मनमोकळा संवाद : पती-पत्नी यांनी एकमेकांना दाद देणे, कौतुक करणे ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्या योग्य शब्दांत मनमोकळे बोलणे गरजेचे आहे. स्पर्धा टाळावी ः पती-पत्नी दोघांनी एकमेकांशी स्पर्धा टाळावी. "तू माझ्या आई-वडिलांशी, नातेवाईकांशी नीट बोलला नाहीस आता मीही तुझ्या आई-वडिलांशी, नातेवाइकांशी चांगली वागणार नाही. स्वीकार महत्त्वाचा ः अपेक्षेप्रमाणे जोडीदार मिळाला नाही तरीही किरकोळ मतभेद व दोषांसहीत आपल्याला त्याला स्वीकारता येईल का, हा विचार प्राधान्याने करावा. बदल करण्याची तयारी ः मीच का बदलायचे हा अहंकार न ठेवता नातेसंबंध सुधारण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी दाखवावी. जबाबदारीची जाणीव ः लग्न झाल्यानंतर येणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव आणि ती निभावण्याची तयारी ठेवून आपल्या भूमिका व दृष्टिकोनांमध्ये बदल करावेत. तडजोडीची तयारी ः कोणत्याही जोडप्यामध्ये वाद होतातच पण ते किती ताणायचे हे आपल्या हातात असते. वाद न वाढवता तडजोडीची भूमिका स्वीकारली तर हे वाद टोकाला जात नाहीत. थोडक्यात, आपल्याला हवे तसे सगळेच कधी मिळत नाही; पण जे मिळाले आहे, ते मनापासून आणि आनंदाने स्वीकारले तर कौटुंबिक नाती टिकवणे शक्य होते.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
106107 वाचन

💬 प्रतिसाद (217)

प्रतिक्रिया

ख्या ख्या ख्या.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 11/23/2016 - 18:34 नवीन
ख्या ख्या ख्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

नको तिथे विनोद

Hulk the devil
Wed, 11/23/2016 - 18:34 नवीन
संसार तस म्हणलं तर तुमच्या सारखे माहिती तंत्रद्य्नतील (मी पण त्यातलाच ) लोकांसाठी दोनच जणांचा पण आई नी केलेलया सौसंकर नुसार दोन कुटुंबाचा असतो. सवय सोडा नको तिथे विनोद करण्याची....!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

अगदी सहमत. ह्या टक्याला ना

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 11/23/2016 - 18:37 नवीन
अगदी सहमत. ह्या टक्याला ना नको तिथे विनोदनिर्मिती करायची सवय आहे. "टवाळा आवडे विनोद".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Hulk the devil

सौसंकर

प्रसाद गोडबोले
Wed, 11/23/2016 - 21:27 नवीन
सौसंकर हे सौसंकर म्हणजे नक्की काय हो =))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Hulk the devil

व्याकरण आणि शुद्ध लेखन चे गुरु

Hulk the devil
Wed, 11/23/2016 - 22:32 नवीन
आहो व्याकरण आणि शुद्ध लेखन चे गुरु मिपा वर कायदा बनवा कि चुकीचे शब्द चालणार नाही. इथे शिवाजी महाराज , महात्मा फुले , लो. टिळक, सावरकर याचं बदल विचारलं तर तुमची तंतरेल चाले रोमन इम्पायर मध्ये बसून चुका काढायला मी मराठी टायपिंग नाही शिकलो मान्य आहे खूप मोठा अपराध केला आहे मी आणि त्यापेक्षा मोठा अपराध केला कि इथे प्रतिसाद दिला. तुम्ही सर्व विद्वान असताना असा तुच्छपणा केला. माफ करा दंड करता का आता? मक्तेदारी आहे ना तुमच्याकडे जो विषय आहे त्यावर बोला ना.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

सौसंकर म्हणजे अंतरजातीय विवाह

प्रसाद गोडबोले
गुरुवार, 11/24/2016 - 00:03 नवीन
सौसंकर म्हणजे अंतरजातीय विवाह केल्यावर सौ सोबत केला जाणारा संकर असे म्हणायचे होते का तुंह्ला ? :))))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Hulk the devil

इथे शिवाजी महाराज , महात्मा

टवाळ कार्टा
गुरुवार, 11/24/2016 - 09:49 नवीन
इथे शिवाजी महाराज , महात्मा फुले , लो. टिळक, सावरकर याचं बदल विचारलं तर तुमची तंतरेल चाले रोमन इम्पायर मध्ये बसून चुका काढायला
तुम्ही या विषयातले तज्ञ आहात का? गेलाबाजार पीएचडी वगैरे....नई म्हणजे रोमन एम्परर त्याच्या फावल्या वेळात व्याकरणाच्या चुका काढायचा हि आम्हाला माहीत नसलेली उपयुक्त माहिती इथे फुकट देत आहात म्हणजे तुमचा अभ्यास जोरदार असणार =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Hulk the devil

"टवाळ कार्टा " जाम घाबरलो मी तुम्हाला

Hulk the devil
गुरुवार, 11/24/2016 - 18:17 नवीन
पीएचडी नकीच नाही माझ्या कडे आणि तुमच्या सारखा महान आणि विद्वान पण नाही मी. चुकून मराठी भाषा आणि आपले लोक म्हणून मिपा वर आलो, माहित नव्हतं कि इथे शब्द महत्वाचे आहेत भावना नाही. अभ्यास म्हणाला तर थोडा आहे नाही म्हंटलं तरी मराठी असल्याची खाज जात नाही डोक्यातून म्हणून. सौसंकर >> हे चुकून झाले पण अद्दल घडली आयुष्यभराची कि मत मांडू नये तुमच्या "मार्कस ऑरेलियस" आणि "टवाळ कार्टा " जिथे असतील तिथे, आणि हो जे पहिले मांडलं होते ते माझ्या आयुष्यावरून होते. चला हा इथला शेवटचा प्रतिसाद नंतर परत चूक नाही करणार. "मार्कस ऑरेलियस" आणि "टवाळ कार्टा " तुमच्या सारखे लोक समाजात आहे म्हणजे खूप प्रगती होणार मराठी भाषा शिकनार्यांची आणि ज्यांना आवड आहे त्यांची. http://marathi.changathi.com/ >> मराठी टायपिंग ज्यांना येत नाही त्यांनी हे वापरावे "टवाळ कार्टा " जाम घाबरलो मी तुम्हाला IT वाले ना तुम्ही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

=))

टवाळ कार्टा
गुरुवार, 11/24/2016 - 20:58 नवीन
=)) श्या, इतक्या लवकर कोणी डाव सोसून जाते का? ते अण्णा बघा ट्रक किती पळवत होते =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Hulk the devil

तुम्ही जरा जास्तच सेन्टी होताय

सामान्य वाचक
Fri, 11/25/2016 - 09:45 नवीन
असे वाटत नाही का? असे राहणार असाल तर मिपा च नाही, एकूणच आंतरजाल तुमच्या साठी नाही मिपा वाचले तर तुम्हाला कळेल कि चांगल्या लेखकाना कायम च प्रोत्साहन मिळते छोट्या गोष्टींचा बाऊ केले तर काही खरे नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Hulk the devil

हा आयडी भारी आहे.

बोका-ए-आझम
Wed, 11/23/2016 - 18:13 नवीन
एक शंका: पण हल्क तर चांगला असतो ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Hulk the devil

Hulk

Hulk the devil
Wed, 11/23/2016 - 18:40 नवीन
Hulk चांगला असो कि वाईट तो विनाशच करतो.....!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बोका-ए-आझम

HULK ...SMASH ..IT.

jp_pankaj
Wed, 11/23/2016 - 18:50 नवीन
HULK ...SMASH ..IT.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Hulk the devil

200

jp_pankaj
Wed, 11/23/2016 - 16:23 नवीन
लट्टुकाकांना "कारणे दाखवा" नोटुस देण्यात येत आहे.
  • Log in or register to post comments

मिपावर 'लग्न' ह्या विषयाशी

अभिजीत अवलिया
Wed, 11/23/2016 - 16:39 नवीन
मिपावर 'लग्न' ह्या विषयाशी संबंधित धाग्यांसाठी एक अजून सेक्शन लवकरात लवकर करावा अशी आग्रहाची मागणी.
  • Log in or register to post comments

परत परत वाचला धागा 2दा

सामान्य वाचक
गुरुवार, 11/24/2016 - 11:05 नवीन
मधेच झोप लागली होती आत्ताच जाग आली कशी काय चालली आहे चर्चा?
  • Log in or register to post comments

अजून निर्णय झालाच नाही !!!!!

मितान
गुरुवार, 11/24/2016 - 11:13 नवीन
अजून निर्णय झालाच नाही !!!!! :))
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा