सामान्यत: मी प्रतिसादांवर प्रत्युत्तरे देण्याचे टाळतो. त्याचा उपयोग किती ह्याबद्दल शंकाच असते. एक दोनवेळा मित्रांना व्य,नि.पाठवला होता.आज मात्र त्याची गरज दिसते.
प्रथम सांगावयाची गोष्ट म्हणजे मी व प्रा.वालावलकर किमान गेली आठएक वर्षे आठवड्यातून सहावेळा संध्याकाळी भेटतो. समवयस्क, निनिराळ्या क्षेत्रातील सहा-सात ज्येष्ट नागरिकांची ही एक मैफलच असते. निरनिराळ्या क्षेत्रातील, निरनिराळ्या आवडीनिवडी, अनुभव यांची देवाणघेवाण यांमुळे हा आता दिवसाचा वाट पहावी असा घटक झाला आहे. एकमेकांची मते प्रत्येकाला माहीत असतात व त्यात बदल होणार नाही हे ही माहीत असते.त्यामुळे मंगळवारी देवीला व गुरूवारी दत्ताला जाणारा श्रद्धाळू माणुस व प्रा. वालाववलकर यांच्या मैत्रीत अंतराव येत नाही. मी तर कधीच देवपूजा न करणारा, सत्यनारायणाचा प्रसाद मस्त शिरा म्हणून परत मागून खाणारा, . उपनिषदे व दर्शने यांच्या अभ्यासामुळे निरिश्वरवादी विचाराचा माणुस. मी व प्रा. दोघेही (आणि कंपूत दोघेच) कोंकणातले. (हा किती घट्ट धागा असतो हे फक्त कोकणवासीच जाणतात.) आम्हा दोघांना "शब्दां"ची आवड; त्यांना शब्दकोड्यांमुळे व मला कवितारतीमुळे.
मला उपक्रमवर लिहावयास त्यांनी प्रवृत्त केले, त्याकरिता माझ्या घरी येऊन बराह कसा वापरावयाचे हे शिकवले. उपक्रम बंद झाल्यावर मी त्यांना मिपावर लेख पाठवण्याचा आग्रह केला. त्यांच्या लेखाचा वाचकवर्ग किती मोठा झाला हे संध्याकाळी मीच सांगत होतो.
म्हणजे आमच्यात वाद होत नव्हते कां? तसे नाही. होत होतेच. पण त्याचे कारण दोघेही निरीश्वरवादी असूनही दोघांच्या विचारसरणीतील फरक. ते तर्कनिष्ठ.विचारांपुढे भावनेला दुय्यम मानणारे. मी माऊलींचा निस्सीम उपासक. अद्वैतवादी असून भक्तीचा पुरस्कार का करतात याचा विचार करतांना ज्ञानोत्तर भक्ती वगैरे आपल्या आवाक्याबाहेरच्या गोष्टींवर वेळ घालवण्य़ाऐवजी त्यांना माझ्यासारख्या सामान्य जनांच्या वैचारिक कुवतीची अचूक जाणीव होती म्हणून विठ्ठलभक्तीचा सोपा मार्ग सुचवला असे मानतो.त्यामुळे काय झाले, निरीश्वरवादाचे वैचारिक श्रेष्टत्व मान्य करूनही मला देवावर विश्वास ठेवणार्यांवर "हे अडाणी, यांना सुधारले पाहिजे" असे वाटत नाही. उलट सत्, चित्, आनंद यापैकी आनंद मिळवण्यास ती एक सुलभ वाट वाटते. संध्याकाळच्या गप्पात एखादे नैमत्तिक निमित्त घेऊन आमच्यात वाद झडतात पण घरी जाईपर्यंत ते विसरलेलेही असतात.(प्रा.डॉ.ची निराशा झाली असेल नाही!)
आता मिपावरील लेखाबद्दल. एक देव नाही म्हणणारा, सर्वथ: देवाला नाकारणारा व दुसरा भक्तश्रेष्ठ संत यांच्यात काय समान असणार असा कोणालाही प्रश्न पडावा. पण मला त्यांच्यात एक समान दुवा दिसला.. दोघेही कवी, ओव्या अभंग लिहणारे, अज्ञ जनाबद्दल मनापासून कळवळा असणारे, निरीश्वरवादी आणि परत माझे मित्र. त्यात श्री. यनावालांनी केवळ चार लेखांत मिपावर मोठा वाचकवर्गही गोळा केलेला. तेव्हा हा दुवा एका खेळकर शैलीत सभासद मित्रांसमोर मांडावा असा विचार आला. .कै. जयवंत दळवी, ठणठणपाळ या नावाखाली "ललित" मध्ये लेख लिहित असत. त्याला अनुसरून लेख लिहला. त्यात कोठेही उपरोध नाही, शिंतोडे उडवलेले नाहीत, चिखलफेक नाही, त्यांच्या काव्याबद्दल अनुदार नाही, यनावला हे पूनावाला, बंदुकवाला या सारखे पारशी नाव वाटते याचा उपयोग तर पहिला नव्हेच. मग काही सभासदांना असे कां वाटावे ? अपरिचित शैली हे एक कारण असू शकेल. पण त्यामुळे असे नित्कर्ष काढणे मला अयोग्य वाटते. मागे गुरू संप्रदायावरील लेखातील "खाज" या शब्दाबद्दल असेच आक्षेप घेण्यात आले पण त्याला डॉ.प्रा. बरुटे सरांनीच उत्तर दिले व सभासदांच्या आक्षेपाचे निराकरण केले..आज मी सर्वश्री नादखुळा, नितीनचंद,, एस, तिमा, पेठकर इ.सभासदांना नम्र विनंती करत आहे की त्यांना नक्की काय आक्षेपार्ह वाटले व ते आक्षेपार्ह का हे सांगावे..असल्या मौलिक मार्गदर्शनाचा मला, इतर लेखकांना (व काय सांगावे, एखादे वेळी संपादक मंडळाही) फायदाच होईल.
आता आणखी एक शंका निरसन.नवीन धागा कां ? त्याचे काय आहे, एखाद्या धाग्यावर तीस-एक प्रतिसाद झाले की पुढचे कोणी वाचतच नाहीत. निदान मला तरी तसे वाटते. तर आता या धाग्यावरील मौलिक प्रतिसाद सर्वांना वाचावयास मिळावेत म्हणून नवीन धागा.
(मागे अशाच एका प्रसंगी मी संपादक मंडळाला विचारले असतांना त्यांनी " हरकत नाही " असे सांगितले होते)
शरद
.
वाचने
2991
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी
संक्षिप्त व्यक्तिचित्रण
शालजोडीतला?
In reply to संक्षिप्त व्यक्तिचित्रण by प्रचेतस
नाही.
In reply to शालजोडीतला? by अनुप ढेरे
शरदाच चांदणं !
आता मिपावरील लेखाबद्दल. एक देव नाही म्हणणारा, सर्वथ: देवाला नाकारणारा व दुसरा भक्तश्रेष्ठ संत यांच्यात काय समान असणार असा कोणालाही प्रश्न पडावा. पण मला त्यांच्यात एक समान दुवा दिसला.. दोघेही कवी, ओव्या अभंग लिहणारे, अज्ञ जनाबद्दल मनापासून कळवळा असणारे, निरीश्वरवादीशरदरावांना अज्ञ जीवांविषयी जो कळवळा आहे तो दुर्देवाने काही अभाग्यांच्या लक्षातच येत नाही. तो दाखवुन देण्यासाठी त्यांना जे कष्ट पडतात ते आता बघवत नाहीत. काही अज्ञ जीव म्हणतात की आमचेही इथे मित्र आहेत पण आम्ही सार्वजनिक स्थळी त्यांना अलिंगन देत नाही. कारण असे की जे आमच्या मित्राच्यावर इतर कारणांसाठी प्रेम करत असतात त्यांना ही मग त्यांना अलिंगन द्यावेसे वाटते. अलिंगनामुळे आमच्या मित्रावर प्रेम करण्यास चिथावणी मिळते. आमचा मित्र आणि आम्ही जो काय राडा घालायचा तो सार्वजनिक जागेत घालत नाही. जेव्हा आम्ही तसे करतो तेव्हा आमची एक भुमिका असते.आवडला
गुटगुटीत मित्रास पाठीवर धपाटा
निरीश्वरवादाचे वैचारिक
मला माहिती आहे आक्षेपार्ह काही नाही.
मी आहेच. तुम्ही येणार आहात
In reply to मला माहिती आहे आक्षेपार्ह काही नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वाचतॉय हां मी, वाचतॉय!
In reply to मला माहिती आहे आक्षेपार्ह काही नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कधी येताय प्रा.डॉ.
In reply to मला माहिती आहे आक्षेपार्ह काही नाही. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आक्षेपार्ह
माझी मते...