प्रयास

अविनाश लोंढे.'s picture
अविनाश लोंढे. in जे न देखे रवी...
30 Dec 2015 - 4:27 pm

(काल पोस्ट केलीली कविता ‪#‎वीट‬ , ही प्रियेसीच्या च्या नजरेने होती , आजची ‪#‎प्रयास‬ ,ही कविता प्रियकराच उत्तर …).

तू जानारस होतीस , अन जाशीलही ,
मला राग आलाय , मी सालस असल्याचा

तुला माहितेय, मी प्रयास सोडला नव्हता …… .माफी मागण्यात मी कच्चा आहे
तुला माहितेय , मी हटहास सोडला नव्हता……. कदाचीत देव तरी इथं सच्चा आहे

मला माहितेय … कि तुला माहितेय ,
मी एकदा नाही … चूक दोनदा केलीये
अन दोनदा नाही …चूक तीनदा केलीये
अन तीनदा नाही…. चूक शंभरदा केलीये

म्हणूनच मला , आज अजून एक संधी हवीये …. माझ्या चुकांना सुधारायची
म्हणूनच मला , आज अजून एक संधी हवीये …. तु स्वीकारलेल्या माफीची

इतका उशीर झालाय का माफ करायला ?
इतका उशीर झालाय का चुकांना सावरायला ?
याद सतावते तुझी , ना फ़क्त तुझ्या देहाची
मीच ना तो ज्यान ,वाट लावली तुझ्या स्वप्नांची

सारा दोष दे मला , पण माझी पुन्हा होते का ?
माहितेय तुला , टाळी एका हाताने वाजते का ?

पुन्हा पुन्हा येयील मी , ह्र्याद्याला तथ्य सांगीन मी ,
पुन्हा पुन्हा जाशील तू , ह्र्याद्याला सत्य सांग तू ….

इतका उशीर झालाय का माफ करायला ?
इतका उशीर झालाय का चुकांना सावरायला ?
याद सतावते तुझी , ना फ़क्त तुझ्या देहाची
मीच ना तो ज्यान ,वाट लावली तुझ्या स्वप्नांची

कविता माझीकविता