गौरीचे गाणे

पालीचा खंडोबा १ जे न देखे रवी...
गौरी माझी सोनुली झोपली आनंदाने तिच्यासाठी गातो चिउकाउचे गाणे || गौरीस आवडे साखर मउ साय लावुनी मी झोपवितो तिज अंगाई गाऊनी || गौरी आमची छान लांब तिचे कान तिज निजवताना भरूनी आले मन || गौरीच्या गं स्वप्नी गुळाचे उंच पहाड रात जाहली मोकळी स्वप्नांचे उघडे कवाड || माझ्या गौरीच्या स्वप्नी प-यांचा गं गाव दूधसागरी पोहते तिची चॉकलेटाची नाव || फूल पाकळयाचें सडे तिच्या नजरे वाहती आकाशी उडती गालीचे तिज चांदण्या न्याहाळती || माझ्या बहिणीचे रूप घेऊनी गं गौरी आली दोघींची एकच प्रतिमा माझ्या नजरी राहिली || विजयकुमार................. 04 / 01 / 2009 माझ्या भाचीसाठी लिहिलेले बालगीत आहे हे.
वर्गीकरण
लेखनविषय:

8 टिप्पण्या 2,621 दृश्ये

Comments

माहितगार नवीन

मुख्य म्हणजे अंगाई गित असूनही स्त्रीयांसाठी लिहिलेले नाही. तिच्यासाठी गातो चिउकाउचे गाणे || मी झोपवितो तिज अंगाई गाऊनी || पुरुषांनाही अंगाई गित गाण्याचा अधिकार मिळवून देण्याबाबत कवि महोदयांचे अभिनंदन

चांदणे संदीप नवीन

मस्त! (मला स्मायल्या टाकाया जमल पायजेल राव! :( ) Sandy

शार्दुल_हातोळकर नवीन

असेच विविध विषयांवर लिहित राहा.... तुमच्या काव्यामध्ये खुप उर्जा आहे!!