गौरीचे गाणे
लेखनविषय:
गौरी माझी सोनुली
झोपली आनंदाने
तिच्यासाठी गातो
चिउकाउचे गाणे ||
गौरीस आवडे साखर
मउ साय लावुनी
मी झोपवितो तिज
अंगाई गाऊनी ||
गौरी आमची छान
लांब तिचे कान
तिज निजवताना
भरूनी आले मन ||
गौरीच्या गं स्वप्नी
गुळाचे उंच पहाड
रात जाहली मोकळी
स्वप्नांचे उघडे कवाड ||
माझ्या गौरीच्या स्वप्नी
प-यांचा गं गाव
दूधसागरी पोहते
तिची चॉकलेटाची नाव ||
फूल पाकळयाचें सडे
तिच्या नजरे वाहती
आकाशी उडती गालीचे
तिज चांदण्या न्याहाळती ||
माझ्या बहिणीचे रूप
घेऊनी गं गौरी आली
दोघींची एकच प्रतिमा
माझ्या नजरी राहिली ||
विजयकुमार.................
04 / 01 / 2009
माझ्या भाचीसाठी लिहिलेले बालगीत आहे हे.
वाचने
2621
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
इतर आकलनास कठीण कवितांपासून जरासे वेगळेपण बाळगणारी हि कविता आवडली.
मुख्य म्हणजे अंगाई गित असूनही स्त्रीयांसाठी लिहिलेले नाही.
तिच्यासाठी गातो
चिउकाउचे गाणे ||
मी झोपवितो तिज
अंगाई गाऊनी ||
पुरुषांनाही अंगाई गित गाण्याचा अधिकार मिळवून देण्याबाबत कवि महोदयांचे अभिनंदन
In reply to मुख्य म्हणजे अंगाई गित असूनही by माहितगार
.
छान
कविता आवडली
मस्त!
(मला स्मायल्या टाकाया जमल पायजेल राव! :( )
Sandy
असेच विविध विषयांवर लिहित राहा....
तुमच्या काव्यामध्ये खुप उर्जा आहे!!
खूप छान!
इतर आकलनास कठीण कवितांपासून