Where There is 'I' there is 'Ego '
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
जिथे ' मी ' ची जाणीव आहे , तिथे ' अहंकार ' उपजतो .जिथे ' अहंकार ' उपजतो , तिथे ' भय ' उत्पन्न होते .जिथे ' भय ' असते , तिथे ' संदेह ' निर्माण होतो .जिथे ' संदेह ' असतो , तिथे 'अपयश ' हमखास येते .जिथे ' अपयश ' आहे , तिथे ' कष्ट ' कार्य्ण्याची तयारी असावी .जिथे ' कष्ट ' आहेत , तिथे ' प्रामाणिकपणा ' रुजतो .जिथे ' प्रामाणिकपणा ' आहे , तिथे ' आशा ' आहे .जिथे ' आशा ' आहे , तिथे ' प्रकाशाचे ' अस्तित्व आहे.जिथे ' प्रकाश ' आहे , तिथे ' श्रद्धा ' आहे.जिथे ' श्रद्धा ' आहे , तिथे ' विश्वास ' आहे.' विश्वास ' हा ' स्वानुभवातून ' निर्माण होतो .हाच 'स्वानुभव' , 'स्वानुभूति ' घडवतो .जिथे ' स्वानुभूति ' आहे , तिथेच ' सत चित आनंद ' किंवा 'शुद्ध परमानंद ' चा वास असतो . जिथे ' सत चित आनंद ' आहे , तिथे ' मी ' पणा नाही .जिथे ' मी ' नाही , तिथे अहंकार , भय , संदेह , यशापयश ,आशा निराशा , अंधार प्रकाश , श्रद्धा अश्रद्धा , विश्वास अविश्वास असे कोणतेच द्वैत नाही .
तिथे फक्त निरुगुन निराकार अद्वैत सत चित आनंदच असतो .हाच तो श्री कृष्णाने गीतेत वर्णन केलेला ‘ अति प्राचीन ’ .त्या निर्गुणाचे वर्णन करणे इथपर्यंतच शक्य आहे , कारण त्यापलीकडे फक्त ' असणे ' अस्तित्वात आहे आणि काही नाही .
हे 'असणे ' आपल्या मुळाचे मुळ , साराचे सार आहे . तेच अद्वैत आहे , अक्षर व अमृत आहे , त्याला न आदी न अंत . ते अजन्मा आहे . हे सर्व व्यापून काळालाही उलंघून तरी उरलेले असे हे एकमेवाद्वित्या आहे . ते अमर्याद आहे आणि ते अनेक रुपात स्वतःला प्रकट व व्यक्त करते .
हेच ते ब्रम्ह तत्व , परमात्मा , ॐ .
तोच मी .
दृष्टी , वाक , स्पर्श ,गंध , श्रोत्र , मन व बुद्धी यांच्या ही पलीकडचा .
प्रतिक्रिया
बास आता. लैच बोअर
Pagination