(म्हातारचळ म्हातारचळ)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
8 Sep 2008 - 3:10 am

अनिरुद्ध अभ्यंकर 'दूर पळ दूर पण' सांगताना बघितले आणि आमच्या मनात आजूबाजूची वेगवेगळी चळिष्ट चित्रे साकारली! ;)

खोकत खोकत
पहाता पहाता
उठते जेव्हा
एक कळ
मन माझे
म्हणते तेव्हा
म्हातार चळ म्हातार चळ

एरंडाचं पान माझ्या
टाळू वरुन ढळलं नाही
काशाची ती वाटी गं
उष्मा अंगचा सरला नाही
खिडकीमधे आज पुन्हा
दिसलं आहे 'मृगजळ'
मन माझे म्हणते तेव्हा
म्हातार चळ म्हातार चळ

समोरच्या घरामधे
अशी एक रात्र येईल
नजर तेव्हा माझी अगदी
पहा धुंद होऊन जाईल
वासनेच भूत नुसतं
शरिरात नाही बळ
मन माझे म्हणते तेव्हा
म्हातार चळ म्हातार चळ

चतुरंग

कवितामुक्तकविडंबनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

8 Sep 2008 - 3:28 am | प्राजु

समोरच्या घरामधे
अशी एक रात्र येईल
नजर तेव्हा माझी अगदी
पहा धुंद होऊन जाईल
वासनेच भूत नुसतं
शरिरात नाही बळ
मन माझे म्हणते तेव्हा
म्हातार चळ म्हातार चळ

=)) =)) =)) =)) =))

सह्हीच.. मानलं राव तुम्हाला.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शितल's picture

8 Sep 2008 - 11:33 pm | शितल

+१
प्राजुशी सहमत.
ह्या ओळ्यांनी तर खुप हसु आले .

रामदास's picture

8 Sep 2008 - 6:32 am | रामदास

कळ फळ
चळ छळ
तळ मळ
मळ मळ
गळ वळ
अचपळ मन .करी विडंबन.
छान झाले आहे.

http://ramadasa.wordpress.com/ हा माझा ब्लॉग आहे.

मीनल's picture

8 Sep 2008 - 6:42 am | मीनल

छान आहे.

तिमा's picture

8 Sep 2008 - 7:09 am | तिमा

पार 'लोन्याचा धागा' च जाला म्हना की राव, लई ब्येस!!!

मदनबाण's picture

8 Sep 2008 - 7:13 am | मदनबाण

मस्त विडंबन..

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

पिवळा डांबिस's picture

8 Sep 2008 - 9:21 am | पिवळा डांबिस

तीर्थस्वरूप चतुरंगअण्णा,

ये तो शॉट मार दिया!
बायको-मुलं असलेल्या कुटुंबवत्सल माणसाकडून इतका चावटपणा!
बाकी चावटपणा केल्याशिवाय का कुणी कुटुंबवत्सल होतो!!:)

तुम्ही चाळीतल्या प्रातिनिधिक खवट/रंगेल म्हातार्‍याचं वर्णन मस्त केलं आहे.....
प्रत्येक चाळीत असा एक तरी नमुना असतोच नाही का?

"क्यॅय रे, इथे अंधारात जिन्याखाली काय गप्पा मारत बसलांय? सांगू का तुमच्या बापाला?" इत्यादि इत्यादि....

आम्ही इथे विलायतेत असल्याने (आणि अजून देठ हिरवा असल्याने!!!!:)) आम्हाला खालील पंक्ति सुचल्या,

लो कट ब्लाऊजमध्ये
जीव माझा मोक्ष धुंडी
मिनी स्कर्ट, नितळ पाय,
खेळून जातो घसरगुंडी!

टॉक, टॉक, हायहिल्स तुझे,
नितंबांनी मांडला छळ!
मन माझे म्हणते तेंव्हा
म्हातारचळ, म्हातारचळ

(आमच्या आयुष्यात आजवर आलेल्या अनेक देशी आणि विलायती सेक्रेटर्‍यांना अर्पण!!!)
:)

चतुरंग's picture

10 Sep 2008 - 12:47 am | चतुरंग

पिडाकाका,
विडंबन आवडले ह्याबद्दल धन्यवाद!

बायको-मुलं असलेल्या कुटुंबवत्सल माणसाकडून इतका चावटपणा! बाकी चावटपणा केल्याशिवाय का कुणी कुटुंबवत्सल होतो!!

ही वाक्यं मला फारशी आवडली नाहीत. तुमचा काहीतरी गैरसमज झालाय! चावटपणा हा अश्लीलतेच्या अंगाने जाणारा असेल तो घातक आहे.
माझ्या विडंबनात मी कुठेही सूचकतेची सीमारेषा ओलांडलेली नाही!

लो कट ब्लाऊजमध्ये
जीव माझा मोक्ष धुंडी
मिनी स्कर्ट, नितळ पाय,
खेळून जातो घसरगुंडी!

टॉक, टॉक, हायहिल्स तुझे,
नितंबांनी मांडला छळ!

ह्याउलट तुमच्या ओळींमध्ये मला तुमच्यातला कवी बर्‍यापैकी गल्ली चुकल्याचे जाणवले! ;)
सरळसरळ वर्णन करण्यातला बटबटीतपणा टाळून सूचकतेच्या अंगाने जाणे हे जास्त कसबाचे आहे.
परखड समीक्षेबद्दल राग नसावा!

चतुरंग

बेसनलाडू's picture

10 Sep 2008 - 2:25 am | बेसनलाडू

बाबत धनंजयांच्या एका कवितेनिमित्ताने झालेली चर्चा आठवली.
(स्मरणशील)बेसनलाडू
वैयक्तिक मत - डांबिसकाकांच्या ओळी कुटुंबवत्सल माणूस लिहू शकेल काय, हे ('कुटुंब' नसल्याने) माहीत नाही; पण सध्याची सडाफटिंग जीवनशैली किंवा बोलायचे झालेच तर 'लाइफ इन् अ मेट्रो' मधील इरफान खानची मॉन्टी ही व्यक्तिरेखा लक्षात घेता ओळी या फारशा अवाजवीही वाटत नाहीत. चू. भू. द्या. घ्या.
(वैयक्तिक)बेसनलाडू

धनंजय's picture

10 Sep 2008 - 2:43 am | धनंजय

माझ्या त्या कवितेत "नितंब" शब्द मला भंपक सोवळा, आणि अप्रामाणिक वाटला होता.

परंतु पि.डां. यांच्या चळलेल्या म्हातार्‍याच्या दृष्टिकोनातून मात्र तो शब्द अचूक योजला आहे. त्या शक्तिहीन वखवखण्याची टर उडवताना तो भंपकपणा मानवतो.

चतुरंग यांच्या शैलीपेक्षा पि.डां. यांची शैली वेगळी आहे, आणि सर्व कडवी एका कवितेत फारकत करून बसली असती - रसभंग झाला असता.

पि.डां. यांची वेगळी कविता म्हणून वाचली, तिचा स्वतःची रस-चौकट आहे. "गल्ली चुकली" वगैरे विचार माझ्या मनात आले नसते. [पण त्यांनी घाईघाईत लिहिल्यामुळे अपेक्षित दर्जा जमलेला नाही असेही वाटते].

चतुरंग's picture

10 Sep 2008 - 6:03 am | चतुरंग

पिडाकाकांच्या लिखाणात कविता आहेच आणि ते दर्जेदार काव्य लिहू शकतात हे आपल्याला माहीत आहे. म्हणूनच नेमके 'त्यांचातला कवी गल्ली चुकला' असे शब्द मी वापरले.
अन्यथा मी प्रतिसाद देण्याची तसदी घेतली नसती!
माझा आक्षेप इतकाच आहे की त्यांच्या मनात आलेल्या भावनांना मूर्त रुप देताना, शैली वेगळी ठेऊनही, शब्दयोजना वेगळी करता आली असती.

चतुरंग

चतुरंग's picture

10 Sep 2008 - 5:55 am | चतुरंग

मी कुटुंबवत्सल आहे. ओळी कुठल्याही मलाही लिहिता येतात!
मनात आलेली ओळ जशीच्यातशी टंकताना, आपण किती धाडसी आणि मुक्त विचारांचे आहोत ह्याचबरोबर ती कुठे टंकली जाते आहे, वाचणारा वर्ग कोण असू शकेल ह्याची जाणीव ठेवायला हवी असे माझे मत आहे.
चावटपणा करताना सीमारेषा कुठे आणि कशी आखायची ह्याचे तारतम्य एवढाच विषय आहे आणि तो फार अवघड नाही असे माझे मत आहे.
वैयक्तिक मतभेद असणारच. मी माझे मत मांडले.

चतुरंग

बेसनलाडू's picture

10 Sep 2008 - 6:32 am | बेसनलाडू

मी कुटुंबवत्सल आहे. ओळी कुठल्याही मलाही लिहिता येतात!
मलाही! कदाचित अनिरुद्ध, धनंजय आणि आणखीही कितीतरी जणांना (नावे फक्त उदाहरणार्थ आणि परिचयातील म्हणून घेतली आहेत)! माझ्या (व्यक्तिगत) मते, ओळी, शब्दयोजना, विचार आणि परिस्थिती तसेच वाचकवर्ग यांचा एकत्रित विचार आपण जितक्या वस्तुनिष्ठपणे करू, तितका ओळी, शब्दयोजना यांमधील समंजसपणा म्हणा किंवा परिपक्वता - कवितेत दिसून येईल. याला काही जण व्यापारी वृत्तीने लिहिलेली कविता म्हणू शकतील; कारण त्यावेळी मुळात 'मनात' एक शब्दयोजना आणि कागदावर 'दुसरीच' अशा स्वरूपाचा/ची आरोप/चर्चा असते आणि केवळ 'वाचक काय म्हणतील,त्यांना काय वाटेल' छापाच्या विचारांतून अशी 'दुसरी' (धनंजय म्हणतात तशी 'भंपक सोवळी') शब्दयोजना जन्माला आलेली असते. मला वाटते जेव्हा शब्दयोजनेच्या/काय लिहायचे नि काय नाही याच्या पर्यायांबद्दल विचार होतो, त्यावेळी तुम्ही म्हणताय तसे सार्वजनिक सभ्यतेची सीमारेषा, कवितेचे आशयसौंदर्य इ. ना बाधा न पोचणे आणि तरीही कवितेतून प्रकट होणार्‍या (कविता लिहिताना मनात असलेल्या) भावनांशी प्रामाणिक राहणे ही खरी तारेवरची कसरत आहे. आणि त्यातही जर काही ओळ सार्वजनिक सभ्यतेला साजेशा नसतील पण कवितेतील भावनांना/विचारांना साजेशा असतील किंवा वाइस वर्सा, तर काय करावे याचा निर्णय घेणे ही तारेवरची कसरत आहे. धनंजयांच्या कवितेवरील चर्चा आठवायचे कारणे हे की तेथे 'ढुंगण' लिहायचे हे त्यांनी नक्की केले होते; फक्त 'ढुंगण' लिहायचे, 'नितंब' लिहायचे की 'गांड' लिहायचे यावर ठाम मत होत नव्हते/नसावे. तुमच्या वरील प्रतिसादातून तुमचा यांपैकी एकही शब्द लिहिण्यास आक्षेप आहे, असे (निदान मला तरी काही वेळापुरते) वाटून गेले. कारण 'ढुंगण' हा शब्दच मुळी सार्वजनिक सभ्यतेत बसत नाही? की 'ढुंगण' आणि/किंवा 'नितंब' बसतात, पण 'गांड' बसत नाही? तसे असते तर पाडगावकरांनी तो 'सलाम' मध्ये वापरला असता का?
डांबिसकाकांना लो कट् ब्लाउजमधून मिळणारा मोक्ष, गुळगुळीत पायांवरून होणारी घसरगुंडी, नितंबांनी मांडलेला छळ यांमधून जो 'चळ' दाखवायचा आहे, त्यासाठी त्यापेक्षा परिणामकारक शब्दयोजना कोणती असेल? अशा गोष्टींकडे लक्ष जाईल ते मी 'कुटुंब'वत्सल नसलो तर, आणि असूनही खरोखरच 'चळ' लागला असेल तर किंवा शब्दशः 'रंगेल' असलो तर :) 'एक उनाड दिवस' या चित्रपटातील विजू खोटेंची मोहनलाल ही व्यक्तिरेखा, 'लाइफ् इन् अ मेट्रो' मधील इरफानची मॉन्टी ही व्यक्तिरेखा जरूर पहावी.

मनात आलेली ओळ जशीच्यातशी टंकताना, आपण किती धाडसी आणि मुक्त विचारांचे आहोत ह्याचबरोबर ती कुठे टंकली जाते आहे, वाचणारा वर्ग कोण असू शकेल ह्याची जाणीव ठेवायला हवी असे माझे मत आहे. चावटपणा करताना सीमारेषा कुठे आणि कशी आखायची ह्याचे तारतम्य एवढाच विषय आहे आणि तो फार अवघड नाही असे माझे मत आहे.
वरच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया लिहिताना जो वस्तुनिष्ठ विचार आणि समंजसपणा म्हणत होतो, तो हाच. खाली धनंजयांनीही स्पष्टीकरण लिहिले आहेच. फक्त जे वाचकवर्गाला 'चावट', 'अश्लील', 'असभ्य' वाटते, ते मला वाटते का हे ठरविणे आणि तसे वाटल्यास मूळ आशय आणि विचारांना धक्का न लावता पर्यायी शब्दयोजनेमधून तितक्याच परिणामकारकपणे ते कसे पोचतील, हा कळीचा मुद्दा आहे आणि तो वाटतो तितका सोपा नक्कीच नाही/नसावा. मला ते जितके अवघड वाटते तितकेच ते तुम्हांला सोपे वाटते, इतकेच! हा सोपेपणा सापेक्ष आहे का आणि असल्यास त्याच्या माध्यमातून होणार्‍या तडजोडी एकूण कवितेच्या संदर्भात साधक आहेत की बाधक याचा आपल्याला निष्पक्षपणे विचार करता येईल का? नव्हे, तसा तो करावा का? या प्रश्नांची उत्तरे मला (सध्या तरी) माहीत नाहीत :)

वैयक्तिक मतभेद असणारच. मी माझे मत मांडले.
उत्तम! नव्हे मतभेद असावेतच, नाहीतर मतांचे आदानप्रदान कसे व्हायचे? लेट् अस् अग्री टु डिसग्री :)

(समंजस)बेसनलाडू

आनंदयात्री's picture

11 Sep 2008 - 10:06 am | आनंदयात्री

>>आपण किती धाडसी आणि मुक्त विचारांचे आहोत ह्याचबरोबर ती कुठे टंकली जाते आहे, वाचणारा वर्ग कोण असू शकेल ह्याची जाणीव ठेवायला हवी असे माझे मत आहे.

रंगाराव तुमचे हे मत प्रचंड पटले !!

पिवळा डांबिस's picture

10 Sep 2008 - 10:41 pm | पिवळा डांबिस

परंतू,
तुमच्या ओळींमध्ये मला तुमच्यातला कवी बर्‍यापैकी गल्ली चुकल्याचे जाणवले!
हे कसे काय ते जरा समजावून सांगाल का? नाही म्हणजे "कविता" म्हणून माझ्या ओळींमध्ये "कवी" कुठे चुकलाय? पुढच्या वेळेस सुधारणा करता येईल.

तुमची कविता वाचून (आवडून) आम्हाला ज्या ओळी सुचल्या त्या आम्ही लिहिल्या. त्या तुमच्या कवितेत समाविष्ट करा असे आम्ही दुरूनही सुचवलेले नाही.....

सूचकतेच्या अंगाने जाणे हे जास्त कसबाचे आहे.
हम्म्म!! माझ्या कवितेतील प्रत्येक शब्द तपासला तर असे आढळेल की कोणताही शब्द हा अपशब्द नाही, किंवा मराठी साहित्याच्या दृष्टीने अश्लील शब्द नाहिये. त्या ओळीतून कवीने व्यक्त केलेले विचार हे जर एखाद्या रंगेल/ वासनामय म्हातार्‍याच्या मनाचा धांडोळा घेतला तर जास्त प्रामाणिक आहेत (असे मला वाटते.)
तेंव्हा सूचकतेने मांडणे हे कसबाचे आहे की भीरूतेचे हा चर्चेचा मुद्दा आहे....

परखड मताबद्दल राग नसावा!
पिवळा डांबिस

चतुरंग's picture

11 Sep 2008 - 8:44 am | चतुरंग

तुमची कविता वाचून (आवडून) आम्हाला ज्या ओळी सुचल्या त्या आम्ही लिहिल्या. त्या तुमच्या कवितेत समाविष्ट करा असे आम्ही दुरूनही सुचवलेले नाही.....
मीही तुम्ही तसं सुचवताय असं कुठेही म्हटलेलं नाही त्यामुळे हा मुद्दा संपला! (मुळात हा मुद्दा तुम्ही उपस्थित केलाय आणि तो गैरलागू आहे).

हम्म्म!! माझ्या कवितेतील प्रत्येक शब्द तपासला तर असे आढळेल की कोणताही शब्द हा अपशब्द नाही, किंवा मराठी साहित्याच्या दृष्टीने अश्लील शब्द नाहिये. त्या ओळीतून कवीने व्यक्त केलेले विचार हे जर एखाद्या रंगेल/ वासनामय म्हातार्‍याच्या मनाचा धांडोळा घेतला तर जास्त प्रामाणिक आहेत (असे मला वाटते.)

तुमच्या काव्यातल्या कोणत्याही शब्दाला मी अपशब्द/अश्लील असे दोन्ही शब्द वापरले नाहीत. मी वापरलेला शब्द 'बटबटीत' असा आहे! त्या शब्दातून व्यक्त होणारी वासनामयता ही जरा जास्तच उघड(ड्या) स्वरुपात व्यक्त झाली आहे एवढंच माझं म्हणणं आहे. त्या जागी काही वेगळी समर्पक शब्दयोजना चालू शकली असती, जसे -

देहाच्या त्या वळणातून
जीव माझा मोक्ष धुंडी
आरस्पानी, नितळ काया,
खेळून जातो घसरगुंडी!

टॉक, टॉक, हायहिल्स,
पाठमोरी मांडते छळ!
मन माझे म्हणते तेंव्हा
म्हातारचळ, म्हातारचळ

भावनांच्या प्रकटनातली सूचकता ही जर 'भीरुता' म्हणून गणली जाणार असेल तर मग श्लीलाश्लीलतेचे तरी भान कशाला ठेवायचे? सगळेच उघडपणे लिहावे. मनात आलेले विचार हे कितीही नग्न स्वरुपात आले (आणि विषयाच्या संदर्भात बर्‍याच वेळा तसे ते येतात) तरी एका विशिष्ठ अवगुंठनातूनच मांडायचे ह्यात अभिव्यक्तीचा कस आहे असे मला वाटते.

चतुरंग

आनंदयात्री's picture

8 Sep 2008 - 6:50 pm | आनंदयात्री

लै भारी रंगाराव.

अवलिया's picture

8 Sep 2008 - 6:52 pm | अवलिया

नाव चतुरंग
पण सध्या एकच रंग उधळत आहात असे दिसते
चालु द्या

नाना

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Sep 2008 - 6:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लै भारी !!! :)

बेसनलाडू's picture

8 Sep 2008 - 10:36 pm | बेसनलाडू

छान विडंबन. डांबिसकाकांच्या ओळीही मस्त!
(वाचक)बेसनलाडू

आजानुकर्ण's picture

8 Sep 2008 - 10:40 pm | आजानुकर्ण

'म्हातारचळ म्हातारचळ' आवडला.

आपला,
(तरुण) आजानुकर्ण

स्वाती राजेश's picture

8 Sep 2008 - 11:14 pm | स्वाती राजेश

म्हातारचळ म्हातारचळ विडंबन आवडले.
:))

कवटी's picture

8 Sep 2008 - 11:47 pm | कवटी

रंगाशेठ,
विडंबनाच सर्व मसाला ठासुन भरलाय या कवितेत... उत्तम विडंबन!
केसुची उणीव सर्वानाच भासत आहे. पण तुम्ही ती थोडी तरी कमी केलीत असे म्हणावे लागेल.
येउद्या आजून....

राधा's picture

9 Sep 2008 - 12:07 am | राधा

क्या बात है............

प्रियाली's picture

10 Sep 2008 - 6:48 am | प्रियाली

मूळ विडंबन आवडले.

नंतर काढलेला काकडी, दुधी, गाजराचा कीस वाचायला कंटाळा आला पण हे माझं वैयक्तिक मत ;)

म्हातारचळ आवडलेल्या आणि न आवडलेल्या सर्व रसिकांना धन्यवाद!

हे मी चुकून म्हातारचळ लागलेल्या आणि न लागलेल्या सर्व रसिकांना धन्यवाद! असे वाचले - हा माझा वैयक्तिक चावटपणा ह. घ्या.

चतुरंग's picture

11 Sep 2008 - 9:00 am | चतुरंग

म्हातारचळ लागलेल्या आणि न लागलेल्या सर्व रसिकांना धन्यवाद! असे वाचले

खुद के साथ बातां टाकून त्यात "कोण म्हणतोय रे तो"? आणि हे वरचे वाक्य असे टाकायचे मनात होते पण कोणीतरी ते करेल अशी अटकळ होतीच म्हणून विचार बदलला आणि तुम्ही माझा अंदाज खरा केलात! त्याबद्दल विशेष धन्यवाद! ;)

चतुरंग

विसोबा खेचर's picture

11 Sep 2008 - 11:36 am | विसोबा खेचर

रंगा मस्त रे! :)

(चळीष्ट) तात्या.

उत्खनक's picture

21 Mar 2013 - 1:57 pm | उत्खनक

अरारारा..
धन्य ती कविता, धन्य ते विडंबन अन् धन्य ती चर्चा! :)

बॅटमॅन's picture

21 Mar 2013 - 5:54 pm | बॅटमॅन

अगायायाया काय हो हे??? धन्य ती कविता, धन्य ते विडंबन अन धन्य ती चर्चा. पिडांकाकांचे विडंबन विशेष आवडले हेवेसांनल ;)

(ऐन तारुण्यातला) बॅटमॅन.

अन या उत्तम खोदकामाबद्दल उत्खनक यांचेही आभार.

दादा कोंडके's picture

21 Mar 2013 - 7:54 pm | दादा कोंडके

पिडांच्या ओळी आणि चर्चा आवडली. :)