✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आमिर आणि शाहरुख

च
चिनार यांनी
Wed, 11/25/2015 - 09:31  ·  लेख
लेख
मन्नतसारख्या किल्ल्यात राहताना किंवा बुलेट प्रूफ व्ह्यानीटी व्ह्यान मधून फिरताना किंवा सतत आसपास दहा-दहा अंगरक्षक बाळगताना जर तुम्हाला या देशात असुरक्षित वाटत असेल तर मेला' आणि 'रा वन' सारखे अत्याचार भोगताना प्रेक्षकांच्या सुरक्षेचा कधी विचार केला का रे तुम्ही दोघांनी? आमिर...अरे बायको म्हणतेय म्हणून देश सोडून जायचंय तुला!...नाही म्हणजे खरच देशातली असुरक्षितता हे कारण आहे की बायको पासून सुरक्षा हे कारण आहे ? तिची फारच इच्छा असेल तर इराक,सिरीयाला घेऊन जा तिला एकदा.आपल्याकडे जुन्या काळात हत्तीवरून साखर वाटायचे की नै तसे विमानातून बॉम्बगोळे वाटतात तिथं. हवं तर फ्रांसला घेऊन जा. आयफेल टॉवर शेजारची जागा फार स्वस्तात मिळतेय म्हणे आजकाल! फूटबॉलची मैदानं पाडून गावागावात आता लष्करी छावण्या बांधणार आहेत म्हणे... नाहीतर अमेरिकेत जाऊन ये. तिथले कस्टमवाले शाहरुखच्या फार ओळखीचे आहेत ना..दरवेळी आस्थेने चौकशी करतात त्याची. 'माय नेम इज खान अँड आय एम नॉट अ टेररिस्ट' हा डायलॉग ऐकल्याशिवाय सोडतच नाही त्याला. तसं तर पाकिस्तानात जायला सुद्धा काही हरकत नाहीये पण ते मुहाजिर वगैरे लफडं संभाळून घे बाबा. किरणवहिनींना मुंबईत मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते ना...पाकिस्तानात तर झेड सिक्युरिटी दिलीये म्हणे शाळांना आजकाल. मागल्यावर्षी नाही का दीडशे निष्पाप मुलांना ठार मारण्याची किरकोळ घटना घडली तिथे ! बाकी कशाकश्शाची म्हणून चिंता नाहीये पाकिस्तानात..ऑस्ट्रेलीयात अधूनमधून भारतीयांवर गोळीबार होत असतो नाहीतर तिथे जा असं सुचवलं असतं.. नाही तर एक काम करा ना...अंटार्क्टिका खंडातच जाऊन राहा...एकदम सुरक्षित !!! http://chinarsjoshi.blogspot.in/
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
31209 वाचन

💬 प्रतिसाद (216)

प्रतिक्रिया

बोलून काही उपयोग आहे का चिनार

प्रसाद१९७१
Wed, 11/25/2015 - 09:37 नवीन
बोलून काही उपयोग आहे का चिनार. हे सगळे होऊन ही, भारतीय लोक त्याच्या सिनेमाला गर्दी करतीलच. जेंव्हा भारतीय ग्राहक त्याला लाथ मारेल तेंव्हा तो जमिनीवर येइल पण ते शक्य नाही. कारगिल चे युद्ध चालू असताना भारत पाकीस्तान क्रिकेट मॅच टीव्ही वर जागुन बघणारा देश हा. पाकीस्तानी सिरीयल्स चा चॅनल आवडीने बघणार्‍यांना हे कळत नाही, की त्यातुन जो पैसा पाकीस्तानात जातोय त्याचा काही भाग शेवटी भारता विरुद्धच वापरला जातोय. इथे असेच चालणार.
  • Log in or register to post comments

जेंव्हा भारतीय ग्राहक त्याला

गवि
Wed, 11/25/2015 - 11:23 नवीन
जेंव्हा भारतीय ग्राहक त्याला लाथ मारेल तेंव्हा तो जमिनीवर येइल पण ते शक्य नाही.
काही प्रमाणात पब्लिककडून तातडीने प्रत्यक्ष कृतीमार्गे निषेध झालाय. म्हणजे तो ज्याचा ब्रँड अ‍ॅम्बॅसिडर आहे त्या अमेझॉनच्या अ‍ॅपला निषेधापोटी व्होटडाऊन करण्याची कृती मोठ्या संख्येने केली गेली आहे लोकांकडून.. असं वाचलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

Snapdeal

देश
Wed, 11/25/2015 - 11:30 नवीन
तुम्हाला Snapdeal म्हणायचे आहे बहुतेक देश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

नाय हो

परिकथेतील राजकुमार
Wed, 11/25/2015 - 11:31 नवीन
स्नॅपडील आहे ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

होय होय. स्नॅपडील. चुकीने

गवि
Wed, 11/25/2015 - 12:11 नवीन
होय होय. स्नॅपडील. चुकीने मिष्टेक झाली.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

(No subject)

sagarpdy
Wed, 11/25/2015 - 10:57 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

बोले तो, शेअर करेगा क्या थोडा

संदीप डांगे
Wed, 11/25/2015 - 13:41 नवीन
बोले तो, शेअर करेगा क्या थोडा पापकार्न? नै, इदर अब पापकार्न छोडके अउर कुच शेअर नै करनेका माहौल बनता जा रा है.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sagarpdy

फिर का करे, इतना टीव-टीव चल

sagarpdy
Wed, 11/25/2015 - 14:55 नवीन
फिर का करे, इतना टीव-टीव चल रा है लोग का. ट्विटर देखाणु पापकार्न खावाणु, मज्जा आणि लाईफ. हम राह देख रै हे रेहमान साब कब आ रहे है धीस्काषण मे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

एकी नाही. हाच प्रॉब्लेम आहे

वेल्लाभट
Wed, 11/25/2015 - 11:14 नवीन
एकी नाही. हाच प्रॉब्लेम आहे आपल्या देशात. नाहीतर बरंच काही साध्य करता आलं असतं.
  • Log in or register to post comments

ह्याचा अर्थ एकाच

सागरकदम
Wed, 11/25/2015 - 11:24 नवीन
ह्याचा अर्थ एकाच बायकोचे जास्त मनावर घेऊ नका मी पळतो
  • Log in or register to post comments

त्याला किंवा त्याच्या पत्नीला

गवि
Wed, 11/25/2015 - 11:31 नवीन
त्याला किंवा त्याच्या पत्नीला तसं वाटलं असेल तर बोलण्याचा हक्क आहे. ते ऐकून त्यावर प्रतिक्रिया देण्याचा इतर नागरिकांनाही हक्क आहे. पण देश सोडून चालते व्हा, पाकिस्तानात जा असं म्हणणं किंवा तीव्र द्वेषयुक्त प्रतिक्रिया देणं, दमदाटी, थेट गुंडागर्दीचे प्रयत्न वगैरे हे सर्व असहिष्णूच ठरेल, आणि त्यामुळे मूळ आरोपाला (?!) बळकटीच मिळेल. अर्थात ज्याला भारतीय पब्लिकने इतकं वरचं स्थान दिलं त्याला "वैयक्तिक" असुरक्षित वाटणं, आणि तेही असहिष्णुतेच्या कारणाने, हे न पटण्यासारखं आहे. देशातल्या एकूण असहिष्णुतेच्या तथाकथित भीतीपेक्षा त्याच्या स्वतःच्या स्टारडम + अतिप्रसिद्धीमुळे कदाचित त्याच्या / कुटुंबियांच्या सुरक्षिततेला जास्त पोटेन्शियल धोका असू शकतो. त्याविषयी काय मत असेल त्याचं ? आणि रोजचा पेपर उघडायला भीती वाटते, घटना वाढत आहेत आणि जणू रोजच्यारोज असंख्य असहिष्णु घटना गल्ल्यागल्ल्यांतून घडताहेत असा इफेक्ट निर्माण करणारं आमीरचं वक्तव्य अतिशयोक्त वाटतं.
  • Log in or register to post comments

पूर्णतः सहमत...

संदीप डांगे
Wed, 11/25/2015 - 11:38 नवीन
पूर्णतः सहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

+१

जातवेद
Wed, 11/25/2015 - 11:48 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

त्याला किंवा त्याच्या पत्नीला

प्रसाद१९७१
Wed, 11/25/2015 - 13:31 नवीन
त्याला किंवा त्याच्या पत्नीला तसं वाटलं असेल तर बोलण्याचा हक्क आहे. ते ऐकून त्यावर प्रतिक्रिया देण्याचा इतर नागरिकांनाही हक्क आहे
गवि - हक्क आहे हे मान्य आहे, पण मिडीया मधे उघडपणे देशाची बदनामी होइल असे बोलायची काही गरज आहे का? घरी, मित्रात बोलावे ना. तसे ही, हिंदू बहूसंख्येनी असलेल्या देशात खान माणसांना सुपरस्टार पद मिळते हे कीती मोठ्ठे आश्चर्य आहे. त्याचे कौतुक करायचे सोडुन शंका, भिती , बदनामी का करत बसायची. जगातल्या कुठल्या देशात, मायनॉरीटी मधल्या लोकांना सुपरस्टार पद मिळाले आहे? आमिरने स्वताला नशिबवान समजायला पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

सहमत

बाजीप्रभू
गुरुवार, 11/26/2015 - 07:41 नवीन
जगातल्या कुठल्या देशात, मायनॉरीटी मधल्या लोकांना सुपरस्टार पद मिळाले आहे? आमिरने स्वताला नशिबवान समजायला पाहिजे
सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

जगातल्या कुठल्या देशात,

जिन्क्स
गुरुवार, 11/26/2015 - 15:10 नवीन
जगातल्या कुठल्या देशात, मायनॉरीटी मधल्या लोकांना सुपरस्टार पद मिळाले आहे? आमिरने स्वताला नशिबवान समजायला पाहिजे. सहिष्णू देशात सुपरस्टार होण्याचा आणि मायनॉरीटी (जातीचा) संबंध तो काय असं म्हणतो मी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद१९७१

+१११११

कैलासवासी सोन्याबापु
Wed, 11/25/2015 - 14:54 नवीन
+१११११ मुळात त्याने दंगल हिट व्हावा म्हणुन हा तमाशा केला असल्याची एक शक्यता आहे बारीक़शी, त्यावर त्याला चालू लागा वगैरे म्हणले का तो आवशेच्या रात्री घुमणाऱ्या मसणजोग्या सारखा अजुन घुमणार, सांगितलंय कोणी? अन तसंही त्याला लॉजिकली पेचात पकडणारे खुप प्रश्न असू शकतात असे काम परेश रावल किंवा अनुपम खेर उत्तमरीत्या करीत आहेत ट्विटर वर त्याला एकच विचारा 'असहिष्णु देशाबद्दल अतुल्य भारत उर्फ़ इनक्रेडिबल इंडिया च्या झैराती करताना काय वाटले किंवा पेमेंट पोचली का इनक्रेडिबल इंडिया ची?'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

बॅग भरा आणि देश सोडा,कशाला पोपट पंची करता ?

मदनबाण
Wed, 11/25/2015 - 11:48 नवीन
Image removed. वरील दोन्ही चित्रपटांच्या गल्ल्यांचे आकडे येतील तेव्हा देशातल जनता किती सिरीयस आहे ते कळेलच ना ! जाता जाता :- आमिरने हिंदुस्थानात अवैध पद्धतीने राहणार्‍या बांग्लादेशी मुसलमानांची भेट घेतली पाहिजे आणि विचारले पाहिजे बाबा रे तुम्ही बांग्लादेशी, त्यात सुद्धा धर्मांने मुसलमान मग पाकिस्तानात जायचे सोडुन मोठ्या संख्येने घुसखोरी करुन इकडे हिंदुंस्थानातच का आलात ? असहिष्णुतेची भिती नाही वाटत ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- बाहों में चले आओ, हमसे सनम क्या परदा... :- Ustad Imtiaz Ali Riaz Ali
  • Log in or register to post comments

पायरेटेड बघितले तर चालेल ना?

जातवेद
Wed, 11/25/2015 - 11:51 नवीन
पायरेटेड बघितले तर चालेल ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

आमिरचा नवीन सिनेमा येतोय

_मनश्री_
Wed, 11/25/2015 - 11:52 नवीन
आमिरचा नवीन सिनेमा येतोय 'दंगल ' त्याच्या प्रमोशनसाठी चाललय हे सगळ बाकी काही नाही
  • Log in or register to post comments

चर्चेच्या सोयीसाठी काही

पिलीयन रायडर
Wed, 11/25/2015 - 12:01 नवीन
चर्चेच्या सोयीसाठी काही माहिती:- आमिर नक्की काय म्हणाला:- http://stylewhack.com/readers-choice/the-intolerant-india-controversy-listen-yourself-to-what-aamir-really-said/ “(Wife) Kiran and I have lived all our lives in India. For the first time, she said, should we move out of India? That’s a disastrous and big statement for Kiran to make to me,” “She fears for her child. She fears about what the atmosphere around us will be. She feels scared to open the newspapers everyday. That does indicate that there is a sense of growing disquiet.” दंगलची रिलिझ डेट - Dangal is scheduled to release on 23 December 2016
  • Log in or register to post comments

मान्यवरांनी २०१६ कडे लक्ष

पिलीयन रायडर
Wed, 11/25/2015 - 12:03 नवीन
मान्यवरांनी २०१६ कडे लक्ष द्यावे. मी आमिरच्या म्हणण्याला सपोर्ट करत नाहीये. देश सोडुन जाणे हा काही पर्याय असु शकत नाही. पण मी तो नक्की कोणत्या संदर्भात हे म्हणाला हे स्वतः ऐकलेले नाही. त्यामुळे त्यावर मत व्यक्त करणे चुक ठरेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

:)

माहितगार
Wed, 11/25/2015 - 12:36 नवीन
पण मी तो नक्की कोणत्या संदर्भात हे म्हणाला हे स्वतः ऐकलेले नाही. त्यामुळे त्यावर मत व्यक्त करणे चुक ठरेल.
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मिपावरील जुना रोचक धागा आठवला

गॅरी ट्रुमन
Wed, 11/25/2015 - 20:48 नवीन
“(Wife) Kiran and I have lived all our lives in India. For the first time, she said, should we move out of India? That’s a disastrous and big statement for Kiran to make to me,”
हे वाचून मिसळपाववरील एका जुन्या (२०१० मधील) रोचक धाग्याची आठवण झाली. संबंधित लेखक मिसळपाव संस्थापकांना म्हणत होता-- (काही कारणामुळे) "....लोकांना तुम्हाला बाकी काही काम धंधा नसावा,तुम्ही रिकामटेकडे आहात असे वाटते...." आणि त्याच दमात तो हे पण म्हणाला होता "जे खरे नाही हे मला माहित आहे". म्हणजे एकतर दुसऱ्या माणसाला एकीकडे रिकामटेकडा, कामधंदा नसलेला म्हणायचे आणि वर उलटेही म्हणायचे---"हे खरे नाही हे मला माहित आहे"!! याला काय अर्थ आहे? त्याचप्रमाणे किरणला कोट करून "should we move out of India?" असे म्हणायचे आणि वर "That’s a disastrous and big statement for Kiran to make to me" असेही म्हणायचे? हा प्रकार आणि मिपावरील त्या आय.डी धारकाने केलेला प्रकार यात नक्की काय फरक आहे? आणि वर तोंडाने "गेल्या ६-८ महिन्यात असुरक्षितता, असहायता इत्यादी वाढली आहे. किरणला वर्तमानपत्र उघडून बघायलाही भिती वाटते" हे पण हाच गृहस्थ म्हणाला आहे. यातील गेल्या ६-८ महिन्यात या वाक्याच्या प्रयोगावरून आमीरच्या म्हणण्याचा रोख तथाकथित वाढलेल्या असहिष्णुतेकडेच आहे असे म्हटले तर काय चुकले? अवांतर-- भारताबाहेर जाऊन राहता आले तर किती चांगले होईल हा विचार मीपण अनेकदा केलेला आहे. भारतातल्या वातावरणात* माझ्या मुलांना मी कसे वाढवू हे प्रश्न मलाही पडतात.अर्थातच त्यामागची माझी कारणे वेगळी आहेत आणि ती कारणे गेल्या अनेक वर्षांपासून तशीच आहेत. पण समजा एखादा माणूस गेल्या ६-८ महिन्यांपासून ही कारणे वाढली असे वक्तव्य करत असेल तर त्याचा रोख नक्कीच सरळ आहे.त्याने आणि त्याच्या समर्थकांनी उगीच वेड पांघरून पेडगावला जाऊ नये. *: या वातावरणाविषयी माझी काही मते आहेत आणि त्याविषयी कोणतीही चर्चा करायची माझी इच्छा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

अगदी अगदी

गामा पैलवान
गुरुवार, 11/26/2015 - 02:46 नवीन
गॅरी ट्रुमन, अगदी बरोब्बर उदाहरण दिलंत बघा. घरची धुणी चव्हाठ्यावर धुवायला काढायची खाज भारी आमीरला. लोकांनी नावं ठेवायला नकोत म्हणून मखलाशी करायची की ही आमची खाजगी बाब आहे! फार छान! असो. इथे अभिराम दीक्षितांचं विवेचन आहे. अमीरच्या वक्तव्याचा एक वेगळा पैलू प्रकाशात येतो. लेख रोचक आहे : http://drabhiram.blogspot.co.uk/2015/11/blog-post_25.html त्यावरचा माझा प्रतिसाद इथे आहे. लेखावर चर्चा करायला आवडेल. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गॅरी ट्रुमन

अमीरच्या ब्लॉगचा पत्ता काय

माहितगार
गुरुवार, 11/26/2015 - 19:52 नवीन
अमीरच्या ब्लॉगचा पत्ता काय आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

आश्चर्य आहे आमिरला आणि किरणला

_मनश्री_
Wed, 11/25/2015 - 12:15 नवीन
आश्चर्य आहे आमिरला आणि किरणला आत्ता असुरक्षित वाटतय मग १९९३ बॉम्ब स्फोट ,२००६ ट्रेन बॉम्ब स्फोट , २६/११ , निर्भया प्रकरण एवढ सगळ घडत असताना हे कधीच वाटल नाही का ?
  • Log in or register to post comments

इंग्रजी विकिपीडियावरील किरण

माहितगार
Wed, 11/25/2015 - 12:34 नवीन
इंग्रजी विकिपीडियावरील किरण रावांच प्रोफाईल सांगत त्या १९९२ मध्ये कलकत्त्याहून मुंबईला आल्या (१९७३ चा जन्म म्हणजे साधारनतः १९ वर्षांच्या असतील) आणि १९९५ पर्यंत ग्रॅज्युएशन मुंबईच्या सोफीयाकॉलेजातन केलं १९९२-९३ मध्ये अमिररावांचे सात चित्रपट आले. तर इतके व्यस्त असताना त्यांना कसे काही समजेल ? कमाल आहे लोकांची सुद्धा :) तेव्हा FTII च आंदोलन झाल नव्हत, सेंसॉर बोर्डाची धास्ती वाटली नव्हती आता मोदींच सरकार आहे म्हणल्यावर किरण रावांना तस वाटलच पाहीजेना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_

आश्चर्य आहे आमिरला आणि किरणला

_मनश्री_
Wed, 11/25/2015 - 12:37 नवीन
आश्चर्य आहे आमिरला आणि किरणला आत्ता असुरक्षित वाटतय मग १९९३ बॉम्ब स्फोट ,२००६ ट्रेन बॉम्ब स्फोट , २६/११ , निर्भया प्रकरण एवढ सगळ घडत असताना हे कधीच वाटल नाही का ?
१९९५ ते २०१३ ह्या कालावधीत भारतात ५७ अतिरेकी हल्ले झाले , तेव्हा भीती नाही वाटली का ? हे सगळे अस बोलताहेत जणू काही २०१३ पूर्वी भारतात रामराज्य नांदत होत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_

इतरांनी पुरस्कार वापसकरून जे

माहितगार
Wed, 11/25/2015 - 13:36 नवीन
इतरांनी पुरस्कार वापसकरून जे राजकीय भांडवल विरोधकांसाठी मिळवल ते अमिर-किरणने अतीरंजन करून घालवलं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: _मनश्री_

अरे वा !! हैप्पी जर्नी !!

पद्माक्षी
Wed, 11/25/2015 - 12:27 नवीन
packing ला काही मदत हवी का?
  • Log in or register to post comments

(No subject)

सागरकदम
Wed, 11/25/2015 - 13:04 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्माक्षी

आमीर आणि शारुकचे कुठ्लेही

मोहन
Wed, 11/25/2015 - 12:28 नवीन
आमीर आणि शारुकचे कुठ्लेही सिनेमे /सिरिअल पाहणार नाही.
  • Log in or register to post comments

आमीर विरोधात देशद्रोहाची याचिका दाखल

shawshanky
Wed, 11/25/2015 - 13:13 नवीन
आमीर विरोधात देशद्रोहाची याचिका दाखल
  • Log in or register to post comments

अतिरेकी संगठना कुठलीही असो ..

shawshanky
Wed, 11/25/2015 - 13:14 नवीन
अतिरेकी संगठना कुठलीही असो ... मुस्लिम अथवा हिंदू ... असहिष्णुता वाढत आहे हे मात्र खरे ... आणि संयोगाने भारतात हिंदू जास्त आहेत त्यामुळे साहजिकच अल्पसंख्यांकांना विश्वासात घेण्याची हिंदू नागरिकांवर येणारी जिम्मेदारी पण मोठीच असते. हि जिम्मेदारी आपण किती विश्वासाने आणि काळजीपूर्वक निभावतो त्यावरच आपण (हिंदू) किती सहिष्णू आहोत हे सिद्ध होते. प्रत्येक वेळी तुलनात्मक विचार करून स्वतःला कुणी फार मोठा तीसमारखान असल्याची समजूत करून घेणे म्हणजे आपण अजून किती अपरिपक्व आहोत हे जगाला दाखविण्या सारखे आहे ....
  • Log in or register to post comments

यामुळे साहजिकच

मदनबाण
Wed, 11/25/2015 - 13:21 नवीन
यामुळे साहजिकच अल्पसंख्यांकांना विश्वासात घेण्याची हिंदू नागरिकांवर येणारी जिम्मेदारी पण मोठीच असते. हि जिम्मेदारी आपण किती विश्वासाने आणि काळजीपूर्वक निभावतो त्यावरच आपण (हिंदू) किती सहिष्णू आहोत हे सिद्ध होते. हे कुठल्या सहिष्णूतेचे प्रतिक आहे ते जरा नीट सांगाल का ? :- अतिरेक्याच्या अंतयात्रेला अलोट गर्दी ! काश्मिरी पंडीतांना त्यांच्या राहत्या घरातुन / जागेतुन हकलुन त्यांच्याच देशात निर्वासिता सारखे जगण्यास भाग पाडण्यात आले तेव्हा कुठे गेली होती ही सहिष्णूता ? आमिर त्या काळात "गझनी" चे जिवन जगत होता काय ? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- बाहों में चले आओ, हमसे सनम क्या परदा... :- Ustad Imtiaz Ali Riaz Ali
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: shawshanky

काश्मिरात काय घडलं मग?

गामा पैलवान
Wed, 11/25/2015 - 13:24 नवीन
ओहोहो! बहुसंख्यांवर एव्हढी जबाबदारी असते का हो? मला माहीतंच नव्हतं. बरं झालं सांगितलंत ते. काश्मिरातल्या हिंदूंवर घरंदारं सोडून नेसत्या वस्त्रानिशी निर्वासित व्हायची वेळ आली तेव्हा तिथल्या बहुसंख मुस्लिमांनी उचलली का काही जबाबदारी? -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: shawshanky

कडक

वेल्लाभट
Wed, 11/25/2015 - 16:08 नवीन
नाहीतर काय! जबाबदारी कसली आलीय? पुतिन चं स्पीच (जर ते खरंच पुतिनचं असेल तर) वाचा IN AUGUST Russian President Vladimir Putin addressed the Duma and gave a speech about the tensions with minorities in Russia. This is part of what he said. "In Russia, live like Russians. Any minority, from anywhere, if it wants to live in Russia, to work and eat in Russia, it should speak Russian, and should respect the Russian laws. "If they prefer Sharia Law, and live the life of Muslims, then we advise them to go to those places where that's the state law. Russia does not need Muslim minorities. Minorities need Russia, and we will not grant them special privileges, or try to change our laws to fit their desires, no matter how loud they yell 'discrimination'. "We will not tolerate disrespect of our Russian culture. We had better learn from the suicides of America, England, Holland and France, if we are to survive as a nation. "The Muslims are taking over those countries and they will not take over Russia." The politicians in the Duma gave Putin a five-minute standing ovation.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

च्यामारी!!

बाजीप्रभू
गुरुवार, 11/26/2015 - 08:52 नवीन
च्यामारी!! हाच मेसेज वॉट्स अॅपवर ऑस्ट्रेलियाच्या माजी पंतप्रधान जुलिया रॉबर्टच्या नावे फिरतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

जूलिया गिलार्ड म्हणायचे आहे

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 11/26/2015 - 08:58 नवीन
जूलिया गिलार्ड म्हणायचे आहे का आपणाला? जूलिया रॉबर्ट्स ही एक अभिनेत्री आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीप्रभू

सॉरी!!

बाजीप्रभू
गुरुवार, 11/26/2015 - 10:20 नवीन
अरे हो!! लिहायच्या धांदलीत चूक झाली. जुलिया गिलार्डच लिहायचं होत मला…सॉरी!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

ते जरा

इरसाल
गुरुवार, 11/26/2015 - 17:39 नवीन
राँबर्ट म्हणजे रॉमबर्ट अस लिहा नायतर मिपावर हा प्रतिसाद माफ नाय तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीप्रभू

रॉमबर्ट कुठून काढलं? ते

बॅटमॅन
गुरुवार, 11/26/2015 - 17:50 नवीन
रॉमबर्ट कुठून काढलं? ते राँर्बट असं पाहिजे. काही म्हणून सांगायची सोय नै राहिली तुम्हांला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

ओहो

इरसाल
Fri, 11/27/2015 - 10:19 नवीन
अहो उच्चारबरहुकुम समजावा म्हणुन आधी राँबर्ट लिहुन कसा उच्चारावा हे समजण्यासाठी ते बोहोरीहीकहर सारखं केलय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

बरोबर, पण ते राँबर्ट नसून

बॅटमॅन
Fri, 11/27/2015 - 15:15 नवीन
बरोबर, पण ते राँबर्ट नसून राँर्बट आहे. अंमळ दुरुस्ती तेवडीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

आमी

इरसाल
Fri, 11/27/2015 - 15:19 नवीन
काय जी़वन्भौंची बरोबरी नाय करु शकत (इथे कानाच्या पाळीला हात लावला गेला आहे हे अध्यरुत हं).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

२००

बॅटमॅन
Fri, 11/27/2015 - 15:23 नवीन
त्ये बाकी खरंच म्हना. कोनीबी बराबरी नाय करु शकत तेंची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

टोकाचे विचार करणार्‍यांना

माहितगार
Wed, 11/25/2015 - 13:34 नवीन
टोकाचे विचार करणार्‍यांना त्यांच्या जबाबदार्‍या समजणे अवघड असतेच पण तथाकथित सेक्युलरांना आपण बोलताना निष्पक्षता बाळगण्याची काळजी घ्यावयास हवी हि जबाबदारी समजण्याची अपेक्षा अधिक असते हे लक्षात घेतले जावयास नको काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: shawshanky

त्यामुळे साहजिकच

प्रसाद१९७१
Wed, 11/25/2015 - 13:34 नवीन
त्यामुळे साहजिकच अल्पसंख्यांकांना विश्वासात घेण्याची हिंदू नागरिकांवर येणारी जिम्मेदारी पण मोठीच असते
कारण काय?
हि जिम्मेदारी आपण किती विश्वासाने आणि काळजीपूर्वक निभावतो त्यावरच आपण (हिंदू) किती सहिष्णू आहोत हे सिद्ध होते.
कशाला सहिष्णु वगैरे सिद्ध करायचे? आमिर, शारुख वगैरे मंडळींना जे इथे मिळाले आहे ते जगात कुठल्याही मायनॉरीटी मधल्या माणसांना मिळणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: shawshanky

घंटा

गॅरी ट्रुमन
गुरुवार, 11/26/2015 - 10:19 नवीन
भारतात हिंदू जास्त आहेत त्यामुळे साहजिकच अल्पसंख्यांकांना विश्वासात घेण्याची हिंदू नागरिकांवर येणारी जिम्मेदारी पण मोठीच असते.
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: shawshanky
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा