एकसष्ठी , शाळकरी मित्र भेट आणि मुंपुमुं
लेखनप्रकार (Writing Type)
कालच एका विलक्षण जोगायोगाला सामोरा गेलो.
हो हो जोगा योगाचा अर्थ सांगतो जुळवलेला योग आणि नंतर आपोआप आलेला योगायोग.
त्याचे असे झाले नातेवाइकांमधील एक एका दूरच्या नातेवाईकांची एकसष्ठी कार्यक्रम होता.पुण्याच्या दक्षीण भागात. अनायसे लेकाला दिवाळीची सुट्टी मग त्याला एखादा सिनेमा दाखवावा हा कार्यक्रम झाल्यावर.त्या अनुषंगाने राहुल सिनेमाग्रुहात तिकिटे आरक्षीत केली आणि सक्काळी व्हाया (तुळशीबाग: फक्त चहा पावडर खरेदी व लेकासाठी चाम्डी कंबरपट्टा - पक्षी बेल्ट )खरेदी करून.
अता कार्यक्र्माची वेळ सकाळी दहाची आणि कार्यक्रम स्थळी मी , मुलगा आणि उत्सवमुर्ती कुटुंब इतकेच होतो. हळूहळू शिस्तीत (आणि सुस्तीत) उपस्थीती वाढू लागली.मधल्या वेळात जर कार्यक्रम लवकरच म्हणजे १-३० पूर्वी आटोपला तर शाळूसोबती
(ज्यांचे बरोबर गेल्याच महिन्यात तब्बल ३३ वर्षांनी भेट झाली आणि त्यांचेबरोबर स्नेहसंमेलनात सहभागी झालो)त्यातल्या काही नगांना भेटण्याचा मानस होताच. कसंकायप्पा क्रिपेने माहीती पाठवून (गडावर वार्ता) कळविली आणि मी कार्यक्रम च्या सभाग्रुहात स्थानापन्न झालो. जुजबी बोलण्यानंतर विरंगुळ्यासाठीच मोबल्याचा शोध लागला आहे, या संधीचा पुरेपूर फायदा उचलीत असतानाच.सत्कार मूर्तींच्या गुणगौरवाचा स्मारंभ समारंभ (पक्षी भाषण) सुरू झाले आणि त्यांच्या कन्येच्या वाक्याने मोबल्यातून बाहेर येऊन लक्ष्य देणे भाग पाडले. "मला बाबांनी कधीही तू मुलगी म्हणून असा दुजाभाव केला नाही,शिक्षणाचे बाबत आणि करिअरचे न बाबत पूर्ण स्वातंत्र्य दिले. रूढार्थाने वेङले वेगळ्या अश्या संस्क्रुत भाषेच्या अभ्यासास प्रोत्साहन दिले आणि खंबीर पाठींबा दिला. त्यामुळेच पुढे मी संस्कृतच्या अध्ययनास वाहून घेतले आणि माझा आवचा विषय शिकविण्याचे ध्येय पुरे करू शकले" त्यानंतर पोटपूजा करून मोर्चा शाळू सोबत्यांच्या परिसराकडे वळविला, फोना फोनी करून दोन मोहरे मिळविले दोन स्थानभ्रष्ठ असल्याने मिळाले नाहीत. त्यांनी मारलेल्या सलगीच्या हाका आणि केलेला प्रेमळ उद्धार पाहून आपला बाप ही
"शाळा गिरी"
करीत होता याची लेकाला खात्री पटली आणि तो निर्धास्त झाला.(त्याच्याशी दोस्ती आणखी वाढवायला हवी आता). मित्रांना "मला शिनुमाला जायचेय आणि तेही लेकाला घेऊन हे सांगीतले"(आणी त्यांचे आश्चर्य संपण्यापूर्वीच) आणि अर्ध्या तासाची भेट फक्त दीड तासात संपवली आणि तडक मोर्चा "राहुल"कडे वळविला. गर्दी आणि दर्दी बर्यापैकी, आपली जागा धुंडाळण्यात नवी पिढी भलतीच स्मार्ट आहे याचा पुनःप्रत्यय आला. आणि आसनस्थ झालो. पुढील अडीच-तीन तास मंतरलेले. उभी रेघ :- भाग दुसरा असला तरी पहिल्या इतकाच (थोडा जास्तच ) सरस.मेलो ड्रामा टाळला आहे
- आपल्याला काय मांडायचे आहे त्याचे लेखकाला आणि दिग्दर्शकाला भान आहे आणि कुठेही गोंधळ संभ्रमावस्था नाही.
- खटकेबाज आणि चुरचुरीत संवाद.
- सर्व व्यक्तीरेखांना न्याय द्यायचा प्रयत्न केला आहे.
- "मितवा" सारखी शाहरूखगिरी टाळली आहे.
- संवाद फेकीत अगदी उस्फुर्तता हे बलस्थान.
- चित्रपट कथा एखादा "खून" प्रेक्षकांसमूर समोरच झालेला असूनही कथानायक त्याचा कसा रहस्य्भेद करतो त्याची उत्सुकता असते आणि तो चित्रपटात गुंततो तेव्हढीच उत्सुकता नायीका नायकालाच मिळणार हे माहीत असूनही प्रेक्षकांना गुंतवीते.
- आपण नक्की कशाला अवाजवी महत्व देतोय ह्याची नायीकेला "जाणीव" करून देताना नायक कुठलाही "भावनीक-शब्दबंबाळ" आक्रस्ताळी भाव करीत नाही.
- जो काही निर्णय घ्यायचा तो तूच घे, आणि चुकीचा निर्णय घेण्यापेक्षा वेळीच काहीही निर्णय न घेणे हेच जास्त अविचारी+घातक आहे. हे सौम्य शब्दात समजावतो.
- रूढार्थाने एक खलनायक-कौटुंबीक कट कारस्थान-गुलाबी स्वप्ने-कुतरओढ-त्याग असा कुठलाही साचेबंद मसाला वाटलेला नाही.
- आणि तरीही कथा चटपटीत आणि प्रवाही ठेवली आहे.
- मावशीचे दुख: एका वाक्यात दाखविले आहे. तीच्या आयुष्यातील "एकटेपणा आणि आलेला फोलपणा" पुरेसा ठसला नाही.
- नायीकेचे वडील मुलीला अगदी मित्रासमान वागतात तरी ती कायम त्यांना शेवटपर्यंत अंधारात का ठेवते हे समजत नाही.
- नायकाचे वडील मित्र असल्याने जरा जास्तच मोकळे ढाकळे दाखविले आहेत. ते प्रेक्षकांच्या कितपत पचनी पडतील हे माहीत नाही. (हिंदी सिनेमातील ग्रुहीतके+आचार विचार मराठीत चालत नाहीत असे पूर्वसूरी म्हणतात) आम्हाला माहीत नाही.
- नायीकेचा पूर्वाष्र्श्रमीचा दोस्त कम प्रियकर हाही जरा गोंधळीच दाखविला आहे.
शिव्या आणि ओव्या स्वागतार्ह आहेत
प्रतिक्रिया
परिक्षण आवडले..
नाखुश्टाइल मिसळ तर्री मारून.
+१ एकद्म चपखल प्रतिसाद !
+२
मस्तच ओ नाखुनकाका.
नाखुकाका
भारी ष्टाईल.
मस्त परीक्षण. पहिला खूप
परिक्षण वेगळ्या ष्टाईलीत
मुंपुमुं
हां हां. आत्ता समजलं. आधी ते
परीक्षण छानच, पण बघेन असे
+१
अगदी अगदी. लघुगुरु! तसाही तो
कुठल्याशा मुलाखतीत लघुगुरुने
ठ्ठो =))
ओव्याच फक्त
बघणारे. स्वजो त्रासदायक आहे
स्वजो त्रासदायक आहे (महागुरुंसारखाच)
छान लिहिलंय
असोच.
मस्त लेख...
टिव्हीवर बघावा हे उत्तम
एकदम सुंदर परिक्षण. एक वेळ
सर्व