.

अंदमान - एक अविस्मरणीय सफर -१

Primary tabs

तिमा's picture
तिमा in भटकंती
3 Nov 2015 - 10:26 pm

भाग २: http://www.misalpav.com/node/33589

अंदमानला एकदा तरी जायचेच, असे बरेच दिवस मनाशी ठरवले होते. तो योग नेमका या आक्टुंबरात आला.महिन्याच्या शेवटच्या आठवड्यांत मुंबई ते चेन्नई आणि चेन्नई ते पोर्ट ब्लेअर, असा प्रवास करत, सकाळी ८ वाजता निघालो ते दुपारी पावणेदोनच्या सुमारास पोर्ट ब्लेअरला उतरलो. तिथे एकाच्या हातात आमच्या नांवाचा फलक बघताच जीव भांड्यात पडला. सहल आयोजक अतिशय सुस्वभावी आणि उत्तम सेवा देणारा मिळणे, हेही भाग्यात असावे लागते. ते तसे आहे हे जाणवताच आणखीनच रिलॅक्स झालो. पहिल्या दिवशी फार वेळ नसल्याने, रुमवर फ्रेश होऊन, लगेचच कॉर्बिन्स कोव्ह या पोर्ट ब्लेअरच्याच एका जवळच्या बीचवर गेलो. दुपारी ३ ते ५ असा चांगला वेळ गेला. सायंकाळी ५ वाजताच सूर्यास्त झाल्याने कोजागिरीच्या चंद्राचा आनंद घेता आला.

कॉर्बिन्स बीचचे काही फोटो
१.
Corbyn's cove

२.
Corbyn's cove

३.
Corbyn's cove

४. तोच चंद्रमा नभांत
Corbyn's cove
त्यानंतर, गाडी लगोलग सेल्युलर जेलकडे वळवली. पण त्या दिवशी जेल बंद असल्याने फक्त 'लाईट आणि साऊंड शो' बघितला. तो अगदी अवश्य बघण्यासारखा आहे. सावरकरांसारखेच बंगाल आणि पंजाब मधले असंख्य क्रांतिकारक या तुरुंगात होते आणि त्यातले काही तर तिथेच छ्ळवणुकीला बळी पडले. जेलचा इतिहास आणि त्यावेळची आतली परिस्थिती, अगदी जिवंतपणे तुमच्या समोर उभी करतात तेंव्हा अंगावर काटा उभा रहातो.
दुसर्‍या दिवशी सकाळी ६ वाजता निघायचे होते. पण तिकडे चार साडेचारलाच कोंबडे आरवायला सुरवात झाली. सकाळी ८ वाजता नाश्ता आटोपून ठीक ९ वाजताची बोट गांठली. एक तासाचा प्रवास करुन आम्हाला नॉर्थ बे आयलंडला नेण्यांत आले.

५.
नॉर्थ बे कडे जाताना
North Bay

६. जेटी
jetty

७. नॉर्थ बे आयलंड
North Bay

तिथे मोठी बोट किनार्‍यापर्यंत नेत नाहीत(कारण खालचे प्रवाळ त्याने खराब होते). त्यामुळे एक किलोमीटर आधीच आम्हाला एका छोट्या होडीत बसवण्यांत आले.त्या बोटीच्या तळाला मॅग्निफायिंग कांच बसवण्यांत आली होती. वर ऊन होते, म्हणून आमच्या सर्वांच्या डोक्यावर मिळून एक काळे प्लास्टिक पांघरले. पुढच्या २० मिनिटांत आम्हाला अत्यंत सुंदर कोरल्स बघायला मिळाले. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या कोरल्सशी तोंडओळख तरी झाली. त्यानंतर आमच्या चॉईस प्रमाणे आम्हाला स्कुबा डायव्हिंग साठी नेण्यांत आले. कपडे बदलण्यासाठी तिथे छोट्या पत्र्याच्या रुम्स आहेत आणि जवळचे मौल्यवान सामान ठेवण्यासाठी लॉकर देखील!
त्या छोट्या खोलीत तो स्कुबाचा वन पीस घालताना माझी अवस्था अगदी कपड्यांच्या दुकानातल्या ट्रायल रुम सारखीच झाली. त्यातून मागचे झिप लागेचना! शेवटी तशाच अवस्थेत बाहेर येऊन एकाकडून ते झिप लावून घेतले.बाहेर चिक्कार महिला वर्ग बसला होता. पण त्यांना या साठीपार बुढ्ढ्याकडे बघण्यात इंटरेस्ट नव्हता आणि त्या बुढ्ढ्यानेही लाज कधीच सोडून दिली असल्यामुळे, काही प्रश्न निर्माण झाला नाही. आम्ही दोघंही म्हातारा-म्हातारे त्या तसल्या ड्रेसमधे डुगुडुगु चालत, कासवे जशी पाण्याकडे जातात तसे पाण्यांत उतरलो. इतरांचे ट्रेनिंग चालू असल्याने आणि त्या दिवशी इन्स्ट्रक्टर लोक कमी असल्याने, आम्हाला आमचा नंबर येईपर्यंत पाण्यांत डुंबण्याचा सल्ला मिळाला.
साधारण पाऊणतास पाण्यांत डुंबल्यावर आमचे ट्रेनिंग सुरु झाले. मास्क चढवून आणि मागे ऑक्सिजन सिलिंडर लावून, तोंडानेच श्वास-उच्छवासाची क्रिया जमायला थोडा वेळ लागला. पाण्याखाली तोंड बुडवून तसा सराव केल्यावर दोन माणसांनी आमची बखोटी धरुन, आम्हाला पाण्याखाली नेले. खालचे दृश्य पाहिले आणि आम्ही थरारलो. पुढचा अर्धा तास, खालचे अविस्मरणीय जिवंत कोरल्स आणि रंगीबेरंगी मासे बघण्यांत कसा गेला ते कळलेच नाही. ते हलणारे, आपल्या चाहुलीने स्वतःला मिटून घेणारे, वेगवेगळ्या आकाराचे कोरल्स पाहून डोळ्यांचे पारणे फिटले. आमचे अंडर वॉटर फोटो काढून त्याची एक सीडीही करुन देण्यांत आली. बाहेर आल्यावर तो स्पेशल सूट अंगापासून वेगळा करायला, पुन्हा एकदा लोकांची मदत घ्यावी लागली. सगळे आवरेपर्यंत थोडा उशीर झाला. आमची बोट वाट पहात उभी होती. बोटीवरचा माणूस आम्हाला शोधायला आला होता. बोटीत बसल्यावर आमचा प्रवास रॉस आयलंडकडे सुरु झाला.

क्रमशः

प्रतिक्रिया

ट्रेड मार्क's picture

3 Nov 2015 - 10:47 pm | ट्रेड मार्क

फोटो पण छान आलेत. कोरलचे फोटो बघायला मिळाले असते तर अजून मजा आली असती.

शिव कन्या's picture

5 Nov 2015 - 10:54 pm | शिव कन्या

आम्ही पण पायले असते कोरल्स!

जातवेद's picture

3 Nov 2015 - 10:57 pm | जातवेद

सुंदर वर्णन. फोटोंची राळ उडवून द्या. पुभाप्र.

जगप्रवासी's picture

4 Nov 2015 - 12:06 pm | जगप्रवासी

छान सफर

अभ्या..'s picture

4 Nov 2015 - 12:08 pm | अभ्या..

मस्त ट्रीप तिमाजीपण्त.

कोरलचे फोटो खरेच हवे होते.

पद्मावति's picture

4 Nov 2015 - 12:11 pm | पद्मावति

खूप छान सफर. पु.भा.प्र.

छान सफर पुभाप्र.

आमचीपण शॉर्ट अंदमान सहल - http://www.misalpav.com/node/20137

मस्त सफर! स्कुबा डायव्हिंग मजेशीर असते. प्रवाळांचे फोटो असतील तर अवश्य टाका ही विनंती.

टवाळ कार्टा's picture

4 Nov 2015 - 8:14 pm | टवाळ कार्टा

मस्त

अंदमान खूपच सुंदर ठिकाण आहे, लग्नानंतर हनिमून साठी तिकडे जाणे झाले. अप्रतिम ठिकाण आहे.

सकाळी ५. ३० ला सूर्योदय आणि संध्याकाळी ५.३० ला अंधार , मजेशीर

नयनरम्य आणि स्वछ समुद्र किनारे, शांतता … अगदी अप्रतिम

मित्रहो's picture

4 Nov 2015 - 9:06 pm | मित्रहो

अंदमान खरच सुंदर आहे. फोटो तर एकदम मस्त आलेत. स्कूबा डायव्हींगचे फोटो येउ द्यात

आतिवास's picture

4 Nov 2015 - 9:59 pm | आतिवास

अंदमानच्या आठवणी जाग्या झाल्या या लेखाने.

तिमा's picture

5 Nov 2015 - 9:00 pm | तिमा

स्कुबा डायव्हिंगचे फोटो फारच धूसर आल्यामुळे देता येत नाहीत.

प्रीत-मोहर's picture

5 Nov 2015 - 9:05 pm | प्रीत-मोहर

मस्त्त्त्त

यशोधरा's picture

5 Nov 2015 - 9:13 pm | यशोधरा

अरे! झकास फोटो आणि वर्णन!

श्रीरंग_जोशी's picture

6 Nov 2015 - 3:17 am | श्रीरंग_जोशी

उत्तम सुरुवात झाली आहे प्रवासवर्णन मालिकेची.
पुभाप्र.

नाखु's picture

6 Nov 2015 - 10:19 am | नाखु

फोटो आणि साक्षेपी वर्णन.
हरकत नसेल तर सहल आयोजकांचा संपर्क क्र्मांक आणि नाव इथे धाग्यात देऊ शकाल काय? आणि किती दिवस आधी आरक्षण करणे गरजेचे आणि भेट देण्यास योग्य ऋतु याबद्दल पुढील भागात माहीती द्यावी ही विनंती.

जीवनातल्या (करणे अनिवार्य ) या यादीत अंदमान भेट आहे म्हणून ही आग्रही विचारणा.