दोन लघुतमकथा .

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
3 Nov 2015 - 7:14 am

दोन लघुतमकथा ..
..........................

१)एका लहानशा खेड्यात तो एकान्तवासांत राहतं होता...
साथीला त्याचा लाडका इमानी कुत्रा...
पुढे तो महानगरात शिफ्ट झाला..
महानगर म्हणजे वेगवान जीवन..माणसांची गर्दी..
तो हळूहळू माणसात मिसळू लागला...
जस जसा तो माणसात मिसळू लागला संवादु लागला....
तसतसे त्याला आपला लाडका कुत्रा जास्त आवडू लागला
.........
२)तरुणपणीच त्याला असाध्य अश्या हृदय विकाराचा रोग मागे लागला..
सकाळ दुपार संध्याकाळ गोळ्या घेत आयुष्य कंठत होता....
आईस खूप काळजी वाटायची. तो कंटाळा करायचा म्हणून आई त्याला आठवणी ने गोळ्या देत असे..गोळ्या घेण्याची आठवण करून देत असे...
.
कामानिमित्त त्याला प्रथमच परदेशी जावे लागले....
विमानाने उड्डाण घेतले व एअर होस्टेस त्याच्या जवळ आली व म्हणाली..." थेट मागच्या सिटवर तुमची आई बसली आहे तिने मला तुम्हाला निरोप द्यायला सांगितले की परदेशी निघाला आहेस औषधाच्या गोळ्या न चुकता घे म्हणून.." व ति निघून गेली...
त्याने पाऊच मधून गोळी काढली व घेतली..व त्याच्या डोळ्यांना अश्रूंची धार लागली..
.
आईचा मृत्यू होऊन आता वर्ष लोटले होते..
असो जिवंत वा मृत ......आई तुमची कायम काळजी घेत असते

कथा

प्रतिक्रिया

मांत्रिक's picture

3 Nov 2015 - 8:18 am | मांत्रिक

सलाम अ.कु. बुवा! अगदी हृदयस्पर्शी!

खेडूत's picture

3 Nov 2015 - 8:20 am | खेडूत

मस्त कथा- आवडल्या हो अक्कुकाका...!

देशपांडे विनायक's picture

3 Nov 2015 - 9:02 am | देशपांडे विनायक

=++११

मोगा's picture

3 Nov 2015 - 9:22 am | मोगा

.

सतिश गावडे's picture

3 Nov 2015 - 9:27 am | सतिश गावडे

पहीली कथा काळजाला भिडली आणि दुसरी कथा काळीज भेदून आरपार गेली.

जातवेद's picture

3 Nov 2015 - 7:42 pm | जातवेद

+१११११

मुक्त विहारि's picture

3 Nov 2015 - 9:52 am | मुक्त विहारि

(अकू ह्यांच्या कथांचा फॅन) मुवि

नाखु's picture

3 Nov 2015 - 12:45 pm | नाखु

तीर्या-चव्व्या काढल्यावर एक पण हुकुमाचाच एक्का काढणारे अकु.

कथा आवडल्या !!!!

पीशिम्पी's picture

3 Nov 2015 - 6:04 pm | पीशिम्पी

निशव्द..

पहीली कथा काळजाला भिडली आणि दुसरी कथा काळीज भेदून आरपार गेली.++++++++१००००००००

परिकथेतील राजकुमार's picture

3 Nov 2015 - 10:36 pm | परिकथेतील राजकुमार

अकु व्हिआरएस देऊ का तुम्हाला?

बिपिन कार्यकर्ते's picture

3 Nov 2015 - 11:17 pm | बिपिन कार्यकर्ते

नेकी और पूछ पूछ?

अभ्या..'s picture

3 Nov 2015 - 11:21 pm | अभ्या..

नको. व्हीआरेसवाल्या रिकामटेकड्यांचा लै तरास.

प्यारे१'s picture

3 Nov 2015 - 11:25 pm | प्यारे१

भातखाऊ!

अभ्या..'s picture

3 Nov 2015 - 11:51 pm | अभ्या..

का बे नळीचोख