दोन लघुतमकथा ..
..........................
१)एका लहानशा खेड्यात तो एकान्तवासांत राहतं होता...
साथीला त्याचा लाडका इमानी कुत्रा...
पुढे तो महानगरात शिफ्ट झाला..
महानगर म्हणजे वेगवान जीवन..माणसांची गर्दी..
तो हळूहळू माणसात मिसळू लागला...
जस जसा तो माणसात मिसळू लागला संवादु लागला....
तसतसे त्याला आपला लाडका कुत्रा जास्त आवडू लागला
.........
२)तरुणपणीच त्याला असाध्य अश्या हृदय विकाराचा रोग मागे लागला..
सकाळ दुपार संध्याकाळ गोळ्या घेत आयुष्य कंठत होता....
आईस खूप काळजी वाटायची. तो कंटाळा करायचा म्हणून आई त्याला आठवणी ने गोळ्या देत असे..गोळ्या घेण्याची आठवण करून देत असे...
.
कामानिमित्त त्याला प्रथमच परदेशी जावे लागले....
विमानाने उड्डाण घेतले व एअर होस्टेस त्याच्या जवळ आली व म्हणाली..." थेट मागच्या सिटवर तुमची आई बसली आहे तिने मला तुम्हाला निरोप द्यायला सांगितले की परदेशी निघाला आहेस औषधाच्या गोळ्या न चुकता घे म्हणून.." व ति निघून गेली...
त्याने पाऊच मधून गोळी काढली व घेतली..व त्याच्या डोळ्यांना अश्रूंची धार लागली..
.
आईचा मृत्यू होऊन आता वर्ष लोटले होते..
असो जिवंत वा मृत ......आई तुमची कायम काळजी घेत असते
| लेखनविषय: |
|---|
मिसळपाव
प्रतिक्रिया
सलाम अ.कु. बुवा! अगदी
सलाम अ.कु. बुवा! अगदी हृदयस्पर्शी!
मस्त कथा- आवडल्या हो
मस्त कथा- आवडल्या हो अक्कुकाका...!
=++११
=++११
छान
.
पहीली कथा काळजाला भिडली आणि
पहीली कथा काळजाला भिडली आणि दुसरी कथा काळीज भेदून आरपार गेली.
+१११११
In reply to पहीली कथा काळजाला भिडली आणि by सतिश गावडे
+१११११
दोन्ही कूट कथा आवडल्या....
(अकू ह्यांच्या कथांचा फॅन) मुवि
चार-दोन
तीर्या-चव्व्या काढल्यावर एक पण हुकुमाचाच एक्का काढणारे अकु.
कथा आवडल्या !!!!
निशव्द..
निशव्द..
पहीली कथा काळजाला भिडली आणि दुसरी कथा काळीज भेदून आरपार गेली.++++++++१००००००००
अकु व्हिआरएस देऊ का तुम्हाला?
अकु व्हिआरएस देऊ का तुम्हाला?
नेकी और पूछ पूछ?
In reply to अकु व्हिआरएस देऊ का तुम्हाला? by परिकथेतील राजकुमार
नेकी और पूछ पूछ?
नको. व्हीआरेसवाल्या
In reply to अकु व्हिआरएस देऊ का तुम्हाला? by परिकथेतील राजकुमार
नको. व्हीआरेसवाल्या रिकामटेकड्यांचा लै तरास.
भातखाऊ!
In reply to नको. व्हीआरेसवाल्या by अभ्या..
भातखाऊ!
का बे नळीचोख
In reply to भातखाऊ! by प्यारे१
का बे नळीचोख