एक माणूस मिशी काढून..............
एक माणूस मिशी काढून शाळेमध्ये पोहचला
बघता बघता खिडक्यांमधून वर्गात जाऊन बसला.
वर्ग भरला मुलामुलींनी
सुरेख हसणे पानांमधूनी
हळूच पाही शाई सांडूनि,
बघते का ती मान वळवूनी!
हातचा राखून गणित चुकले
नजर चकवून भाषा हुकली
कितीक राजे आले गेले
इतिहासाच्या पानोपानी....
छंद जीवाला एकच लागे
रिबिनीमागचे भोळे कोडे!
इकडे तिकडे बघून झाले
मास्तर सगळे येऊन गेले
मधली सुट्टी चिंचा बोरे
मैदानावर सुटली पोरे.....
वर्गासहित उठून गेले
साधेभोळे हळवे कोडे!
भान आले, बाहेर आला....
एक मुलगा मिशी लावून शाळेबाहेर पडला
हरवलेले हळवे कोडे पुनःपुन्हा शोधित राहिला .
अनेक वेळा सहमत....
मस्त.....आवडली!
आवडली
जबरदस्त
सुरेख कविता.
जबरदस्त
आवडली कविता
मिशी इतकी आवडते? म्हैती नवतं!
फारच सुरेख!! धन्यवाद!!
इतके दिवस हा धागा वाचला
बिका, शाळा खुश!!
मी पण.
निसटली होती.
सहमत...
दोनही कविता उत्तम! खूप
झकास कविता
अरेच्या! अजून त्या मुलाबरोबर
मिशी हे रूपक घेऊन अलिकडे मी
वाचली .....
मस्तच!
मस्तच!
Pagination