नमस्कार मिपाकरांनो!
अनाहिताच्या पहिल्या अंकाला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता आजच्या जागतिक अन्न दिवसाच्या निमित्ताने हा रुची अंक घेऊन आपल्यासमोर येत आहोत. अनाहिताचा या वर्षातला हा दुसरा अंक! या अंकाबाबत काही सांगण्याआधी अनाहिता अंक वेगळा का काढतो आपण हे मिपाकरांना जाणून घ्यायला नक्कीच आवडेल! तर याचे मुख्य कारण आहे अनाहितांना लिहिण्याचा आत्मविश्वास येऊन त्यांना या निमित्ताने मिसळपावच्या मुख्य प्रवाहात सामिल होता येते. एरवी घर, मूल, करीअर या सर्वात गुरफटलेल्या असताना, अनेक जवाबदार्या एकटीने खांद्यावर झेलत असताना अनाहितांचा मिपावर सहभाग बर्याचदा वाचनमात्र असतो. अंकासाठी लिहिताना मात्र भरपूर वेळ घेऊन आवडत्या विषयावर लिहिता येते. त्यामुळे सर्वच अनाहितांना अंकात सहभागी होता येतं. काही जणांना प्रश्न आहे की मग अंक मिपाचा सर्वसमावेशक का नाही? तर अनाहितांचा अंकासाठीचा लेखनाचा उत्साह पाहता ते लवकरच शक्य होईल असं वाटतं. आत्ताच्या अनाहिता अंकाच्या निमित्ताने आम्ही स्वतंत्रपणे काय करू शकतो हे अनाहितांना अजमावता येतंय. याचे परिणाम नजिकच्या भविष्यात मिपावरच्या सर्वसमावेशक अंकातल्या अनाहितांच्या जास्तीतजास्त सहभागाने दिसायला लागेल अशी आशा, इच्छा आणि महत्त्वाकांक्षा नक्कीच या अंकांच्या निमित्ताने आम्ही व्यक्त करू पाहतोय.
आता बोलू रुची विशेषांकाबद्दल! मागच्या महिला दिन विशेष अंकानंतर अनाहितात पुढचा अंक कसा असावा, या अंकातल्या त्रुटी या सर्वांचा आढावा घेण्यात आला. त्यादरम्यान सानिकाने ही रुची विशेषांकाची कल्पना सुचवली आणि अनाहिता उत्साहाने भारल्या गेल्या. विशेष म्हणजे नव्याने अनाहितात सामिल झालेल्या मैत्रिणीही तितक्याच आनंदाने सामील झाल्या. वेगवेगळे विषय सुचवले गेले. या अंकाचं स्वरूप नुसता पाककृती असणारा अंक असा नको होता तर अन्न हे पूर्णब्रम्ह हे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य दाखवणारा हवा होता. अन्न ही माणसाची मूलभूत गरज. त्या गरजेचे आपण विविध रुचींमध्ये रुपांतर केले. अगदी आपल्या देशात, राज्यातदेखील विविध प्रांताच्या रुची वेगवेगळ्या आहेत. अशा या पारंपारिक ते आधुनिक असा रुचीचा वैविध्यपूर्ण पट या अंकाच्या निमित्ताने उलगडलाय.
आजच्या ग्लोबल व्हिलेजच्या जमान्यात आपण जगाच्या निरनिराळ्या भागात रहाणारी माणसं, आपोआपच राहत्या ठिकाणाच्या खाद्यसंस्कृतीशी परिचित होतो. अशा विविध देशात राहणार्या आपल्या अनाहिता तिथली खाद्यसंस्कृती या अंकाच्या निमित्ताने पेश करत आहेत. तसंच कोकणापासून ते विदर्भ, मराठवाड्याच्या खाद्यसंस्कृतीतल्या अनवट पाककृती खास तिथली चव घेऊन हजर आहेत! आपल्याकडे सणावाराला, लग्नाला पंगतीतल्या जेवणाचे विशेष महत्व! अगदी संत एकनाथांनाही रुक्मिणी स्वयंवरात पंगतीतल्या विविध खाद्यपदार्थांची वर्णने करायचा मोह सुटलेला नाही! या अंकात आपण त्या काळातल्या पंगतीचे सुरेख वर्णन वाचू शकाल. ग्लोबल सरमिसळीमुळे विविध देशांचे पदार्थ आपल्या खाण्यात महत्वाचे स्थान पकडून बसायला लगले आहेत. त्या पदार्थांमागचा रोचक इतिहास काही लेखात जाणून घेता येईल. अजुन एक विभाग आहे तो आपले मराठी पध्दतीच्या मेजवानीचे भरलेले ताट! यात ताटाभोवतीच्या महिरपीपासून ते डावी, उजवी बाजू सांभाळणारे पदार्थ, भात, सार, कढ्या, पोळ्या, गोडाचे पदार्थ ते मुखवास असे सर्व काही वाढून ठेवलेले आहे. सोबत गदिमांचे ताटावरचे सुरेख काव्यदेखील आहे! उन्हाळ्यातली वाळवणं आपल्या मराठमोळ्या ताटातले मानाचे स्थान. बर्याच वाळवणाच्या पदार्थांच्या पारंपारिक पाककृती अंकातल्या लेखात मिळतील. आंतरजालाच्या वापरामुळे अनेक सुगरणी आपापले रेसिपी ब्लॉग लिहू लागल्या. त्या वाचून स्वयंपाकातल्या टिप्स मिळवणे सोपे जाते. त्यामुळे हल्ली बरेच हौशी पाककलाकार हे ब्लॉग वापरतात. त्यांचा एक संग्रह अंकात वाचायला मिळेल. लहान बाळ ते वाढत्या वयाचे मूल सर्वांच्या भूकेच्या गरजा वेगवेगळ्या. या विषयावर अनाहितामध्ये धागा काढून चर्चा झालेल्या. अंकाच्या निमित्ताने अनाहितावरचा," आई मला भूक लागली" हा धागा संकलित करून खुला करत आहोत. मास्टर शेफप्रमाणे मिस्टरी बॉक्स, केक आर्टिस्टची मुलाखत ते कँपिंगला जातानाचे खाणे असे अजून बरेच काही रोचक या अंकात वाचायला आहेच! आहार आणि वाढते वजन यासंबधी माहिती देणारा लेख आणि आहारतज्ञांची मुलाखत हे सर्व पाककृती वाचून वाढलेल्या वजनाला दिलासा म्हणून आहेतच! या सर्वांबरोबर तोंडीलावणं म्हणून काही छानसे ललित लेख आहेत. अनाहितांनी केलेल्या खाद्यपदार्थांच्या फोटोंचा कोलाजदेखील आहे!
अंकासाठी इतक्या लोकांचा हातभार लागलाय की आभारप्रदर्शन केल्याशिवाय राहवत नाही हे खरं! या अंकाची कल्पना सुचवल्याबरोबर नीलकांतनी अनुमोदन देऊन उत्साह वाढवला. अभ्याने या अंकासाठी सुरेख बॅनर करुन दिले आहे. त्याचे आणि आपल्या तंत्रज्ञ प्रशांत आणि नीलकांतचे विशेष आभार. या अंकासाठी काही फोटोशॉपचे काम अमिपाकरांनी करून दिले आहे त्यांचेही आभार. आपापली करीअर, संसार, लहान बाळं सगळं सांभाळून अनेक जुन्या-नव्या अनाहितांनी या अंकासाठी साहित्य दिलंय. त्यांचे आभार नाही मानत, आमचा सगळ्यांचाच हा अंक आहे म्हणून!
तर मिपाकरांनो आमचा हा अंक जरूर वाचा, सुधारणा सुचवा, प्रोत्साहनपण द्याच!
कळावे, लोभ आहेच, वाढावा ही विनंती.
_____/\______
सानिकास्वप्निल अजया
वाचने
42315
प्रतिक्रिया
67
मिसळपाव
प्रतिक्रिया
अजया ताई आणि सानिका तुमचे ही
अगदी प्रत्येकीच्या मनातल्या भावना!
अजया, सानिका सगळ्याच्या
मस्त संपादकीय. आता हळु हळु
संपादकीय अगदी छान...अजयाताई
मस्त , अजया , सानिका तुमच्या
मस्त.४
चला प्रतिक्षा सम्पली एकदाची ,
अजयाताई,सानिका तुमचे खूप,खूप
मस्त झालाय अंक :) आता
अंक चाळत आहे. एकेक करुन
अनोकोनेक शुभेछा
नक्की!
In reply to अनोकोनेक शुभेछा by अमृत
फार छान कल्पना ! बागकाम
In reply to नक्की! by पैसा
अजया ताई आणि सानिका तुमचे खरच
आला आला..अंक आला.. :)
रुची अंक अगदी मस्त झालायं.
अभिनंदन!
ग्रेट जॉब.
संपादकीय लेख उत्तमच झालाय!
वा..
सुंदर !!!! :)
अजया नि सानिका
तुम्हा दोघींचेही अभिनंदन! खूप
छान दिसतोय अंक.मिसळपावची
उत्तम संपादकीय!
अंकात प्रत्यक्ष आणि
अंक आला
अजया ताई- सानिका खुपच सुन्दर
वाह मस्तच!! संपादकीय लेख खूप
संपादकीयने सुरुवात एकदम झकास झालीये
संपादकीय खूप छान झाले अहे.
संपादकीय लेखन अतिशय उत्तम झाले आहे.
अगदी मुद्देसूद संपादकीय आहे.
संपादकीय अगदी नेमके आणि
या अंकासाठी कष्ट घेतलेल्या
खूप अभिनंदन!!
सुरेख!
जोरदार
अभिनंदन आणि आभार
अभिनंदन
अजयाताई सानिका तुमचे खूप अभिनंदन!!
संपादकिय लेख मस्तच.विषय
हा अंक
अजयातै आणि सानिकातै
मिपासाठी इतका वैविध्यपूर्ण
संपादकीय सुरेख.
सर्व अनाहिता सुग्रणींचे या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शुभारंभ... :- Kai Po Che!उत्तम संपादकिय! माझी एक सूचना
उत्तम संपादकीय. दोघींनी खरच
बापरे! केवढा मोठा हा रुचीअंक!
अभिनंदन.
उत्तम संपादकीय! अजया, सानिका
संपादकीय खूप भावले
अतिशय सुरेख संपादकीय!!!!!
अजया आणि सानिका तुमचे अभिनंदन
सानि आणि अजया ताई तुमचे खूप
अगदी मनापासून लिहिलेले
उत्कृष्ठ अंक! +++१११
छान झाला आहे अंक. अभिनंदन.
अंक आवडला.
सुरेख झाला आहे अंक
आज संपूर्ण अंक वाचून झाला.
अंकासाठी मेहनत घेतलेल्या सर्वांचे आभार.
लवकरच पिडिएफ आवृत्ती देतोय
अंक उत्तम झाला आहे!!!
मस्त संपादकीय....