✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ल _ _

द
दमामि यांनी
गुरुवार, 10/15/2015 - 07:44  ·  लेख
लेख
ल _ _ तोंडात पान ठेवल्यासारखी ती शिवी तिनं दिली, एकदा... दोनदा... अनेकदा... मन भरेपर्यंत. तिथेच उभ्या असलेल्या मला अंगावरून काहीतरी ओलसर सरपटत गेल्यासारखं वाटत होतं. श्रीदुर्गापूजेचा आदला दिवस. रस्त्यांवर भरपूर ट्रॅफिक, गोंधळ. इतर पर्याय नसल्याने आणि लांब जायचे असल्याने बीईयेष्टी ने प्रवास करावा लागणार होता. दादरला बसमध्ये चढलो,, खचाखच गर्दी. आम्ही ४-५ जण बसच्या मागील बाजूस जेन्ट्सना उभे राहण्यासाठी हमखास जागा असते तिथे थांबलो होतो, बस थोडी पुढे गेली असेल तोवर मागून तिघींच एक वाचाळ मंडळ खिखीखुखू करत पुढे आलं. हिंदी भाषा बोलण्याच्या पध्दतीवरून वरून मराठी वाटत होते, त्यातील एकीने भरपूर (बोचकी) घेतली होती (त्यातल्या मोगऱ्याच्या वेण्यांचा सुवास पसरला होता). तिच्या बाजुचीला धड सरळ उभंही रहता येत नव्हतं, तिची गाडी अजून चालू न लागलेली सहज कळत होती. ती सरळ आमच्या जवळ येऊन रेलू लागली , अविर्भाव असा की बसच्या धक्क्यांमुळे चुकून तसं होतंय,आम्ही अजून डावीकडे सरकत होतो पण आता सरकायला जागाच नव्ह्ती. तिथल्या एका मुलाने गोडीत त्यांना .बायकाच्या राखीव जागी बसण्यास सांगितले , तेवढयापुरतं सरकल्यासारखं करून पुन्हा तिनं तोच प्रकार चालू ठेवला, बळेच धक्के देण्याचा. . इतर लोक नेहमीप्रमाणे सोयिस्कररीत्या बघ्याची भूमिका घेऊन गंमत बघत होते. पुढचे एक आजोबा तिला समज देत होते तर ती त्यांनाच वेड्यासारखे हातवारे करून दाखवीत होती . अशावेळेस पुरुष जास्त बोलू शकत नाहीत कारण समोरची घाबरून काय करेल, रडेल याचा नेम नसतो, त्यामुळे मी दुर्लक्ष करत होतो, त्यांच्याकडे पूर्ण पाठ करून मध्ये बॅग घेऊन उभा राहिलो होतो . त्या मुलालाही मी समजावत होतो की "जाऊ दे अजून थोडा वेळ. सवय आहे मला याची. उगीच नादी लागू नको." ती अजून बरळतच होती काही-बाही सुनावत होती. तेव्हाच कधीतरी डोकं सटकलेली ती शिवी देऊन मोकळी झाली .. ल _ _ कु _ _!! त्यानंतरही अजून काही बोलण्यासाठी, लक्ष वेधून घेण्यासाठी ती माझ्या हाताला स्पर्श करू पहात होती . मी आपल्याच संयमाची परिक्षा पाहत तिच्याकडे ढुंकूनही न पाहता स्थितप्रज्ञ उभा . त्यानंतर मात्र मला राहवेना. ती माझ्या हाताला चिकटलीच . मी त्या छोट्या गोड मुलीला उचलून घेतलं आणि तितक्यात अंगावरून काहीतरी ओलसर सरपटत गेल्यासारखं वाटलं . आकाशी शर्टावर मोठ्ठा ओघोळ दिसू लागला . तिची आई मात्र सारखी "लबाड कुठली " म्हणू लागली. ( कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. वाटलं तर एक डायपरची जाहिरात समजा.)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव

प्रतिक्रिया द्या
9700 वाचन

💬 प्रतिसाद (61)

प्रतिक्रिया

ह___

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/15/2015 - 07:47 नवीन
ह___
  • Log in or register to post comments

वाटच बघत होतो.

जव्हेरगंज
गुरुवार, 10/15/2015 - 08:01 नवीन
वाटच बघत होतो. शेवट अगागा!!! (पण, आपल्याकडून ह्यापेक्षा जबराटाची अपेक्षा होती, भावना दुखावण्याचा नादात हात आखडता घेतल्यासारखा वाटला):)
  • Log in or register to post comments

सकाळी जरा घाईतच वाचली होती.

जव्हेरगंज
गुरुवार, 10/15/2015 - 17:54 नवीन
सकाळी जरा घाईतच वाचली होती. आता पुन्हा वाचली. आणि खरा प्रकार समजला. खतरा जमलीय.(आधीच्या प्रतिसादासाठी माफी) आवडेश!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जव्हेरगंज

वां_

चांदणे संदीप
गुरुवार, 10/15/2015 - 08:08 नवीन
वां_
  • Log in or register to post comments

आवडल

प्रीत-मोहर
गुरुवार, 10/15/2015 - 08:12 नवीन
आवडल
  • Log in or register to post comments

धन्यवाद हो!

दमामि
गुरुवार, 10/15/2015 - 08:17 नवीन
धन्यवाद हो! स्पष्ट लिहिल्याबद्दल अजून एकदा धन्यवाद! नाहीतर इतर प्रतिसाद वाचून मी डोकं खाजवत बसलोय.:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

झ _ _

सतिश गावडे
गुरुवार, 10/15/2015 - 08:29 नवीन
नाहीतर इतर प्रतिसाद वाचून मी डोकं खाजवत बसलोय.:)
हे वाक्य "नाहीतर इतर प्रतिसाद वाचून मी डोकं खाजवत बसलेय.:)" किंवा "नाहीतर इतर प्रतिसाद वाचून आम्ही डोकं खाजवत बसलोय.:)" असंही लिहिता आलं असतं काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

कत्ती, आमी नाय बोल्नाल जा!

दमामि
गुरुवार, 10/15/2015 - 08:36 नवीन
कत्ती, आमी नाय बोल्नाल जा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

अच्चं नै कलायच्चं दमामि (दादा

प्रचेतस
गुरुवार, 10/15/2015 - 08:55 नवीन
अच्चं नै कलायच्चं दमामि (दादा, ताई, ताया....)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

=))

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/15/2015 - 10:09 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

चांगलंय !!

खटपट्या
गुरुवार, 10/15/2015 - 08:59 नवीन
चांगलंय !!
  • Log in or register to post comments

निरागस विडंबन! आवडलं!

अजया
गुरुवार, 10/15/2015 - 09:06 नवीन
निरागस विडंबन! आवडलं!
  • Log in or register to post comments

मस्त लेख

नाखु
गुरुवार, 10/15/2015 - 09:42 नवीन
और आने दो. हा टका कुठं गेलाय काही कळेना. शोधायचं राज्य आलेला नाखु
  • Log in or register to post comments

बसा. तुम्ही शोधत बसा आणि

प्यारे१
गुरुवार, 10/15/2015 - 10:02 नवीन
बसा. तुम्ही शोधत बसा आणि राज्य घेत बसा. सात वेळा धप्पा करून गेलंय ते टक्या तुम्हाला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

छान आहे.. आवडलं..!!

पिलीयन रायडर
गुरुवार, 10/15/2015 - 10:02 नवीन
छान आहे.. आवडलं..!!
  • Log in or register to post comments

भें _ _ मस्तय ;)

टवाळ कार्टा
गुरुवार, 10/15/2015 - 10:11 नवीन
भें _ _ मस्तय ;) बाकी कोणी मला "ल _ _ कु _ _" म्हणजे नक्की काय ते कळवेल काय
  • Log in or register to post comments

टक्कूमक्कूशोनू जरा

दमामि
गुरुवार, 10/15/2015 - 10:14 नवीन
टक्कूमक्कूशोनू जरा शेवटपर्यंत वाचायचे कष्ट घे की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

खि खि खि

टवाळ कार्टा
गुरुवार, 10/15/2015 - 10:46 नवीन
खि खि खि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

हुर्रॆ

चांदणे संदीप
गुरुवार, 10/15/2015 - 10:30 नवीन
हुर्रॆ….धतड ततड…! मी आलोच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आर्र…गल्ली चुकली!

चांदणे संदीप
गुरुवार, 10/15/2015 - 10:47 नवीन
आर्र…गल्ली चुकली! स्वारी बर्का! (तुमच चालू द्या… ल_ _ _ कु_ _ _ वैग्रे!)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

"ल _ _ कु _ _" म्हणजे काय?

हेमंत लाटकर
गुरुवार, 10/15/2015 - 10:28 नवीन
"ल _ _ कु _ _" म्हणजे काय? विचारात पडलेला मिपाकर.
  • Log in or register to post comments

लबाड कुठला!

मांत्रिक
गुरुवार, 10/15/2015 - 10:37 नवीन
लबाड कुठला! अरे देवा काय हे अज्ञान?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

मांत्रिकभौ, मिपाकर किती

दमामि
गुरुवार, 10/15/2015 - 10:51 नवीन
मांत्रिकभौ, मिपाकर किती निरागस असू शकतो हे तुमच्याकडं बघून कळतं, नाहीतर .....:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

जबराट

सौंदाळा
गुरुवार, 10/15/2015 - 10:40 नवीन
जबराट शेवटची कलाटणी तर बेहद्द आवडली ;)
  • Log in or register to post comments

पु__

बॅटमॅन
गुरुवार, 10/15/2015 - 10:54 नवीन
पु__
  • Log in or register to post comments

पुरष्या???

प्यारे१
गुरुवार, 10/15/2015 - 11:06 नवीन
पुरष्या???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

एकदम भारी!!!

असंका
गुरुवार, 10/15/2015 - 11:00 नवीन
एकदम भारी!!!
  • Log in or register to post comments

वरच्या प्रसंगातून एक मोठी

प्यारे१
गुरुवार, 10/15/2015 - 11:06 नवीन
वरच्या प्रसंगातून एक मोठी सामाजिक समस्या लेखक (की लेखिका हाय तू?) यांनी मांडलेली असून तिच्या उद्भवण्यामागे मुख्यत्वे आर्थिक कारण जे गरीबी हे दिसत असलं तरीसुद्धा व्यक्तीच्या जडणघडणीत भोवताल कसा कार्य करतो याचा मानस शास्त्रीय आढावा घेण्याची गरज आहे. आपल्या विधींची जाणीव नसण्याच्या वयात बरोबरच्या फुलवाल्या बाईकडून कधीतरी ऐकलेल्या वाईट शब्दांची अभिव्यक्ती त्या मुलीच्या मुखातून होते याचा अर्थ लहान मुलांची ग्रहण शक्ती ही जणू टीपकागदासारखी असते. निव्वळ मुलीच्या तोंडची ही भाषा हा तिच्या संस्कारांचाच भाग नसून त्या अनुषंगानं येणाऱ्या अनेकपदरी समस्येच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. मूळ लेखातल्या मूळ व्यक्तीबाबत हेच म्हणता येत असलं तरी निव्वळ कारणमीमांसा करून थांबता येत नाही कारण ती किंवा त्या व्यक्ती सामाजिक दृष्टया प्रौढ़ आहेत.
  • Log in or register to post comments

तुमचा प्रतिसाद वाचून आता

मांत्रिक
गुरुवार, 10/15/2015 - 11:10 नवीन
तुमचा प्रतिसाद वाचून आता कळायला लागलंय की मला कथा नक्कीच कळलेली नाही. पुन्हा वाचतो आता!!! तरी पण डोक्यात शिरेल असं वाटत नाही. व्यनि कराल?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

जमलय

मिनेश
गुरुवार, 10/15/2015 - 11:16 नवीन
जमलय विडंबन . =)) -दगडू माधव मिरजकर
  • Log in or register to post comments

+१

नाखु
गुरुवार, 10/15/2015 - 11:20 नवीन
आपलाच दमानी मागावी मिसळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिनेश

ल ---कु दमामि!

सालस
गुरुवार, 10/15/2015 - 11:26 नवीन
ल ---कु दमामि!
  • Log in or register to post comments

'येड्याची जत्रा' मधे सतिश

जातवेद
गुरुवार, 10/15/2015 - 11:34 नवीन
'येड्याची जत्रा' मधे सतिश तारे आमदार म्हणून उद्घाटनाला येतात तो प्रसंग आठवला. एक नंबर!
  • Log in or register to post comments

द- मामी....

बाबा योगिराज
गुरुवार, 10/15/2015 - 14:23 नवीन
आजची जिल्बी मस्त व्हती.... कुडुन् आन्लि वो....
  • Log in or register to post comments

आजची बोलविती धनीण कोण? =))

सूड
गुरुवार, 10/15/2015 - 14:37 नवीन
आजची बोलविती धनीण कोण? =))
  • Log in or register to post comments

सुडूक मुडूक गोणीत बेडूक

दमामि
गुरुवार, 10/15/2015 - 16:20 नवीन
सुडूक मुडूक गोणीत बेडूक मारतो उड्या टुणटुण सुडूक म्हणे धनिण कोण? आता सोडा की (ड)राव, अजून किती दिवस असा लिंगभेद करणार? त्या अनाहिता अर्थातच त्यांच्यात घेणार नाहीतच ( सांगतही नाहीत एन्ट्रीची पद्धत), आणि तुम्ही पण दूर लोटता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

ह्म्म.. मग इकडे आणि तिक़डेही

अस्वस्थामा
गुरुवार, 10/15/2015 - 17:54 नवीन
ह्म्म.. मग इकडे आणि तिक़डेही दूर लोटले जाणार्‍यांसाठी तुम्ही LGBT च्या धर्तीवर नवा विभाग (नाव?) मागून घ्यावा असे सुचवेन. काळजी करु नका. इकडचे इतर आणि तिकडच्या अनाहिता तुम्हाला नक्की समजून घेतील आणि तुमच्या या मागणीस नक्की पाठिंबा देतील याबद्दल खात्री बाळगा. (मज्जा म्हणून "दक्षिण बाग (south park)" मधला 'द सिस्सी' हा भाग पहा. धमाल आहे.. ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

द मामी, उत्तम विडंबन हो. :)

अस्वस्थामा
गुरुवार, 10/15/2015 - 14:40 नवीन
द मामी, उत्तम विडंबन हो. :)
  • Log in or register to post comments

कसं काय सुचतं ब्वा

आनंदराव
गुरुवार, 10/15/2015 - 14:47 नवीन
कसं काय सुचतं ब्वा
  • Log in or register to post comments

द मामी ची बोलविती धनीण कोण

बॅटमॅन
गुरुवार, 10/15/2015 - 14:50 नवीन
द मामी ची बोलविती धनीण कोण आहे ब्रे? पुरुषासारखे लिहिण्याचा अभ्यास बाकी बरा जमलाय =))
  • Log in or register to post comments

बस का बॅट्या, अजून नाय ओळखलं

दमामि
गुरुवार, 10/15/2015 - 16:08 नवीन
बस का बॅट्या, अजून नाय ओळखलं का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

a

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/15/2015 - 16:29 नवीन
पिंपरी व सोलापूर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

नाय बा ओळखलं. अता तुम्हीच

बॅटमॅन
गुरुवार, 10/15/2015 - 17:01 नवीन
नाय बा ओळखलं. अता तुम्हीच सांगा ब्रे ओळख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दमामि

_/\_

नीलमोहर
गुरुवार, 10/15/2015 - 14:56 नवीन
हे असंं काही १००% अपेक्षित होतं, बाकी मूळ लेखापेक्षा हे लेखन थोडं ओघळतं आणि प्रवाही आहे हे विशेष. ;) ' धन्य ' वाद !!
  • Log in or register to post comments

धन्यवाद!

दमामि
गुरुवार, 10/15/2015 - 16:09 नवीन
धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलमोहर

ड__

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/15/2015 - 15:41 नवीन
ड__
  • Log in or register to post comments

अ_ रां__ __दा स__!:क्ष**

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 10/15/2015 - 16:24 नवीन
अ_ रां__ __दा स__!:क्ष**
  • Log in or register to post comments

:)

पैसा
गुरुवार, 10/15/2015 - 16:52 नवीन
:)
  • Log in or register to post comments

अतिशय अस्वस्थ वाटलं लेख वाचुन

द-बाहुबली
गुरुवार, 10/15/2015 - 17:27 नवीन
अतिशय अस्वस्थ वाटलं लेख वाचुन... आपण काय करु शकतो अशावेळी ?
  • Log in or register to post comments

रोफल

दमामि
गुरुवार, 10/15/2015 - 17:38 नवीन
रोफल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा