Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by दमामि on गुरुवार, 10/15/2015 - 07:44
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
अनुभव
ल _ _ तोंडात पान ठेवल्यासारखी ती शिवी तिनं दिली, एकदा... दोनदा... अनेकदा... मन भरेपर्यंत. तिथेच उभ्या असलेल्या मला अंगावरून काहीतरी ओलसर सरपटत गेल्यासारखं वाटत होतं. श्रीदुर्गापूजेचा आदला दिवस. रस्त्यांवर भरपूर ट्रॅफिक, गोंधळ. इतर पर्याय नसल्याने आणि लांब जायचे असल्याने बीईयेष्टी ने प्रवास करावा लागणार होता. दादरला बसमध्ये चढलो,, खचाखच गर्दी. आम्ही ४-५ जण बसच्या मागील बाजूस जेन्ट्सना उभे राहण्यासाठी हमखास जागा असते तिथे थांबलो होतो, बस थोडी पुढे गेली असेल तोवर मागून तिघींच एक वाचाळ मंडळ खिखीखुखू करत पुढे आलं. हिंदी भाषा बोलण्याच्या पध्दतीवरून वरून मराठी वाटत होते, त्यातील एकीने भरपूर (बोचकी) घेतली होती (त्यातल्या मोगऱ्याच्या वेण्यांचा सुवास पसरला होता). तिच्या बाजुचीला धड सरळ उभंही रहता येत नव्हतं, तिची गाडी अजून चालू न लागलेली सहज कळत होती. ती सरळ आमच्या जवळ येऊन रेलू लागली , अविर्भाव असा की बसच्या धक्क्यांमुळे चुकून तसं होतंय,आम्ही अजून डावीकडे सरकत होतो पण आता सरकायला जागाच नव्ह्ती. तिथल्या एका मुलाने गोडीत त्यांना .बायकाच्या राखीव जागी बसण्यास सांगितले , तेवढयापुरतं सरकल्यासारखं करून पुन्हा तिनं तोच प्रकार चालू ठेवला, बळेच धक्के देण्याचा. . इतर लोक नेहमीप्रमाणे सोयिस्कररीत्या बघ्याची भूमिका घेऊन गंमत बघत होते. पुढचे एक आजोबा तिला समज देत होते तर ती त्यांनाच वेड्यासारखे हातवारे करून दाखवीत होती . अशावेळेस पुरुष जास्त बोलू शकत नाहीत कारण समोरची घाबरून काय करेल, रडेल याचा नेम नसतो, त्यामुळे मी दुर्लक्ष करत होतो, त्यांच्याकडे पूर्ण पाठ करून मध्ये बॅग घेऊन उभा राहिलो होतो . त्या मुलालाही मी समजावत होतो की "जाऊ दे अजून थोडा वेळ. सवय आहे मला याची. उगीच नादी लागू नको." ती अजून बरळतच होती काही-बाही सुनावत होती. तेव्हाच कधीतरी डोकं सटकलेली ती शिवी देऊन मोकळी झाली .. ल _ _ कु _ _!! त्यानंतरही अजून काही बोलण्यासाठी, लक्ष वेधून घेण्यासाठी ती माझ्या हाताला स्पर्श करू पहात होती . मी आपल्याच संयमाची परिक्षा पाहत तिच्याकडे ढुंकूनही न पाहता स्थितप्रज्ञ उभा . त्यानंतर मात्र मला राहवेना. ती माझ्या हाताला चिकटलीच . मी त्या छोट्या गोड मुलीला उचलून घेतलं आणि तितक्यात अंगावरून काहीतरी ओलसर सरपटत गेल्यासारखं वाटलं . आकाशी शर्टावर मोठ्ठा ओघोळ दिसू लागला . तिची आई मात्र सारखी "लबाड कुठली " म्हणू लागली. ( कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. वाटलं तर एक डायपरची जाहिरात समजा.)
  • Log in or register to post comments
  • 9700 views

प्रतिक्रिया

Submitted by दमामि on गुरुवार, 10/15/2015 - 17:46

Permalink

रिकाम्या जागा भरा

1 ह__ २ वां_ ३ झ_ _ ४ भें _ _ ५ पु__ ६ ड__ ७ अ _ रां __दा स _!क्ष ** सर्व उत्तरे अचूक देणाऱ्यास सहा वाजता वडा, सात वाजता भात आणि आठ वाजल्यापासून होसूमीयाघ देण्यात येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on गुरुवार, 10/15/2015 - 17:56

Permalink

टु__

टु__
  • Log in or register to post comments

Submitted by दमामि on गुरुवार, 10/15/2015 - 18:12

In reply to टु__ by जेपी

Permalink

सासं, हा शब्द सुद्धा वरच्या

सासं, हा शब्द सुद्धा वरच्या यादीत अॅड करा प्लीज.
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on गुरुवार, 10/15/2015 - 17:56

Permalink

टु__

टु__
  • Log in or register to post comments

Submitted by दमामि on गुरुवार, 10/15/2015 - 18:11

In reply to टु__ by जेपी

Permalink

सासं, हा शब्द सुद्धा वरच्या

सासं, हा शब्द सुद्धा वरच्या यादीत अॅड करा प्लीज.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on गुरुवार, 10/15/2015 - 19:55

In reply to सासं, हा शब्द सुद्धा वरच्या by दमामि

Permalink

आणखी एक भि_र_ _

आणखी एक भि_र_ _
  • Log in or register to post comments

Submitted by मित्रहो on गुरुवार, 10/15/2015 - 20:09

Permalink

माफ करा

एकदम भारी
  • Log in or register to post comments

Submitted by प्रसाद गोडबोले on गुरुवार, 10/15/2015 - 20:13

Permalink

छा _

कोणत्याही प्रकारचे स्वमतांध सरसकटीकरण नसल्याने लेखन आवडले :-)
  • Log in or register to post comments

Submitted by विद्यार्थी on गुरुवार, 10/15/2015 - 21:12

Permalink

हा हा हा!!!

तितक्यात अंगावरून काहीतरी ओलसर सरपटत गेल्यासारखं वाटलं . आकाशी शर्टावर मोठ्ठा ओघोळ दिसू लागला . तिची आई मात्र सारखी "लबाड कुठली " म्हणू लागली. अरेरेरे!!! बाहेर जाताना झाले का बाहेरून घरी? :-)
  • Log in or register to post comments

Submitted by बोका-ए-आझम on गुरुवार, 10/15/2015 - 21:23

Permalink

वा वा!

मामी द ग्रेट. अशी मामी सगळ्यांणा मिळो. णाही का लोक्स?
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on गुरुवार, 10/15/2015 - 21:39

Permalink

हम्म!

रच्याकने लांब म्हणजे कुठे डोंगरीला जायचे होते का?
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com