ल _ _
ल _ _
तोंडात पान ठेवल्यासारखी ती शिवी तिनं दिली,
एकदा... दोनदा... अनेकदा...
मन भरेपर्यंत.
तिथेच उभ्या असलेल्या मला अंगावरून काहीतरी ओलसर सरपटत गेल्यासारखं
वाटत होतं.
श्रीदुर्गापूजेचा आदला दिवस. रस्त्यांवर भरपूर ट्रॅफिक, गोंधळ. इतर पर्याय
नसल्याने आणि
लांब जायचे असल्याने बीईयेष्टी ने प्रवास करावा लागणार होता.
दादरला बसमध्ये चढलो,, खचाखच गर्दी. आम्ही ४-५ जण बसच्या मागील बाजूस
जेन्ट्सना उभे राहण्यासाठी
हमखास जागा असते तिथे थांबलो होतो, बस थोडी पुढे गेली असेल तोवर मागून तिघींच
एक वाचाळ मंडळ खिखीखुखू करत पुढे आलं. हिंदी भाषा बोलण्याच्या पध्दतीवरून वरून मराठी वाटत होते,
त्यातील एकीने भरपूर (बोचकी) घेतली
होती (त्यातल्या मोगऱ्याच्या वेण्यांचा सुवास पसरला होता). तिच्या बाजुचीला धड सरळ उभंही रहता येत नव्हतं, तिची गाडी अजून चालू न लागलेली सहज कळत होती.
ती सरळ आमच्या जवळ येऊन रेलू लागली , अविर्भाव असा की बसच्या धक्क्यांमुळे
चुकून तसं होतंय,आम्ही अजून डावीकडे सरकत होतो पण आता सरकायला जागाच नव्ह्ती.
तिथल्या एका मुलाने गोडीत त्यांना .बायकाच्या राखीव जागी बसण्यास सांगितले ,
तेवढयापुरतं सरकल्यासारखं
करून पुन्हा तिनं तोच प्रकार चालू ठेवला, बळेच धक्के देण्याचा. .
इतर लोक नेहमीप्रमाणे सोयिस्कररीत्या बघ्याची भूमिका घेऊन गंमत बघत होते.
पुढचे एक आजोबा तिला
समज देत होते तर ती त्यांनाच वेड्यासारखे हातवारे करून दाखवीत होती .
अशावेळेस पुरुष जास्त बोलू शकत नाहीत कारण समोरची घाबरून काय करेल, रडेल याचा नेम नसतो, त्यामुळे मी दुर्लक्ष करत होतो, त्यांच्याकडे पूर्ण पाठ करून मध्ये बॅग घेऊन उभा राहिलो होतो .
त्या मुलालाही मी समजावत होतो की "जाऊ दे अजून थोडा वेळ. सवय आहे मला याची. उगीच नादी लागू नको."
ती अजून बरळतच होती काही-बाही सुनावत होती.
तेव्हाच कधीतरी डोकं सटकलेली ती शिवी देऊन मोकळी झाली ..
ल _ _ कु _ _!!
त्यानंतरही अजून काही बोलण्यासाठी, लक्ष वेधून घेण्यासाठी ती माझ्या हाताला स्पर्श करू पहात होती .
मी आपल्याच संयमाची परिक्षा पाहत तिच्याकडे ढुंकूनही न पाहता स्थितप्रज्ञ उभा .
त्यानंतर मात्र मला राहवेना. ती माझ्या हाताला चिकटलीच . मी त्या छोट्या गोड मुलीला उचलून घेतलं आणि
तितक्यात अंगावरून काहीतरी ओलसर सरपटत गेल्यासारखं वाटलं .
आकाशी शर्टावर मोठ्ठा ओघोळ दिसू लागला .
तिची आई मात्र सारखी "लबाड कुठली " म्हणू लागली.
( कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही.
वाटलं तर एक डायपरची जाहिरात समजा.)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ह___
वाटच बघत होतो.
सकाळी जरा घाईतच वाचली होती.
वां_
आवडल
धन्यवाद हो!
झ _ _
कत्ती, आमी नाय बोल्नाल जा!
अच्चं नै कलायच्चं दमामि (दादा
=))
चांगलंय !!
निरागस विडंबन! आवडलं!
मस्त लेख
बसा. तुम्ही शोधत बसा आणि
छान आहे.. आवडलं..!!
भें _ _ मस्तय ;)
टक्कूमक्कूशोनू जरा
खि खि खि
हुर्रॆ
आर्र…गल्ली चुकली!
"ल _ _ कु _ _" म्हणजे काय?
लबाड कुठला!
मांत्रिकभौ, मिपाकर किती
जबराट
पु__
पुरष्या???
एकदम भारी!!!
वरच्या प्रसंगातून एक मोठी
तुमचा प्रतिसाद वाचून आता
जमलय
+१
ल ---कु दमामि!
'येड्याची जत्रा' मधे सतिश
द- मामी....
आजची बोलविती धनीण कोण? =))
सुडूक मुडूक गोणीत बेडूक
ह्म्म.. मग इकडे आणि तिक़डेही
द मामी, उत्तम विडंबन हो. :)
कसं काय सुचतं ब्वा
द मामी ची बोलविती धनीण कोण
बस का बॅट्या, अजून नाय ओळखलं
a
नाय बा ओळखलं. अता तुम्हीच
_/\_
धन्यवाद!
ड__
अ_ रां__ __दा स__!:क्ष**
:)
अतिशय अस्वस्थ वाटलं लेख वाचुन
रोफल