✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

स्थापत्य- एक कला

प
प्यारे१ यांनी
गुरुवार, 10/15/2015 - 04:08  ·  लेख
लेख
मूलभूत गरजां पैकी शेवटची पण महत्त्वाची गरज म्हणजे निवारा. आदिमानवाच्या गुहेपासून ते आताच्या प्रचंड आलिशान घरांपर्यंत खरंतर घर म्हणन्यापेक्षा महाल, राजवाड़े किंवा आपल्या भाषेत 'पॅलेस' म्हणावं अशा अनेक इमारती निवारा याच सदरात येतात. निवाऱ्याबरोबरच आणखी काही गरजा भागवण्यासाठी करावं लागणारं तात्पुरतं बांधकाम ते त्याच गरजेचं आपल्या सत्ता, संपत्ति, सामर्थ्याच्या अभिव्यक्ती करता वापरल्या जाणाऱ्या दृश्य रुपाला कदाचित स्थापत्यकला मानलें जावं. मी कुणीतरी मोठा, लोकोत्तर म्हणून काहीतरी अचाट घडवेन या भावनेतून जगातली काही स्थापत्य शिल्पं बनली. काही संरक्षणाच्या दृष्टीनं, काही दिखावा म्हणून तर काही व्यापारासाठी, बरीच गरज म्हणून देखील घडली. चीनच्या भिंतीपासून अनेक गड़किल्ले, भव्य पुतळे, धरणं, कालवे, पूल, बोगदे याचीच प्रतिकं. आता एवढ्या मोठ्या पातळीवर विचार न करता सध्याच्या स्थापत्याबाबत विचार करावा इतपत साधा प्रयत्न आहे. सहजसाध्य वाटल्यानं आणि भरघोस आर्थिक उत्पन्न मिळू शकल्यानं शिरलेल्या अपप्रवृत्तीनी भरपूर बदनाम झालेल्या या क्षेत्राकड़े योग्य प्रकारे पाहिल्यास एक समाधानाची भावना निश्चित दिसू शकेल. वर सगळीकडं मी स्थापत्य कला म्हणतोय कारण त्यात मला कला दिसते जाणवते. अगदी साध्यातल्या साध्या इमारतीच्या उभारणीमध्ये देखील कला असते. सगळ्यांचा विचार करण्यापेक्षा आपल्या घराच्या रचनेचा विचार केला तरी आपल्याला ते पटेल. एक घर किंवा एक इमारत कशी बनते हे आता पाहू. काही इंग्रजी शब्द येतील ते सोपे करण्याचा प्रयत्न करेन. कुठल्याही इमारतीमध्ये सगळ्यात वरुन खालच्या आणि तिथून आणखी खालच्या बाजूला वजन (लोड) स्थानांतरीत होत असतं. यात सुद्धा लाईव्ह लोड म्हणजे व्यक्ति किंवा वस्तू ज्या एका जागेवरून दुसरीकडे हलू शकतात तर डेड लोड म्हणजे बांधकामाचं स्वत:चं वजन असे प्रकार असतात. स्वत:च्या वजनात लोखंड, खड़ी,वाळू,सिमेन्ट,विटा, टाईल्स यांच्या घनतेनुसार वजन गृहीत धरलं जातं. इमारतीचा आराखडा नि सांगाडा बनवताना याचा एका अधिकच्या संरक्षक आकड्यासहीत (सेफ्टी फैक्टर) विचार होतो. याबरोबर भूकंपामुळे येऊ शकणारे हादरे, उंच इमारतीमध्ये वाऱ्याचा दाब, पाणथळ किंवा दलदलीच्या जमिनीच्या जागी इमारतीच्या वजनामुळे वरुन आलेल्या वजनाला विरोध करणारा खालच्या बाजूनं येणारा दाब, मातीची क्षमता असे अनेक विषय इमारत बनवण्या आधी विचारात घ्यावे लागतात. हे सगळं व्यवस्थित विचारात घेऊन बनतो इमारतीचा सांगाडा. कुठेही भिंत घातली, कुठलाही खांब काढला किंवा कुठेही slab ला छिद्र पाडलं असं चालत नाही त्याबरोबरच कुठल्याही नाल्याशेजारी अथवा नदीशेजारी पाया रचून देखील. वरील गोष्टीन्चा विचार करून इमारतीचा सांगाडा बनवणं हे निष्नात आणि अधिकृत व्यक्ति किंवा संस्थेकडून केलं जातं त्याला स्ट्रक्चरल इंजीनियर म्हणतात. मातीची आवश्यक क्षमता पारखण्याचं वेगळंच क्षेत्र स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये आहे त्याला सॉइल इंजीनियरिंग म्हणतात तर इमारत उभी राहताना नेमकी कशी उभी राहील हे आर्किटेक्ट पाहतो. आर्किटेक्टच्या अचाट नि अतर्क्य स्वप्नाला स्ट्रक्चरल इंजिनीयरच्या ताकदवान सांगाड्यासहीत असेल त्या मातीच्या पायात उभा करतो तो कंत्राटदार/कॉंट्रॅक्टर. लक्षावधी इमारती व्यवस्थित उभ्या असताना नि संपूर्ण मानवजातीचं रक्षण करताना आपण त्या उभ्या करण्यामागचे कष्ट सुद्धा लक्षात घेतले पाहिजेत. सध्या एवढंच. आवडलं तर पुढे लिहीन.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी

प्रतिक्रिया द्या
11568 वाचन

💬 प्रतिसाद (62)

प्रतिक्रिया

आर्किटेक्चर च्या आभासक्रमात

'पिंक' पॅंथर्न
Sun, 10/18/2015 - 17:10 नवीन
आर्किटेक्चर च्या आभासक्रमात मॅथ्स चा समावेश असतो. पण बिल्डींग स्टॅबीलीटी पेक्षा डिझाईन वर जास्त भर दिला जातो. आर्कीटेक्टने जरी कॉलम / स्टील वगैरे डिझाईन केले तरी त्याला स्ट्रक्चरल इंजिनिअरची सही/ मान्यता असल्याशिवाय ऑथंटीक डाक्युमेंट म्हणता येत नाही....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

ह्यात अजिबातच तथ्य नाही.

इन्ना
Mon, 10/19/2015 - 12:17 नवीन
ह्यात अजिबातच तथ्य नाही. इम्जिइनियरिंग डिझाइन ( स्ट्रेन्थ ऑफ मटेरियल्स , अ‍ॅप्लाईड मेकॅनिक्स सारखे विषयही असतात) अभ्यासाला आर्किटेक्चरच्या अभ्यासक्रमात. एखादी वास्तू डिझाईन करताना ती बांधता येणे प्रॅक्टीकली शक्य आहे ना हे समजणे आवश्यक असते. तसच वास्तू बांधली जाते त्या ठिकाणचे नियम ( बाउंड्री पासून सोडायचे अंतर , उंची, पिण्याच्या पाण्याची , सांडपाण्याची व्यवस्था, उजेड, उंच इमारती बाबतीत फायर प्रिवेन्शन इत्यादी) पाळून प्लॅनिङ करणे ही आर्कीटेक्टची जबाबदारी असते व वास्तू त्या प्लॅन प्रमाणे उभ राहील अस स्ट्रक्चरल डिझाइन करणे स्ट्रक्चरल डिझायनर ची ( सहसा सिव्हिल इंजिनियर) जबाबदारी असते. कायद्यानी .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

वास्तुविशारद

vijaykharde
Tue, 10/20/2015 - 14:13 नवीन
आर्किटेक्चर ला वास्तुशास्त्रविशारद म्हणुया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: 'पिंक' पॅंथर्न

माझा दादा आरकिटेक्ट आहे.

बिन्नी
Tue, 10/20/2015 - 13:29 नवीन
माझा दादा आरकिटेक्ट आहे. त्याला हा लेख पाठवला. आवडल
  • Log in or register to post comments

च्यामारी प्यारेलाल. हुशार

अभ्या..
Tue, 10/20/2015 - 13:35 नवीन
च्यामारी प्यारेलाल. हुशार हायेस लका. मला वाटले तुला फक्त................ असो. लेखमाला आवडली. पुढे लिहित राहा. बिल्डर लोक्स हायेत तवर आम्ही हावोत. ;) जर्रा मॅथ्स अन ट्रिग्नोमेट्री जमली असती तर म्याबी आर्किटेक्ट झालो असतो लका.
  • Log in or register to post comments

आमी मिपावर आमच्या अकलेचं तारं

प्यारे१
Tue, 10/20/2015 - 13:39 नवीन
आमी मिपावर आमच्या अकलेचं तारं तोडाय येत न्हाय आब्या. मिपाभाईर लै मोट्टं जग हाय. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

सहमत :)

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 10/20/2015 - 14:40 नवीन
सहमत :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

आमी मिपावर आमच्या अकलेचं तारं

बॅटमॅन
Wed, 10/21/2015 - 14:51 नवीन
आमी मिपावर आमच्या अकलेचं तारं तोडाय येत न्हाय आब्या.
खरं म्हणतील कुणीतरी. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

;)

प्यारे१
Wed, 10/21/2015 - 15:25 नवीन
;) आमी जरा ट्यार्पी वाढवायचा प्रेत्न करत होतो रे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

खूप हाणामारी झाली आता एकेक

कंजूस
Tue, 10/20/2015 - 20:17 नवीन
खूप हाणामारी झाली आता एकेक छोट्या मुद्द्याचे लिहा कोणीतरी.
  • Log in or register to post comments

नाहीतर मी लिहू का?

कंजूस
Tue, 10/20/2015 - 20:19 नवीन
नाहीतर मी लिहू का?
  • Log in or register to post comments

ऑलवेज वेलकम काकाश्री.

प्यारे१
Tue, 10/20/2015 - 20:22 नवीन
ऑलवेज वेलकम काकाश्री.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा