दुष्काळ वणवा
पावसाचे थेंब हे आटुन गेले सारे,
दाटलेले मेघ तरीही कोरडेच वारे,
उष्णतेचा वणवा सहन कुणा होइना,
तापलेल्या मातीचा रंग कुणी पाहीना,
चातकाचा उर भरुन ही गीत मुखी येईना,
सांज वेडी बावरली तीज धीर कुणी देइना..
विजांचे चमकणे ढगात लुप्त झाले,
मेघांचे नगाडे ही आज गप्प झाले,
उन्हाचे तेज ही आणखीच तप्त झाले,
भरल्या मनी माञ आसुच फक्त मागे...
पुढे वाढवली तरी चालेल..
काव्यरस..
+१
धन्यवाद .मी अजून लहान आहे .