केरळी फिश करी

इडली डोसा's picture
इडली डोसा in पाककृती
7 Oct 2015 - 11:50 pm

एका केरळी मैत्रिणीच्या डब्यातून नेहमी हि फिश करी खाणं व्हायचं . आता या मैत्रिणीची बदली दुसऱ्या हापिसात झाल्यावर तिला म्हटलं मला पण तुझी केरळी फिश करी करायला शिकव. मग तिने सांगितलेल्या पद्धतीने लगेच करून बघितली फिश करी आणि त्याचीच रेसिपी इथे दिलीये. .
टीप: ह्या फिश करी साठी मी तिलापिया मासा वापरला आहे. त्याप्रकारच्या सगळ्या माश्यांसाठी ही कृती वापरता येईल .
साहित्य :
१. स्वच्छ केलेले ४ -५ माश्याचे मोठे तुकडे
२. १ छोटा कांदा
३. १ टोमॅटो
४. ४ -५ कढिपत्ता पाने
५. मोहरी
६. चिंचेचा कोळ
७. सुकं खोबरं (अर्धी वाटी कीस )
८. कोथिंबिर
९. लाल तिखट / लाल मिर्ची पूड
१०. धणे पूड
११. मीठ
१२. तेल २ मोठे चमचे

कृती :
- मासे फ्रोझन असतील तर फ्रीझर मधून काढून त्याला हळद आणि मीठ लावून बाकीची तयारी होईपर्यंत बाजूला ठेऊन द्या
- कांदा टोमॅटो बारीक चिरून घ्या
- खोबरं आणि कोथिंबीरीमध्ये थोडं पाणि घालून त्याची पेस्ट करा

- आता एका पसरट भांड्यात / कढईत तेल तापायला ठेवा ( मला मातीच्या भांड्याच उद्घाटन करायचं होतं , म्हणून मी ते वापरलं आहे )
- तेल थोडं तापल्यावर नुसती मोहरी आणि कडीपत्त्याची फोडणी घाला
- त्यानंतर फोडणीत कांदा टोमॅटो घालून ते एकजीव होई पर्यंत परता

- थोडा चिंचेचा कोळ एक कप पाण्यात एकत्र करून हे पाणी कांदा टोमेटोच्या मिश्रणात ओता
- माश्याचे छोटे तुकडे करा आणि पाण्याला उकळी आली की त्यात हे तुकडे सोडा
- २ मिनिट थांबून आता त्यात खोबरं कोथिंबिरीची पेस्ट घाला

- एका बाजूला छोट्या फोडणीच्या भांड्यात तेल घालून त्यात धणे पावडर आणि तिखट पूड अगदी २ मिनिट परतून घ्या

- आता ही तिखटाची पेस्ट करी मध्ये घाला

- भांडं पाचेक मिनिट झाकून ठेवा

- मासे शिजले आहेत कि नाही याचा थोडाअंदाज घ्या आणि गॅस बंद करा

झाली फिश करी तयार , तुमच्या आवडीनुसार भात , चपाती किंवा भाकरी बरोबर खा

प्रतिक्रिया

भाजी केलीये ती कढई मातीची आहे का? छान दिसतेय.
भाजीपण छान दिसतेय. पण आम्ही बटाटे घालून करू. :)

विंजिनेर's picture

8 Oct 2015 - 2:31 am | विंजिनेर

भाजी केलीये ती कढई मातीची आहे का

भाजी??? अहो फिश करी आहे हो ती... कालवण तरी म्हणा हवं तर.. भाजी म्हटल्यावर एकदम कायच्या काय वाट्टं

रातराणी's picture

8 Oct 2015 - 6:43 am | रातराणी

:)
@ इडली डोसा: नुसते फोटो बघून प्रतिसाद दिल्याचा परिणाम. तू सांगितलच आहे ते भांड मातीच आहे म्हणून. :)

इडली डोसा's picture

8 Oct 2015 - 8:06 am | इडली डोसा

भाजी वाचुन असं वाटलं कि माश्या ऐवजी मी चुकुन मेथीच्या भाजीची रेसिपी टाकली कि काय? ;)
मराठीत माश्याचा रस्सा म्हणता येईल याला

कपिलमुनी's picture

8 Oct 2015 - 12:06 am | कपिलमुनी

भारी जमली आहे

मातीचे भांडे छान आहे. त्यात फोडणी करता येते ही नवी माहिती आहे.

इडली डोसा's picture

8 Oct 2015 - 8:09 am | इडली डोसा

मी या भांड्याला कढई सारखं वापरते.

पिलीयन रायडर's picture

8 Oct 2015 - 10:47 am | पिलीयन रायडर

अगं रेवाक्का.. अगदी रेग्युलर कढई सारखं वापरता येतं मातीचं भांडं.. आणि इतक्या सुंदर शिजतात भाज्या. नक्की ट्राय कर.

एस's picture

8 Oct 2015 - 1:30 am | एस

वाखुसाआ.

श्रीरंग_जोशी's picture

8 Oct 2015 - 2:36 am | श्रीरंग_जोशी

उत्तम सादरीकरण.

पुपाप्र.

अयय्यो...हे मिपाकर मंडळी मला फिश इटर बनवुनच सोडणार असते वाटते की हो !

{ वडा सांभार } ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ittage Recchipodham... ;) :- Temper

तुला काय गं सगळं साऊथ इंडियन च आवडतं का? :) रंग सुरेख आलाय, सादरीकरण पण झकास ! नक्की करुन बघेन.. मातीच्या कढईचा वास लागला का गं छान?

इडली डोसा's picture

8 Oct 2015 - 8:12 am | इडली डोसा

कनेडीयन पदार्थाची रेसिपी टाकते हं पुढच्यावेळी :P

स्रुजा's picture

8 Oct 2015 - 7:31 pm | स्रुजा

टाक नक्की :)

इडली डोसा's picture

8 Oct 2015 - 8:16 am | इडली डोसा

प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार.

बघून गेले गं रेसिपी! छान सादर केलीये.

नूतन सावंत's picture

8 Oct 2015 - 8:46 am | नूतन सावंत

यार,ती शेवटच्या फोटोतली करी कढईसकट टेबलावर आणण्यासाठी कोणती जादू करावी?

इडली डोसा's picture

8 Oct 2015 - 7:09 pm | इडली डोसा

आमच्या टेबलावर येउन बसावे :)

नूतन सावंत's picture

8 Oct 2015 - 7:53 pm | नूतन सावंत

पहिली संधी मिळाली की,येतेच.

अमृत's picture

8 Oct 2015 - 10:39 am | अमृत

खरच तोपासू.

पिलीयन रायडर's picture

8 Oct 2015 - 10:46 am | पिलीयन रायडर

मातीच्या भांड्यातलं काहीपण आपल्याला फार आवडतं. पण तू नेमका मासा केलास.. हरकत नाय.. आम्ही पनीर घालु (जय दिपक बाबा!)

रंग एक नंबर आलाय...!

पियुशा's picture

8 Oct 2015 - 11:02 am | पियुशा

मस्त दिसतिये फिश करी.

स्वाती दिनेश's picture

8 Oct 2015 - 11:55 am | स्वाती दिनेश

फिशकरी छानच दिसतेय,
मला ते मातीचं भांडं फारच आवडलंय.. ते असं कढई सारखं वापरता येतं हे माहित नव्हतं.
स्वाती

बॅटमॅन's picture

8 Oct 2015 - 12:24 pm | बॅटमॅन

इन्द कर्री रोम्बा नल्ला इरुक्कु! (मलयाळम तेरियादु).

इडली डोसा's picture

8 Oct 2015 - 7:13 pm | इडली डोसा

मिका नांद्रि बॅट्मन... तमिळ मळ्ळ्याळम नन्गे बरुदिल्ला .. स्वल्प कन्नडा बरतदे. हुश्श दमले एवढ लिहुन.. आम्ही मराठीच आहोत हो.

आम्हीही मराठीच ओ. नानगे कूडा बरे स्वल्प कन्नडा बरतदं. :)

स्वल्प कसलं, मेल्याला कोणी कन्नडभाषिक भेटलं की ज्यास्तीच बरतदं!!

सौंदाळा's picture

8 Oct 2015 - 12:28 pm | सौंदाळा

मातीचे भांडे धुता येते का व्यवस्थित? टिकते का?
म्हणजे मासे शिजवुन धुवुन नंतर दुसरी भाजी केली तर माशाची (आधीच्या केलेल्या पदार्थाची चव येत का परत)
माशापेक्षा मातीचे भांडे बघुन जास्त जळजळ झाली.
घ्यावे म्हणतो लवकरच

नाखु's picture

8 Oct 2015 - 12:40 pm | नाखु

मलाही सांगणे मिळत असेल तर ( मातीचे भांडे)
मासे नाही.
माश्यांशिवाय काय शाकाहारी जिन्नस वापरून ही पा कृ करावी.

या विवंचनेतला नाखु

पिलीयन रायडर's picture

8 Oct 2015 - 12:50 pm | पिलीयन रायडर

मी कुंभाराकडुन साधे मातीचे काळे मडके घेतले आहे. त्यात मी अनेकदा बिर्याणी केली आहे. उत्तम होते.
शिवाय भरीत, इतर काही भाज्याही केल्या आहेत. उत्तम होतात,

मातीचे भांडे वापरण्यासाठी:-
भांड्यात पाणी भरुन ७-८ दिवस ठेवावे. पाणी बदलत रहावे.
पहिल्यांदा वापरताना गॅसवर ठेवुन पाणी उकळावे.

भांड तापवताना थोडासा वेळ लागतो पण एकदा तापलं की साधारण धातुच्या भांड्याएवढाच वेळ लागतो.

भांडे स्वच्छ करण्यासाठी
मी पाणी भरुन ठेवते. सगळं खरकटं सुटलं की मग प्लास्टिकच्या घासणीने स्वच्छ घासुन घेते. शक्यतो साबण लावत नाही कारण तो छिद्रांमध्ये जाउन बसतो.

पुढल्यावेळी वापरताना भांडे तापवले की तेल सुटल्यासारखे दिसते. म्हणुन मी परत थोडे पाणी उकळुन घेते म्हणजे आधीची चव / अन्नाचे कण येत नाहीत.

मी बिर्याणीच्या आधी सर्व भाज्या मॅरिनेट करुन ठेवल्या होत्या, त्यांना एक वाफ काढली होती ह्या भांड्यात तर फारच सुरेख चव आली. तेच मी साध्या कढईतही करुन पाहिले तर तशी चव आली नाही.

प्राधिकरणात सिटिप्राईड शाळेपाशी जे मैदान आहे तिथे मी एक पसरट भांडे आणि तवा घेतला आहे. पण अजुन तवा वापरलेला नाही कधी.

पिलीयन रायडर's picture

8 Oct 2015 - 12:54 pm | पिलीयन रायडर

ही भांडी कुंभारवाड्यात ६०-१००/- रुपयाला मात्र मिळतात. त्यामुळे चुकुन फुटले तरी दु:ख नाही.

निर्लेपची ही भांडिसुद्धा मिळतात - http://www.elephantdesign.com/case-study/Product-Design/Bhoomi/49.aspx
महाग आहेत.

शिवाय त्याला एक कोटिंग आहे. त्यामुळे मातीची चव कशी लागणार ते माहीत नाही. आधी प्रयोग म्हणुन कुंभारांकडुन घ्या. आणि त्यांना बिचार्‍यांना पण स्कोप द्या!

उपयुक्त आणि तपशीलवार माहिती
धन्यवाद.

इडली डोसा's picture

8 Oct 2015 - 7:06 pm | इडली डोसा

हे भांडं इथुन घेतल आहे
http://www.amazon.com/gp/product/B00T57FQPI?psc=1&redirect=true&ref_=oh_....
याला कसलही कोटिंग नाहिये. भांड वापरायला सुरुवात करण्याआधी ४ दिवस क्युअर करायला लागलं. कसं क्युअर करायचं त्याची माहिती भांड्याबरोबर आलेल्या मॅन्युअल मधे होती.
मी यात भाजी करुन झाली कि ती लगेच दुसर्‍या भांड्यात काढुन ठेवते आणि हे भांड थोडं गार झालं कि मग कोमट पाण्यात थोडा लिक्विड सोप टाकुन धुते. मासा करायच्या आधि यात पालक पनीर केला होत त्यामुळे माश्याला त्याचा वास नाही लागला अजुन माश्यानंतर काही करुन बघितलं नाहिये.
भारतातुन आणणं स्वत पडल असतं पण ते निट आलं असतं कि नाही याची खात्री वाटत नव्हती म्हणुन इथेच ऑनलाईन मागवलं. ८" आहे भांड पण फक्त दोन लोकांसाठीच पुरेस आहे. कोणि घेणार असाल तर थोडं मोठ घ्या.

मस्त ग इडली! छानच दिसतेय कढई. नक्की घेणार. भरली वांगी करेन त्यात.

इडली डोसा's picture

9 Oct 2015 - 7:58 am | इडली डोसा

माझा नवरापण व्हेजिटेरियन आहे. मी पण करणार भरली वांगी त्याच्यासाठी.

दिपक.कुवेत's picture

8 Oct 2015 - 1:14 pm | दिपक.कुवेत

मातीचे भांडे घेतल्यावर ते स्वच्छ कसे करायचे हेच माहित नव्हते म्हणून ईतके दिवस घ्यायची टाळाटाळ करत होतो. आता जाउन घेतोच. बाकि फिश करी बद्दल काय बोलणार.... ह्याच्या बरोबर साउथ ईंडियन मट्टा राईस असेल तर बास....जेउन जी समाधी लागते त्याला तोड नाहि. फोटो छान आलेत.

मधुरा देशपांडे's picture

8 Oct 2015 - 1:21 pm | मधुरा देशपांडे

मस्त पाकृ आणि सादरीकरण.

पद्मावति's picture

8 Oct 2015 - 1:43 pm | पद्मावति

खूप छान पाककृती आणि फोटो. मातीचं भांडं खूपच मस्तं.

वाव इडली.. मस्तच आहे पाकृ. मी नक्की करुन बघणारे हि करी. ते मातीचे भांडे तर मस्तच. घरी साबांकडे पण आहे एक मातीचे भांडे. त्या त्याच्यामधे प्रॉन्सकरी करतात. भारी एकदम.
मी मागच्या वर्षी भारतातुन येताना मातीचे छोटे मडके आणले आहे. त्यात मी बिर्याणी करते. पण तेवढी २ जणांना पुरत नाही त्यामुळे जास्त करणे होत नाही त्यात.

प्यारे१'s picture

8 Oct 2015 - 2:57 pm | प्यारे१

अरे मडक्या.... बद्दल काय बोलताय रे?

त्या माशाचा जीव गेलाय त्याबद्दल बोला की काही!

प्रभाकर पेठकर's picture

8 Oct 2015 - 2:59 pm | प्रभाकर पेठकर

फिश करीची पाककृती जरा वेगळी आहे. करून पाहिली पाहिजे.

बाकी, मुख्य गायकापेक्षा वादकांनाच वाहवा मिळाल्याने मैफिलीत रंग भरला नाही.

स्वाती२'s picture

8 Oct 2015 - 4:19 pm | स्वाती२

छान पाकृ! शेवटचा फोटो खास!

सानिकास्वप्निल's picture

8 Oct 2015 - 7:39 pm | सानिकास्वप्निल

छान आहे पाककृती, फोटो ही मस्तं आहेत.
मातीचे भांडे फार फार आवडले आहे ;)
ह्यावेळेस भारतवारीत मातीचा छोटा तवा आणलाय , त्यावर भाकर्‍या छान, खमंग होतात. मातीचे तवकट आणायची फार इच्छा आहे पण कसे ते कळत नाही.

इडली डोसा's picture

9 Oct 2015 - 8:02 am | इडली डोसा

तवकट म्हणजे काय?

इडली डोसा's picture

9 Oct 2015 - 8:01 am | इडली डोसा

सानिका तुझ्या पाक्रुंसमोर हि करी किस झाड की पत्ती. शिकते आहे इथे सगळ्यांच बघुन.

इशा१२३'s picture

9 Oct 2015 - 12:20 pm | इशा१२३

मला फक्त ते सुंदर मातीचे भांडे दिसत आहे.पत्ता देते पाठवुन देणे.
मी पनीर ,बटाटे अस काहि घालुन करावी म्हणतेय.मासे काहि कामाचे नाहित.

मातीच्या भांड्याचा विषय चर्चिला गेला आहे म्हणून माझे चार पैसे. (झैरात वाटत असल्यास इग्नोर करावे)

मुंबई गोवा हायवे (NH17) वरती माणगांव जवळ (पनवेलकडून आल्यास माणगांवच्या अलिकडे १० किमी आणि पुण्यातून गेल्यास ताम्हिणीघाट-निजामपूर-माणगांव-इंदापूर असा रूट आहे) इंदापूर नामक छोट्याश्या गावात श्री. राजेश कुलकर्णी यांचे "आकार पॉट आर्ट" नामक 'स्टुडीओ पॉटरी आर्ट' चे वर्कशॉप आहे.

माझ्याकडे असणार्‍या बहुतांश मातीच्या वस्तू त्यांच्याकडून आणलेल्या / तयार करून घेतलेल्या आहेत. पाणी प्यायचे तांब्या-भांडे, सातारी लोटा, गडू, वेगवेगळ्या आकाराचे ग्लासेस, पाणी प्यायचीच मातीची बाटली अशा वेगवेगळ्या घाटाची भांडी त्यांच्याकडे ऑर्डर देवून करून घेता येतात. मी अनेकदा तांब्याच्या (Copper) किंवा मिळतील त्या वस्तू त्यांच्याकडे घेवून जातो व त्यामध्ये हवे ते बदल करून मातीच्या रोज वापरायोग्य वस्तू तयार करून घेतो. वरील प्रकारचे / आणखी कोणत्याही प्रकारचे स्वयंपाकाचे भांडे त्यांच्याकडे मिळू शकेल. फक्त तेथे जाण्यायेण्याची चिकाटी असावी कारण पुण्यातून इंदापूरचे अंतर साधारणपणे १३० किमी आहे.

त्यांचे शोरूमही बघण्यासारखे आहे. सजावटीच्या वेगवेगळ्या वस्तू, शोपीस, नेमप्लेट्स, पॅनल्स अशा असंख्य प्रकारच्या वस्तू तेथे मिळतात.

स्टुडीओ पॉटरी आर्ट असल्याने मातीचे फिनिशींग एकदम स्मूथ असते व मातीही भारतातल्या बर्‍याच ठिकाणांहून आणि बहुदा काही प्रकार भारताबाहेरून आणवलेली असते. तसेच एकंदर सेटअप अत्याधुनीक आहे. वस्तूंच्या किंमती पाहताना या सर्व बाबी विचारात घ्याव्यात असे आवर्जून नमुद करत आहे.

(मातीचा एक तांब्या व एक भांडे यांची किंमत अंदाजे ४००/-, पाणी प्यायच्या ६ ग्लासच्या सेटची किंमत ६००/-)

या प्रकारची झाकणाला ग्लास जोडलेली तांब्याची बाटली त्यांच्याकडे पाठवून मातीची बाटली करवून घेतली. यामध्ये सछिद्रता कमी असते त्यामुळे पाणी फारसे गार होत नाही परंतु वॉटर कंटेनर म्हणून घरातल्या घरात वापरण्यास उपयुक्त आहे.

.

त्यांच्या स्टुडीओची एक झलक..

.

त्यांचा पत्ता..

Behind Indapur S.T.Stand,, A/p:Talashet, Tal: Mangaon, Dist: Raigad, Mumbai-Goa road NH 17, Indapur, Maharashtra 402112

Phone:02140 266 266

आणखी एक..

मागच्या आठवड्यातील इंदूर ट्रीपमध्ये एक वेगळ्या प्रकारचा तवा मिळाला. (हा तवा मध्य प्रदेशातील "धार" येथून आणलेला आहे)

या तव्याला "कल्ला" म्हणतात.

.

वरून दिसत आहे तसे स्मूथ तर आतून थोडेसे खरखरीत फिनीशिंग आहे. याला एकसमान अंतरावर आरपार छिद्रे असल्याने फुलका भाजताना नंतर फ्लेमवर भाजून फुगवावा लागत नाही. यावरच भाजतो आणि फुगतो. मातीवर भाजल्याने एकप्रकारचा खमंगपणा येतो.

_मनश्री_'s picture

9 Oct 2015 - 2:06 pm | _मनश्री_

माहितीबद्दल खूप आभारी आहे
बऱ्याच वर्षांपासून मातीचा डिनर सेट असावा अशी फार इच्छा होती . पुण्यात भरपूर शोध घेतला पण मिळाला नाही
पण आता मिळेल ,
माहितीबद्दल पुन्हा एकदा आभार

स्टुडिओ खूप छान आहे

माहितीबद्दल धन्यवाद. घड्याळे आवडली आहेत. या ठिकाणी भेट द्यायला आवडेल.

इडली डोसा's picture

9 Oct 2015 - 7:37 pm | इडली डोसा

मला फार आवडला स्टूडीओचा फोटो. बघु कधी जाणं होतये.तांब्याची भांडी पण मस्त!

_मनश्री_'s picture

9 Oct 2015 - 1:54 pm | _मनश्री_

1

वा !!!!
खूपच मस्त झालीये फिशकरी

अप्रतिम आहेत वस्तु.छान माहिती स्टुडिओची.