✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लालबहादुर शास्त्री जयंती......

_
_मनश्री_ यांनी
Fri, 10/02/2015 - 10:52  ·  लेख
लेख
1 आज भारताचे द्वितीय पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची ११० वी जयंती त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन पंडित नेहरुंच्या मृत्यूनंतर लाल बहादुर शास्त्री यांना त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे पंतप्रधान पद दिल गेल लाल बहादुर शास्त्री ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६ म्हणजे मृत्युपर्यन्त जवळ जवळ अठरा महीने ते पंतप्रधान पदी होते त्यांच्या साधेपणा, देशभक्ती आणि प्रामाणिकपणा यासाठी त्यांना 1966 मध्ये मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आले.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना

प्रतिक्रिया द्या
4783 वाचन

💬 प्रतिसाद (23)

प्रतिक्रिया

विनम्र अभिवादन.

पद्मावति
Fri, 10/02/2015 - 11:08 नवीन
विनम्र अभिवादन.
  • Log in or register to post comments

विनम्र अभिवादन

गामा पैलवान
Fri, 10/02/2015 - 12:14 नवीन
मनरंग, शास्त्रीजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. 'ये धोती पहननेवाले क्या कर सकते है?' असा उर्मट प्रश्न अयुबखानाने १९६५ साली विचारला होता. शास्त्रीजींनी शांतपणे जाहीर केलं की भारतीय सैन्य पाकिस्तानी पंजाबमध्ये शिरेल. आणि अगदी तसंच झालं. असं सडेतोड उत्तर देणाऱ्या शास्त्रीजींची बटुमूर्ती आजही प्रेरणादायक आहे. जय जवान जय किसान ही घोषणाही त्यांचीच. स्मृती जागवल्याबद्दल आभार. :-) आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

ब्रिटीशांना बाणेदार उत्तर

रमेश आठवले
Fri, 10/02/2015 - 20:56 नवीन
१९६५ च्या युद्धात पाकिस्तान ने काश्मीर हद्दीवर आपला फौज फाटा एकत्र केला होता आणि भारत फक्त तेथेच त्यांच्याशी लढेल असा त्यांचा अंदाज होता. आंतरराष्ट्रीय सीमेवर भारत लढेल असे त्यांना वाटले नाही. इतर देशांचाही तसाच तर्क होता. त्यांना ही असे वाटत होते की काश्मीरच्या वादग्रस्त भागातच हे युद्ध मर्यादित राहील. भारतीय फौजांनी, काशीर मधील पाकिस्तानी दबाव कमी करण्या साठी, आंतरराष्ट्री सीमा ओलांडल्यावर तत्कालीन ब्रिटीश पन्तप्रधान हरोल्ड विल्सन यांनी शास्त्री याना पत्र लिहून तुम्ही आंतरराष्ट्रीय सीमा का ओलांडली असा प्रश्न विचारला. त्या वर शास्त्री यांनी तुम्ही या प्रश्नाचे उत्तर तुमच्या जनरल ना विचारा असे लिहून कळवले होते .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गामा पैलवान

शास्त्रीजींच्या स्मृतीला

प्यारे१
Fri, 10/02/2015 - 12:16 नवीन
शास्त्रीजींच्या स्मृतीला विनम्र अभिवादन. आणखी एका थोर नेत्याला आज जनता विसरलेली दिसतेय. त्यांनाही विनम्र अभिवादन.
  • Log in or register to post comments

+१.. हा धागा जर धागाकर्त्याने

आनन्दा
Fri, 10/02/2015 - 12:33 नवीन
+१.. हा धागा जर धागाकर्त्याने दोघांच्याही स्मृतीसाठी काढला असता तर जास्त आनंद झाला असता. दोन्ही महामानवांना विनम्र अभिवादन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

२ ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंती

_मनश्री_
Fri, 10/02/2015 - 12:54 नवीन
२ ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंती हे सहसा कुणी विसरत नाही , सगळ्या देशात गांधी जयंती अगदी उत्साहात साजरी केली जाते पण ' लाल बहादूर शास्त्रीं ' ह्यांना बरेचदा विसरतात लोक म्हणून हा धागा (
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनन्दा

विनम्र

नाखु
Fri, 10/02/2015 - 12:38 नवीन
अभिवादन. सरकारी पातळीवर कायम उपेक्षा आणि अनुल्लेख आलेल्या ह्या महामानवाला सलाम.
  • Log in or register to post comments

सरकारी पातळी वर सतत अनुल्लेख

कैलासवासी सोन्याबापु
Fri, 10/02/2015 - 17:42 नवीन
सरकारी पातळी वर सतत अनुल्लेख अन उपेक्षा मी तरी म्हणाणार नाही नाखु साहेब कारण असे असता जागतिक स्तरावर पब्लिक एडमिनिस्ट्रेशन (लोक प्रशासन) ह्या विषयाला वाहिलेल्या अत्युच्च प्रोफेशनल संस्थांपैकी एक अन भारतात आईएस सारख्या अतिशय उच्च बौद्धिक अन नेतृत्व गुण असलेल्या अधिकाऱ्यांच्या ट्रेनिंग साठी जी संस्था आहे तिचे नाव "लाल बहादुर शास्त्री नॅशनल एडमिनिस्ट्रेशन अकादमी" उर्फ़ लबस्ना ठेवले गेले नसते, नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

संस्थे बाबत माहीती नाही त्याबद्दल क्षमस्व

नाखु
Sat, 10/03/2015 - 13:53 नवीन
पण एकूणात त्यांचे पेक्षा (लाल बहादुर शास्त्री) वकूबात आणि योअगदानात कमी असलेल्या लोकांना जास्त झुकते माप दिले गेले. नेहरूत्तर काळात. अर्थात जो पक्ष स्वतःच्या जुन्या पक्शाध्यक्षांना आणि प्रगतीशील पंप्रं(पी व्ही) ना अनुल्लेखत असेल त्यांच्या करीता हा राजकीय लाभ शून्य नेता काय कामाचा?? तरीही आपल्या मताचा आदर आहेच. नाखु "जय जवान जय किसान"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

तुमचा प्रतिवाद तितकाच तार्किक

कैलासवासी सोन्याबापु
Sat, 10/03/2015 - 22:04 नवीन
तुमचा प्रतिवाद तितकाच तार्किक आहे बॉस! _/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

शास्त्रीजींच्या स्मृतीला

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 10/02/2015 - 15:13 नवीन
शास्त्रीजींच्या स्मृतीला विनम्र अभिवादन !
  • Log in or register to post comments

.

dadadarekar
Fri, 10/02/2015 - 17:50 नवीन
अभिवादन
  • Log in or register to post comments

लाल बहादूर शास्त्रीं ह्यांना विनम्र अभिवादन !

द-बाहुबली
Fri, 10/02/2015 - 22:08 नवीन
सकाळपासुन फक्त 281 वाचने अन १० प्रतिसाद ...? लाज वाटली, पण आज नथ्थुचा उदो उदो न झा(के)ल्याबद्दल बरेही वाटले.
  • Log in or register to post comments

सॉरी टु डिसपॉईंट यु सर.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 10/02/2015 - 22:13 नवीन
सॉरी टु डिसपॉईंट यु सर. लाल बहादुर शास्त्रींना अभिवादन आणि नथुराम गोडसेंना हि विनम्र अभिवादन. धन्यवाद. वाद घालणार्‍यांसाठी पौड फाट्यावर ड्रॉप बॉक्स ठेवलेला आहे त्याचा सुयोग्य वापर करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

सॉरी टु डिसपॉईंट यु सर.

द-बाहुबली
Fri, 10/02/2015 - 22:57 नवीन
सॉरी टु डिसपॉईंट यु सर.
यु डिसअपाँइंटेड धिस कंट्री बाय इग्नोरींग शास्त्रीजी... अँड यु डिसअपाँइंटेड मदर अर्थ बाय नॉट इग्नोरींग नथ्थु.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

असो.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 10/02/2015 - 23:21 नवीन
असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

.अग्गोबै !

dadadarekar
Sat, 10/03/2015 - 06:31 नवीन
२ ऑक्टो. आशा पारेखचा बर्थडे विसरल्याबद्दल सर्वांचा निषेध.
  • Log in or register to post comments

आजपण नमो टीका संप्रदाय जोशात आहे

chetanlakhs
Sat, 10/03/2015 - 06:59 नवीन
नमो शास्त्रीन्च्या स्मृतिस्थलावर न गेल्याबद्दल लोकमत ने लगेच बातमी केली..शेवटी नमोना FB वर post करावे लागले..मार्क कामी आला योग्य वेळी
  • Log in or register to post comments

किती समाध्या ?

रमेश आठवले
Sat, 10/03/2015 - 20:24 नवीन
फेसबुक वरची मोदींची टिपणी पाहू शकलो नाहि. शास्त्री यांच्या सारख्या एकूण किती पन्तप्रधान व राष्ट्रपती यांच्या समाध्या दिल्लीत आहेत व त्यांच्या त्यांच्या पुण्यतिथीला वर्तमान पंत प्रधानांनी जायला पाहिजे याची माहिती कोणी देऊ शकेल काय ? ही एक पायंडा निर्माण करण्याची बाब आहे. महात्मा गांधींची गोष्ट वेगळी आहे.
  • Log in or register to post comments

मोदींनी गतवर्षी पंतप्रधान

श्रीगुरुजी
Sat, 10/03/2015 - 20:34 नवीन
मोदींनी गतवर्षी पंतप्रधान झाल्यापासून एक नवीन पायंडा पाडलेला आहे. यापुढे केंद्र सरकारतर्फे अधिकृतरित्या फक्त गांधीजी व सरदार पटेल यांच्याच जयंती/पुण्यतिथीला सरकारी सोहळा होईल. इतर कोणत्याही नेत्याच्या, माजी पंतप्रधानांच्या साठी अधिकृत सोहळा होणार नाही. त्यामुळेच मोदींनी अधिकृतरित्या शास्त्रींच्या स्मृतिस्थानाला भेट दिलेली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमेश आठवले

.

dadadarekar
Sun, 10/04/2015 - 08:57 नवीन
काँग्रेसमुक्त भारत करणार म्हणून कोकलणार्‍याना जयंती साजरी करायला दोनच व्यक्ती सापडल्या... त्याही काँग्रेसच्याच !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

उदात्त दृष्टी म्हणतात. एक

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 10/04/2015 - 09:15 नवीन
उदात्त दृष्टी म्हणतात. एक गोष्ट सांगा हो द रेकर. नै म्हणजे ज्या पक्षात व्यक्तीचाटुगिरी अगदी रोमारोमात भरली आहे त्या पक्षाची तुम्ही भलावण कशी काय करता हो? ते जाउ दे एक साधी गोष्ट सांगा ना. ज्या योजनेमधे मलई असते त्या योजनेला गांधी परिवाराची नावं आणि जिथे प्रत्यक्ष कामाची वेळ येते तिथे दुसर्‍या लोक्सची नावं असं का हो? उदा: राजीव गांधी अमुक तमुक योजना. आणि जिथे हागणदारीशी/ कचर्‍याशी संबंध आहे तिथे बरे गाडगेबाबा आठवतात? तिथे अमुक तमुक गांधी हादामुक्त योजना असं नावं दिल्याचं माझ्या माहितीमधे तर नाही. असेल योजना अशी तर सांगा, शब्द मागे घेइन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar

जागे व्हा

गामा पैलवान
Sun, 10/04/2015 - 13:27 नवीन
दादा दरेकर, तुम्ही म्हणताय ती काँग्रेस केव्हाच इतिहासजमा झालीये. पूर्वी जिला इंदिराकाँग्रेस म्हणायचे तिचा सांप्रत अवतार समाप्त करायचे कार्य मोदींनी अंगावर घेतले आहे. तस्मात जागे व्हा. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा