लेखक_मनश्री_यांनी शुक्रवार, 02/10/2015 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
आज भारताचे द्वितीय पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची ११० वी जयंती
त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन
पंडित नेहरुंच्या मृत्यूनंतर लाल बहादुर शास्त्री यांना त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे पंतप्रधान पद दिल गेल
लाल बहादुर शास्त्री ९ जून १९६४ ते ११ जानेवारी १९६६ म्हणजे मृत्युपर्यन्त जवळ जवळ अठरा महीने ते पंतप्रधान पदी होते
त्यांच्या साधेपणा, देशभक्ती आणि प्रामाणिकपणा यासाठी त्यांना 1966 मध्ये मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आले.
मनरंग,
शास्त्रीजींच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. 'ये धोती पहननेवाले क्या कर सकते है?' असा उर्मट प्रश्न अयुबखानाने १९६५ साली विचारला होता. शास्त्रीजींनी शांतपणे जाहीर केलं की भारतीय सैन्य पाकिस्तानी पंजाबमध्ये शिरेल. आणि अगदी तसंच झालं. असं सडेतोड उत्तर देणाऱ्या शास्त्रीजींची बटुमूर्ती आजही प्रेरणादायक आहे.
जय जवान जय किसान ही घोषणाही त्यांचीच. स्मृती जागवल्याबद्दल आभार. :-)
आ.न.,
-गा.पै.
१९६५ च्या युद्धात पाकिस्तान ने काश्मीर हद्दीवर आपला फौज फाटा एकत्र केला होता आणि भारत फक्त तेथेच त्यांच्याशी लढेल असा त्यांचा अंदाज होता. आंतरराष्ट्रीय सीमेवर भारत लढेल असे त्यांना वाटले नाही. इतर देशांचाही तसाच तर्क होता. त्यांना ही असे वाटत होते की काश्मीरच्या वादग्रस्त भागातच हे युद्ध मर्यादित राहील. भारतीय फौजांनी, काशीर मधील पाकिस्तानी दबाव कमी करण्या साठी, आंतरराष्ट्री सीमा ओलांडल्यावर तत्कालीन ब्रिटीश पन्तप्रधान हरोल्ड विल्सन यांनी शास्त्री याना पत्र लिहून तुम्ही आंतरराष्ट्रीय सीमा का ओलांडली असा प्रश्न विचारला. त्या वर शास्त्री यांनी तुम्ही या प्रश्नाचे उत्तर तुमच्या जनरल ना विचारा असे लिहून कळवले होते .
२ ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंती हे सहसा कुणी विसरत नाही ,
सगळ्या देशात गांधी जयंती अगदी उत्साहात साजरी केली जाते
पण ' लाल बहादूर शास्त्रीं ' ह्यांना बरेचदा विसरतात लोक म्हणून हा धागा
(
सरकारी पातळी वर सतत अनुल्लेख अन उपेक्षा मी तरी म्हणाणार नाही नाखु साहेब कारण असे असता जागतिक स्तरावर पब्लिक एडमिनिस्ट्रेशन (लोक प्रशासन) ह्या विषयाला वाहिलेल्या अत्युच्च प्रोफेशनल संस्थांपैकी एक अन भारतात आईएस सारख्या अतिशय उच्च बौद्धिक अन नेतृत्व गुण असलेल्या अधिकाऱ्यांच्या ट्रेनिंग साठी जी संस्था आहे तिचे नाव
"लाल बहादुर शास्त्री नॅशनल एडमिनिस्ट्रेशन अकादमी" उर्फ़ लबस्ना ठेवले गेले नसते, नाही का?
पण एकूणात त्यांचे पेक्षा (लाल बहादुर शास्त्री) वकूबात आणि योअगदानात कमी असलेल्या लोकांना जास्त झुकते माप दिले गेले. नेहरूत्तर काळात. अर्थात जो पक्ष स्वतःच्या जुन्या पक्शाध्यक्षांना आणि प्रगतीशील पंप्रं(पी व्ही) ना अनुल्लेखत असेल त्यांच्या करीता हा राजकीय लाभ शून्य नेता काय कामाचा??
तरीही आपल्या मताचा आदर आहेच.
नाखु
"जय जवान जय किसान"
सॉरी टु डिसपॉईंट यु सर.
लाल बहादुर शास्त्रींना अभिवादन आणि नथुराम गोडसेंना हि विनम्र अभिवादन. धन्यवाद.
वाद घालणार्यांसाठी पौड फाट्यावर ड्रॉप बॉक्स ठेवलेला आहे त्याचा सुयोग्य वापर करावा.
फेसबुक वरची मोदींची टिपणी पाहू शकलो नाहि. शास्त्री यांच्या सारख्या एकूण किती पन्तप्रधान व राष्ट्रपती यांच्या समाध्या दिल्लीत आहेत व त्यांच्या त्यांच्या पुण्यतिथीला वर्तमान पंत प्रधानांनी जायला पाहिजे याची माहिती कोणी देऊ शकेल काय ? ही एक पायंडा निर्माण करण्याची बाब आहे.
महात्मा गांधींची गोष्ट वेगळी आहे.
मोदींनी गतवर्षी पंतप्रधान झाल्यापासून एक नवीन पायंडा पाडलेला आहे. यापुढे केंद्र सरकारतर्फे अधिकृतरित्या फक्त गांधीजी व सरदार पटेल यांच्याच जयंती/पुण्यतिथीला सरकारी सोहळा होईल. इतर कोणत्याही नेत्याच्या, माजी पंतप्रधानांच्या साठी अधिकृत सोहळा होणार नाही. त्यामुळेच मोदींनी अधिकृतरित्या शास्त्रींच्या स्मृतिस्थानाला भेट दिलेली नाही.
उदात्त दृष्टी म्हणतात. एक गोष्ट सांगा हो द रेकर. नै म्हणजे ज्या पक्षात व्यक्तीचाटुगिरी अगदी रोमारोमात भरली आहे त्या पक्षाची तुम्ही भलावण कशी काय करता हो? ते जाउ दे एक साधी गोष्ट सांगा ना. ज्या योजनेमधे मलई असते त्या योजनेला गांधी परिवाराची नावं आणि जिथे प्रत्यक्ष कामाची वेळ येते तिथे दुसर्या लोक्सची नावं असं का हो? उदा: राजीव गांधी अमुक तमुक योजना.
आणि जिथे हागणदारीशी/ कचर्याशी संबंध आहे तिथे बरे गाडगेबाबा आठवतात? तिथे अमुक तमुक गांधी हादामुक्त योजना असं नावं दिल्याचं माझ्या माहितीमधे तर नाही. असेल योजना अशी तर सांगा, शब्द मागे घेइन.
दादा दरेकर,
तुम्ही म्हणताय ती काँग्रेस केव्हाच इतिहासजमा झालीये. पूर्वी जिला इंदिराकाँग्रेस म्हणायचे तिचा सांप्रत अवतार समाप्त करायचे कार्य मोदींनी अंगावर घेतले आहे.
तस्मात जागे व्हा.
आ.न.,
-गा.पै.
प्रतिक्रिया
विनम्र अभिवादन.
विनम्र अभिवादन
ब्रिटीशांना बाणेदार उत्तर
In reply to विनम्र अभिवादन by गामा पैलवान
शास्त्रीजींच्या स्मृतीला
+१.. हा धागा जर धागाकर्त्याने
In reply to शास्त्रीजींच्या स्मृतीला by प्यारे१
२ ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंती
In reply to +१.. हा धागा जर धागाकर्त्याने by आनन्दा
विनम्र
सरकारी पातळी वर सतत अनुल्लेख
In reply to विनम्र by नाखु
संस्थे बाबत माहीती नाही त्याबद्दल क्षमस्व
In reply to सरकारी पातळी वर सतत अनुल्लेख by कैलासवासी सोन्याबापु
तुमचा प्रतिवाद तितकाच तार्किक
In reply to संस्थे बाबत माहीती नाही त्याबद्दल क्षमस्व by नाखु
शास्त्रीजींच्या स्मृतीला
.
लाल बहादूर शास्त्रीं ह्यांना विनम्र अभिवादन !
सॉरी टु डिसपॉईंट यु सर.
In reply to लाल बहादूर शास्त्रीं ह्यांना विनम्र अभिवादन ! by द-बाहुबली
सॉरी टु डिसपॉईंट यु सर.
In reply to सॉरी टु डिसपॉईंट यु सर. by कॅप्टन जॅक स्पॅरो
असो.
In reply to सॉरी टु डिसपॉईंट यु सर. by द-बाहुबली
.अग्गोबै !
आजपण नमो टीका संप्रदाय जोशात आहे
किती समाध्या ?
मोदींनी गतवर्षी पंतप्रधान
In reply to किती समाध्या ? by रमेश आठवले
.
In reply to मोदींनी गतवर्षी पंतप्रधान by श्रीगुरुजी
उदात्त दृष्टी म्हणतात. एक
In reply to . by dadadarekar
जागे व्हा
In reply to . by dadadarekar